आय टी आणि आम्ही
शेवटचे वर्ष संपत असत ... Placement नामक पर्व सुरु होत असत .... ह्या पर्वात सगळ्या जणांना उडी घ्यायची असते किंबहुना तशी धडपड तरी ते करीत असतात .... कंपनी'ज येतात .... आपल्यातले (आमच्यातले ???) काही जण select होतात .... आम्ही मात्र अजूनही त्या कॉलेजच्या बेफिकीरीतच असतो ...
अरे होईल रे .... कंपनी कुठे पळून चालल्या आहेत का ...... अरे आपल्याला ती कंपनी च नको होती यार ... असे संवाद कट्ट्यावर ऐकायला/ऐकवायला सुरुवात होते ....
select झालेल्या मुलांचा आता एक वेगळा ग्रुप तयार झालेला असतो .... ते कॉलेज student न राहता आता प्रोफेशनल झालेले असतात ...
त्यांच्या वागण्यातली सहजता जाऊन त्यात एक वेगळा भाव दिसू लागतो ... हा ग्रुप पुढे वाढत जातो ...
मग एकदाची आपलीही lotery लागते आपणही कुठल्या तरी कंपन्याच्या Criteria त बसतो .... मग अचानक आपणही जबाबदार बनतो इंटरव्ह्यू राउंड पर्यंत पोचतो तिथनं बाहेर .... कधी HR तर कधी Apti . पण बाहेरचा रस्ता ह्या न त्या कारणाने ठरलेला ....
त्या वेळी ते अपयश न वाटता .... च्यायला जगात काही हीच कम्पनी आहे आहे का असला बेफिकीरीपणा सुरूच कारण त्या वेळेला कॉलेज सुरु असते ...
अशातच फेअरवेल होत select झालेल्यांना प्रेझेंट्स मिळतात ... यात आपण पण असतो तर ??? ही सल मनात कुठे तरी बोचत राहते .... त्या फेअरवेलच्या दुखापेक्षा हे दुखः खूप मोठे असते .... अशातच कॉलेज संपते ....
मग काय रिझल्ट येइ तो.... रिझल्ट येऊ देत ह्या वाक्यावर भरवसा ... रिझल्ट नंतर काहीच होत नाही म्हणून शेवटी डिग्री बरोबर एक्स्ट्रा लागताच आजकाल म्हणून पुणे - मुंबई ला क्लास ....
३ - ४ महिने तसेच गेल्यानंतर आजूबाजूचे लोक ( Detective) विचारायला लागतात ... तुमचा मुलगा/मुलगी इंजिनीअर झाला ना ??? असतो कुठे सध्या ???
मग आई-वडील .... कशी IT फिल्ड मध्ये मंदी आहे ... अमेरिकेच्या धोरणांमुळे कसे प्रोजेक्ट मिळत नाहीयेत हे सगळे त्यांना ऐकवतात .... बरोबर परवाच कॉग्निझंट ला इंटरव्ह्यू दिलाय हे पण सांगतात .... येईल पुढच्या शनिवारी रिझल्ट असा खोटा दिलासा ....
रोज सकाळी उठल्या बरोबर मेल , जॉब साईट चेक करून नंतर पटकन आवरून Walk-Ins असेल तिथे पोचायचे ...
त्या चकचकीत एसी ऑफिस मध्ये प्रवेश करताना आता हीच ती कंपनी म्हणून आत्मविश्वासाने सोपस्कार पार पडायचे ...
आम्ही तुम्हाला कळवू ह्या गोड आशेवर त्यांनी दिलेला फिल्टर चा चहा ढोसून आपण परतीकडे ...
बाहेर पडल्यावर एखाद्या चहाच्या टपरीवरचा ग्रुप बघून आपणही तेच स्वप्न रंगवायचे ....
शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडतो ... एखाद्या कंपनीच्या HR ची आणि आपली मन जुळतात ... आणि आपण हि एका IT कंपनीचे भाग असतो ...
घरी दरी आनंद होतो ... मग त्या स्ट्रगल चे पण गोडवे गायला सुरवात होते .... आंपणही "अच्छे दिन आ गये " ह्या आविर्भावात असतो पण ह्या पुढच्या प्रवासात तर खरा स्ट्रगल असतो ....
आपल्याला चकचकीत ऑफिसेस , पार्ट्या , वीकेंड दिसतात पण नोकरीनंतरचा तो स्ट्रगल ती घुसमट ..... त्याचे काय ???
क्रमश:
वाचने
5870
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
३९४ शब्दांच्या लेखात १५८
+१
In reply to ३९४ शब्दांच्या लेखात १५८ by आदूबाळ
+७८६ नया है वह
In reply to +१ by सुनील
३ - ४ महिने तसेच गेल्यानंतर
तुमच आमच सेम असत
मोजा!
(No subject)
तीन ते पाच पूर्णविराम का?
अनेक टिंबे दिली की काही तरी
In reply to तीन ते पाच पूर्णविराम का? by हुप्प्या
३९४ शब्दांच्या लेखात १५८
हम्म...
मस्त लेख...
संघर्ष, धडपड प्रत्येक क्षेत्रात असते.
हे आपण स्वतःहून स्विकारलेलं
In reply to संघर्ष, धडपड प्रत्येक क्षेत्रात असते. by प्रभाकर पेठकर
आपल्याला चकचकीत ऑफिसेस ,
शिर्षक आणि आतला मजकूर यातला
मी एक मालिका सुरु केली होती,
ऑनसाईट (२), ऑनसाईट (३),ऑनसाईट
In reply to मी एक मालिका सुरु केली होती, by धन्या
इतकं सुंदर लिखाण आणि फक्त
In reply to मी एक मालिका सुरु केली होती, by धन्या
आयटी मधे येताना प्रत्येकाला ५ वर्षाचा दुसरा अनुभव असल्याशिवाय घे
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे
In reply to आयटी मधे येताना प्रत्येकाला ५ वर्षाचा दुसरा अनुभव असल्याशिवाय घे by प्रसाद१९७१
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे
In reply to आयटी मधे येताना प्रत्येकाला ५ वर्षाचा दुसरा अनुभव असल्याशिवाय घे by प्रसाद१९७१
आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे
In reply to आयटी मधे येताना प्रत्येकाला ५ वर्षाचा दुसरा अनुभव असल्याशिवाय घे by प्रसाद१९७१
@ धन्या - मी पण आयटी मधे च
In reply to आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे by धन्या
तुमचं म्हणणं मी नाकारत नाही.
In reply to @ धन्या - मी पण आयटी मधे च by प्रसाद१९७१
वरच्या पोष्ट साठी ता.क.
चांगलं लिहिलंय