Skip to main content

चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 21/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे... का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही... तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,..

ठाणे महानगर पालिका आणि तिचे खाबुगीरीचे नवे फंडे

लेखक अभिजित - १ यांनी बुधवार, 21/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आता पावसाळा येणार . ठाणे महानगर पालिका नेहमीच काहीतरी वांझोटी कामे काढते या दिवसात . घोडबंदर रोड म्हणजे पूर्वी जंगल होते . आता बिल्डर कृपेने ठाणे - २ / नवीन ठाणे झालेय . कितीही रस्ते , concrete करण केले तरी माती आपला गुण दाखवणारच . म्हणजे काय तर - पाउस पडला कि लगेच कितीतरी ठिकाणी जमिनि तून गवत , छोटी झाडे उगवायला लागतात ( रस्ताच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध नाही ) . छान दिसते ते. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत , काही झाडे . याची एक प्रकारे मदत पण होते आपल्या ला . हे गवत रस्त्याच्या कडेची माती ghatt धरून ठेवते.

मंत्रालयात 'आग'-बाई

लेखक माहितगार यांनी बुधवार, 21/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे पहिले नाव मंत्रालयात भूलाबाई भूलाबाईच्या माहेरी विरोधी नणंदा, सत्तेतल्या भावजया घरात नव्हतं मुनीमाशिवाय तिसरं कोणी मंत्रालयातबसून लोणी, खाल्लं कोणी खाल्लं कोणी तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी.... आता माझा दादा येईलग येईलग दादासोबत सभागृहात बसीनग/बसेनग दादा तुझी बायको चोरटी चोरटी असू दे माझी चोरटी चोरटी कायद्याचे हात आहेत लाबं मत्रांलयातलयात फायलींना लागलेली आग पाहून येतो थांब भूलाबाई गेल्या काढाया सासरची रुष्टी पाठी विसरल्या भूलाबाई माहेरच्या गोष्टी

नेमके काय चुकते आहे?

लेखक vikramaditya यांनी मंगळवार, 20/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर विविध विषयांवर चर्चा होत असते. अशाच एका वेगळ्या विषयावरील हा धागा. दररोज बातमीपत्रात येण्यार्‍या व्यवसाय जगतातील बातम्‍या वाचताना एक बाब लक्षात येते कि बहुराष्ट्रीय अथवा भारतीय प्रथीतयश कॉर्पोरेटस मध्ये अती उच्च पदांवर मराठी माणसांचे प्रमाण फ़ारच कमी आढळते. कृपया लक्षात घ्या कि इथे कर्तुत्व किंवा आर्थिक यश हा विषय नसुन एखाद्या फ़ार मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये अती उच्च पदावर पोहोचण्यासाठी लागणारे "खास कौशल्य" मराठी माणसाकडे कमी पडते आहे का, असा प्रश्न आहे. "मोडेन पण वाकणार नाही" हा मराठी बाणा तर ह्या आड येत नाही ना?

विकास--एक लोकचळवळ

लेखक राही यांनी मंगळवार, 20/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दि.१६ मेच्या सायंकाळी बडोद्यातल्या विजयसभेत मोदींचे भाषण झाले. त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा वाटला. विकास हा फक्त सरकारी योजनांच्या आराखड्यात न रहाता ती एक लोकचळवळ (जनअभियान) व्हावी. प्रत्येक भारतीयाला विकासात सहभागी होता यावे आणि आपण राष्ट्राच्या विकासाला हातभार लावतो आहोत याचा अभिमान त्याच्यात रुजावा, असा काहीसा तो मुद्दा होता. प्रत्येक नागरिक कशाप्रकारे विकासात भाग घेऊ शकेल याची त्यांनी दोन उदाहरणे दिली. एक म्हणजे रस्त्यांवर कचरा न फेकणे आणि दुसरे, चुकीच्या मार्गिकेतून वाहन न घुसवणे.

उन्हाळी उद्योग : भाग १ उद्योजक व्हा, आपले स्वतःचे दुकान उघडा

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 20/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित) प्रयोगाचे उद्दिष्ट: घरी (खेळातले आणि म्हणूनच बरेचसे काल्पनिक) "आपले स्वतःचे" दुकान उघडणे, ते उभारण्याच्या प्रक्रियेत "दुकान" म्हणजे काय, त्यात काय काय हवे/ठेवता येईल, ते कसे तयार करता येईल या वर विचार करताना आजी/आजोबांना नातवंडांच्या कल्पनाशक्तीला बरीच चालना देता येईल स्थळ: घरातील कुठलेही, जिथे पसारा करण्यास नातवंडांच्या आई वडिलांचा फारसा विरोध नसेल काळ: आळसावलेली दुपार, आजी/आजोबांबरोबर घालवण्याकरता नातवंडांच्या हातात पुरेसा वेळ, काही तरी नवीन करण्याचा इरादा, "आपण काय बरे आता करूया" असा बराच उहापोह झाल्या

सौदी क्षणचित्रे : ०३ : महाकंपनी सौदी आराम्को आणि मरजान बेट

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 20/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

चोकलेट रोल

लेखक इशा१२३ यांनी मंगळवार, 20/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची सुट्टी लागली तशी चार दिवस आईकडे रहायला गेले.बरोबर मुल होतीच.मग काय मुलांसाठी रोज एक नविन पदार्थ करण्याची आई आणि मामीची लगबग सुरु झाली.त्यातले मुलांना खूप आवडले ते त्यांच्या मामीने केलेले चोकलेट रोल.

संग्रह

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 20/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कसला संग्रह करेल सांगता येत नाही पण निवडणूक प्रचार साहित्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता... आपण तो पहावा आणि आपल्याही याबाबतच्या आठवणी असतील तर इथे लिहाव्यात १५ फेब १९९० . अण्णा जोशींची विधानसभा निवडणूक . कसबा विधानसभा... . अण्णांची यशस्वी लोकस