शांतरस

प्रतिसाद....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जे न देखे रवी...
2 Jan 2016 - 11:33 am

मूळ प्रेरणा (http://misalpav.com/node/34317)

दरेक धाग्याला प्रतिसाद असतो.
प्रत्येक सदस्याचा वेगळा असतो.

प्रतिसाद सुखद असतो किवा दु:खद असतो.
दु:खद प्रतिसाद आपल्या लिखाणाच्या उर्मीवर काळी छाया पसरवतो
सुखद प्रतिसाद लिखाणाला प्रेरणा देतो.

मलाच दु:खद प्रतिसाद का म्हणून विचारू नये.
दु:खद प्रतिसाद दुसऱ्याला का नाही? म्हणून खंतावू नये.

कोणता प्रतिसाद मिळेल हे आपल्या लिखाणावर अवलंबून असते.
मित्रानो, प्रत्येक प्रतिसाद घेत जावे.
प्रत्येक प्रतिसाद शिकत जावे.

शांतरसवावर

गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
27 Dec 2015 - 7:41 pm

मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतले आपण, आपले आपले.

गुलाब काढा, मोगरा लावा
मोगरा काढा, मरवा लावा,
मरवा काढा, सुगंध ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतला सुगंध आपला आपला.

खुर्ची काढा, झोपाळा लावा,
झोपाळा काढा, चटई टाका,
चटई काढा, मोकळीच ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतली स्पेस आपली आपली.

काचा काढा, गज लावा
गज काढा, पडदे लावा,
पडदे काढा, उघडीच ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतला प्रकाश आपला आपला.

कविता माझीमुक्त कविताशांतरसवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमानराहणी

अखेरची मानवंदना

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Dec 2015 - 8:52 pm

अखेरची मानवंदना
अखेरची ही मानवंदना
नतमस्तकल्या स्वरी
अश्रू होऊन हृदय वितळले
योद्ध्या चरणावरी

कृषीवलांना, मृदश्रमिकांना
तूच आसरा होता
अर्थवादाच्या प्रबोधिनीचा
तू प्रकाशतारा होता
तूच आमुची मथुरा, काशी
प्रयाग नि पंढरी

एका दाण्यापासून दाणे
हजार निर्मित जेथे
डाकू, लुटारू बनूनी शासक
सनद घेऊनी येते
उणे सबसिडीचा मांडलास तू
हिशेब गणितेश्वरी

युगायुगाच्या अबोलतेला
फोडलीस तू वाचा
मूठ आवळून लढवैय्याची
शिकविलीस तू भाषा
आयुष्याची मशाल चेतवून
जगलास जन्मभरी

शांतरसकविता

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 12:00 pm

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)

क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!

dive aagarmango curryvidambanअनर्थशास्त्रअभंगअभय-काव्यआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितावाङ्मयशेतीस्वरकाफियाहास्यवीररसअद्भुतरसशांतरसप्रेमकाव्यमुक्तकविडंबनउखाणेम्हणीसुभाषितेविनोदप्रवासभूगोलनोकरीअर्थकारणराजकारण

हुरहुर

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
18 Dec 2015 - 12:14 pm

सावल्या झाकोळलेल्या बोलल्या वाऱ्यास हलके
जा उन्हाला सांग आता, थांब.. घे थोडा विसावा
पावले चालून थकली गाव अजुनी दूर माझा
सांग त्या रस्त्यासही घे श्वास वेड्या तू जरासा

सांजवेळी काहुर मनी, दाटती अवचीत डोळे
अंतरीचा शाम कोठे ? साद घाली हां दुरावा
वेड कसले हे प्रियाचे क्षुब्ध करते विरहवेळा
त्या तिरावर वाजताहे धुंद होवुन कृष्णपावा

ऐक आता थांब थोडे विरघती अंधारभूली
मोहपट तो संभ्रमाचा त्यासवे मग विरघळावा
या क्षणांचे, त्या क्षणांशी मैत्र जुळता ते चिरंतन
स्पष्ट होता चित्र सारे पट सुखाचा उलगडावा

शांतरसकविता

सॅचुरेशन पॉइंट

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
16 Dec 2015 - 12:48 pm

एक सूर्य
चांदण्या रात्री संथ जलाशयात
खड़े मारत बसलेला दिसला
'रस्ता चुकलायस का मित्रा?'
त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले
म्हणाला ...
कंटाळा आला राव !
रोज रोज पूर्वेकडे उगवायचं
स्वत:लाच जाळत मावळतीकड़े जायचं..
रोजचा जन्म आणि रोजचाच मृत्यु
ते काय म्हणता तुम्ही?
संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा
काहीतरी नवीन..
काही वेगळं करावंसं वाटतय मित्रा
एखादी हळुवार कविता ऐकावी
एखाद्या चित्रात संध्याप्रकाश व्हावं
अगदीच काही नाही तर
गेलाबाजार एखाद्या आमराईत मस्त ताणून द्यावी
आणि मग...

मुक्त कविताशांतरसमुक्तक

आत्मबंध..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
10 Dec 2015 - 12:02 pm

होतो अत्रुप्त आत्मा
मग आत्म-मुक्त झालो..
आता कळून आले
मी आत्मबंध आहे.

अतृप्त मूळ माझे
आत्मस्वरूप तेच.
परी मूळबीज म्हणजे
मी आत्म-बंध आहे.

आत्मा बदलता-हा
अतृप्त वर्तमान!
तो भूत काळ त्याचा
प्राचीन बंध आहे.

मी बदलताच असतो
वैविध्य तेच माझे.
या जाणिवेत नुकता,,,
"तो" आत्मबंध आहे.

कविता माझीशांतरसकविता

माह्या मायेचं कारटं

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
8 Dec 2015 - 10:00 pm

माह्या मायेचं कारटं
जाई खळ्यात मळ्यात
गाऊनी अभंग
खेळी शेणात शेणात

माह्या मायेचं कारटं
चाले हसत रुसत
भाळूनी चंद्राला
शोधी आभाळ आभाळ

माह्या मायेचं कारटं
सुटे ऊन्हात रानात
शोधीत पाण्याला
होई छप्पर छप्पर

माह्या मायेचं कारटं
निजे सुखात दु:खात
होऊनी भाकरी
जाई थापत थापत

शांतरसकविता

गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
4 Dec 2015 - 1:03 pm

कलत्या उन्हात, कोण अंगणात?
तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही!

कलत्या उन्हात, कोण आकाशात?
फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही!

कलत्या उन्हात, कोण झाडात?
झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही!

कलत्या उन्हात, कोण घरात?
चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही!

कलत्या उन्हात, कोण उरात?
एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही!

कलत्या उन्हात, कोण गॅलरीत?
असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!

कविता माझीकाणकोणप्रकाशचित्रणभावकविताविराणीशांतरसकवितासाहित्यिक

अस्थी

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
26 Nov 2015 - 8:29 pm

देह माझा राहिला ना मी ही कोठे राहिलो
शोधता माझ्या मला मी मुळी न कोठे राहिलो

होत होतो या जगी मी मानवी देहात ना!?
पाश ते सुटले आता अन अस्थि रूपी राहिलो

वाहिलि ती राख माझी पंचप्राणा सोडली
पंचभूतांच्या प्रमाणे त्यातला मी जाहलो

काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती
आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो

यायचे आहे फिरोनि या इथे पुन्हा पुन्हा
जायचे का मग इथोनी???चित्र पाहत राहिलो

रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे?
मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो

शांतरससंस्कृतीकविता