✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तिहारी लावणी

प — पिवळा डांबिस, Sat, 05/24/2014 - 09:44
पक्षही हरला, मीही बुडालो, तरी मोडीत काढू नका! अन राया मला, जेलात धाडू नका... राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || गुरू अण्णांना उपासा बसविले, प्राण तयांचे पणास लाविले... साथ न देता लाभ उठविला कृतघ्न ठरवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || जने विश्वासली, दिल्लीची सत्ता, कशी राबवू, मला न पत्ता... खोटी आश्वासने, राजीनामा नाटक 'भगोडा' हिणवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका || अहो सख्या मला, जेलात धाडू नका || सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका... अन राया मला, जेलात धाडू नका || अहो सख्या मला, जेलात धाडू नका || पुराव्याविना आरोप केले, कोर्टात पितळ उघडे पडले, तिहार जेलचे बूचच बसले, महात्मा मी बनचुका... अन राया मला, जेलात धाडू नका || अहो सख्या मला, जेलात धाडू नका||| :)

प्रतिक्रिया द्या
12647 वाचन

💬 प्रतिसाद (45)

(No subject)

प्रचेतस
Sat, 05/24/2014 - 09:47 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

जबरा...

मुक्त विहारि
Sat, 05/24/2014 - 09:56 नवीन
मस्त.. @ पिडां भाऊ, आता लिहायला सुरुवात केलीच आहे, तर थांबू नका.
  • Log in or register to post comments

भारी!

अनुप ढेरे
Sat, 05/24/2014 - 09:57 नवीन
=)) भारी! केजरू पब्लिसिटी स्टंट्समध्ये राखी सावंतला कॉम्पिटिशन आहे.
  • Log in or register to post comments

कहर!

पैसा
Sat, 05/24/2014 - 11:07 नवीन
या लावणीच्या निमित्ताने "आप"ल्या भाऊंसाठी "मी नाही ग बाई त्यातली न कडी लावते आतली" ही खास म्हण आठवली!
  • Log in or register to post comments

पिडाकाका-लावणी-तिहारी हे शब्द वाचुन मोठ्या अपेक्षेने धागा उघडला

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 05/24/2014 - 11:08 नवीन
पिडा काकांसारख्या प्रतिभाशाली पुरुषाने एक लिहीलेली एखादी झकास तिहारी तडका असलेली लावणी वाचायला मिळणार अशी खात्री होती. पण पहातो तर काय एका होउ घातलेल्या महात्म्याची घोर टवाळी करणारी कवीता निघाली. भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे, अशा एका थोर, आदरणीय, सन्माननिय, माननिय व्यक्तीमत्वाची अशी हेटाळणी करण्याच्या या ब्रिगेडी मनोवृत्तीचा जाहिर निशेढ हे परमेश्र्वरा यांना क्षमा कर, भारतमातेच्या एका थोर सुपुत्राचा हे लोक अपमान करत आहेत.
  • Log in or register to post comments

हे आवडलं

तिमा
Sat, 05/24/2014 - 17:14 नवीन
भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यातूनही हे महाशय (ठेवणीतलं) खोकतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह

धन्या
Sun, 05/25/2014 - 10:39 नवीन
आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यातूनही हे महाशय (ठेवणीतलं) खोकतील!
भारीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/25/2014 - 11:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

पिडांकाका, वेल्कम !

सस्नेह
Sat, 05/24/2014 - 11:08 नवीन
*lol* पिडांकाका, वेल्कम !
  • Log in or register to post comments

लावणी एकदम मस्तं

मनीषा
Sat, 05/24/2014 - 11:11 नवीन
लावणी एकदम मस्तं महात्मा मी बनचुका... मार्मिक
  • Log in or register to post comments

लय भारी

माहितगार
Sat, 05/24/2014 - 11:19 नवीन
:"काव्यरस: सांत्वना ! लेखनविषय:: गुंतवणूक" !! :) लय भारी गुंतवणूकीवर आपपाला बोनस मीळो हि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

ठ्ठो

इरसाल
Sat, 05/24/2014 - 12:20 नवीन
काव्यरस: सांत्वना हेच भयानक होते. बाकी लावणी जब्राट ह्यावर माझी क्लास्मेट सुरेखा कुडचीकर छान नाचेल.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Sat, 05/24/2014 - 12:38 नवीन
कालिंदीतटपुलिंदलांछित जेलनत पादारविंद! :)
  • Log in or register to post comments

___/\___

प्यारे१
Sat, 05/24/2014 - 13:02 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

__/|\__

जेम्स बॉन्ड ००७
Sat, 05/24/2014 - 13:18 नवीन
__/|\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

_/\_

बॅटमॅन
Sat, 05/24/2014 - 16:41 नवीन
धीरसमीरे एसि हपीसे वसति अहो खलु नंदन कोटीपीनमहत्तरमर्दन खलु यः जनकृतवंदन || पिडांकाकांची लावणी तर खासच! डांबिसो पीतचेष्टालु: युवकेषु महद्युवा | विनोदकाव्यं तस्यैतद्दृष्ट्वाऽहं चाहसम् बहु ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी

आतिवास
Sat, 05/24/2014 - 12:44 नवीन
:-) फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी 'मला काहीही करून जेलात धाडा, तेवढेच आणखी काही बाईट्स' असं म्हणताहेत हो आमचे (म्हणजे 'आप'ले) एके ४९! चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त ;-)
  • Log in or register to post comments

काहीच्या कै

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 05/26/2014 - 09:51 नवीन
चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त
गैरसमजाचा प्रश्नच कुठे येतो? गडकरी हे भारतातील सर्वाधिक भ्रष्ट राजकारणींमध्ये एक आहेत हे तुमच्याच केजरीवालचे वाक्य होते.त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर स्वतःकडे जो काही पुरावा असेल तो कोर्टाला द्यावा नाहीतर बिनशर्त माफी मागून मोकळं व्हावे. यापैकी दोन्ही गोष्टी केजरू करत नसेल तर जी काही प्रोसेस असेल त्याप्रमाणे त्याला कोर्टाने तुरूंगात धाडले.त्यात काय चूक आहे? अजूनही केजरीने नियमांप्रमाणे पाहिजे तो बाँड भरला तर त्याला तुरूंगातून सोडायला काहीच हरकत नसेल--कोणाचीच अगदी कोर्टाचीही. सुरवातीली तो बाँड भरायला तयार झाला होता पण प्रशांत भूषण या दिडशहाण्या च्या सल्ल्यामुळे त्याने तो भरायला नकार दिला असे पेपरात आले आहे. याचा अर्थ काय? फुकटची प्रसिध्दी मिळत असेल तर तुमचा केजरू तिथे सर्वात पहिला पोचेल हे नक्कीच. युपीएच्या दहा वर्षाच्या अनागोंदीनंतर लोकांना काम करणारे आणि रिझल्ट देणारे सरकार हवे आहे.मोदींकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.लोकं रिझल्ट बघायला अधिरच नाही तर उतावळे आहेत.अशा परिस्थितीत या रस्त्यावरील धरणे, रस्त्यावर झोपणे या नौटंकीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे?मोदींनी चांगले काम करायची सुरवात जरी केली तरी सहा महिन्यात या केजरूपुढे रस्त्यावरचे उकिरडे फुंकणारे कुत्रंही तंगड वर करायचे नाही. आम आदमी पक्ष या अजब रसायनातून कॅप्टन गोपीनाथ हा एक सेन्सिबल माणूस बाहेर पडला आहे. इतरही सेन्सिबल माणसे--आमचे इन्फोसिसचे बाळकृष्णन, मीरा सन्याल, संजीव आघा इत्यादी इतर सेन्सिबल माणसेही लवकरात लवकर बाहेर पडोत ही सदिच्छा.नंतर आआप म्हणजे प्रशासनाची काडीमात्र अक्कल नसलेल्या आणि नुसते अ‍ॅजिटेशन, फालतूची उपोषणे करून सवंग लोकप्रियता मिळवायचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या बिनडोकांचे टोळके बनून राहिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

:-)

आतिवास
Mon, 05/26/2014 - 14:08 नवीन
:-) तुम्ही माझा पूर्ण प्रतिसाद वाचला नाही - असं दिसतंय. आणि शेवटचं वाक्यही स्मायलीविना वाचलेलं दिसतंय. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

ख्याक

स्पा
Sat, 05/24/2014 - 13:06 नवीन
ख्याक :-D
  • Log in or register to post comments

पिडांकडून बर्‍याच दिवसांनी

प्यारे१
Sat, 05/24/2014 - 13:06 नवीन
पिडांकडून बर्‍याच दिवसांनी फर्मास लेखन! अशाच 'प्रसुती' सुरु राहू द्या. ;) बाकी ते 'आप' नि 'आपापले' ह्यांना दुर्लक्षावं असं वाटू लागलंय. स्वतःच्याच बेसिक फंडामेंटलच्या अम्मलबजावणी अभावी वाया जाणारी (ऑलरेडी गेलेली) आणखी एक केस.
  • Log in or register to post comments

'आप'ली लावणी आवडली.

प्रभाकर पेठकर
Sat, 05/24/2014 - 14:02 नवीन
खास लावणी. तरीपण, दिल्लीतील सत्तेसाठी काँग्रेस सोबत आवळलेल्या, आय मीन, आळवलेल्या 'शृंगार'रसाचा अभाव जाणवला. बाकी ही, निवडणूकीच्या रणधुमाळीतील 'फडाची' लावणी म्हणायची की काँग्रेसच्या 'बैठकी'तली?
  • Log in or register to post comments

पेठकर काका. या लावणीत

विजुभाऊ
Sat, 05/24/2014 - 14:14 नवीन
पेठकर काका. या लावणीत श्रुंगार रसाचा अभाव असला तरी "आम" रसाचा आंतर्भाव आहे.
  • Log in or register to post comments

समयोचित लावणी.

शिद
Sat, 05/24/2014 - 15:04 नवीन
समयोचित लावणी. ;)
  • Log in or register to post comments

सौजन्यः इ-सकाळ

शिद
Sat, 05/24/2014 - 15:07 नवीन
'आप' नेत्या शाझिया इल्मींची पक्षाला सोडचिठ्ठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

कॅप्टन गोपीनाथ.

प्रभाकर पेठकर
Sat, 05/24/2014 - 19:12 नवीन
कॅप्टन गोपीनाथांनीही 'आम आदमी पार्टी' सोडली. - टिव्ही बातमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

लै भारी !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/24/2014 - 17:24 नवीन
लै भारी ! =))
  • Log in or register to post comments

डांबिसानु माका ह्यो लावणीचो

मदनबाण
Sat, 05/24/2014 - 18:42 नवीन
डांबिसानु माका ह्यो लावणीचो तडको आवडलो बघा. ;)
  • Log in or register to post comments

मिडियाशी बोंबललो तरीही

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/24/2014 - 19:57 नवीन
मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका...Image removed. तिहार जेलचे बूचच बसले, महात्मा मी बनचुका...>>> Image removed. _/\_ Image removed.
  • Log in or register to post comments

काकानु __/\__ घ्येवा!!!!

प्रीत-मोहर
Sun, 05/25/2014 - 10:09 नवीन
काकानु __/\__ घ्येवा!!!!
  • Log in or register to post comments

जबराट !!!!

धन्या
Sun, 05/25/2014 - 10:43 नवीन
अन राया मला, जेलात धाडू नका..
हे अगदी लावणीच्या मीटरमधी बसतंय. :)
  • Log in or register to post comments

भारतातील अतिशय प्रामाणीक माणसाचे

वेताळ
Sun, 05/25/2014 - 11:02 नवीन
शेवटी एका खेचरात रुपांतर झालेने वाईट वाटते.भारतापेक्षा भारताबाहेर त्याचे प्रशंशक अधिक होते.परंतु पिंडाकाका नी त्याचे योग्य वर्णन केले आहे.महात्मा बनायच्या नादात त्याने पार वाट लावुन टाकली आहे. अजुन एक खेचर योगेंद्र यादव ह्याने तर कहर केला आहे. अटक झाल्यावर झोपलेले फोटो काढण्याच्या नादात त्याने चक्क ९० डिग्री झोपत फिरला आहे्ए लोक प्रसिध्दीसाठी काय पण करतील.
  • Log in or register to post comments

निवडणूकी लढून हरला तो. केवढा

असंका
Sun, 05/25/2014 - 12:35 नवीन
निवडणूकी लढून हरला तो. केवढा मोठा गुन्हा. (का निवडणूकीला उभा राहिला हाच गुन्हा?) त्याला फक्त एवढीशीच शिक्षा? अहो अजून चार शिव्या घाला. हरलेल्याची हर तर्‍हेने हेटाळणी करणे हीच तर आपली थोर संस्कृति आहे.
  • Log in or register to post comments

केजरी हरला म्हणून कुणी बोलत

प्यारे१
Sun, 05/25/2014 - 13:27 नवीन
केजरी हरला म्हणून कुणी बोलत नै हो त्याला! भावना को समझो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

हो हो नक्कीच.

असंका
Sun, 05/25/2014 - 13:42 नवीन
हो हो नक्कीच.
सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका...
फक्त याचा मग कसा अर्थ घ्यायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी

श्रीगुरुजी
Sun, 05/25/2014 - 14:21 नवीन
:yahoo: केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता ते तुरूंगात गेले ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी. माध्यमे व कॅमेरे बरोबर घेऊन कंबरेला फक्त टॉवेल गुंडाळलेल्या उघडेबंब अवस्थेत ते नदीवर डुबक्या मारण्यासाठी गेले होते तेदेखील फक्त सवंग प्रसिद्धीसाठी. प्रसिद्धी मिळणार असेल तर तर कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळायलाही ते मागे राहणार नाहीत.
  • Log in or register to post comments

केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी

नानासाहेब नेफळे
Sun, 05/25/2014 - 21:04 नवीन
केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी कोण? कालपर्यंत पाकीस्तानला शिव्या घालून मतांच्या तुंबड्या भरणारे मोदी आज शरीफचे तळवे चाटत आहेत. यात स्ट्रॅटेजी आहे असा समज पसरवला जातोय. वास्तविक पाकने खोड्या काढल्यावर आपला व्हावहारीक षंढपणा जगासमोर उघड होऊ नये यासाठि केलेलं लांगुलचालन आहे.कंदहार कारगिल व संसद हल्ल्यावेळी भाजपचा व्यावाहारीक षंढपणा उघड झाला होता व ते इलेक्शन हरले होते. अरेरे इलेक्शन जिंकण्यासाठी शत्रुचे तळवे चाटत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

...केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी...

विनोद१८
Wed, 05/28/2014 - 13:20 नवीन
अरे नान्या शुद्धिवर ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

जाऊ दे हो गुरुजी

वेताळ
Sun, 05/25/2014 - 19:09 नवीन
केजरीच काय त्याचे कार्यकर्ते व समर्थक देखिल कन्फ्युज्ड झाले आहे.काल त्यांची बायको चक्क टीव्ही वाल्याना शिव्याशाप देत होती.
  • Log in or register to post comments

The whole problem with the

असंका
Sun, 05/25/2014 - 19:35 नवीन
The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves and wiser people so full of doubts- Bertrand Russel कुणी तरी असं काही म्हटलंय हे मला मिपाचा सदस्य होइपर्यंत माहित नव्हतं. इथे कुणाची तरी स्वाक्षरी होती ही.
  • Log in or register to post comments

लावणी आवडली, गेल्या ३०

विवेकपटाईत
Sun, 05/25/2014 - 20:07 नवीन
लावणी आवडली, गेल्या ३० वर्षांपासून रोज-सकाळ संध्या काळी बस मधून (कार्यालयातून जाता येता), देशातील सर्वात प्रसिद्ध वास्तू जिथे मोठ्या मोठ्या पुण्यात्मांचे चरण धूळ लागते (काही जास्त नाही झाल ना), रोज दर्शन करतो. काही वर्षांपूर्वी ही भकास दिसायची. पण आजकाल बाहेरच्या भिंतींवर सुंदर रंग रोगन शिवाय ग्राफिटी म्हणतात त्या प्रकारचे चित्र ही भिंतींवर आहेत. फक्त एकच ' जेलात धाडा" हा शब्द प्रयोग अधिक सार्थक आहे.
  • Log in or register to post comments

पिडां काका इज बॅक!!

स्पंदना
Mon, 05/26/2014 - 10:01 नवीन
पिडां काका इज बॅक!!
  • Log in or register to post comments

झक्कास! नंदन +१

यशोधरा
Mon, 05/26/2014 - 10:56 नवीन
झक्कास! नंदन +१
  • Log in or register to post comments

मस्त !

बबन ताम्बे
गुरुवार, 05/29/2014 - 14:16 नवीन
मस्त तिहार लावणी.
  • Log in or register to post comments

वा! सुरेख जमली आहे तिहारी लावणी!!

नरेंद्र गोळे
Tue, 06/03/2014 - 08:14 नवीन
लावणी आवडली. प्रतिष्ठितांची लफडी काढू भ्रष्टांविरुद्ध शिमगा घडवू राज्य चालवा असे मात्र तुम्ही कधीही सांगू नका अहो राया मला, जेलात धाडू नका अहो सख्या मला, जेलात धाडू नका
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा