शांतरस

एकांत

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Oct 2016 - 3:10 pm

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?

चंद्र, तारे, फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं
नेमकं त्याच कडव्यावर
का मनानं सांडावं?

आजच्या बंडखोर लेखकानं
कालच्याला भांडावं!
दोघांचही चुकत नसतं
कुणाला समोर ठेवावं?

तिन्हीसांजेची वेळ समोर
अन एकांतानं घेरावं
कितीही नको म्हटलं तरी
का आठवणींनी आठवावं?

शीळ येते मुक्कामी
शब्दांनी का रुसावं?
सुस्कारे नि हुंकार याला
गुणगुणनं कसं म्हणावं

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं ?

शांतरसकलाकविता

(*गणे कसेच होते)

स्पा's picture
स्पा in जे न देखे रवी...
2 Aug 2016 - 8:00 am

पेर्रणा -लाडका बुव्या

*गणे कसेच होते? येथे बघून गेलो
पाणी जराच होते, थोडा *गून गेलो

टमरेल टांगलेले, मी घेतले हातात
परसाकडील दारी, मी लगबगून गेलो

लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची
अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो

तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे
अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो

ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू
आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो

*गणे कसेच होते. .

mango curryअनर्थशास्त्रआगोबाकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीगरम पाण्याचे कुंडजिलबीरतीबाच्या कविताहझलशांतरसकला

जगणे...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
31 Jul 2016 - 8:23 pm

जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो
मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो.

ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो
गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो.

लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची
जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो.

ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी
भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो.

ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी!
मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो.

जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो......
....
अत्रुप्त...

कविता माझीशांतरसकविता

वाट पहात आहे.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 Jun 2016 - 10:32 am

त्या पक्ष्याची वाट पहात आहे.....
बसेन ते झाड माझे,
शिटेन ती फांदी माझी,
असले त्याचे आक्रमण नाही!

घरटोघरटी माझी पिले
माझ्याच पिढ्या, माझेच वंश
असली माणुसकी त्याची नाही!

मैत्री कधी कुणाशी केली नाही,
पण बुडत्या मुंगीसाठी
पान टाकायचे विसरला नाही!

चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि
तोऱ्याने मान फिरवणे नाही!
पंखांचे मिटणे केवळ सुंदर
जणू मौनाचे शिल्प पुरातन!

पाय कधी दिसू नयेत
इतके त्याचे असणे प्रगाढ,
युगायुगांची पौर्णिमा उजळावी
इतके त्याचे पंख सतेज!

अदभूतकविता माझीभावकवितामुक्त कवितासांत्वनाअद्भुतरसशांतरसवावरसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतर

हिरवीन

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
24 May 2016 - 12:53 pm

आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित! :)
______________________________________________

अरे हटाव बाजू, हिमालया
आन फेअर ॲन्ड लवलीच्या
कापूसभरल्या भावल्यांना
    तूच माझी खरी हिरवीन ग!
    एकच बावनकशी ब्युटी ग!

झालो तर्राट आन लैच्च सैराट
खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ
लोकं बघणार कायबाय बोलणार,
    तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!
    आता ही येवढीच माझी ड्युटी ग!

अविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडप्रेम कविताफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमुक्त कविताशांतरसकविताप्रेमकाव्यमुक्तकमौजमजा

समरस व्हावे ऐसे

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 May 2016 - 10:49 am

थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा

दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा

शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता

मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे

परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी

कविता माझीप्रेम कविताभावकविताशांतरससंस्कृतीकलावाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिक

मी अश्व!!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Apr 2016 - 9:40 am

'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित!

वेग अफाट
शक्ती अचाट

अंगी डौल
मोल अमोल

निष्ठा घोर
इतिहास थोर

करारी बाणा
सखा महाराणा

बनता दळ
सैन्या बळ

आजीचे कथन
पऱ्यांचे वाहन

नीज गहाण
वया परिमाण

लौकिकी मती
प्राणी जगती

अडीच पावली
चौसष्ठ आलयी

पौरुष नामांकन
दिव्य आभूषण

मिळता सात
तिमिरा मात

ऋणी विश्व
मी अश्व!!

- संदीप चांदणे

कविता माझीरोमांचकारी.अद्भुतरसशांतरससंस्कृतीकलावाङ्मयकवितासाहित्यिकसमाजरेखाटन

तू फूल कुणाचे देखणे?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
15 Apr 2016 - 7:30 pm

तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू!
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून त्यांच्या देशा!

रुजताना होईल अंत
नसेल कोणास खंत
तू जीव कुणा मायेचा?
जा निघून हलक्या पायाने....

तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू.....

-शिवकन्या

अदभूतकविता माझीभावकवितासांत्वनाकरुणशांतरसवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकजीवनमानप्रवासभूगोलदेशांतर

एकरूप

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
14 Apr 2016 - 11:51 am

घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे
पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे
साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले
निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले

घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला
ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला
किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग
भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग

घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा
गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा
उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात
ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात

शांतरसकविता