पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 9:10 pm

आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की

२४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला. कट्टा आमच्या शेजारच्या पुण्यनगरीमधे व्हायचा असल्याने किमान दोन्ही पायांमधले बुट काढल्याखेरीज कट्टा व्हायचा नाही हे वेगळे सांगणे नं लगे. मिपाकरांच्या ह्या लौकिकास मिपाकरांनी जागुन आणि उत्सवमुर्तींनी जागुन दुसरा धागा काढला. त्यावरही कोणताही निर्णय नं झाल्याने शेवटी मला दो सोनार की एक लोहार की ह्या उक्तीस जागुन शेवटचा धागा टाकावा लागला. त्यानुसार ४ ऑक्टोबर ला पुण्यभुमीमधल्या पाताळेश्वर नामक मध्यवर्ती ठिकाणी कट्टा निश्चित झाला. सदर कट्टा ठरल्याचं उत्सवमुर्तींनाही माहिती नव्हतं. आपल्या एक्काकाकांनी सुदैवानी त्यांना व्यनि करुन बोलाउन घेतलं.

कट्ट्याच्या आदल्याचं दिवशी एका मिपाकरणीला मज पामरानेचुकुन चिडवलेले असल्याने व त्याचा बदला कट्ट्याच्या दिवशी घेतला जाणार ह्या स्पष्ट मिळालेल्या धमकीमुळे मी हेल्मेट नं विसरता बरोबर घेतलं आणि मगचं गाडीवरती टांग टाकली. आणि बरोबर ११.०५ वाजता कट्ट्याच्या स्थानी पोचलो. मला जायला जरा उशिर झालेला होता तोपर्यंत एक्काकाका, नाखुनकाका, चि.नाखु, वल्ली उर्फ प्रचेतस उर्फ अगोबा हत्ती उर्फ बरचं काय काय, अभिजित अवलिया, यमन आणि खुशबु फेम पगला गजोधर इत्यादी मंडळी जमलेली होती. भितीचं कारण जवळपास कुठेही नं दिसल्याने मी ही भर रस्ता अडवुन गप्पा हाणणार्‍या टोळक्यामधे सामिल झालो. अभिजीत, यमन आणि पगला गजोधर ह्यांना पहिल्यांदाच भेटत असल्याने ओळखपाळखीचा समारंभ पार पडला. जेमतेम पाच मिनिटं होतात नाही होतात तोपर्यंत उत्सवमुर्तींचं आगमन झालं. "पैचान कौन" च्या कार्यक्रमाची दुसरी फेरी पार पडली (मी दिलेल्या क्लुवरुन सदर उत्सवमुर्तींना माझा आयडी ओळखता आला नाही शुन्य मार्क्स). दिव्यश्रीनी आल्या आल्या आणि ओळख झाल्या झाल्या पहिली गोष्ट कुठली केली असेल तर प्रत्येकाचा फेसबुक आयडी आहे का नाही ह्याची वास्तपुस्त करुन जागेवर मित्रयादीमधे भर घातली. फोटोंना लाईक केलं नाही तर ब्लॉक करु अशी लुक्राटिव्ह ऑफरही ठेवली =)).

वल्लींच्या फोनवरती पैसाताईचा फोन आला. वल्लीनी कोणकोण आलयं ची माहिती देउन फोन माझ्याकडे दिला. "येताय का, चहा पाजु" असं मी बोलल्यानंतर कसा काय कोण जाणे अचानक कॉल ड्रॉप झाला =)). करा करा मजा करा. कटिंग च्या कटिंग रिचवा अश्या शुभेच्छा थोड्या वेळाने व्हॉट्सॅपवर आल्यात =)) (पुराव्याने शाबित करुन दाखविन काय समजलांत =)) ). नाखुनकाकांना बॅट्या कधी येतो ह्याचे वेध लागलेले होते. तो नुकताच झोपेतुन उठल्याची सुवार्ता कोणीतरी दिली (बहुतेक वल्ली). सगा आजारी असल्याने येणार नाही अशीही बातमी कळली.

मी गप्पांमधे गुंतलेला असताना यशोतैने एंट्री घेतली. हमकु बरोबर पकड्या उन्होने (दुत्तं दुत्तं मिपाकरांनी मीचं तो म्हणुन थेट समोर उभा केला नं). =)).तेवढ्या वेळामधे दिव्यश्रीनी, "अय्या, तुम्ही रेवाक्का कां" असं म्हणुन तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी टाकली. (ह्या नांदीविषयी इथे वाचा). आख्खी ३ मिनिटं १६ सेकंद हजेरी लाउन हापिसातल्या सर्व्हरला इंजेक्शन द्यायसाठी त्या निघुन गेल्या. दरम्यान बॅट्या आणि प्रशांत हे दोघही आले. (टैमलैन गंडली राव गप्पा मारायच्या नादात)

नाखुन काका आणि बॅट्याची गळाभेट बघुन "ड्वॉळे पाणावले". बॅट्याने आल्या आल्या चौफेर बॅटिंग चालु केली. ह्या मनुक्षाकडुन कुठली माहिती कुठल्या वेळी किती डिट्टेलवारीमधे मिळेल ह्याचा भरवसा नाही. इकडे एका बाजुला अमचे अवडते बुवा कधी येणार असा ग-ह-न प्रश्ण आम्हाला पडलेला होता. त्यावेळेला बुवा यजमानांकडे पुजाविधींमधे मग्न असल्याने थेट १.३० वाजता दर्शन देतील ही ताम्रपटावर कोरुन ठेवण्याएवढी महत्त्वाची माहिती मिळाली. त्यावरुन हिंदु धर्मातील कावळ्याचं महत्त्व ह्यावर एक छोटासा परिसंवाद रंगला. हा सु-संवाद चालु असताना मला डोळ्याच्या कोपर्‍यामधुन पाताळेश्वराच्या दरवाज्यामधे काहितरी चमकलेलं दिसलं. त्या चमकणार्‍या गोष्टीला जोडलेला कानही दिसला. भिकबाळीफेम सूड आणि मिपावरचे लोककलांचे आश्रयदाते सगा दोघही हो नाही करता करता आले. आता खर्‍या अर्थाने गप्पा-टप्पांना सुरुवात झालेली होती. उत्सवमुर्तींनी त्त्यांच्या पर्समधुन चितळ्यांची बाकरवडी काढली. यमनने छानश्या कुकीज आणलेल्या (कुकीजचं ना रे? पदार्थाचं नावं विसरलो सॉरी. योग्य नावं सांग संपादित करेन). दरम्यानच्या काळामधे एवढी सगळी मंडळी पाताळेश्वराचा रस्ता आपल्याच काकाचा असल्यासारखी रस्ता अडवुन उभी होती. शेवटी हळुचं बाजुला सरकली. तेवढ्यामधे श्री व सौ समीर ह्यांचही आगमन झालं. हळु हळु गोलाचं रुपांतर छोट्या छोट्या कंपुंमधे झालं. उत्सवमुर्ती उत्साहाने सगळ्यांची विचारपुस करत होत्या आणि फोटोही काढत होत्या. त्यांनी एकदोघांना चुकुन चुकीचा प्रश्ण विचारुन, त्यामधुन भयानकच चुकीचा अर्थ निघाल्याचं आमचा वार्ताहार सांगतो. तेवढ्यातल्या तेवढयात बॅट्याने चि.नाखुबरोबर कन्नडमधे गुड गुड करुन आपण त्यामधेही गुड असल्याचं दाखवुन दिलं. यमनने एव्हाना मी जेवायला येणार नसल्याचा वेगळा सुर लावला. त्याचं कारण अगदी व्हॅलिड असल्याने सोडुन दिलं. अगले टैम ऐसा नै होगा.

एव्हाना मघाच्या चर्चेमधले कावळे पोटामधे शिरल्याचं एकेकाने जाहिर करायला सुरुवात केली. सुकांताला जायचं ठरलं.

एक्काकाकांनी त्यांचा मुलगा MS in Information Technology झाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ सुकांताला पार्टी दिली. :)

तिकडुन गाड्या काढुन सुकांताला पोचलो. तिकडे भयानक गर्दी असल्याने बॅटमॅनने त्याचं नावं सांगुन टेबलं बुक करुन ठेवलं. तिकडेही बराचं वेळ वाट पहायला लागणार असल्याने तिकडे परत गप्पा रंगायला लागल्या. ५० फक्त ह्यांचही आगमन तिकडे झालं. त्यांची माझी ओळख थेट कट्टा संपताना झाली त्यामुळे पुढच्या कट्ट्यामधे नं मारलेल्या गप्पांची भरपाई करेनचं.

दिव्यश्रीने मला अगदी आस्थेने "लग्नं झालयं का तुझं? आणि कशी मुलगी पाहिजे?", वगैरे प्रश्ण विचारुन माझी विकेट काढली. मी तिथल्या समस्तं अविवाहित मंडळींची नावं जाहिर करणार होतो, पण तेवढ्यात इकडचा एक आयडी आपल्या नावाप्रमाणे वागला तर माझी पंचाईत होईल हा मुद्दा माझ्या वेळेत लक्षात आला. =))
त्या जर्मनीमधे विवाहमंडळ तसचं मराठी सुद्दलेकणाचे काढणार असल्याची खात्रीशीत वार्ता कळलेली आहे. इकडच्या सर्व सिंगल कार्ट्यांना रजिस्ट्रेशन मोफत अशी स्कीम आहे. =)).

फायनली नंबर लागुन आम्ही सगळे वर गेलो (हॉटेलमधे). शेजारशेजारच्या दोन टेबलांवर आमचा नंबर लागला. माझ्या टेबलवर नाखु, सूड. प्रशांत, चि.नाखु, एक्काकाका आणि वल्ली बसलेलो तर शेजारच्या टेबलावर दिव्यश्री, अभिजीत, बॅट्या, सगा, पगला गजोधर इ.इ. मंडळी बसलेली होती. तिथल्या तिथे दिव्यश्रीनी ताटाचे फोटो वगैरे काढुन, "चिमण्या, ह्याचेचं फोटो टाकायचे" वगैरे वॉर्निंगा दिल्याचं आठवतं. पोटात कावळे कोकलत असल्यानी आता फारसं काही आठवत नाही =))


सुकांतामधलं चविष्टं जेवण :)!!!

सुकांताच्या चविष्ट जेवणाबरोबर एक्काकाका, सूड आणि मी ह्यांच्यामधे कोंकणातले पदार्थ ह्यावर एक छोटासा संवाद झाला. नॉस्टॅल्जिल फिलिंग. भरगच्चं जेवण आणि त्याहुन भरगच्चं गप्पा मारता मारता वेळ कसा गेला हे समजलचं नाही अजिबात. जेवण करत असतानाचं मला एका मैत्रिणीचा फोन आला. डेक्कनलाचं आहेस तर रिचो-क्रिम (चतुश्रुंगी)ची कॉफी प्यायला जायचं का म्हणुन. मी डोक्याला हात लावला. =)). जेवुन खाली आलो आणि तोवर आमचे अवडते बुवा त्यांचं खेचर घेउन दत्तं म्हणुन उभे राहिले. =)). आता एवढं जेवल्यानंतर कसल्या गप्पा मारल्या जाताहेत हा विचार खोटा ठरला.

बुवांनी आधी आल्या आल्या अगोबा हत्ती, रानडुक्कर वगैरे चार-पाच प्राण्यांची नावं घेउन वल्लींना गुद्दे हाणले. नंतर मी अजिबात काही केलेलं नसताना उगाचं चिमण्या बिमण्या म्हणुन खांद्यावर हेल्मेट आपटलं, चार सहा गुद्दे घातले आणि हात पिरगाळला (त्यामुळे वृत्तांत लिहायला उशिर झाला) आणि नंतर स्वतःला लागलं म्हणुन हात चोळत बसले (हात चोळताना त्यामधे काहितरी दुसरही चोळलं गेलं असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर बुवांचे गाल (रागाने नव्हे) जरावेळ फुगीर वाटत होते हा भाग अलाहिदा. सगळ्यांनी बुवांना कट्ट्याला नं आल्याचा सामुहिक जाब विचारला. =)). धोत्रास हात घालणे हा प्रयोग काहिजणांनी करुन पाहिला. त्यानंतर मग सामुदायिक फोटो वगैरे काढले.

डावीकडुन पगला गजोधर, ५० फक्त, वल्ली, सूड, सगा, दिव्यश्रींच्या मागे नाखुन्काका, दिव्यश्री, चि. नाखुन, मी, अभिजित आणि प्रशांत

डावीकडुन प्रशांत, अभिजित, बॅटमॅन, पगला गजोधर, ५० फक्त, चि.नाखुन, वल्ली, सूड, माझ्यामागे नाखुन, मी आणि एक्काकाका

सदर फोटोंमधे सगळ्यांच्या मागे उभे राहुन फोटोस आधार दिल्याबद्दल नाखुन काकांचा मी शतशः आभारी आहे.

इथुन पुढे हळु हळु एक एक जणाने निरोप घ्यायला सुरु केली. मी, सगा, प्रशांत, बॅटमॅन, सूड, बुवा आणि वल्ली तिकडुन पुढे अक्षरधाराला जाणार होतो. तो उपकट्टाही छान पार पडला. तिकडेही निवांत गप्पा, पुस्तकांविषयी चर्चा झाल्या. मी काही विशेष खरेदी करायला गेलो नसलो तरी दोन-तीन पुस्तकं नजरेत भरलेली आहेत ती लौकरचं विकत घेण्यात येतील.
काही तांत्रिक अडचणींमुळे ह्या कट्ट्याचा वृत्तांत ८ तारखेनंतर व १६ तारखेच्या आत प्रसिद्ध करण्यात येईल. १६ तारखेस सदर धागा परत उडविण्यात येईल.

** सदर वृत्तांतामधे गमती गमतीमधे काड्या सारण्यात आलेल्या आहेत. कोणीही कृपया वाईट वाटुन घेउ नये ही नम्र विनंती. ह्या कट्ट्यास नवीन मंडळी पहिल्यांदाच भेटली असल्याने हा ढिस्क्लेमर टाकतोय. नित्यपरिचित मंडळींनी हा डिस्क्लेमर पौड फाट्यावरच्या नेहेमीच्या ड्रॉप बॉक्समधे नेउन टाकुन जळजळ व्यक्त करावी हि नम्र विनंती.**

असेचं कट्टे होतं राहोत आणि पुण्याचा कट्ट्प्पा ही ओळख बुवांना मिळो हि देवाचरणी प्रार्थना.

ह्यापेक्षा चांगला वृत्तांत येउ शकेल तो कोणीतरी लिहावा हि विनंती.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

दिव्यश्री's picture

7 Oct 2015 - 12:18 am | दिव्यश्री

11111111111111111111

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Oct 2015 - 6:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

टाकु का काडी बुवांना? =))

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2015 - 7:01 am | अत्रुप्त आत्मा

मशाल आणु का??? :P

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Oct 2015 - 7:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

काडी आणि मशालीच्या काठीमधे फरक असतो. आणि धाग्याची शंभरी करायची आहे भरवायची नाही. ते एक असो. =))
वल्ली सर काय म्हणताय्त. पुस्तक कट्ट्याचा वृत्तांत कधी?

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2015 - 8:48 am | अत्रुप्त आत्मा

दू दू दू दू! :-/ llllluuuuu :-/

प्रचेतस's picture

7 Oct 2015 - 8:51 am | प्रचेतस

करू की १००. हाकानाका.

आधी अक्षरधारा गेलो तिथे ब्याट्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले नामक एक पुस्तक घेतले त्यात सिंधुदुर्गावरील हाताच ठसा हा शिवाजी महाराजांचाच असल्याचा एक अस्स्सल संदर्भ आहे. धन्याने कुठलेतरी मानसशास्त्रावरील एक पुस्तक घेतले. तितक्यात बुवा आणि चिमण मागाहून आलेच. मग काय परत गप्पाटप्पा. तिथून मेहताकडे गेलो. पण नुसतेच विंडो शॉपिंग केले खरेदी काहीच नै. अजूनही टैमपास करायचा मूड होता तसा पण इकडे आभाळ गर्जू लागले होते पण काढता पाय घेतला आणि काय तर आलो घरी.

सिंधुदुर्गावरील हाताच ठसा हा शिवाजी महाराजांचाच असल्याचा एक अस्स्सल संदर्भ आहे

त्या संदर्भाबद्दलची माहीती इथे देता येइल का?

प्रचेतस's picture

7 Oct 2015 - 1:47 pm | प्रचेतस

तो ब्याट्या देईलच.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 2:09 pm | टवाळ कार्टा

तो ब्याट्या देईलच.

हे वाक्य "तो तर काय ब्याट्या पण देईल" असे (हवे) होते काय? ;)

बॅटमॅन's picture

7 Oct 2015 - 2:36 pm | बॅटमॅन

२१ नोव्हेंबर १७६३ रोजी तत्कालीन करवीरच्या महाराणी जिजाबाई यांनी सिंधुदुर्गाचे किल्लेदार येसाजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात तसा उल्लेख आहे असे दिलेले आहे.

अमुल्य माहीतीबद्दल धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 11:25 am | टवाळ कार्टा

वात पेटवायला मशाल? =))

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2015 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा

तुझ्या काडिला आहे का वात?
मूळ प्रतिसादाकडे लक्ष कस नै जात!??? :-/

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2015 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

चिरंजीवांचे अभिनंदन केल्याबद्दल सर्वांना अनेकानेक धन्यवाद !

खटपट्या's picture

7 Oct 2015 - 7:30 am | खटपट्या

मस्त कट्टा झालाय. एक्का काकांच्या मुलाचे अभिनंदन. बॅटमॅन यांचा दाढीवाला गेटअप आवडला.

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 12:34 pm | प्यारे१

यशस्वी कट्ट्याबद्दल उत्सवमूर्तींचे हाबिणंडण.

नेहमीच्या यशस्वी कलाकारांचे कट्ट्याला पोचल्याबद्दल हाबिनंदन,
५० रावांचे दणकून मिश्या वाढवल्याबद्दल अबिणंदण,
आणि
डॉ. म्हात्रे व कुटुंबियांचे साधे तर ज्यु. म्हात्रे यांचे हार्दिक अभिनंदन.....

कट्टा दणकून झालेला आहे ह्यात वाद नाहि. डॉ. चे हर्दिक अभिनंदन.

कपिलमुनी's picture

7 Oct 2015 - 4:49 pm | कपिलमुनी

:(

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 5:42 pm | प्यारे१

धाग्याचे अजूनही शंभर न झाल्याने सुकांताच्या भोजनाने कट्ट्यास उपस्थित न राहू शकणार्‍या लोकान्नी किती श्या घातल्या आहेत हे लक्षात येत आहे. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Oct 2015 - 6:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यामधे आपलाही सिंहाचा वाटा असल्याचा सौंशय आहे. ९९ हाण तेजायला.

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 7:09 pm | प्यारे१

निछ्चितच!
:)

रेवती's picture

7 Oct 2015 - 7:02 pm | रेवती

चला, शतक झालं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Oct 2015 - 7:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठँक्यु. तुम्हालाचं काळजी =))

मधुरा देशपांडे's picture

7 Oct 2015 - 7:07 pm | मधुरा देशपांडे

झक्कास कट्टा आणि वृत्तांत. एक्काकाकांच्या मुलाचे अभिनंदन.

५० फक्त's picture

7 Oct 2015 - 11:51 pm | ५० फक्त

कट्ट्याला आलो अन धाग्याला नाही आलो तर उपयोग काय या किबोर्डाचा.

ब-याच दिवसांनी ब-याच मिपाकरांना एकत्र भेटलो, मजा आली, पाताळेश्वराच्या नशीबात नव्हतं आमचं दर्शन पण सुकांता जमलं, वल्ल्यानं नाव बदलल्यानं आणि पिची प्रसिद्ध काळा कवटीचा टिशर्ट न घातल्यानं याव्यात त्या शंका येउन गेल्या, पण बुवांनी त्या भांड्यात लपवल्या लगेच.

बाकी पुन्हा एकदा लिहितं व्हावं असा विचार बळावतो आहे, आई जगदंबेच्या कृपेनं सुरु करेन नवरात्रात.

अजुन बॅट्या आणि सुड बरोबर एक नविन प्रोजेक्ट सुरु करायचं ठरलं आहे, काही दिवसात डिटेल सांगेन सर्वांना.

दिव्यश्रींनी दिलेला खाउ १०० आणि १५० दोघांना आवडला ही जाहीर पावती.

आणि एक विचारायचं राहिलंच बुवांना, फोन का बदलला हो अशात बुवा ?

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2015 - 12:10 am | अत्रुप्त आत्मा

दू दू दू दू दू =))

नाखु's picture

8 Oct 2015 - 8:39 am | नाखु

थांबा "बुवा फोनसुद्धा बदलतात" या नावाची एक लेखमाला येणार आहे कदाचीत दिवाळी नंतर. दिवाळीत चिमणची आग्रही (जुळी) मागणी मार्गी लावतायत असं वाटते.

अखिल मिपा भावविश्व चाहता वाचक संघ आणि तमाम हवामहल खयाली पुलाव संघाचे संयुक्त पत्रक

जुइ's picture

8 Oct 2015 - 9:24 am | जुइ

वृत्तांत आणि फोटो दोन्ही आवडले. सुकांला जाउन बरीच वर्ष॑ झाली. एका काका आणि चिरंजीवांचे अभिनंदन!

अभिजीत अवलिया's picture

8 Oct 2015 - 9:29 am | अभिजीत अवलिया

मी पहिल्यांदाच आलो कट्ट्याला. खूप आवडला कट्टा. दिव्याश्रीना ओळख करून देताना मी अभिजित अवलिया आहे असे सांगितले. त्यानी ते अभिजित अहलुवालिया असे ऐकले. नंतर बर्याच वेळाने मी एवढे चांगले मराठी कसे बोलू शकतो ह्यावर आश्चर्य वाटल्याने त्यानी मला माझी मातृभाषा विचारली. मी मराठी सांगताच त्यांना अजून एक धक्का बसला. आडनाव अहलुवालिया लेकिन मातृभाषा मराठी. बहुत नाइन्साफ़ि है. नंतर मात्र मी अहलुवालिया नाही हे कळल्यावर गैरसमज दूर झाला.

असंका's picture

8 Oct 2015 - 9:32 am | असंका

:-))
:-))
:-))

अहलुवालिया जी वेलकम....!

एस's picture

8 Oct 2015 - 10:17 am | एस

ह.ह.गडाबडा लो.

पगला गजोधर's picture

8 Oct 2015 - 10:38 am | पगला गजोधर

'तुमची मराठी इतकी कशी छान ?' असा प्रश्नरुपी अस्त्रामुळे, नाही म्हटलं तरी अभिजित अ. थोडेसे दाचाकलेले मला जाणवलेले, पण कॅ चिमण, व्लागुदाचार्य, अस्मादिक आम्ही सर्व, ''अहलुवालिया'' म्हणजे, उत्सवमूर्तीनी अभिजितकडून फक्त हिंदी भाषिक ऐवढीच अपेक्षा केली होती, नशीब त्यांनी खोलात शिरून लांब दाढी, फेटा, क्रिपान वैगरे आपेक्षिली नाही, वैगरे सांगून अभिजित अ. यांचे सांत्वन वैगरे केले.

व्लागुदाचार्य आणि सूड यांनी दोघेही आपआपल्या पाठीवर, आपापली सँक घेऊन, ग्रुपमध्ये जरा जवळजवळ उभे असताना, उत्सवमूर्तीनी , त्यांनासुद्धा,.. 'तुमची जोडी आहे का ?' (किंवा अश्या अर्थीचा) प्रश्न विचारल्याबरोबर, दोघांनी झुरळ झटकाव तसे हात झटकले व शक्य तितक्या दूर उभे (एकमेकांनपासून) राहिले, ते अगदी सुकांता भोजन कार्यक्रम झाला तरी, लोकांच्या मनात भलतेच गैरसमज होवू नये म्हणून, लांब राहणे पसंत केले.
(कृपया हळू घेणे)

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा

अश्शी कट्ट्यांची गुपिते लग्गेच जाहिरपणे फोडायची नस्तात =))

किसन शिंदे's picture

8 Oct 2015 - 10:14 am | किसन शिंदे

वृत्तांत मस्तच आणि फोटोही झकास आले आहेत!