मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

शिखर त्यांनी गाठलेले -

विदेश ·
लेखनविषय:
शिखर त्यांनी गाठलेले, पायथा धुंडाळतो चालती तो-यात सारे मीच का ठेचाळतो |१| देव दगडांतील येथे पुजुन का कंटाळतो माणसांतिल देव तेथे पूजणे ना टाळतो |२| शोभती जरि आज कपडे भरजरी अंगावरी कालच्या सद-यावरीचे ठिगळ का कुरवाळतो |३| फाटकी लेऊन वसने गरिब अब्रू झाकतो अब्रु उघड्यावर थिरकते मंच ना ओशाळतो |४| चोर अपराधीच येथे उजळ माथे मिरवती वेदना इतरां न होते तीच का कवटाळतो |५| बीज ते साधेपणाचे काल कोणी पेरले रोप भाऊबंदकीचे आजला सांभाळतो |६|

तुला आपलेसे करावे किती ?...

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
तुला आपलेसे करावे किती ? जगावे किती ? मी ! मरावे किती ? किनाराच मी ! भरती ओहटिचा बुडावे किती ? मी ! तरावे किती ? तू जवळून जाता ! मनी बाग फुलते तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ? तुझी याद येते ! तसा तोल जातो सावरून मी ! वावरावे किती ? ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले लिलावात माझ्या ! हरावे किती ? चांदणे सारखे आज जाळू पहाते तुझे आज नसणे स्मरावे किती ? मिठी दे युगांची ! धुके दूर सारु फुलांनीच दव पांघरावे किती ? तुला "मी "- मला "तू" - मला "तू" - तूला "मी" परक्या परी -हे झुरावे किती ? मयुरेश साने...दि.०५-डिसेंबर-१०

मरण्यात अर्थ नाही

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
काव्यरस
मरण्यात अर्थ नाही . संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही गंगाधर मुटे .....................................................

अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
(व्रुत्त पंचचामर... एक लघु आणि एक गुरु या क्रमाने ...अक्षरे योजली आहेत, पहिलाच प्रयत्न आहे.) मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा..... पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... अजून चंद्र चांदण्या ! तुला मलाच शोधती बनून स्वप्न जागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... जिवंत मी ! असा कसा?

शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई...

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही ! अश्रु बनुन गेला - मग शब्द अर्थवाही तोडून तसबीरिला - ती एकसंध राही ऐना कसा कळेना - जपतो तिला मला ही मागुन ही सुखाला - आले न हाती काही दुःख हेंच मजला - देते अजून ग्वाही सांगुन ही कुणाला - कळले न गुज मनीचे कुसुमास कागदी त्या - कुठला सुवास येई? कळवून ही तुला - मी कळलो कधीच नाही तोच उम्बरा अन - तीच ठेच पाई छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही टाळुन ही मला तू - मी टळलोच नाही जरी चन्द्र मी आता - मी सूर्य उद्याचा ही माझी कविता ...मयुरेश साने...दि १६-औग-10

का शब्द मी निघालो खोडून वाचलेला?....

मयुरेश साने ·
लेखनविषय:
वाहून काल गेला राहून साचलेला का शब्द मी निघालो खोडून वाचलेला? वारुळ हे जगाचे - नाते जपा विषारी का डंख हा मिळाला आतून डाचलेला काळोख ही विजेचा अंगार होत आहे अंधार ही विजांनी पोळून टाकलेला सारे तुला दिले मी माझी न राहिली तू तो चोरटा निघाला माझाच वाटलेला गाणे कसे म्हणू ती आता कुठे दिसेना प्रत्येक हुन्दक्याला हा कंठ दाटलेला यात्रेत त्या फुलांच्या "गंधाळल्या" दिशा का ? कोमेजल्या फुलाने संदेश धाडलेला मी हासतो सुखाने दुःखात नांदतो मी तो चेहरा सुखाचा मी रोज फाडलेला मयुरेश साने ....दि ०९ ओक्ट-10

तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?...

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
पसारे तुझे आवरावे कशाला ? स्वत:ला असे सावरावे कशाला ? झोकून देतो मझ्यातला मी तुझ्यातच असे सापडावे कशाला ? जरा सांज होता तुझी याद येते पारव्याने असे गीत गावे कशाला ? तुझा स्पर्श व्हावा विसावा सुखाचा तुझ्यातून मी वावरावे कशाला ? तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला दीपकाने असे मंद व्हावे कशाला ? जरा कान देण्या कळी फूल होते भ्रमर गीत ऐकून बावरावे कशाला ? जीव उरला कुठे ? लावण्याला पणाला तरीही तिने मुस्कुरावे कशाला ? मयुरेश साने..दि..२४-नोव्हेंबर-१०

बघ कशा संवेदना गातात माझ्या

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
फक्त दे तू हात या हातात माझ्या बघ कशा संवेदना गातात माझ्या मी फुलांचे ताटवे फुलवून गेलो मोगर्‍याचा गंध मुक्कामात माझ्या भक्तिने नेवैद्य मी अर्पुन आलो जेवतो माझा "विठू" ताटात माझ्या काय तू रमते अशी भासात मझ्या ठेव थोडा श्वास तू श्वासात माझ्या कुंकवाचा साज भाळी रेखुदे ना रंगुदे सौभग्य ते रंगात माझ्या मी हिशेबी राहिलो नाही तरीही बेरजा - वजाबाक्या ठरतात माझ्या मयुरेश साने....दि...२३-नोव्हेंबर-१०

चुंबिण्या येऊ नको तू............

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
संपलेला ध्यास आता दोन उरले श्वास आता मोडुनी त्रिज्या सुखाच्या विश्व केले व्यास आता स्वप्न ती देऊन गेली सत्य भासे भास आता जिंकुनी पैजा विजांच्या सोसुदे मधुमास आता ओंजळी अश्रु तुझा "ही " फक्त उरली प्यास आता चुंबिण्या येऊ नको तू डंख मुरले आत आता घेउनी संन्यास जावे हा खरा हव्यास आता मयुरेश साने..दि.२५-ऑक्टोबर-२०१०

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम