पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

Primary tabs

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 9:10 pm

आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की

२४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला. कट्टा आमच्या शेजारच्या पुण्यनगरीमधे व्हायचा असल्याने किमान दोन्ही पायांमधले बुट काढल्याखेरीज कट्टा व्हायचा नाही हे वेगळे सांगणे नं लगे. मिपाकरांच्या ह्या लौकिकास मिपाकरांनी जागुन आणि उत्सवमुर्तींनी जागुन दुसरा धागा काढला. त्यावरही कोणताही निर्णय नं झाल्याने शेवटी मला दो सोनार की एक लोहार की ह्या उक्तीस जागुन शेवटचा धागा टाकावा लागला. त्यानुसार ४ ऑक्टोबर ला पुण्यभुमीमधल्या पाताळेश्वर नामक मध्यवर्ती ठिकाणी कट्टा निश्चित झाला. सदर कट्टा ठरल्याचं उत्सवमुर्तींनाही माहिती नव्हतं. आपल्या एक्काकाकांनी सुदैवानी त्यांना व्यनि करुन बोलाउन घेतलं.

कट्ट्याच्या आदल्याचं दिवशी एका मिपाकरणीला मज पामरानेचुकुन चिडवलेले असल्याने व त्याचा बदला कट्ट्याच्या दिवशी घेतला जाणार ह्या स्पष्ट मिळालेल्या धमकीमुळे मी हेल्मेट नं विसरता बरोबर घेतलं आणि मगचं गाडीवरती टांग टाकली. आणि बरोबर ११.०५ वाजता कट्ट्याच्या स्थानी पोचलो. मला जायला जरा उशिर झालेला होता तोपर्यंत एक्काकाका, नाखुनकाका, चि.नाखु, वल्ली उर्फ प्रचेतस उर्फ अगोबा हत्ती उर्फ बरचं काय काय, अभिजित अवलिया, यमन आणि खुशबु फेम पगला गजोधर इत्यादी मंडळी जमलेली होती. भितीचं कारण जवळपास कुठेही नं दिसल्याने मी ही भर रस्ता अडवुन गप्पा हाणणार्‍या टोळक्यामधे सामिल झालो. अभिजीत, यमन आणि पगला गजोधर ह्यांना पहिल्यांदाच भेटत असल्याने ओळखपाळखीचा समारंभ पार पडला. जेमतेम पाच मिनिटं होतात नाही होतात तोपर्यंत उत्सवमुर्तींचं आगमन झालं. "पैचान कौन" च्या कार्यक्रमाची दुसरी फेरी पार पडली (मी दिलेल्या क्लुवरुन सदर उत्सवमुर्तींना माझा आयडी ओळखता आला नाही शुन्य मार्क्स). दिव्यश्रीनी आल्या आल्या आणि ओळख झाल्या झाल्या पहिली गोष्ट कुठली केली असेल तर प्रत्येकाचा फेसबुक आयडी आहे का नाही ह्याची वास्तपुस्त करुन जागेवर मित्रयादीमधे भर घातली. फोटोंना लाईक केलं नाही तर ब्लॉक करु अशी लुक्राटिव्ह ऑफरही ठेवली =)).

वल्लींच्या फोनवरती पैसाताईचा फोन आला. वल्लीनी कोणकोण आलयं ची माहिती देउन फोन माझ्याकडे दिला. "येताय का, चहा पाजु" असं मी बोलल्यानंतर कसा काय कोण जाणे अचानक कॉल ड्रॉप झाला =)). करा करा मजा करा. कटिंग च्या कटिंग रिचवा अश्या शुभेच्छा थोड्या वेळाने व्हॉट्सॅपवर आल्यात =)) (पुराव्याने शाबित करुन दाखविन काय समजलांत =)) ). नाखुनकाकांना बॅट्या कधी येतो ह्याचे वेध लागलेले होते. तो नुकताच झोपेतुन उठल्याची सुवार्ता कोणीतरी दिली (बहुतेक वल्ली). सगा आजारी असल्याने येणार नाही अशीही बातमी कळली.

मी गप्पांमधे गुंतलेला असताना यशोतैने एंट्री घेतली. हमकु बरोबर पकड्या उन्होने (दुत्तं दुत्तं मिपाकरांनी मीचं तो म्हणुन थेट समोर उभा केला नं). =)).तेवढ्या वेळामधे दिव्यश्रीनी, "अय्या, तुम्ही रेवाक्का कां" असं म्हणुन तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी टाकली. (ह्या नांदीविषयी इथे वाचा). आख्खी ३ मिनिटं १६ सेकंद हजेरी लाउन हापिसातल्या सर्व्हरला इंजेक्शन द्यायसाठी त्या निघुन गेल्या. दरम्यान बॅट्या आणि प्रशांत हे दोघही आले. (टैमलैन गंडली राव गप्पा मारायच्या नादात)

नाखुन काका आणि बॅट्याची गळाभेट बघुन "ड्वॉळे पाणावले". बॅट्याने आल्या आल्या चौफेर बॅटिंग चालु केली. ह्या मनुक्षाकडुन कुठली माहिती कुठल्या वेळी किती डिट्टेलवारीमधे मिळेल ह्याचा भरवसा नाही. इकडे एका बाजुला अमचे अवडते बुवा कधी येणार असा ग-ह-न प्रश्ण आम्हाला पडलेला होता. त्यावेळेला बुवा यजमानांकडे पुजाविधींमधे मग्न असल्याने थेट १.३० वाजता दर्शन देतील ही ताम्रपटावर कोरुन ठेवण्याएवढी महत्त्वाची माहिती मिळाली. त्यावरुन हिंदु धर्मातील कावळ्याचं महत्त्व ह्यावर एक छोटासा परिसंवाद रंगला. हा सु-संवाद चालु असताना मला डोळ्याच्या कोपर्‍यामधुन पाताळेश्वराच्या दरवाज्यामधे काहितरी चमकलेलं दिसलं. त्या चमकणार्‍या गोष्टीला जोडलेला कानही दिसला. भिकबाळीफेम सूड आणि मिपावरचे लोककलांचे आश्रयदाते सगा दोघही हो नाही करता करता आले. आता खर्‍या अर्थाने गप्पा-टप्पांना सुरुवात झालेली होती. उत्सवमुर्तींनी त्त्यांच्या पर्समधुन चितळ्यांची बाकरवडी काढली. यमनने छानश्या कुकीज आणलेल्या (कुकीजचं ना रे? पदार्थाचं नावं विसरलो सॉरी. योग्य नावं सांग संपादित करेन). दरम्यानच्या काळामधे एवढी सगळी मंडळी पाताळेश्वराचा रस्ता आपल्याच काकाचा असल्यासारखी रस्ता अडवुन उभी होती. शेवटी हळुचं बाजुला सरकली. तेवढ्यामधे श्री व सौ समीर ह्यांचही आगमन झालं. हळु हळु गोलाचं रुपांतर छोट्या छोट्या कंपुंमधे झालं. उत्सवमुर्ती उत्साहाने सगळ्यांची विचारपुस करत होत्या आणि फोटोही काढत होत्या. त्यांनी एकदोघांना चुकुन चुकीचा प्रश्ण विचारुन, त्यामधुन भयानकच चुकीचा अर्थ निघाल्याचं आमचा वार्ताहार सांगतो. तेवढ्यातल्या तेवढयात बॅट्याने चि.नाखुबरोबर कन्नडमधे गुड गुड करुन आपण त्यामधेही गुड असल्याचं दाखवुन दिलं. यमनने एव्हाना मी जेवायला येणार नसल्याचा वेगळा सुर लावला. त्याचं कारण अगदी व्हॅलिड असल्याने सोडुन दिलं. अगले टैम ऐसा नै होगा.

एव्हाना मघाच्या चर्चेमधले कावळे पोटामधे शिरल्याचं एकेकाने जाहिर करायला सुरुवात केली. सुकांताला जायचं ठरलं.

एक्काकाकांनी त्यांचा मुलगा MS in Information Technology झाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ सुकांताला पार्टी दिली. :)

तिकडुन गाड्या काढुन सुकांताला पोचलो. तिकडे भयानक गर्दी असल्याने बॅटमॅनने त्याचं नावं सांगुन टेबलं बुक करुन ठेवलं. तिकडेही बराचं वेळ वाट पहायला लागणार असल्याने तिकडे परत गप्पा रंगायला लागल्या. ५० फक्त ह्यांचही आगमन तिकडे झालं. त्यांची माझी ओळख थेट कट्टा संपताना झाली त्यामुळे पुढच्या कट्ट्यामधे नं मारलेल्या गप्पांची भरपाई करेनचं.

दिव्यश्रीने मला अगदी आस्थेने "लग्नं झालयं का तुझं? आणि कशी मुलगी पाहिजे?", वगैरे प्रश्ण विचारुन माझी विकेट काढली. मी तिथल्या समस्तं अविवाहित मंडळींची नावं जाहिर करणार होतो, पण तेवढ्यात इकडचा एक आयडी आपल्या नावाप्रमाणे वागला तर माझी पंचाईत होईल हा मुद्दा माझ्या वेळेत लक्षात आला. =))
त्या जर्मनीमधे विवाहमंडळ तसचं मराठी सुद्दलेकणाचे काढणार असल्याची खात्रीशीत वार्ता कळलेली आहे. इकडच्या सर्व सिंगल कार्ट्यांना रजिस्ट्रेशन मोफत अशी स्कीम आहे. =)).

फायनली नंबर लागुन आम्ही सगळे वर गेलो (हॉटेलमधे). शेजारशेजारच्या दोन टेबलांवर आमचा नंबर लागला. माझ्या टेबलवर नाखु, सूड. प्रशांत, चि.नाखु, एक्काकाका आणि वल्ली बसलेलो तर शेजारच्या टेबलावर दिव्यश्री, अभिजीत, बॅट्या, सगा, पगला गजोधर इ.इ. मंडळी बसलेली होती. तिथल्या तिथे दिव्यश्रीनी ताटाचे फोटो वगैरे काढुन, "चिमण्या, ह्याचेचं फोटो टाकायचे" वगैरे वॉर्निंगा दिल्याचं आठवतं. पोटात कावळे कोकलत असल्यानी आता फारसं काही आठवत नाही =))


सुकांतामधलं चविष्टं जेवण :)!!!

सुकांताच्या चविष्ट जेवणाबरोबर एक्काकाका, सूड आणि मी ह्यांच्यामधे कोंकणातले पदार्थ ह्यावर एक छोटासा संवाद झाला. नॉस्टॅल्जिल फिलिंग. भरगच्चं जेवण आणि त्याहुन भरगच्चं गप्पा मारता मारता वेळ कसा गेला हे समजलचं नाही अजिबात. जेवण करत असतानाचं मला एका मैत्रिणीचा फोन आला. डेक्कनलाचं आहेस तर रिचो-क्रिम (चतुश्रुंगी)ची कॉफी प्यायला जायचं का म्हणुन. मी डोक्याला हात लावला. =)). जेवुन खाली आलो आणि तोवर आमचे अवडते बुवा त्यांचं खेचर घेउन दत्तं म्हणुन उभे राहिले. =)). आता एवढं जेवल्यानंतर कसल्या गप्पा मारल्या जाताहेत हा विचार खोटा ठरला.

बुवांनी आधी आल्या आल्या अगोबा हत्ती, रानडुक्कर वगैरे चार-पाच प्राण्यांची नावं घेउन वल्लींना गुद्दे हाणले. नंतर मी अजिबात काही केलेलं नसताना उगाचं चिमण्या बिमण्या म्हणुन खांद्यावर हेल्मेट आपटलं, चार सहा गुद्दे घातले आणि हात पिरगाळला (त्यामुळे वृत्तांत लिहायला उशिर झाला) आणि नंतर स्वतःला लागलं म्हणुन हात चोळत बसले (हात चोळताना त्यामधे काहितरी दुसरही चोळलं गेलं असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर बुवांचे गाल (रागाने नव्हे) जरावेळ फुगीर वाटत होते हा भाग अलाहिदा. सगळ्यांनी बुवांना कट्ट्याला नं आल्याचा सामुहिक जाब विचारला. =)). धोत्रास हात घालणे हा प्रयोग काहिजणांनी करुन पाहिला. त्यानंतर मग सामुदायिक फोटो वगैरे काढले.

डावीकडुन पगला गजोधर, ५० फक्त, वल्ली, सूड, सगा, दिव्यश्रींच्या मागे नाखुन्काका, दिव्यश्री, चि. नाखुन, मी, अभिजित आणि प्रशांत

डावीकडुन प्रशांत, अभिजित, बॅटमॅन, पगला गजोधर, ५० फक्त, चि.नाखुन, वल्ली, सूड, माझ्यामागे नाखुन, मी आणि एक्काकाका

सदर फोटोंमधे सगळ्यांच्या मागे उभे राहुन फोटोस आधार दिल्याबद्दल नाखुन काकांचा मी शतशः आभारी आहे.

इथुन पुढे हळु हळु एक एक जणाने निरोप घ्यायला सुरु केली. मी, सगा, प्रशांत, बॅटमॅन, सूड, बुवा आणि वल्ली तिकडुन पुढे अक्षरधाराला जाणार होतो. तो उपकट्टाही छान पार पडला. तिकडेही निवांत गप्पा, पुस्तकांविषयी चर्चा झाल्या. मी काही विशेष खरेदी करायला गेलो नसलो तरी दोन-तीन पुस्तकं नजरेत भरलेली आहेत ती लौकरचं विकत घेण्यात येतील.
काही तांत्रिक अडचणींमुळे ह्या कट्ट्याचा वृत्तांत ८ तारखेनंतर व १६ तारखेच्या आत प्रसिद्ध करण्यात येईल. १६ तारखेस सदर धागा परत उडविण्यात येईल.

** सदर वृत्तांतामधे गमती गमतीमधे काड्या सारण्यात आलेल्या आहेत. कोणीही कृपया वाईट वाटुन घेउ नये ही नम्र विनंती. ह्या कट्ट्यास नवीन मंडळी पहिल्यांदाच भेटली असल्याने हा ढिस्क्लेमर टाकतोय. नित्यपरिचित मंडळींनी हा डिस्क्लेमर पौड फाट्यावरच्या नेहेमीच्या ड्रॉप बॉक्समधे नेउन टाकुन जळजळ व्यक्त करावी हि नम्र विनंती.**

असेचं कट्टे होतं राहोत आणि पुण्याचा कट्ट्प्पा ही ओळख बुवांना मिळो हि देवाचरणी प्रार्थना.

ह्यापेक्षा चांगला वृत्तांत येउ शकेल तो कोणीतरी लिहावा हि विनंती.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Oct 2015 - 9:13 pm | यशोधरा

त्या गेल्या आणि बॅट्या आला.

चूक! मी असतानाच बॅट्या आलेला.
प्रशांतही आधीच आलेला की!
मी १० मिनिटे थांबलेले!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 9:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गप्पा मारण्यामधे दंग असल्याने चुक झाली :/
थोड्या वेळाने रिपेअर करतो.

यशोधरा's picture

5 Oct 2015 - 9:29 pm | यशोधरा

सगा, सूडही.

आणि मी आले तेव्हा ऑलरेडी बिस्किटं संपत आलेली! :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 9:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

-_-

टैमलैन फारचं चुकली म्हणायची. -_-

कोणीतरी रिपेअर करा रे. साहित्य संपादक कुठे आहेत. =))

सतिश गावडे's picture

5 Oct 2015 - 9:32 pm | सतिश गावडे

छिद्रान्वेषी शब्दाचा अर्थ आज नेमका कळला. ;)

गंमती गंमतीत लिहिलेय हो साहेब. चुकल्यास माफी द्या बरे.

नाखु's picture

6 Oct 2015 - 8:20 am | नाखु

गावडेसर (आल्याआल्या)झोपेत होते ही शुद्ध लोणकढी थाप आणि अफवा होती हे सिद्द झाले !!

प्रत्ययवादी नाखु

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 1:27 pm | सतिश गावडे

मंग तसा परतिसादात लिवायचा ना गमतीत लिवलाय म्हनून. आमी शिरेसली घ्यातला नसता. मापी बिपी काय नाय वो. चालतो सग्ला.

यशोधरा's picture

7 Oct 2015 - 8:48 pm | यशोधरा

Kaa vo GavdeSir, tumaasni smaaylyaa naay kaay disat??

प्रचेतस's picture

7 Oct 2015 - 8:56 pm | प्रचेतस

तुम्ही ल्याटिनमध्ये का टायपायलात ओ?

यशोधरा's picture

8 Oct 2015 - 12:02 am | यशोधरा

Mobilevarun type kele. Aami pbirtivar geloy - almost.

यशोधरा's picture

8 Oct 2015 - 12:04 am | यशोधरा

Phirati

रेवती's picture

8 Oct 2015 - 12:06 am | रेवती

pbirtivar हे काय आहे?

यशोधरा's picture

8 Oct 2015 - 12:10 am | यशोधरा

Du du Rewakka!!
Lihiley naa khaalich "phirati*' ase?? Mag??

ओह! स्वारी, पाह्यले नव्हते. मला वाटलं की ठिकाणाचे नाव आहे. तू जसजशी पुढे जात राहशील तसतसे, निदान जेंव्हा शक्य आहे तेंव्हा ठिकाणाचे नाव कळवत राहिलीस तरी मजा वाटेल.

यशोधरा's picture

8 Oct 2015 - 12:17 am | यशोधरा

Nakki Rewati :)
Kharadphalyaavar lihin. Internet asale ki praytna karen.

रेवती's picture

8 Oct 2015 - 12:26 am | रेवती

ओक्के.

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 9:19 pm | सतिश गावडे

नाय दिसल्या. मिपावर "आत बनवलेल्या" स्मायल्या बंद झाल्या हायेत.

श्रीरंग_जोशी's picture

5 Oct 2015 - 9:20 pm | श्रीरंग_जोशी

लै भारी कट्टा झालेला दिसतोय. उत्सवमूर्ती लैच उत्साहे ब्वॉ.
बाकी वर्णचाची इष्टाइल लैच आवडली. फोटो मोजकेच पण उत्तम.

त्या जर्मनीमधे विवाहमंडळ तसचं मराठी सुद्दलेकणाचे काढणार असल्याची खात्रीशीत वार्ता कळलेली आहे.

मराठी सुद्दलेकणाचे नेमके काय काढकाय? पिसं काढणार की काय? ;-) .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 9:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांनी कट्ट्यामधे मी सुद्दलेकणाचे काढणार असचं म्हणलेलं होतं. त्यामुळे क्लास, वर्ग का पिसं हा प्रश्णं येणारा काळचं ठरवेल.

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 9:50 pm | दिव्यश्री

अरे बाळ ...अभ्यास कमी पडयालाय... शुद्ध लेखण. असा शब्द आहे तो काय समजलास.

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 9:51 pm | दिव्यश्री

अरे बाळ ...अभ्यास कमी पडयालाय... शुद्ध लेखण. असा शब्द आहे तो काय समजलास.

"लग्नं झालयं का तुझं? आणि कशी मुलगी पाहिजे?"

आम्हाला विचारलेल्या प्रश्नापेक्षा हा प्रश्न फारच सौम्य होता!! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 9:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. तुला विचारलेला प्रश्ण ऐकुन मी ऑलमोस्ट बराचं मागे झालेलो :)!!

कुठल्याही प्रसंगी साथ देतात ते खरे मित्र!! आपण मागे झालात त्यातच सारं काही आलं !! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 9:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुला त्रिकुटाबद्दलचे प्रश्ण पचणार होते का? =))

टवाळ कार्टा's picture

5 Oct 2015 - 9:40 pm | टवाळ कार्टा

असे नक्की काय विचारले कि साक्षात सूडला झेपले नै

झेपलं नाय असं नाही. जीभेवरलं पडजीभेवर ढकलावं लागलं इतकंच. तोच प्रश्न चिमणने अक्षरधारासमोर विचारला तेव्हा त्याला यथोचित उत्तर दिलेलं आहे. =))

बॅटमॅन's picture

5 Oct 2015 - 9:41 pm | बॅटमॅन

खी खी खी =)) =)) =))

(एककुटी) बॅटमॅन.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 10:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मेतकुटवरनं फर्मास ष्लेष सुचलेला आहे =))!!

सूड's picture

5 Oct 2015 - 10:50 pm | सूड

हौ अबौट मेटाकुटी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत आणि फ़ोटो लै भारी.
नव्या मंडळींना पाहता आलं.

बॅटमॅनला पाहुन अपेक्षाभंग झाला. :)

-दिलीप बिरुटे

++++++++++++++++ 111111111111

वृत्तान्त मस्तच कप्तानसाहेब. पाताळेश्वर ते सुकान्ता ते पुढे अक्षरधारा व मेहता अशा सर्व टप्प्यांत मज्या आली. कप्तान जॅक स्पॅरो, नाखुनकाका, चि.नाखु आणि दिव्यश्री तसेच यमन व पगला गजोधर या सदस्यांशी प्रथमच भेट झाली.

(रुमालटाकुनठेवलाआहेतरिनंतरलिहितो)

(नाखुकाकांच्यास्पेसबारचाफॅनबॅट्मॅन)

प्रचेतस's picture

5 Oct 2015 - 9:49 pm | प्रचेतस

जवळपास अडीच तास पाताळेश्वराच्या आवारात असूनही याखेपी एकदाही लेणीत गेलो नै ब्वा.

पद्मावति's picture

5 Oct 2015 - 10:07 pm | पद्मावति

खूप छान वृतांत आणि फोटो.

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 10:09 pm | दिव्यश्री

.

यशो ताई आणि माझी पहिली ओळख …
" काय खाताय ? मला पण " …. अशी झाली .
कॅप्टन राव …तुम्ही खाण्याच्या पदार्थांची नावं कशी विसराल ? १०/१० मार्क .
जाताना रीकामे कुकीज चे डबे दिव्यश्री ताई च्या फारीन च्या " खाउणी भरूण णेले" हे. वे. सा. न. ल.
सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला .

यशोधरा's picture

5 Oct 2015 - 10:14 pm | यशोधरा

:D

यशोधरा's picture

5 Oct 2015 - 10:25 pm | यशोधरा

दिव्यश्री! फारीणचा खाउ ण दिल्याबद्दल णिषेध!! दुत्त!!

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 10:12 pm | दिव्यश्री

.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 10:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझी टाईमलाईन पारचं गंडली ब्वॉ ह्यावेळी. जाउंदे आता वल्लींनी एक वृत्तांत लिहावा अशी मागणी =))व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व

प्रचेतस's picture

5 Oct 2015 - 10:26 pm | प्रचेतस

इतकी पण नाय गंडली रे.:)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 10:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे बघा बुवांबरोबरच्या कट्ट्याचं वर्णन त्यांचे चहातेचं णीट करु शकतील की नाही. आम्हाला त्यांनी रांगेतही उभं केलं नाही. तस्मात त्या कट्ट्याचा वृत्तांत तुम्ही लिहावा हि मागणी.

प्रचेतस's picture

5 Oct 2015 - 10:31 pm | प्रचेतस

खी खी खी.
तो उपवृत्तान्त आम्ही लिहूच. नाखुनकाका जरा अधिकच समरसतेने लिहितील. =))

बाकी गुर्जींच्या चाहत्यांच्या रांगेत खूप लंबर असल्याने ते बहुधा कुणालाच स्थाण देत नसावेतसे दिसते.

चिमणराव तुम्ही म्हणता तसे तुम्ही काय हल्क, बैल वगैरे कॅटेगरीतले दिसत नाहीत ओ. आपल्या वल्ल्याएवढेच तर आहात.
मी पण जरा दोन चार किलो वाढवलो तर वल्ल्याएवढा होईन. :) उंचीला बी अम्मळ तेवढाच हाय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2015 - 10:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी काडीपैलवानापासुन तेवढा फुगलोय, आता हळु हळु कमी व्हायला लागलोय. :/...!!! :(!!!!
एक साल बाद फिरसे बारिक होएंगा/

अभ्या..'s picture

5 Oct 2015 - 10:45 pm | अभ्या..

बी द भक्त ऑफ पन्नास फक्त

अत्रुप्त आत्मा's picture

6 Oct 2015 - 12:10 am | अत्रुप्त आत्मा

@ते बहुधा कुणालाच स्थाण देत नसावेतसे दिसते.>>> असो! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
..............
समांतर
धुबुकागोबा-तवामारातृप्त
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/frying-pan-smash.gif
.........................
अतीसमांतर :- बाकिचे फोटू कुठ्ठायत? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

एस's picture

5 Oct 2015 - 11:22 pm | एस

पुणे कट्टा तो पुणे कट्टा! :-)

चांदणे संदीप's picture

5 Oct 2015 - 11:36 pm | चांदणे संदीप

खुसखुशीत, खमंग, चटकदार वृत्तांत! :)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Oct 2015 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा

@बुवांनी आधी आल्या आल्या अगोबा हत्ती, रानडुक्कर वगैरे चार-पाच प्राण्यांची नावं घेउन
वल्लींना गुद्दे हाणले.>> ह्हूं!!! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ते त्या हत्तीनी माझा छळ सुरू केला म्हणून! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

@नंतर मी अजिबात काही केलेलं नसताना http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/chainsaw.gif उगाचं चिमण्या बिमण्या म्हणुन खांद्यावर हेल्मेट आपटलं, चार सहा गुद्दे घातले आणि हात पिरगाळला>>> दुष्ट हल कट http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shotgun.gifचिमण! हत्ती पाठोपाठ स्वतःही माझ्यावर गोळीबार केला... ते नै सांगत .. ल्लुल्लुल्लुल्लु! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

@(त्यामुळे वृत्तांत लिहायला उशिर झाला) >> बघ बघ त्या हत्तीचाच गुण लागला तुला. स्वतः करुन दुसय्राच्या अंगावर ढकलून द्यायचा... दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

@आणि नंतर स्वतःला लागलं म्हणुन हात चोळत बसले (हात चोळताना त्यामधे काहितरी दुसरही चोळलं गेलं असल्याचा भास सगळ्यांना झाला.>>> आं sssssssss http://www.sherv.net/cm/emo/angry/pulling-hair-out.gif इसका बदला लिया जाएगा.. http://www.sherv.net/cm/emoticons/war/smiley-with-bomb.gifअगली भ्येट में बराब्बर लिया जाएगा

@नंतर बुवांचे गाल (रागाने नव्हे) जरावेळ फुगीर वाटत होते हा भाग अलाहिदा. सगळ्यांनी बुवांना कट्ट्याला नं आल्याचा सामुहिक जाब विचारला. =)). धोत्रास हात घालणे हा प्रयोग काहिजणांनी करुन पाहिला.>> त्याचा तिथच घेतला की https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ...................... सूड! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/gun.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2015 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे

हे घ्या अजून काही फोटो.

पाताळेश्वराच्या आवारातील वटवृक्षाखाली गहन चर्चा करून ब्रम्हज्ञान प्राप्त करून घेताना मिपाकर...

.

सुकांता आदरातिथ्याची तयारी करत असताना गफ्फांत वेळ घालविणारे मिपाकर आणि त्यांच्या मागे मिपाकरांना पाहण्यासाठी उसळलेला अथांग जनसागर...

.

जेवणाबरोबर जेवणाइतक्याच चविष्ट गप्पांचा आस्वाद घेताना...

.

बुवांच्या आगमनानंतर बुवांनी (आणि बुवांच्या संबंधात) उपस्थित केलेल्या/झालेल्या मुद्द्यांवर सुकांताच्या बाहेर जमलेले चर्चासत्र...

.

पांगापांग व्हायला सुरुवात होण्यापूर्वी काढलेला गृपफोटो...

.

मार्कस ऑरेलियस's picture

7 Oct 2015 - 6:09 pm | मार्कस ऑरेलियस

१) वल्ली तात्यांना निळ्या रंगाच्या फ्रेश कलरच्या शर्टात पाहुन साश्चर्य आणंड वाटला .
२) त्यांची काळ्या टी शर्ट ची परंपरा चिमणरावांनी चालु ठेवली आहे असे एक सुक्ष्म ऑब्झर्वेशन केले आहे
३) पन्नासरावांच्या जगप्रसिध्द मिशांना मोठ्ठी दाद देण्यात येत आहे
४) नाखुनकाका घुश्श्याने गावडे सरांकडे का बरे पहात आहेत ? गावडे सरांनी त्यांना बोलताना थांबवले की काय ?
५) पाठीवर स्यॅक घेवुन आलेल्या लोकांच्या स्यॅक मधे काय काय असेल ह्याचा साधारण अंदाज बांधता येत आहे !
६) आणि अखेरीस अखेरच्या फोटोत शेवटी अगोबाने अतृप्त अत्म्याला झपाटलेच हे स्पष्ट होत आहे !

कट्टा मिस झाल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे
- प्रगो

भारी झाला की कट्टा! सगळे फोटू पाहून मजा वाटतिये. अगदी पुण्यात गेल्यासारखं वाटतय.
मिपाकरांची पुढची पिढी या सगळ्यामध्ये मोठी होतिये.
एक्काकाकांच्या चिरंजिवांचे अभिनंदन. चांगली बातमी आहे.
सुकांताला जाऊन बहुतेक ११ वर्षे झालीत.
चिमणबाळाने शेवटी लिहिलाच वृत्तांत. आधी मला खात्री वाटत नव्हती.
कबूल केल्यानुसार सगळेजण आले. यशोसारखी महा बिझी सदस्याही आली होती म्हणजे मिपावरील प्रेम बघा!
दिव्यश्रीने यशोला रेवती म्हटल्याचे वाचले. यावर काही बोलायचे नाही. तू भेट आता!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2015 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद रेवाक्का !

यावर काही बोलायचे नाही. तू भेट आता!

ही धमकी दिव्यश्रीला आहे ना? ;)

डॉ. तुमचे व लेकाचे अभिनंदन!

अगं हो हो! धमकी कशी देईन? ए के ४७ आहे ना तुझ्याकडे!

आहे नाही, आणणारे. पण तू थोडीच दुत्त आहेस? ती फक्त दुत्त लोकांसाठी आहे.

मुक्त विहारि's picture

6 Oct 2015 - 4:25 am | मुक्त विहारि

आता पुढचा कट्टा कधी?

नाखु's picture

6 Oct 2015 - 8:27 am | नाखु

आकुर्डीला आलात की लगेचच.

बाकी बाबा (महाराजांना) आमचा नमस्कार सांगणे.

मुवींच्या बाबांच्या असंख्य भक्तगणांपैकी एक

तेंव्हा परत एक कट्टा करू या.

भारि कटटा,सुणडर वरउतताणट.
अपहलाटुण पोतो.

छान झालेला दिस्तोय कट्टा.दिव्यश्री राॅक्स!!

श्रीरंग_जोशी's picture

6 Oct 2015 - 6:32 pm | श्रीरंग_जोशी

दिव्यश्री पाषाणहॄदयी आहे असे म्हणायचे आहे का? ;-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Oct 2015 - 7:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळे फोटो बघुन मनापासुन दुख्ख: झाले. किमान २५ किलोने अजुन हलके होणे भाग आहे. राक्षस वाटतोय मी सगळ्यांपुढे :/!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! दुत्तं दुत्तं बारिक लोक्स!! :/

सस्नेह's picture

6 Oct 2015 - 11:04 am | सस्नेह

मी तर सगळ्या फोटोत चिमणा 'चिमण' शोधून दमले !

हे असे जेवणाचे फोटो टाकण्यावर बंदी आणली पाहिजे. ते दुत्त दुत्त रिपीट.

मालोजीराव's picture

6 Oct 2015 - 9:58 am | मालोजीराव

वृत्तांत मस्तच…पन्नासराव आणि वल्ली बरेच वाळलेत ;)

प्रीत-मोहर's picture

6 Oct 2015 - 9:58 am | प्रीत-मोहर

मस्तच झाला की कट्टा.

लै भारी वृत्तांत आणि फटु! जाम धमाल! पुणेकरांनी चहाचा विषय काढल्याबरोबर अख्ख्या एअरटेलला धक्का बसून कॉल ड्रॉप झाला, म्हणजे बघा! तेवढ्यात मुविंना नंबर लागल्यामुळे बाकी मंडळींची खबर घेता आली नै. पण ती दिव्यश्रीने चांगलीच घेतल्याचे कळते. अनाहितांतर्फे दिव्यश्रीला स्टँडिंग ओव्हेशन!

हे सगळेजण धोकट्या घेऊन का फिरत आहेत ते मात्र कळले नाई!

नूतन सावंत's picture

6 Oct 2015 - 10:24 am | नूतन सावंत

छान वृतांत अन फोटोही.
डॉक्टरसाहेबांचे न त्यांच्या चिरंजीवांचे अभिनंदन.

मालोजीराव's picture

6 Oct 2015 - 11:04 am | मालोजीराव

डॉक्टरसाहेबांचे न त्यांच्या चिरंजीवांचे अभिनंदन.

नीलमोहर's picture

6 Oct 2015 - 11:34 am | नीलमोहर

छान वृतांत अन फोटो,
डॉक्टरसाहेबांचे आणि त्यांच्या चिरंजीवांचे अभिनंदन..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2015 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद !

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2015 - 4:49 pm | टवाळ कार्टा

हार्दिक अभिनंदन...!!

असंका's picture

6 Oct 2015 - 4:39 pm | असंका

हार्दिक अभिनंदन...!!

सस्नेह's picture

6 Oct 2015 - 11:04 am | सस्नेह

आणि खमंग वृ. !!

इरसाल's picture

6 Oct 2015 - 12:23 pm | इरसाल

मस्त मज्जा केलेली दिसतेय.
बॅट्याचे डोळे स्वप्नाळु आहेत की पेंगुळलेले !!!!!!

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2015 - 1:57 pm | टवाळ कार्टा

ब्येर्की हैत =))

सुबोध खरे's picture

6 Oct 2015 - 12:34 pm | सुबोध खरे

एक उत्तम कट्टा मिसला. वाईट वाटून राह्यले

कट्टा हुकला. पुढच्या वेळेस नक्की येणार.
एक्काकाकांच्या चिरंजिवांचे अभिनंदन

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2015 - 12:57 pm | प्रभाकर पेठकर

उत्तम कट्ट्याचा अत्युत्तम वृत्तांत.
डॉक्टरसाहेबांच्या मुलाचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला पण पार्टी ड्यू हे विसरू नका. (कॅश पाठवलीत तरी चालेल.)

सर्व कट्टेबाजांचे अभिनंदन. मी येतो आहे पुन्हा डिसेंबरात.

नाखु's picture

6 Oct 2015 - 1:00 pm | नाखु

जंगी महा संमेलन व्हावे ही श्रींची ईच्छा !!!!

मुवींचा तत्पर स्वयंसेवक नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2015 - 11:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

तुम्ही याल तेव्हा डिसेंबरात जंगी कट्टा करू, हाकानाका.

स्वाती दिनेश's picture

6 Oct 2015 - 1:10 pm | स्वाती दिनेश

कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे,
वृत्तांत वाचून फ्राफुतला इनो संपवला.
स्वाती

इशा१२३'s picture

6 Oct 2015 - 2:02 pm | इशा१२३

मस्त वृत्तांत मस्त फोटो.
एक्काकाकांच्या चिरंजिवांचे अभिनंदन.

पियुशा's picture

6 Oct 2015 - 3:25 pm | पियुशा

वा वा झाला बै कट्टा आला बै व्रुत्तान्त ;)

सानिकास्वप्निल's picture

6 Oct 2015 - 6:46 pm | सानिकास्वप्निल

छान झाला कट्टा.
फोटो, वृत्तांत पण मस्तं.
एक्का कांकाच्या मुलाचे अभिनंदन :)

धागा काढून २४ तास होत आले तरी जेमतेम ७० प्रतिसाद? आमच्या वेळी असं नव्हतं!!