शांतरस

पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
26 Nov 2015 - 2:34 pm

नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी
कळेल का कधी तुला, किती तुझ्या ऋणात मी

उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा
किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी

किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी
सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी

क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी
पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी

मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी
अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी

विशाल
(२६-११-२०१५)

मराठी गझलशांतरसगझल

माझ्या मराठीचा बोल

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
2 Nov 2015 - 2:43 pm

नमस्कार

कवी अशोक बागवे यांच्या 'माझ्या मराठीचा बोल' या कवितेवरून प्रेरणा घेऊन खालील काव्य लिहिले आहे. अर्थात कवितेचा भाव अशोक बागवे यांच्या कवितेच्या अगदीच विरुद्ध आहे. आज मराठी भाषा, मराठी संस्कृती किंवा आपलं मराठीपण या गोष्टींबद्दल एकंदरितच मराठी माणसांमध्ये जी अनास्था बघायला मिळते त्यावरून खरं तर हे काव्य सुचलं. सदर परिस्थिती आशादायक नाही, आणि भविष्यात मराठी माणसाची विचारपद्धती बदलली नाही तर आगोदरच कमी असलेलं मराठीचं महत्व नगण्य होईल आणि तेंव्हा हळहळून काहीही उपयोग नसेल.

मुक्त कविताशांतरसधोरणकविताभाषा

लाजाळू नि गुलाब

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
30 Oct 2015 - 5:11 pm

लाजाळूच्या झाडापुढे
गुलाबाच फूल नको
स्पर्शाविना मिटण्याची
त्याला नवी भूल नको!

गुलाबाच फूल भारी
लाजाळूला खेटलेल
लाजाळूच झाड वेड
येता जाता मिटलेल!

कुणी द्या रे रंग-वास
लाजाळूला मिरवाया
तोरा नवा दाखवून
ताटव्याला फुलवाया!

- संदीप चांदणे

कविता माझीप्रेम कविताशांतरसकविताप्रेमकाव्यमौजमजा

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
21 Oct 2015 - 4:41 pm

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे
कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे

कुणी होत वाचाळ थयथय उगाच
कुणी शांत राहून ठेवीत जाच

कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे
असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे

कृतीतून ठरते इथे कोण वाघ
मुखे बोंबलोनी करी काय सांग

एकीत असते रहस्य यशाचे
तुम्हाला महत्व न पटले अशाचे

तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला
तिथे एक चेहरा भुलवतो जगाला

असे वेळ हाती न वागा असे रे
कशाला करावे स्वतःचे हसे रे

इथे संधी सर्वांस आहे समान
भूतापरी हो जपा वर्तमान

भावकविताशांतरसकवितासमाजराजकारण

नवमी

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
7 Oct 2015 - 5:58 pm

वडे घारगे पुर्‍या
कधी नाजूकशा सांजोर्‍या
दिंडे निवगर्‍या
तूप काठोकाठी

खमंग अळवड्या
कधी तांदुळ कुरवड्या
सुरळी पाटवड्या
कधी देठीगाठी

अबोली वळेसर
कधी केवडा त्यावर
अनंत नि तगर
मोगर्‍याची दाटी

असोल नारळ
ओटी इंद्रायणी तांदूळ
सुपारी तांबूल
खण जरीकाठी

जितेपणी याचा
कधी केला नाही सोस
आज सारे खास
अविधवेसाठी

शांतरसमुक्तक

भेट...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
29 Sep 2015 - 7:16 pm

छान छान जावे दिवस
छान छान व्हावी भेट
दिवस जसा रात्रीला
येऊन भिडतो थेट थेट

मग होते रोजची सकाळ
सूर्य येताे प्रकाशात
दिवसभर थकून भागून
रात्री मिटतो आकाशात

असाच दिवस अशीच रात्र
मला खूप आवडते
मन माझं भेटीच्या त्या
सोनसंध्येला निवडते

आवडेल तुला जीवनात
अशी भेट झाली तर?
रात्री सोबत दिवसाला
नवी पालवी आली तर!?

मैत्रीच्या या फुलामधला
परागकण मी व्हावे
अश्या भेटिच्या पूर्णत्वाला
वर्षे ने ही यावे
.............................

प्रेम कविताशांतरसकविता

..... तो कृष्ण 'एकटा' होता !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
18 Sep 2015 - 10:32 am

कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा
वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला
गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग
हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग
पण वृन्दावनचा राणा
..... तो कृष्ण 'एकटा' होता !

चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा
चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला
ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या
अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया
विश्व डोलते ज्या मुरलीवर..
...... तो कृष्ण 'एकटा' होता !

शांतरसकविता

लाघवी

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
12 Sep 2015 - 12:31 pm

तूझ्या कपाळावर रेंगाळणार्‍या
अल्लड, अवखळ...
किंचीत खोडसाळ बटा,
थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे,
आणि...
ओठावरचे मिश्किल हसू...!!

अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही,
वारंवार सावरायला लागली आहेस तू...
डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल
तू काही बोलत नाहीस...
ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य...
त्या बंद ओठाआड मात्र,
कधी पोहोचताच येत नाही बघ...
सगळं आर्त ...
त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू !

आणि ते म्हणतात...
व्वा, केवढी लाघवी पोर आहे !

विशाल...

करुणशांतरसकविता

असमाधानाची

अर्थहीन's picture
अर्थहीन in जे न देखे रवी...
13 Aug 2015 - 10:06 am

एक भरलेली 'शव'वाहिका
एका भरधाव 'रुग्ण'वाहिकेला म्हणते
.........अजुन तुझी कोणती ग़ ओढ़ बाकी??

पानसरेंच्या छातीतली गोळी
दाभोळकरांच्या डोक्यातल्या गोळीला म्हणते,
..........यापेक्षा आपली 'आत्महत्या' बरी असती.

नेमाडेंच्या दौतीतली शाई
कसबेंच्या दौतीतल्या शाईला म्हणते
.........एवढं 'रुत्तुन' लिहिलंस, तरी तू अजुन फिक्कट कशी???

कलामांची मुठमाती
याकूबच्या मुठमातीला म्हणते
.........मला कालच 'पालवी' फुटली,
तू अजुन कोरडीच कशी??

शांतरसकविता

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस's picture
एस in जे न देखे रवी...
4 Aug 2015 - 11:22 pm

(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)

प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -

('खरे' कवी यांची माफी मागून...)

dive aagarअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीमराठीचे श्लोकमुक्त कवितावाङ्मयशेतीविराणीसांत्वनास्वरकाफियाभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसहे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र