Skip to main content

प्रथम क्रमांक स्पर्धा विजेता कविता

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/04/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे? "घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही? सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे? कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कस

कळले नाही ....

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/04/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलो उन्हात इतका .... पावसात वाळलो नाही ... मेलो पुन्हा पुन्हा इतका ..... जगण्यास भाळलो नाही ... पिकलो कधीच नव्हतो .... गळलो कसे कळले नाही ... पेटलो कधीच नव्हतो.... जळलो कसे कळले नाही ... खेळलोच नाही कधी .... हरलो कसे कळले नाही ... विसरली नव्हतीस कधी .... स्मरलो कसे कळले नाही ... आणले उसने अवसान .... गळले कसे कळले नाही ... दुख्खास ह्या सलत्या ... गिळले कसे कळले नाही .... होतो स्वप्नवत निद्रेत .... जागलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही .... होतीस तू माझा श्वास .... अजून जगलो कसे कळले नाही ....
काव्यरस

जिंदगी क्या राज ही ?

लेखक बन्या बापु यांनी मंगळवार, 19/04/2011 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
ही गझल माझी नाही.. पण आज कोण जाणे खूप आठवते आहे... आशुतोषदादा जगणे तुझ्या कडुन शिकावे.. त्या दिवसातली ती प्यास आज जीव कासावीस करून जाते आहे. सगळी गझल आता आठवत नाहि.. तरिही.. ------------------------------------------------------------------------------ हे खुदा मुझको बता, येह जिंदगी क्या राज ही ? आजतक वोह हमसे, हम उनसे नाराज है कर तलब यु जाम-ए-उल्फत कौन पिता है यहा ? अश्क पी पी कर बहकना येह मेरा अंदाज है.. ------------------------------------------------------------------------------ अशीच अजुन एक... कवी आज आठवत नाही..
काव्यरस

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

गझल

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 31/03/2011 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा काल स्वप्नात आली गझल खुले पापणी अन् उडाली गझल कशी कोरडी मी, जरी वाहते तुझ्या आठवांच्या पखाली गझल? नसे वेगळे रूप माझे-तिचे, मला वारशाने मिळाली गझल "जरा एकटे वाटते, शब्द दे तुझे सोबतीला" म्हणाली गझल जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये, क्षणार्धात माझीच झाली गझल! नको या प्रवासात थांबा कुठे, सवे आज माझ्या निघाली गझल
काव्यरस

शत्रु समोरून थेट वार करुन गेला -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/03/2011 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रु समोरून थेट वार करुन गेला - मित्र मिठित पाठीवर वार करुन गेला ! मैफिलीत हास्यरंग उधळण्यास आला सुतकी चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला ! सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला - तिरडीवर मात्र आज छान हसुन गेला ! पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला , अवसेला काजवाच चकित करुन गेला ! भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट झाला सचोटिचा देव तिथुन कधिच पळुन गेला !

पांढरा किडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 22/03/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा किडा तुझी सांग येथे दखल कोण घेतो कशाला घशाला उगा त्रास देतो असामान्य विश्लेषकांच्या भितीने गझल घप्प कपड्यात झाकून नेतो नवे रोप लावत पुढे चालताना कुणी सांड मागून तुडवीत येतो पिके फस्त केली फळे पोखरूनी कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी कुणाच्याच बापास ना घाबरे तो . गंगाधर मुटे ..........................................

टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 22/03/2011 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे हासती का पाहुनी मज रोजला हे आरसे?? मैफ़िलीना मी सजवले प्राण माझे ओतुनी पण तरीही का कुणीही फ़िरकले ना फ़ारसे?? सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!! एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!! - प्राजु *काल एक फोन आला..
काव्यरस

ओले परीस...

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 20/03/2011 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यामधील आसू परतून ना गळावे धुंदीत मी जगावे, धुंदीत मी मरावे आता न जाणवावी दुःखे उदासवाणी ’दारू’ परीस ओले जखमांवरी फिरावे तार्‍यांत वावरावे सहवास चांदण्यांचा डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे काळोख दाटलेला आहे दहा दिशांनी श्वासात ध्यास आहे तोची प्रकाश दावे आत्म्यात राम राहे, आत्म्यात कॄष्ण आहे हे राम-कॄष्ण आता बाहेरही दिसावे - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com

नव्या यमांची नवीन भाषा

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 13/03/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या यमांची नवीन भाषा मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी यमास थोडी दया न उरली, नव