मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृष्णमुर्ती

(पितृभाषा)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा अर्थातच तूम्ही भकार, मकार, गकाराने सुरु होणारे शब्द उच्चारत माझ्या एक सणकन कानफाटीत मारता, तेव्हा मी तुमचे राकट् हात लालसर डोळे पहात राहतो. तुम्हाला पाहुन जीव इतका का घाबराघुबरा व्हावा? तुम्ही माझे मनगट कचकन पिरगळून पाठीत दणका घालता, पितृभाषा कि काय तिच्यातच जीव जातो बघा, बापाचा माल आहे का?

(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

ज्ञानोबाचे पैजार ·
जर विशालची तरही तर आमची जरही (जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला मोकळे हापिसात् कधिही, व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला, कळ उठता पोटातूनी, दाबूनी ठेउ किती? दर्प जहरी इतरे जनांना, द्यायचे नव्हते मला आज गडबड जाहली पोटामधे माझ्या कशी? करपट ढेकर द्यायची, मिटींग मधे नव्हती मला वेळ नाही काळ नाही, ना कुणाची लाजही, पाचवी वाटी बासुंदीची , प्यायची नव्हती मला, पोट भरण्या अर्थ नव्हता, पंगती मधे तुझ्या खात आलो मी जरीही, खायचे नव्हते मला पैजारबुवा,

(खुरपणी)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा खुरपणी संयम संपला संतापाने, फुलला माझा श्वास लागलात जर मागे माझ्या, घेइन मिपा संन्यास ||१ || इक्षुदंडी कविता लिहिता, धावत येती टवाळ प्रतिसादांच्या उतरंडीने, मन होते किती घायाळ ||२ || पान खाऊन येती दाजीबा पिंकाच्या टाकीत चुळा, चार शब्दही कौतुकाचे लिहीले न माझ्या भाळा ||३ || एकएक प्रतिसाद वाचून माझे अंगअंग शहारले श्वास होतो विग्दद, हे माझे विश्वची न उरले |||४ || प्रतिसादांनी तुमच्या राया स्वत्व माझे हरवले कॅलेंडरी कविता करता माझे भान हरपले ||५ || असेल तुमची प्रीती म्हणूनी, कितीदा दुर्लक्ष मी क

(नोटा)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी? चालः- गे मायभू तुझे मी नोटा नोटा कितीक असती हजार पाचशेच्या नाही कुणास मुल्य कागद वाटती साऱ्या दूरस्थ आयकर विभाग ठाऊक पाहतो मजला डोळ्यांत् कॅशियरच्या अनुकंप दाटलेला झालो विवश परंतु बोलणार काही नाही निःशब्द भावनांना होळीच साक्षी राही अत्यंत भित्रे 08112016 पैजारबुवा,

Foolपाखरा

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा अर्थात Foolपाखरा का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? कोण? मी? तू जागी आहेस ना म्हणून, मी पण जागतोय . गिरणीच्या पट्ट्यासारखी अखंड बोलतेस कधी कधी वाटतं दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहातेस माझ्या कार्डावर आणि मग उद्या काय खरेदी करायचे?

योग- ध्यानासाठी सायकलिंग

मार्गी ·
लेखनप्रकार
नमस्कार. योग- ध्यान ही थीम घेऊन एक सायकल मोहीम करणार आहे. सायकलिंगचा योगाशी व ध्यानाशीही जवळचा संबंध आहे. किंबहुना सायकलिंग, रनिंग, वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा नृत्य ह्या सगळ्यांचा संबंध योग व ध्यानाशी आहे. पश्चिमोत्तानासनासारखी काही आसन करणं कठीण असतं. किंवा सूर्य नमस्काराच्या तिस-या स्थितीत काही जणांचे हात जमिनीला स्पर्श करू शकत नाही. पण सायकलिंग- रनिंगमुळे अशी आसनं करता येतात. शिवाय एंड्युरन्सच्या एक्टिव्हिटीमध्ये हृदय जास्त हवा पंप करतं, त्यामुळे सायकलिंगसारख्या व्यायामानंतर भस्त्रिकासारखं प्राणायामसुद्धा जास्त तीव्रतेने करता येतं.

(महाग्रु)

ज्ञानोबाचे पैजार ·
(महाग्रु) पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २ सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी समूळ पिळून्-बोरकर अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

मार्गी ·
लेखनप्रकार
हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ हिंदी चित्रपटगीतांमधल्या काही गाण्यांमध्ये सापडलेला हा अर्थ आहे. हा अर्थ काहीसा व्यक्तिसापेक्ष आहे. एकाला जो अर्थ दिसेल, तो दुस-याला दिसेलच असं नाही. पण त्या गाण्याची पार्श्वभूमी, त्याचे चित्रण, त्याचे चित्रपटातील संदर्भ व आपण कोणत्या काळात ते गाणं ऐकलं, हे थोडं बाजूला ठेवलं तर खूप वेगळा अर्थ सापडतो. काही गाण्यांमध्ये तर पूर्ण धर्माचं सार आहे; काही गाण्यांमध्ये आध्यात्मिक जीवनदृष्टी आहे तर काही गाणी ही जणू गुरू- शिष्य नात्याच्या विविध छटा दाखवतात तर काही अध्यात्मिक दृष्टीची प्रचिती देतात.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

(ही पहा पाडली गजल)

ज्ञानोबाचे पैजार ·
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले पेरणा सांगायलाच पाहिजे का? ही पहा पाडली गजल, ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी, उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू, शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी, कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली, रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी, हो!