वादविवादाच्या आसमंतातील पोकळी
मिपावर मागचे ७-८ महिने फार मस्त गेले. नमो>नी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर केली, आणि त्यांची मोहीम चालू झाली, त्यावर आणि एकंदर गुजरात मॉडेल, वगैरे गोष्टींवर साधक-बाधक चर्चा इथेच झाली. मोदींवर अनेक शतकी, द्विशतकी धागे निघाले, घमासान वादळे झाली. वादविवादाची आवड असलेल्या मराठी माणसाला अगदी मन भरेपर्यंत काथ्याकूट झाले.
त्यातच मफलार्धारी>चा जन्म झाला आणि वातावरण पुन्हा ढवळून निघाले, त्यांचे लोकप्रियतेचे दावे, ते बोलणे, ते खोकणे सारेच काही नवे. पुन्हा एकदा मिपामध्ये जान आली, पुन्हा एकदा धागे द्विशतक गाठू लागले, त्यातच निवडणूका जवळ आल्या आणि मग तर मिपावर एकदम तडाखेबंद फलंदाजी सुरू झाली. कधी गोलंदाजांनी विकेट घेतली, कधी षट्कार चोउकार झाले, तर कधी हिटविकेट. अगदी बॉडीलाईन ओलंदाजीपर्यंत सगळा थरार अनुभवायला मिळाला.
पण निकाल लागला आणि सगळे चित्रच बदलले. विश्वचषकाच्या फिनालेमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकड्यांना एकतर्फी हरवावे आणि त्या सामन्यातला आपला आनंद हिरावून घ्यावा असे काहीतरी झाले. उदा. मी माझ्या आत्याकडे त्या दिवशी सकाळी सहजच गेलो होतो. साधारण १० च्या आस्पास त्यांनी टी. व्ही बंद केला. मी आपलं विचारले, काय हो काय झाले? तर म्हणे मजा येत नाहीये. आता बोला.
तर, सध्या माझ्यापुढचा प्रश्न आहे तो, आता पुढे काय? मोदींना एकहाती बहुमत मिळाल्यामुळे वादविवादप्रिय मराठी माणसासमोर अचानक एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निवडणूका, त्यानंतरचा घोडेबाजार वगैरे करमणूकीची साधने मोदींनी हिरावून घेतल्यामुळे मी तर मनातल्या मनात मोदींविरुद्ध एक ठराव पण पास करून टाकला आहे.
माझी मिपाकरांना विनंती आहे की मिपाकरांनी मला आता वादासाठी नवीन विषय सुचवावेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला
तुम्ही त्या वेगळ्या पुरुष
तो ऑलरेडी आहेच अस्तित्वात. डी
मोकळ्या मनाने, न पटनारी/नावडनारी मते, ऐकून घ्यायची मानसिकता
काळजी करू नका
>>माझी मिपाकरांना विनंती आहे
अध्यात्मावर बोला
नरेंद्र मोदींनी दाढी काढावी का?
चांगला विषय...
विषय फार गंभीर आहे
युक्रेन
Must Read
हो.. छानच आहे.