Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/26/2015 - 14:34
नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी कळेल का कधी तुला, किती तुझ्या ऋणात मी उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी विशाल (२६-११-२०१५)

Submitted by मांत्रिक on गुरुवार, 11/26/2015 - 14:54

Permalink

मस्त! आवडली!!!

मस्त! आवडली!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 11/26/2015 - 15:22

Permalink

वा!

खूप छान!
क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी
अतिशय आवडले!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/26/2015 - 15:24

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/26/2015 - 15:53

Permalink

फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'

  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/26/2015 - 15:54

Permalink

फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'

  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/26/2015 - 15:54

Permalink

फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'

  • Log in or register to post comments

Submitted by पालीचा खंडोबा १ on गुरुवार, 11/26/2015 - 16:21

Permalink

नव्या-जुन्या किती खुणा

नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी खुपच सुरेख अगदि मनतुन आलेलि वाटते खोलातुन
  • Log in or register to post comments

Submitted by रुमानी on गुरुवार, 11/26/2015 - 16:47

Permalink

आवडली गझल...!

आवडली गझल...! उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी ह्य दोन ओळी खासच.....!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/26/2015 - 18:16

Permalink

संपादक मंडळी, माझ्या

संपादक मंडळी, माझ्या प्रतिसादांचा काय गोंधळ झालाय बघणार का? उडवलेत तरी चालेल. फ़क्त मतल्यात 'आन्दणात' ऐवजी 'आंदणात'असा बदल करा कृपया.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on गुरुवार, 11/26/2015 - 19:06

Permalink

वा!

वा! आजच्या तारखेचा विशेष संदर्भ आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/26/2015 - 21:32

In reply to वा! by दमामि

Permalink

हो दमामि, विशेषत: शेवटचे

हो दमामि, विशेषत: शेवटचे दोन्ही शेर २६-११ चा सन्दर्भ घेवून आलेत..
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Fri, 11/27/2015 - 12:37

In reply to हो दमामि, विशेषत: शेवटचे by विशाल कुलकर्णी

Permalink

अगदी समयोचित!

अगदी समयोचित!
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on गुरुवार, 11/26/2015 - 19:07

Permalink

मस्त गझल

क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी
खासच
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 11/26/2015 - 19:15

Permalink

क्या बात है जी!!!!!

क्या बात है जी!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/26/2015 - 21:34

Permalink

धन्यवाद मंडळी _/\_

धन्यवाद मंडळी _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 11/26/2015 - 22:11

Permalink

छान आहे!

खूप कमी बोलणारी आणि बरेच काही सांगून जाणारी कविता आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Fri, 11/27/2015 - 11:28

Permalink

झकास विकु

सुरेख झालीये गझल. एकदम कडक. फक्त दुस-या शेरातल्या दुस-या मिस-यात जरा मीटर गडबडलय का? (का मलाच तसं वाटतंय) म्हणजे तांत्रिकदृष्ट्या दोन 'ल' चा 'ग' होऊ शकतो. पण वाचताना गाडी अडखळतीये असं मला वाटलं. असा बदल केला तर:- किती पडाव सोडतो ईथे क्षणाक्षणात मी
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 12/01/2015 - 10:25

Permalink

गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट

गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट घेण्याची परवानगी आहे. एका गुरु च्या ऐवजी दोन लघु , वृत्त बदलत नसेल तर चालतात. आता राहिला बदलतो च्या ऐवजी सोडतो चा वापर तर त्यामुळे शेराचा अर्थच बदलेल. ही सुट घेण्यापुर्वी मी गझलकारा क्रान्ति साडेकरांकडून खात्री करून घेतलेली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Tue, 12/01/2015 - 21:12

In reply to गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट by विशाल कुलकर्णी

Permalink

ओक्के

.
  • Log in or register to post comments

Submitted by शान्तिप्रिय on Wed, 12/02/2015 - 17:28

Permalink

सुन्दर शब्दरचना

सुन्दर शब्दरचना
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4081 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com