महात्मा गांधीजींची १९४८ मध्ये हत्या करण्यात आली, तेंव्हा राजघाट हे स्मृतीस्थळ उभारले गेले,
अनेक वर्षे सरली तरीही आजतागायत (दि. २७ मे २०१४), जेव्हा कधीही नव प्रधान /मुख्य मंत्री कार्यभार स्वीकारण्या आधी , वा विदेशी पाहुणे भेटीवर आले असता, राजघाटावर येवून आदराने नतमस्तक होतातच, अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ?
म्या पगाल्याच्यामते, कदाचित 'जीवनामध्ये सत्याला प्रमाण मानने', या त्यांच्या विचारसरणीत आहे का ?