पक्षही हरला, मीही बुडालो,
तरी मोडीत काढू नका!
अन राया मला,
जेलात धाडू नका...
राया मला, जेलात धाडू नका |
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
गुरू अण्णांना उपासा बसविले,
प्राण तयांचे पणास लाविले...
साथ न देता लाभ उठविला
कृतघ्न ठरवू नका...
अन राया मला, जेलात धाडू नका |
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
जने विश्वासली, दिल्लीची सत्ता,
कशी राबवू, मला न पत्ता...
खोटी आश्वासने, राजीनामा नाटक
'भगोडा' हिणवू नका...
अन राया मला, जेलात धाडू नका ||
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
सिंहासामोरी दंड थोपटले
तरी तयाने मज दुर्लक्षियले,
मिडियाशी बोंबललो तरीही
गंगा न गिळे माझ्या चुका...
अन राया मला, जेलात धाडू
:)
:)
मस्त!
(No subject)
अरे वा....इथे पण झेंडा रोवला
In reply to अरे वा....इथे पण झेंडा रोवला by असंका
माहित गार
In reply to माहित गार by आत्मशून्य
मुळात ते मिपाकरच होते...
In reply to मुळात ते मिपाकरच होते... by आत्मशून्य
आपल्या दोघांचेही अभिनंदन
In reply to आपल्या दोघांचेही अभिनंदन by माहितगार
तांत्रिकदृष्ट्या कविता छानच
In reply to तांत्रिकदृष्ट्या कविता छानच by असंका
तांत्रिकदृष्ट्या कविता
एका लोकनायकाची कीती ती बदनामी
छान कविता.