Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 10/05/2015 - 21:10
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला. कट्टा आमच्या शेजारच्या पुण्यनगरीमधे व्हायचा असल्याने किमान दोन्ही पायांमधले बुट काढल्याखेरीज कट्टा व्हायचा नाही हे वेगळे सांगणे नं लगे. मिपाकरांच्या ह्या लौकिकास मिपाकरांनी जागुन आणि उत्सवमुर्तींनी जागुन दुसरा धागा काढला. त्यावरही कोणताही निर्णय नं झाल्याने शेवटी मला दो सोनार की एक लोहार की ह्या उक्तीस जागुन शेवटचा धागा टाकावा लागला. त्यानुसार ४ ऑक्टोबर ला पुण्यभुमीमधल्या पाताळेश्वर नामक मध्यवर्ती ठिकाणी कट्टा निश्चित झाला. सदर कट्टा ठरल्याचं उत्सवमुर्तींनाही माहिती नव्हतं. आपल्या एक्काकाकांनी सुदैवानी त्यांना व्यनि करुन बोलाउन घेतलं. कट्ट्याच्या आदल्याचं दिवशी एका मिपाकरणीला मज पामरानेचुकुन चिडवलेले असल्याने व त्याचा बदला कट्ट्याच्या दिवशी घेतला जाणार ह्या स्पष्ट मिळालेल्या धमकीमुळे मी हेल्मेट नं विसरता बरोबर घेतलं आणि मगचं गाडीवरती टांग टाकली. आणि बरोबर ११.०५ वाजता कट्ट्याच्या स्थानी पोचलो. मला जायला जरा उशिर झालेला होता तोपर्यंत एक्काकाका, नाखुनकाका, चि.नाखु, वल्ली उर्फ प्रचेतस उर्फ अगोबा हत्ती उर्फ बरचं काय काय, अभिजित अवलिया, यमन आणि खुशबु फेम पगला गजोधर इत्यादी मंडळी जमलेली होती. भितीचं कारण जवळपास कुठेही नं दिसल्याने मी ही भर रस्ता अडवुन गप्पा हाणणार्‍या टोळक्यामधे सामिल झालो. अभिजीत, यमन आणि पगला गजोधर ह्यांना पहिल्यांदाच भेटत असल्याने ओळखपाळखीचा समारंभ पार पडला. जेमतेम पाच मिनिटं होतात नाही होतात तोपर्यंत उत्सवमुर्तींचं आगमन झालं. "पैचान कौन" च्या कार्यक्रमाची दुसरी फेरी पार पडली (मी दिलेल्या क्लुवरुन सदर उत्सवमुर्तींना माझा आयडी ओळखता आला नाही शुन्य मार्क्स). दिव्यश्रीनी आल्या आल्या आणि ओळख झाल्या झाल्या पहिली गोष्ट कुठली केली असेल तर प्रत्येकाचा फेसबुक आयडी आहे का नाही ह्याची वास्तपुस्त करुन जागेवर मित्रयादीमधे भर घातली. फोटोंना लाईक केलं नाही तर ब्लॉक करु अशी लुक्राटिव्ह ऑफरही ठेवली =)). वल्लींच्या फोनवरती पैसाताईचा फोन आला. वल्लीनी कोणकोण आलयं ची माहिती देउन फोन माझ्याकडे दिला. "येताय का, चहा पाजु" असं मी बोलल्यानंतर कसा काय कोण जाणे अचानक कॉल ड्रॉप झाला =)). करा करा मजा करा. कटिंग च्या कटिंग रिचवा अश्या शुभेच्छा थोड्या वेळाने व्हॉट्सॅपवर आल्यात =)) (पुराव्याने शाबित करुन दाखविन काय समजलांत =)) ). नाखुनकाकांना बॅट्या कधी येतो ह्याचे वेध लागलेले होते. तो नुकताच झोपेतुन उठल्याची सुवार्ता कोणीतरी दिली (बहुतेक वल्ली). सगा आजारी असल्याने येणार नाही अशीही बातमी कळली. मी गप्पांमधे गुंतलेला असताना यशोतैने एंट्री घेतली. हमकु बरोबर पकड्या उन्होने (दुत्तं दुत्तं मिपाकरांनी मीचं तो म्हणुन थेट समोर उभा केला नं). =)).तेवढ्या वेळामधे दिव्यश्रीनी, "अय्या, तुम्ही रेवाक्का कां" असं म्हणुन तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी टाकली. (ह्या नांदीविषयी इथे वाचा). आख्खी ३ मिनिटं १६ सेकंद हजेरी लाउन हापिसातल्या सर्व्हरला इंजेक्शन द्यायसाठी त्या निघुन गेल्या. दरम्यान बॅट्या आणि प्रशांत हे दोघही आले. (टैमलैन गंडली राव गप्पा मारायच्या नादात) नाखुन काका आणि बॅट्याची गळाभेट बघुन "ड्वॉळे पाणावले". बॅट्याने आल्या आल्या चौफेर बॅटिंग चालु केली. ह्या मनुक्षाकडुन कुठली माहिती कुठल्या वेळी किती डिट्टेलवारीमधे मिळेल ह्याचा भरवसा नाही. इकडे एका बाजुला अमचे अवडते बुवा कधी येणार असा ग-ह-न प्रश्ण आम्हाला पडलेला होता. त्यावेळेला बुवा यजमानांकडे पुजाविधींमधे मग्न असल्याने थेट १.३० वाजता दर्शन देतील ही ताम्रपटावर कोरुन ठेवण्याएवढी महत्त्वाची माहिती मिळाली. त्यावरुन हिंदु धर्मातील कावळ्याचं महत्त्व ह्यावर एक छोटासा परिसंवाद रंगला. हा सु-संवाद चालु असताना मला डोळ्याच्या कोपर्‍यामधुन पाताळेश्वराच्या दरवाज्यामधे काहितरी चमकलेलं दिसलं. त्या चमकणार्‍या गोष्टीला जोडलेला कानही दिसला. भिकबाळीफेम सूड आणि मिपावरचे लोककलांचे आश्रयदाते सगा दोघही हो नाही करता करता आले. आता खर्‍या अर्थाने गप्पा-टप्पांना सुरुवात झालेली होती. उत्सवमुर्तींनी त्त्यांच्या पर्समधुन चितळ्यांची बाकरवडी काढली. यमनने छानश्या कुकीज आणलेल्या (कुकीजचं ना रे? पदार्थाचं नावं विसरलो सॉरी. योग्य नावं सांग संपादित करेन). दरम्यानच्या काळामधे एवढी सगळी मंडळी पाताळेश्वराचा रस्ता आपल्याच काकाचा असल्यासारखी रस्ता अडवुन उभी होती. शेवटी हळुचं बाजुला सरकली. तेवढ्यामधे श्री व सौ समीर ह्यांचही आगमन झालं. हळु हळु गोलाचं रुपांतर छोट्या छोट्या कंपुंमधे झालं. उत्सवमुर्ती उत्साहाने सगळ्यांची विचारपुस करत होत्या आणि फोटोही काढत होत्या. त्यांनी एकदोघांना चुकुन चुकीचा प्रश्ण विचारुन, त्यामधुन भयानकच चुकीचा अर्थ निघाल्याचं आमचा वार्ताहार सांगतो. तेवढ्यातल्या तेवढयात बॅट्याने चि.नाखुबरोबर कन्नडमधे गुड गुड करुन आपण त्यामधेही गुड असल्याचं दाखवुन दिलं. यमनने एव्हाना मी जेवायला येणार नसल्याचा वेगळा सुर लावला. त्याचं कारण अगदी व्हॅलिड असल्याने सोडुन दिलं. अगले टैम ऐसा नै होगा. एव्हाना मघाच्या चर्चेमधले कावळे पोटामधे शिरल्याचं एकेकाने जाहिर करायला सुरुवात केली. सुकांताला जायचं ठरलं.
एक्काकाकांनी त्यांचा मुलगा MS in Information Technology झाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ सुकांताला पार्टी दिली. :)
तिकडुन गाड्या काढुन सुकांताला पोचलो. तिकडे भयानक गर्दी असल्याने बॅटमॅनने त्याचं नावं सांगुन टेबलं बुक करुन ठेवलं. तिकडेही बराचं वेळ वाट पहायला लागणार असल्याने तिकडे परत गप्पा रंगायला लागल्या. ५० फक्त ह्यांचही आगमन तिकडे झालं. त्यांची माझी ओळख थेट कट्टा संपताना झाली त्यामुळे पुढच्या कट्ट्यामधे नं मारलेल्या गप्पांची भरपाई करेनचं. दिव्यश्रीने मला अगदी आस्थेने "लग्नं झालयं का तुझं? आणि कशी मुलगी पाहिजे?", वगैरे प्रश्ण विचारुन माझी विकेट काढली. मी तिथल्या समस्तं अविवाहित मंडळींची नावं जाहिर करणार होतो, पण तेवढ्यात इकडचा एक आयडी आपल्या नावाप्रमाणे वागला तर माझी पंचाईत होईल हा मुद्दा माझ्या वेळेत लक्षात आला. =)) त्या जर्मनीमधे विवाहमंडळ तसचं मराठी सुद्दलेकणाचे काढणार असल्याची खात्रीशीत वार्ता कळलेली आहे. इकडच्या सर्व सिंगल कार्ट्यांना रजिस्ट्रेशन मोफत अशी स्कीम आहे. =)). फायनली नंबर लागुन आम्ही सगळे वर गेलो (हॉटेलमधे). शेजारशेजारच्या दोन टेबलांवर आमचा नंबर लागला. माझ्या टेबलवर नाखु, सूड. प्रशांत, चि.नाखु, एक्काकाका आणि वल्ली बसलेलो तर शेजारच्या टेबलावर दिव्यश्री, अभिजीत, बॅट्या, सगा, पगला गजोधर इ.इ. मंडळी बसलेली होती. तिथल्या तिथे दिव्यश्रीनी ताटाचे फोटो वगैरे काढुन, "चिमण्या, ह्याचेचं फोटो टाकायचे" वगैरे वॉर्निंगा दिल्याचं आठवतं. पोटात कावळे कोकलत असल्यानी आता फारसं काही आठवत नाही =)) सुकांतामधलं चविष्टं जेवण :)!!! सुकांताच्या चविष्ट जेवणाबरोबर एक्काकाका, सूड आणि मी ह्यांच्यामधे कोंकणातले पदार्थ ह्यावर एक छोटासा संवाद झाला. नॉस्टॅल्जिल फिलिंग. भरगच्चं जेवण आणि त्याहुन भरगच्चं गप्पा मारता मारता वेळ कसा गेला हे समजलचं नाही अजिबात. जेवण करत असतानाचं मला एका मैत्रिणीचा फोन आला. डेक्कनलाचं आहेस तर रिचो-क्रिम (चतुश्रुंगी)ची कॉफी प्यायला जायचं का म्हणुन. मी डोक्याला हात लावला. =)). जेवुन खाली आलो आणि तोवर आमचे अवडते बुवा त्यांचं खेचर घेउन दत्तं म्हणुन उभे राहिले. =)). आता एवढं जेवल्यानंतर कसल्या गप्पा मारल्या जाताहेत हा विचार खोटा ठरला. बुवांनी आधी आल्या आल्या अगोबा हत्ती, रानडुक्कर वगैरे चार-पाच प्राण्यांची नावं घेउन वल्लींना गुद्दे हाणले. नंतर मी अजिबात काही केलेलं नसताना उगाचं चिमण्या बिमण्या म्हणुन खांद्यावर हेल्मेट आपटलं, चार सहा गुद्दे घातले आणि हात पिरगाळला (त्यामुळे वृत्तांत लिहायला उशिर झाला) आणि नंतर स्वतःला लागलं म्हणुन हात चोळत बसले (हात चोळताना त्यामधे काहितरी दुसरही चोळलं गेलं असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर बुवांचे गाल (रागाने नव्हे) जरावेळ फुगीर वाटत होते हा भाग अलाहिदा. सगळ्यांनी बुवांना कट्ट्याला नं आल्याचा सामुहिक जाब विचारला. =)). धोत्रास हात घालणे हा प्रयोग काहिजणांनी करुन पाहिला. त्यानंतर मग सामुदायिक फोटो वगैरे काढले. डावीकडुन पगला गजोधर, ५० फक्त, वल्ली, सूड, सगा, दिव्यश्रींच्या मागे नाखुन्काका, दिव्यश्री, चि. नाखुन, मी, अभिजित आणि प्रशांत डावीकडुन प्रशांत, अभिजित, बॅटमॅन, पगला गजोधर, ५० फक्त, चि.नाखुन, वल्ली, सूड, माझ्यामागे नाखुन, मी आणि एक्काकाका सदर फोटोंमधे सगळ्यांच्या मागे उभे राहुन फोटोस आधार दिल्याबद्दल नाखुन काकांचा मी शतशः आभारी आहे. इथुन पुढे हळु हळु एक एक जणाने निरोप घ्यायला सुरु केली. मी, सगा, प्रशांत, बॅटमॅन, सूड, बुवा आणि वल्ली तिकडुन पुढे अक्षरधाराला जाणार होतो. तो उपकट्टाही छान पार पडला. तिकडेही निवांत गप्पा, पुस्तकांविषयी चर्चा झाल्या. मी काही विशेष खरेदी करायला गेलो नसलो तरी दोन-तीन पुस्तकं नजरेत भरलेली आहेत ती लौकरचं विकत घेण्यात येतील. काही तांत्रिक अडचणींमुळे ह्या कट्ट्याचा वृत्तांत ८ तारखेनंतर व १६ तारखेच्या आत प्रसिद्ध करण्यात येईल. १६ तारखेस सदर धागा परत उडविण्यात येईल. ** सदर वृत्तांतामधे गमती गमतीमधे काड्या सारण्यात आलेल्या आहेत. कोणीही कृपया वाईट वाटुन घेउ नये ही नम्र विनंती. ह्या कट्ट्यास नवीन मंडळी पहिल्यांदाच भेटली असल्याने हा ढिस्क्लेमर टाकतोय. नित्यपरिचित मंडळींनी हा डिस्क्लेमर पौड फाट्यावरच्या नेहेमीच्या ड्रॉप बॉक्समधे नेउन टाकुन जळजळ व्यक्त करावी हि नम्र विनंती.** असेचं कट्टे होतं राहोत आणि पुण्याचा कट्ट्प्पा ही ओळख बुवांना मिळो हि देवाचरणी प्रार्थना. ह्यापेक्षा चांगला वृत्तांत येउ शकेल तो कोणीतरी लिहावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
  • 48390 views

प्रतिक्रिया

Submitted by चांदणे संदीप on Mon, 10/05/2015 - 23:36

Permalink

मस्त!

खुसखुशीत, खमंग, चटकदार वृत्तांत! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 10/06/2015 - 00:04

Permalink

@बुवांनी आधी आल्या आल्या

@बुवांनी आधी आल्या आल्या अगोबा हत्ती, रानडुक्कर वगैरे चार-पाच प्राण्यांची नावं घेउन वल्लींना गुद्दे हाणले.>> ह्हूं!!! Image removed. ते त्या हत्तीनी माझा छळ सुरू केला म्हणून! Image removed. @नंतर मी अजिबात काही केलेलं नसताना Image removed. उगाचं चिमण्या बिमण्या म्हणुन खांद्यावर हेल्मेट आपटलं, चार सहा गुद्दे घातले आणि हात पिरगाळला>>> दुष्ट हल कट Image removed.चिमण! हत्ती पाठोपाठ स्वतःही माझ्यावर गोळीबार केला... ते नै सांगत .. ल्लुल्लुल्लुल्लु! Image removed. @(त्यामुळे वृत्तांत लिहायला उशिर झाला) >> बघ बघ त्या हत्तीचाच गुण लागला तुला. स्वतः करुन दुसय्राच्या अंगावर ढकलून द्यायचा... दुत्त दुत्त! Image removed. @आणि नंतर स्वतःला लागलं म्हणुन हात चोळत बसले (हात चोळताना त्यामधे काहितरी दुसरही चोळलं गेलं असल्याचा भास सगळ्यांना झाला.>>> आं sssssssss Image removed. इसका बदला लिया जाएगा.. Image removed.अगली भ्येट में बराब्बर लिया जाएगा @नंतर बुवांचे गाल (रागाने नव्हे) जरावेळ फुगीर वाटत होते हा भाग अलाहिदा. सगळ्यांनी बुवांना कट्ट्याला नं आल्याचा सामुहिक जाब विचारला. =)). धोत्रास हात घालणे हा प्रयोग काहिजणांनी करुन पाहिला.>> त्याचा तिथच घेतला की Image removed. ...................... सूड! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/06/2015 - 00:27

Permalink

हे घ्या अजून काही फोटो.

हे घ्या अजून काही फोटो. पाताळेश्वराच्या आवारातील वटवृक्षाखाली गहन चर्चा करून ब्रम्हज्ञान प्राप्त करून घेताना मिपाकर... Image removed. . सुकांता आदरातिथ्याची तयारी करत असताना गफ्फांत वेळ घालविणारे मिपाकर आणि त्यांच्या मागे मिपाकरांना पाहण्यासाठी उसळलेला अथांग जनसागर... Image removed. . जेवणाबरोबर जेवणाइतक्याच चविष्ट गप्पांचा आस्वाद घेताना... Image removed. . बुवांच्या आगमनानंतर बुवांनी (आणि बुवांच्या संबंधात) उपस्थित केलेल्या/झालेल्या मुद्द्यांवर सुकांताच्या बाहेर जमलेले चर्चासत्र... Image removed. . पांगापांग व्हायला सुरुवात होण्यापूर्वी काढलेला गृपफोटो... Image removed. .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 10/07/2015 - 18:09

In reply to हे घ्या अजून काही फोटो. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

१) वल्ली तात्यांना निळ्या

१) वल्ली तात्यांना निळ्या रंगाच्या फ्रेश कलरच्या शर्टात पाहुन साश्चर्य आणंड वाटला . २) त्यांची काळ्या टी शर्ट ची परंपरा चिमणरावांनी चालु ठेवली आहे असे एक सुक्ष्म ऑब्झर्वेशन केले आहे ३) पन्नासरावांच्या जगप्रसिध्द मिशांना मोठ्ठी दाद देण्यात येत आहे ४) नाखुनकाका घुश्श्याने गावडे सरांकडे का बरे पहात आहेत ? गावडे सरांनी त्यांना बोलताना थांबवले की काय ? ५) पाठीवर स्यॅक घेवुन आलेल्या लोकांच्या स्यॅक मधे काय काय असेल ह्याचा साधारण अंदाज बांधता येत आहे ! ६) आणि अखेरीस अखेरच्या फोटोत शेवटी अगोबाने अतृप्त अत्म्याला झपाटलेच हे स्पष्ट होत आहे ! कट्टा मिस झाल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे - प्रगो
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/06/2015 - 00:47

Permalink

भारी झाला की कट्टा! सगळे फोटू

भारी झाला की कट्टा! सगळे फोटू पाहून मजा वाटतिये. अगदी पुण्यात गेल्यासारखं वाटतय. मिपाकरांची पुढची पिढी या सगळ्यामध्ये मोठी होतिये. एक्काकाकांच्या चिरंजिवांचे अभिनंदन. चांगली बातमी आहे. सुकांताला जाऊन बहुतेक ११ वर्षे झालीत. चिमणबाळाने शेवटी लिहिलाच वृत्तांत. आधी मला खात्री वाटत नव्हती. कबूल केल्यानुसार सगळेजण आले. यशोसारखी महा बिझी सदस्याही आली होती म्हणजे मिपावरील प्रेम बघा! दिव्यश्रीने यशोला रेवती म्हटल्याचे वाचले. यावर काही बोलायचे नाही. तू भेट आता!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/06/2015 - 12:26

In reply to भारी झाला की कट्टा! सगळे फोटू by रेवती

Permalink

धन्यवाद रेवाक्का !

धन्यवाद रेवाक्का !
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 10/06/2015 - 17:28

In reply to भारी झाला की कट्टा! सगळे फोटू by रेवती

Permalink

यावर काही बोलायचे नाही. तू

यावर काही बोलायचे नाही. तू भेट आता!
ही धमकी दिव्यश्रीला आहे ना? ;) डॉ. तुमचे व लेकाचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/06/2015 - 18:24

In reply to यावर काही बोलायचे नाही. तू by यशोधरा

Permalink

अगं हो हो! धमकी कशी देईन? ए

अगं हो हो! धमकी कशी देईन? ए के ४७ आहे ना तुझ्याकडे!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 10/06/2015 - 18:45

In reply to अगं हो हो! धमकी कशी देईन? ए by रेवती

Permalink

आहे नाही, आणणारे. पण तू थोडीच

आहे नाही, आणणारे. पण तू थोडीच दुत्त आहेस? ती फक्त दुत्त लोकांसाठी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 10/06/2015 - 04:25

Permalink

कट्टा मस्तच झालेला दिसतोय....

आता पुढचा कट्टा कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 10/06/2015 - 08:27

In reply to कट्टा मस्तच झालेला दिसतोय.... by मुक्त विहारि

Permalink

तुम्ही

आकुर्डीला आलात की लगेचच. बाकी बाबा (महाराजांना) आमचा नमस्कार सांगणे. मुवींच्या बाबांच्या असंख्य भक्तगणांपैकी एक
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 10/06/2015 - 19:10

In reply to तुम्ही by नाखु

Permalink

आकुर्डीला लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो...

तेंव्हा परत एक कट्टा करू या.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Tue, 10/06/2015 - 06:58

Permalink

भारि कटटा,सुणडर वरउतताणट.

भारि कटटा,सुणडर वरउतताणट. अपहलाटुण पोतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 10/06/2015 - 06:59

Permalink

छान झालेला दिस्तोय कट्टा

छान झालेला दिस्तोय कट्टा.दिव्यश्री राॅक्स!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 10/06/2015 - 18:32

In reply to छान झालेला दिस्तोय कट्टा by अजया

Permalink

राॅक्स म्हणजे

दिव्यश्री पाषाणहॄदयी आहे असे म्हणायचे आहे का? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 10/06/2015 - 07:00

Permalink

सगळे फोटो बघुन मनापासुन दुख्ख

सगळे फोटो बघुन मनापासुन दुख्ख: झाले. किमान २५ किलोने अजुन हलके होणे भाग आहे. राक्षस वाटतोय मी सगळ्यांपुढे :/!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! दुत्तं दुत्तं बारिक लोक्स!! :/
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 10/06/2015 - 11:04

In reply to सगळे फोटो बघुन मनापासुन दुख्ख by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

हा:हा:

मी तर सगळ्या फोटोत चिमणा 'चिमण' शोधून दमले !
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 10/06/2015 - 08:27

Permalink

हे असे जेवणाचे फोटो टाकण्यावर

हे असे जेवणाचे फोटो टाकण्यावर बंदी आणली पाहिजे. ते दुत्त दुत्त रिपीट.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Tue, 10/06/2015 - 09:58

Permalink

वृत्तांत मस्त !

वृत्तांत मस्तच…पन्नासराव आणि वल्ली बरेच वाळलेत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 10/06/2015 - 09:58

Permalink

मस्तच झाला की कट्टा.

मस्तच झाला की कट्टा.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/06/2015 - 10:02

Permalink

लै भारी वृत्तांत आणि फोटो!

लै भारी वृत्तांत आणि फटु! जाम धमाल! पुणेकरांनी चहाचा विषय काढल्याबरोबर अख्ख्या एअरटेलला धक्का बसून कॉल ड्रॉप झाला, म्हणजे बघा! तेवढ्यात मुविंना नंबर लागल्यामुळे बाकी मंडळींची खबर घेता आली नै. पण ती दिव्यश्रीने चांगलीच घेतल्याचे कळते. अनाहितांतर्फे दिव्यश्रीला स्टँडिंग ओव्हेशन! हे सगळेजण धोकट्या घेऊन का फिरत आहेत ते मात्र कळले नाई!
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन सावंत on Tue, 10/06/2015 - 10:24

Permalink

छान वृतांत अन फोटोही.

छान वृतांत अन फोटोही. डॉक्टरसाहेबांचे न त्यांच्या चिरंजीवांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Tue, 10/06/2015 - 11:04

In reply to छान वृतांत अन फोटोही. by नूतन सावंत

Permalink

+१

डॉक्टरसाहेबांचे न त्यांच्या चिरंजीवांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 10/06/2015 - 11:34

In reply to छान वृतांत अन फोटोही. by नूतन सावंत

Permalink

+१११

छान वृतांत अन फोटो, डॉक्टरसाहेबांचे आणि त्यांच्या चिरंजीवांचे अभिनंदन..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/06/2015 - 12:25

In reply to +१११ by नीलमोहर

Permalink

तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद

तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 10/06/2015 - 16:49

In reply to तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

हार्दिक अभिनंदन...!!

हार्दिक अभिनंदन...!!
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 10/06/2015 - 16:39

In reply to +१११ by नीलमोहर

Permalink

हार्दिक अभिनंदन...!!

हार्दिक अभिनंदन...!!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 10/06/2015 - 11:04

Permalink

जंगी कट्टा !

आणि खमंग वृ. !!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 10/06/2015 - 12:23

Permalink

छान,

मस्त मज्जा केलेली दिसतेय. बॅट्याचे डोळे स्वप्नाळु आहेत की पेंगुळलेले !!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 10/06/2015 - 13:57

In reply to छान, by इरसाल

Permalink

ब्येर्की हैत =))

ब्येर्की हैत =))
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 10/06/2015 - 12:34

Permalink

एक उत्तम कट्टा मिसला. वाईट

एक उत्तम कट्टा मिसला. वाईट वाटून राह्यले
  • Log in or register to post comments

Submitted by मीता on Tue, 10/06/2015 - 12:42

Permalink

कट्टा हुकला. पुढच्या वेळेस

कट्टा हुकला. पुढच्या वेळेस नक्की येणार. एक्काकाकांच्या चिरंजिवांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 10/06/2015 - 12:57

Permalink

मस्तकट्टा...

उत्तम कट्ट्याचा अत्युत्तम वृत्तांत. डॉक्टरसाहेबांच्या मुलाचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला पण पार्टी ड्यू हे विसरू नका. (कॅश पाठवलीत तरी चालेल.) सर्व कट्टेबाजांचे अभिनंदन. मी येतो आहे पुन्हा डिसेंबरात.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 10/06/2015 - 13:00

In reply to मस्तकट्टा... by प्रभाकर पेठकर

Permalink

डिसेंबारात

जंगी महा संमेलन व्हावे ही श्रींची ईच्छा !!!! मुवींचा तत्पर स्वयंसेवक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/06/2015 - 23:44

In reply to मस्तकट्टा... by प्रभाकर पेठकर

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद ! तुम्ही याल तेव्हा डिसेंबरात जंगी कट्टा करू, हाकानाका.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 10/06/2015 - 13:10

Permalink

मस्त

कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे, वृत्तांत वाचून फ्राफुतला इनो संपवला. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Tue, 10/06/2015 - 14:02

Permalink

मस्त वृत्तांत मस्त फोटो.

मस्त वृत्तांत मस्त फोटो. एक्काकाकांच्या चिरंजिवांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Tue, 10/06/2015 - 15:25

Permalink

वा वा झाला बै कट्टा आला बै

वा वा झाला बै कट्टा आला बै व्रुत्तान्त ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Tue, 10/06/2015 - 18:46

Permalink

छान झाला कट्टा.

छान झाला कट्टा. फोटो, वृत्तांत पण मस्तं. एक्का कांकाच्या मुलाचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 10/06/2015 - 19:36

Permalink

धागा काढून २४ तास होत आले तरी

धागा काढून २४ तास होत आले तरी जेमतेम ७० प्रतिसाद? आमच्या वेळी असं नव्हतं!!
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Wed, 10/07/2015 - 00:18

In reply to धागा काढून २४ तास होत आले तरी by सूड

Permalink

+++++++++++++++++

11111111111111111111
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 10/07/2015 - 06:53

In reply to धागा काढून २४ तास होत आले तरी by सूड

Permalink

टाकु का काडी बुवांना? =))

टाकु का काडी बुवांना? =))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 10/07/2015 - 07:01

In reply to टाकु का काडी बुवांना? =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मशाल आणु का??? :P

मशाल आणु का??? :P
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 10/07/2015 - 07:10

In reply to मशाल आणु का??? :P by अत्रुप्त आत्मा

Permalink

काडी आणि मशालीच्या काठीमधे

काडी आणि मशालीच्या काठीमधे फरक असतो. आणि धाग्याची शंभरी करायची आहे भरवायची नाही. ते एक असो. =)) वल्ली सर काय म्हणताय्त. पुस्तक कट्ट्याचा वृत्तांत कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 10/07/2015 - 08:48

In reply to काडी आणि मशालीच्या काठीमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

दू दू दू दू! :-/

दू दू दू दू! :-/ llllluuuuu :-/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 10/07/2015 - 08:51

In reply to काडी आणि मशालीच्या काठीमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

करू की १००. हाकानाका.

करू की १००. हाकानाका. आधी अक्षरधारा गेलो तिथे ब्याट्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले नामक एक पुस्तक घेतले त्यात सिंधुदुर्गावरील हाताच ठसा हा शिवाजी महाराजांचाच असल्याचा एक अस्स्सल संदर्भ आहे. धन्याने कुठलेतरी मानसशास्त्रावरील एक पुस्तक घेतले. तितक्यात बुवा आणि चिमण मागाहून आलेच. मग काय परत गप्पाटप्पा. तिथून मेहताकडे गेलो. पण नुसतेच विंडो शॉपिंग केले खरेदी काहीच नै. अजूनही टैमपास करायचा मूड होता तसा पण इकडे आभाळ गर्जू लागले होते पण काढता पाय घेतला आणि काय तर आलो घरी.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 10/07/2015 - 11:00

In reply to करू की १००. हाकानाका. by प्रचेतस

Permalink

सिंधुदुर्गावरील हाताच ठसा हा

सिंधुदुर्गावरील हाताच ठसा हा शिवाजी महाराजांचाच असल्याचा एक अस्स्सल संदर्भ आहे
त्या संदर्भाबद्दलची माहीती इथे देता येइल का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 10/07/2015 - 13:47

In reply to सिंधुदुर्गावरील हाताच ठसा हा by खटपट्या

Permalink

तो ब्याट्या देईलच.

तो ब्याट्या देईलच.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 10/07/2015 - 14:09

In reply to तो ब्याट्या देईलच. by प्रचेतस

Permalink

तो ब्याट्या देईलच.

तो ब्याट्या देईलच.
हे वाक्य "तो तर काय ब्याट्या पण देईल" असे (हवे) होते काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 10/07/2015 - 14:36

In reply to सिंधुदुर्गावरील हाताच ठसा हा by खटपट्या

Permalink

२१ नोव्हेंबर १७६३ रोजी

२१ नोव्हेंबर १७६३ रोजी तत्कालीन करवीरच्या महाराणी जिजाबाई यांनी सिंधुदुर्गाचे किल्लेदार येसाजी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात तसा उल्लेख आहे असे दिलेले आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com