✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Mon, 10/05/2015 - 21:10  ·  लेख
लेख
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला. कट्टा आमच्या शेजारच्या पुण्यनगरीमधे व्हायचा असल्याने किमान दोन्ही पायांमधले बुट काढल्याखेरीज कट्टा व्हायचा नाही हे वेगळे सांगणे नं लगे. मिपाकरांच्या ह्या लौकिकास मिपाकरांनी जागुन आणि उत्सवमुर्तींनी जागुन दुसरा धागा काढला. त्यावरही कोणताही निर्णय नं झाल्याने शेवटी मला दो सोनार की एक लोहार की ह्या उक्तीस जागुन शेवटचा धागा टाकावा लागला. त्यानुसार ४ ऑक्टोबर ला पुण्यभुमीमधल्या पाताळेश्वर नामक मध्यवर्ती ठिकाणी कट्टा निश्चित झाला. सदर कट्टा ठरल्याचं उत्सवमुर्तींनाही माहिती नव्हतं. आपल्या एक्काकाकांनी सुदैवानी त्यांना व्यनि करुन बोलाउन घेतलं. कट्ट्याच्या आदल्याचं दिवशी एका मिपाकरणीला मज पामरानेचुकुन चिडवलेले असल्याने व त्याचा बदला कट्ट्याच्या दिवशी घेतला जाणार ह्या स्पष्ट मिळालेल्या धमकीमुळे मी हेल्मेट नं विसरता बरोबर घेतलं आणि मगचं गाडीवरती टांग टाकली. आणि बरोबर ११.०५ वाजता कट्ट्याच्या स्थानी पोचलो. मला जायला जरा उशिर झालेला होता तोपर्यंत एक्काकाका, नाखुनकाका, चि.नाखु, वल्ली उर्फ प्रचेतस उर्फ अगोबा हत्ती उर्फ बरचं काय काय, अभिजित अवलिया, यमन आणि खुशबु फेम पगला गजोधर इत्यादी मंडळी जमलेली होती. भितीचं कारण जवळपास कुठेही नं दिसल्याने मी ही भर रस्ता अडवुन गप्पा हाणणार्‍या टोळक्यामधे सामिल झालो. अभिजीत, यमन आणि पगला गजोधर ह्यांना पहिल्यांदाच भेटत असल्याने ओळखपाळखीचा समारंभ पार पडला. जेमतेम पाच मिनिटं होतात नाही होतात तोपर्यंत उत्सवमुर्तींचं आगमन झालं. "पैचान कौन" च्या कार्यक्रमाची दुसरी फेरी पार पडली (मी दिलेल्या क्लुवरुन सदर उत्सवमुर्तींना माझा आयडी ओळखता आला नाही शुन्य मार्क्स). दिव्यश्रीनी आल्या आल्या आणि ओळख झाल्या झाल्या पहिली गोष्ट कुठली केली असेल तर प्रत्येकाचा फेसबुक आयडी आहे का नाही ह्याची वास्तपुस्त करुन जागेवर मित्रयादीमधे भर घातली. फोटोंना लाईक केलं नाही तर ब्लॉक करु अशी लुक्राटिव्ह ऑफरही ठेवली =)). वल्लींच्या फोनवरती पैसाताईचा फोन आला. वल्लीनी कोणकोण आलयं ची माहिती देउन फोन माझ्याकडे दिला. "येताय का, चहा पाजु" असं मी बोलल्यानंतर कसा काय कोण जाणे अचानक कॉल ड्रॉप झाला =)). करा करा मजा करा. कटिंग च्या कटिंग रिचवा अश्या शुभेच्छा थोड्या वेळाने व्हॉट्सॅपवर आल्यात =)) (पुराव्याने शाबित करुन दाखविन काय समजलांत =)) ). नाखुनकाकांना बॅट्या कधी येतो ह्याचे वेध लागलेले होते. तो नुकताच झोपेतुन उठल्याची सुवार्ता कोणीतरी दिली (बहुतेक वल्ली). सगा आजारी असल्याने येणार नाही अशीही बातमी कळली. मी गप्पांमधे गुंतलेला असताना यशोतैने एंट्री घेतली. हमकु बरोबर पकड्या उन्होने (दुत्तं दुत्तं मिपाकरांनी मीचं तो म्हणुन थेट समोर उभा केला नं). =)).तेवढ्या वेळामधे दिव्यश्रीनी, "अय्या, तुम्ही रेवाक्का कां" असं म्हणुन तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी टाकली. (ह्या नांदीविषयी इथे वाचा). आख्खी ३ मिनिटं १६ सेकंद हजेरी लाउन हापिसातल्या सर्व्हरला इंजेक्शन द्यायसाठी त्या निघुन गेल्या. दरम्यान बॅट्या आणि प्रशांत हे दोघही आले. (टैमलैन गंडली राव गप्पा मारायच्या नादात) नाखुन काका आणि बॅट्याची गळाभेट बघुन "ड्वॉळे पाणावले". बॅट्याने आल्या आल्या चौफेर बॅटिंग चालु केली. ह्या मनुक्षाकडुन कुठली माहिती कुठल्या वेळी किती डिट्टेलवारीमधे मिळेल ह्याचा भरवसा नाही. इकडे एका बाजुला अमचे अवडते बुवा कधी येणार असा ग-ह-न प्रश्ण आम्हाला पडलेला होता. त्यावेळेला बुवा यजमानांकडे पुजाविधींमधे मग्न असल्याने थेट १.३० वाजता दर्शन देतील ही ताम्रपटावर कोरुन ठेवण्याएवढी महत्त्वाची माहिती मिळाली. त्यावरुन हिंदु धर्मातील कावळ्याचं महत्त्व ह्यावर एक छोटासा परिसंवाद रंगला. हा सु-संवाद चालु असताना मला डोळ्याच्या कोपर्‍यामधुन पाताळेश्वराच्या दरवाज्यामधे काहितरी चमकलेलं दिसलं. त्या चमकणार्‍या गोष्टीला जोडलेला कानही दिसला. भिकबाळीफेम सूड आणि मिपावरचे लोककलांचे आश्रयदाते सगा दोघही हो नाही करता करता आले. आता खर्‍या अर्थाने गप्पा-टप्पांना सुरुवात झालेली होती. उत्सवमुर्तींनी त्त्यांच्या पर्समधुन चितळ्यांची बाकरवडी काढली. यमनने छानश्या कुकीज आणलेल्या (कुकीजचं ना रे? पदार्थाचं नावं विसरलो सॉरी. योग्य नावं सांग संपादित करेन). दरम्यानच्या काळामधे एवढी सगळी मंडळी पाताळेश्वराचा रस्ता आपल्याच काकाचा असल्यासारखी रस्ता अडवुन उभी होती. शेवटी हळुचं बाजुला सरकली. तेवढ्यामधे श्री व सौ समीर ह्यांचही आगमन झालं. हळु हळु गोलाचं रुपांतर छोट्या छोट्या कंपुंमधे झालं. उत्सवमुर्ती उत्साहाने सगळ्यांची विचारपुस करत होत्या आणि फोटोही काढत होत्या. त्यांनी एकदोघांना चुकुन चुकीचा प्रश्ण विचारुन, त्यामधुन भयानकच चुकीचा अर्थ निघाल्याचं आमचा वार्ताहार सांगतो. तेवढ्यातल्या तेवढयात बॅट्याने चि.नाखुबरोबर कन्नडमधे गुड गुड करुन आपण त्यामधेही गुड असल्याचं दाखवुन दिलं. यमनने एव्हाना मी जेवायला येणार नसल्याचा वेगळा सुर लावला. त्याचं कारण अगदी व्हॅलिड असल्याने सोडुन दिलं. अगले टैम ऐसा नै होगा. एव्हाना मघाच्या चर्चेमधले कावळे पोटामधे शिरल्याचं एकेकाने जाहिर करायला सुरुवात केली. सुकांताला जायचं ठरलं.
एक्काकाकांनी त्यांचा मुलगा MS in Information Technology झाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ सुकांताला पार्टी दिली. :)
तिकडुन गाड्या काढुन सुकांताला पोचलो. तिकडे भयानक गर्दी असल्याने बॅटमॅनने त्याचं नावं सांगुन टेबलं बुक करुन ठेवलं. तिकडेही बराचं वेळ वाट पहायला लागणार असल्याने तिकडे परत गप्पा रंगायला लागल्या. ५० फक्त ह्यांचही आगमन तिकडे झालं. त्यांची माझी ओळख थेट कट्टा संपताना झाली त्यामुळे पुढच्या कट्ट्यामधे नं मारलेल्या गप्पांची भरपाई करेनचं. दिव्यश्रीने मला अगदी आस्थेने "लग्नं झालयं का तुझं? आणि कशी मुलगी पाहिजे?", वगैरे प्रश्ण विचारुन माझी विकेट काढली. मी तिथल्या समस्तं अविवाहित मंडळींची नावं जाहिर करणार होतो, पण तेवढ्यात इकडचा एक आयडी आपल्या नावाप्रमाणे वागला तर माझी पंचाईत होईल हा मुद्दा माझ्या वेळेत लक्षात आला. =)) त्या जर्मनीमधे विवाहमंडळ तसचं मराठी सुद्दलेकणाचे काढणार असल्याची खात्रीशीत वार्ता कळलेली आहे. इकडच्या सर्व सिंगल कार्ट्यांना रजिस्ट्रेशन मोफत अशी स्कीम आहे. =)). फायनली नंबर लागुन आम्ही सगळे वर गेलो (हॉटेलमधे). शेजारशेजारच्या दोन टेबलांवर आमचा नंबर लागला. माझ्या टेबलवर नाखु, सूड. प्रशांत, चि.नाखु, एक्काकाका आणि वल्ली बसलेलो तर शेजारच्या टेबलावर दिव्यश्री, अभिजीत, बॅट्या, सगा, पगला गजोधर इ.इ. मंडळी बसलेली होती. तिथल्या तिथे दिव्यश्रीनी ताटाचे फोटो वगैरे काढुन, "चिमण्या, ह्याचेचं फोटो टाकायचे" वगैरे वॉर्निंगा दिल्याचं आठवतं. पोटात कावळे कोकलत असल्यानी आता फारसं काही आठवत नाही =)) सुकांतामधलं चविष्टं जेवण :)!!! सुकांताच्या चविष्ट जेवणाबरोबर एक्काकाका, सूड आणि मी ह्यांच्यामधे कोंकणातले पदार्थ ह्यावर एक छोटासा संवाद झाला. नॉस्टॅल्जिल फिलिंग. भरगच्चं जेवण आणि त्याहुन भरगच्चं गप्पा मारता मारता वेळ कसा गेला हे समजलचं नाही अजिबात. जेवण करत असतानाचं मला एका मैत्रिणीचा फोन आला. डेक्कनलाचं आहेस तर रिचो-क्रिम (चतुश्रुंगी)ची कॉफी प्यायला जायचं का म्हणुन. मी डोक्याला हात लावला. =)). जेवुन खाली आलो आणि तोवर आमचे अवडते बुवा त्यांचं खेचर घेउन दत्तं म्हणुन उभे राहिले. =)). आता एवढं जेवल्यानंतर कसल्या गप्पा मारल्या जाताहेत हा विचार खोटा ठरला. बुवांनी आधी आल्या आल्या अगोबा हत्ती, रानडुक्कर वगैरे चार-पाच प्राण्यांची नावं घेउन वल्लींना गुद्दे हाणले. नंतर मी अजिबात काही केलेलं नसताना उगाचं चिमण्या बिमण्या म्हणुन खांद्यावर हेल्मेट आपटलं, चार सहा गुद्दे घातले आणि हात पिरगाळला (त्यामुळे वृत्तांत लिहायला उशिर झाला) आणि नंतर स्वतःला लागलं म्हणुन हात चोळत बसले (हात चोळताना त्यामधे काहितरी दुसरही चोळलं गेलं असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर बुवांचे गाल (रागाने नव्हे) जरावेळ फुगीर वाटत होते हा भाग अलाहिदा. सगळ्यांनी बुवांना कट्ट्याला नं आल्याचा सामुहिक जाब विचारला. =)). धोत्रास हात घालणे हा प्रयोग काहिजणांनी करुन पाहिला. त्यानंतर मग सामुदायिक फोटो वगैरे काढले. डावीकडुन पगला गजोधर, ५० फक्त, वल्ली, सूड, सगा, दिव्यश्रींच्या मागे नाखुन्काका, दिव्यश्री, चि. नाखुन, मी, अभिजित आणि प्रशांत डावीकडुन प्रशांत, अभिजित, बॅटमॅन, पगला गजोधर, ५० फक्त, चि.नाखुन, वल्ली, सूड, माझ्यामागे नाखुन, मी आणि एक्काकाका सदर फोटोंमधे सगळ्यांच्या मागे उभे राहुन फोटोस आधार दिल्याबद्दल नाखुन काकांचा मी शतशः आभारी आहे. इथुन पुढे हळु हळु एक एक जणाने निरोप घ्यायला सुरु केली. मी, सगा, प्रशांत, बॅटमॅन, सूड, बुवा आणि वल्ली तिकडुन पुढे अक्षरधाराला जाणार होतो. तो उपकट्टाही छान पार पडला. तिकडेही निवांत गप्पा, पुस्तकांविषयी चर्चा झाल्या. मी काही विशेष खरेदी करायला गेलो नसलो तरी दोन-तीन पुस्तकं नजरेत भरलेली आहेत ती लौकरचं विकत घेण्यात येतील. काही तांत्रिक अडचणींमुळे ह्या कट्ट्याचा वृत्तांत ८ तारखेनंतर व १६ तारखेच्या आत प्रसिद्ध करण्यात येईल. १६ तारखेस सदर धागा परत उडविण्यात येईल. ** सदर वृत्तांतामधे गमती गमतीमधे काड्या सारण्यात आलेल्या आहेत. कोणीही कृपया वाईट वाटुन घेउ नये ही नम्र विनंती. ह्या कट्ट्यास नवीन मंडळी पहिल्यांदाच भेटली असल्याने हा ढिस्क्लेमर टाकतोय. नित्यपरिचित मंडळींनी हा डिस्क्लेमर पौड फाट्यावरच्या नेहेमीच्या ड्रॉप बॉक्समधे नेउन टाकुन जळजळ व्यक्त करावी हि नम्र विनंती.** असेचं कट्टे होतं राहोत आणि पुण्याचा कट्ट्प्पा ही ओळख बुवांना मिळो हि देवाचरणी प्रार्थना. ह्यापेक्षा चांगला वृत्तांत येउ शकेल तो कोणीतरी लिहावा हि विनंती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
48390 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

वृ मध्ये चुका आहेत! :D

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 21:13 नवीन
त्या गेल्या आणि बॅट्या आला.
चूक! मी असतानाच बॅट्या आलेला. प्रशांतही आधीच आलेला की! मी १० मिनिटे थांबलेले!
  • Log in or register to post comments

गप्पा मारण्यामधे दंग असल्याने

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 21:18 नवीन
गप्पा मारण्यामधे दंग असल्याने चुक झाली :/ थोड्या वेळाने रिपेअर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सगा, सूडही.

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 21:29 नवीन
सगा, सूडही. आणि मी आले तेव्हा ऑलरेडी बिस्किटं संपत आलेली! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

-_-

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 21:31 नवीन
-_- टैमलैन फारचं चुकली म्हणायची. -_- कोणीतरी रिपेअर करा रे. साहित्य संपादक कुठे आहेत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छिद्रान्वेषी शब्दाचा अर्थ आज

सतिश गावडे
Mon, 10/05/2015 - 21:32 नवीन
छिद्रान्वेषी शब्दाचा अर्थ आज नेमका कळला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गंमती गंमतीत लिहिलेय हो साहेब

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 21:50 नवीन
गंमती गंमतीत लिहिलेय हो साहेब. चुकल्यास माफी द्या बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

यावरून

नाखु
Tue, 10/06/2015 - 08:20 नवीन
गावडेसर (आल्याआल्या)झोपेत होते ही शुद्ध लोणकढी थाप आणि अफवा होती हे सिद्द झाले !! प्रत्ययवादी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मंग तसा परतिसादात लिवायचा ना

सतिश गावडे
Wed, 10/07/2015 - 13:27 नवीन
मंग तसा परतिसादात लिवायचा ना गमतीत लिवलाय म्हनून. आमी शिरेसली घ्यातला नसता. मापी बिपी काय नाय वो. चालतो सग्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

Kaa vo GavdeSir, tumaasni

यशोधरा
Wed, 10/07/2015 - 20:48 नवीन
Kaa vo GavdeSir, tumaasni smaaylyaa naay kaay disat??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्ही ल्याटिनमध्ये का

प्रचेतस
Wed, 10/07/2015 - 20:56 नवीन
तुम्ही ल्याटिनमध्ये का टायपायलात ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

Mobilevarun type kele. Aami

यशोधरा
गुरुवार, 10/08/2015 - 00:02 नवीन
Mobilevarun type kele. Aami pbirtivar geloy - almost.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

Phirati

यशोधरा
गुरुवार, 10/08/2015 - 00:04 नवीन
Phirati
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

pbirtivar हे काय आहे?

रेवती
गुरुवार, 10/08/2015 - 00:06 नवीन
pbirtivar हे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

Du du Rewakka!!

यशोधरा
गुरुवार, 10/08/2015 - 00:10 नवीन
Du du Rewakka!! Lihiley naa khaalich "phirati*' ase?? Mag??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ओह! स्वारी, पाह्यले नव्हते.

रेवती
गुरुवार, 10/08/2015 - 00:12 नवीन
ओह! स्वारी, पाह्यले नव्हते. मला वाटलं की ठिकाणाचे नाव आहे. तू जसजशी पुढे जात राहशील तसतसे, निदान जेंव्हा शक्य आहे तेंव्हा ठिकाणाचे नाव कळवत राहिलीस तरी मजा वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

Nakki Rewati :)

यशोधरा
गुरुवार, 10/08/2015 - 00:17 नवीन
Nakki Rewati :) Kharadphalyaavar lihin. Internet asale ki praytna karen.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ओक्के.

रेवती
गुरुवार, 10/08/2015 - 00:26 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नाय दिसल्या. मिपावर "आत

सतिश गावडे
Wed, 10/07/2015 - 21:19 नवीन
नाय दिसल्या. मिपावर "आत बनवलेल्या" स्मायल्या बंद झाल्या हायेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वा वा वा

श्रीरंग_जोशी
Mon, 10/05/2015 - 21:20 नवीन
लै भारी कट्टा झालेला दिसतोय. उत्सवमूर्ती लैच उत्साहे ब्वॉ. बाकी वर्णचाची इष्टाइल लैच आवडली. फोटो मोजकेच पण उत्तम.
त्या जर्मनीमधे विवाहमंडळ तसचं मराठी सुद्दलेकणाचे काढणार असल्याची खात्रीशीत वार्ता कळलेली आहे.
मराठी सुद्दलेकणाचे नेमके काय काढकाय? पिसं काढणार की काय? ;-) .
  • Log in or register to post comments

त्यांनी कट्ट्यामधे मी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 21:22 नवीन
त्यांनी कट्ट्यामधे मी सुद्दलेकणाचे काढणार असचं म्हणलेलं होतं. त्यामुळे क्लास, वर्ग का पिसं हा प्रश्णं येणारा काळचं ठरवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

Punha shoonya marks....agadich NAPASS!!!

दिव्यश्री
Mon, 10/05/2015 - 21:50 नवीन
अरे बाळ ...अभ्यास कमी पडयालाय... शुद्ध लेखण. असा शब्द आहे तो काय समजलास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे बाळ ...अभ्यास कमी पडयालाय

दिव्यश्री
Mon, 10/05/2015 - 21:51 नवीन
अरे बाळ ...अभ्यास कमी पडयालाय... शुद्ध लेखण. असा शब्द आहे तो काय समजलास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

"लग्नं झालयं का तुझं? आणि कशी

सूड
Mon, 10/05/2015 - 21:21 नवीन
"लग्नं झालयं का तुझं? आणि कशी मुलगी पाहिजे?"
आम्हाला विचारलेल्या प्रश्नापेक्षा हा प्रश्न फारच सौम्य होता!! =))
  • Log in or register to post comments

अगदी अगदी. तुला विचारलेला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 21:22 नवीन
अगदी अगदी. तुला विचारलेला प्रश्ण ऐकुन मी ऑलमोस्ट बराचं मागे झालेलो :)!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुठल्याही प्रसंगी साथ देतात

सूड
Mon, 10/05/2015 - 21:29 नवीन
कुठल्याही प्रसंगी साथ देतात ते खरे मित्र!! आपण मागे झालात त्यातच सारं काही आलं !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुला त्रिकुटाबद्दलचे प्रश्ण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 21:31 नवीन
तुला त्रिकुटाबद्दलचे प्रश्ण पचणार होते का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

असे नक्की काय विचारले कि

टवाळ कार्टा
Mon, 10/05/2015 - 21:40 नवीन
असे नक्की काय विचारले कि साक्षात सूडला झेपले नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

झेपलं नाय असं नाही. जीभेवरलं

सूड
Mon, 10/05/2015 - 22:42 नवीन
झेपलं नाय असं नाही. जीभेवरलं पडजीभेवर ढकलावं लागलं इतकंच. तोच प्रश्न चिमणने अक्षरधारासमोर विचारला तेव्हा त्याला यथोचित उत्तर दिलेलं आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खी खी खी =)) =)) =))

बॅटमॅन
Mon, 10/05/2015 - 21:41 नवीन
खी खी खी =)) =)) =)) (एककुटी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मेतकुटवरनं फर्मास ष्लेष

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 22:44 नवीन
मेतकुटवरनं फर्मास ष्लेष सुचलेला आहे =))!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हौ अबौट मेटाकुटी?

सूड
Mon, 10/05/2015 - 22:50 नवीन
हौ अबौट मेटाकुटी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/05/2015 - 21:24 नवीन
वृत्तांत आणि फ़ोटो लै भारी. नव्या मंडळींना पाहता आलं. बॅटमॅनला पाहुन अपेक्षाभंग झाला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बॅटमॅनला पाहुन अपेक्षाभंग झाला. :)

दिव्यश्री
Mon, 10/05/2015 - 21:44 नवीन
++++++++++++++++ 111111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तान्त मस्तच कप्तानसाहेब.

बॅटमॅन
Mon, 10/05/2015 - 21:29 नवीन
वृत्तान्त मस्तच कप्तानसाहेब. पाताळेश्वर ते सुकान्ता ते पुढे अक्षरधारा व मेहता अशा सर्व टप्प्यांत मज्या आली. कप्तान जॅक स्पॅरो, नाखुनकाका, चि.नाखु आणि दिव्यश्री तसेच यमन व पगला गजोधर या सदस्यांशी प्रथमच भेट झाली. (रुमालटाकुनठेवलाआहेतरिनंतरलिहितो) (नाखुकाकांच्यास्पेसबारचाफॅनबॅट्मॅन)
  • Log in or register to post comments

जवळपास अडीच तास

प्रचेतस
Mon, 10/05/2015 - 21:49 नवीन
जवळपास अडीच तास पाताळेश्वराच्या आवारात असूनही याखेपी एकदाही लेणीत गेलो नै ब्वा.
  • Log in or register to post comments

खूप छान वृतांत आणि फोटो.

पद्मावति
Mon, 10/05/2015 - 22:07 नवीन
खूप छान वृतांत आणि फोटो.
  • Log in or register to post comments

(No subject)

दिव्यश्री
Mon, 10/05/2015 - 22:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वृतांत बाकरवडी ,सुकांता जेवणा इतकाच झकास

यमन
Mon, 10/05/2015 - 22:10 नवीन
यशो ताई आणि माझी पहिली ओळख … " काय खाताय ? मला पण " …. अशी झाली . कॅप्टन राव …तुम्ही खाण्याच्या पदार्थांची नावं कशी विसराल ? १०/१० मार्क . जाताना रीकामे कुकीज चे डबे दिव्यश्री ताई च्या फारीन च्या " खाउणी भरूण णेले" हे. वे. सा. न. ल. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला .
  • Log in or register to post comments

:D

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 22:14 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमन

दिव्यश्री! फारीणचा खाउ ण

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 22:25 नवीन
दिव्यश्री! फारीणचा खाउ ण दिल्याबद्दल णिषेध!! दुत्त!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमन

Help Help

दिव्यश्री
Mon, 10/05/2015 - 22:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझी टाईमलाईन पारचं गंडली

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 22:18 नवीन
माझी टाईमलाईन पारचं गंडली ब्वॉ ह्यावेळी. जाउंदे आता वल्लींनी एक वृत्तांत लिहावा अशी मागणी =))व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व
  • Log in or register to post comments

इतकी पण नाय गंडली रे.:)

प्रचेतस
Mon, 10/05/2015 - 22:26 नवीन
इतकी पण नाय गंडली रे.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हे बघा बुवांबरोबरच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 22:28 नवीन
हे बघा बुवांबरोबरच्या कट्ट्याचं वर्णन त्यांचे चहातेचं णीट करु शकतील की नाही. आम्हाला त्यांनी रांगेतही उभं केलं नाही. तस्मात त्या कट्ट्याचा वृत्तांत तुम्ही लिहावा हि मागणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी.

प्रचेतस
Mon, 10/05/2015 - 22:31 नवीन
खी खी खी. तो उपवृत्तान्त आम्ही लिहूच. नाखुनकाका जरा अधिकच समरसतेने लिहितील. =)) बाकी गुर्जींच्या चाहत्यांच्या रांगेत खूप लंबर असल्याने ते बहुधा कुणालाच स्थाण देत नसावेतसे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणराव तुम्ही म्हणता तसे

अभ्या..
Mon, 10/05/2015 - 22:39 नवीन
चिमणराव तुम्ही म्हणता तसे तुम्ही काय हल्क, बैल वगैरे कॅटेगरीतले दिसत नाहीत ओ. आपल्या वल्ल्याएवढेच तर आहात. मी पण जरा दोन चार किलो वाढवलो तर वल्ल्याएवढा होईन. :) उंचीला बी अम्मळ तेवढाच हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी काडीपैलवानापासुन तेवढा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 22:42 नवीन
मी काडीपैलवानापासुन तेवढा फुगलोय, आता हळु हळु कमी व्हायला लागलोय. :/...!!! :(!!!! एक साल बाद फिरसे बारिक होएंगा/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बी द भक्त ऑफ पन्नास फक्त

अभ्या..
Mon, 10/05/2015 - 22:45 नवीन
बी द भक्त ऑफ पन्नास फक्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

@ते बहुधा कुणालाच स्थाण देत

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/06/2015 - 00:10 नवीन
@ते बहुधा कुणालाच स्थाण देत नसावेतसे दिसते.>>> असो! Image removed. .............. समांतर धुबुकागोबा-तवामारातृप्त Image removed. ......................... अतीसमांतर :- बाकिचे फोटू कुठ्ठायत? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काहीही म्हणा, पण...

एस
Mon, 10/05/2015 - 23:22 नवीन
पुणे कट्टा तो पुणे कट्टा! :-)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा