पसारे तुझे आवरावे कशाला ?
स्वत:ला असे सावरावे कशाला ?
झोकून देतो मझ्यातला मी
तुझ्यातच असे सापडावे कशाला ?
जरा सांज होता तुझी याद येते
पारव्याने असे गीत गावे कशाला ?
तुझा स्पर्श व्हावा विसावा सुखाचा
तुझ्यातून मी वावरावे कशाला ?
तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला
दीपकाने असे मंद व्हावे कशाला ?
जरा कान देण्या कळी फूल होते
भ्रमर गीत ऐकून बावरावे कशाला ?
जीव उरला कुठे ? लावण्याला पणाला
तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?
मयुरेश साने..दि..२४-नोव्हेंबर-१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1989
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वाह!
मनाला स्पर्श करुन जाणारी कविता!
झोकून देतो मझ्यातला
झोकून देतो मझ्यातला मी
तुझ्यातच असे सापडावे कशाला ?
तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला
दीपकाने असे मंद व्हावे कशाला ?
हे शेर आवडले
सुंदर कविता
सुंदर कविता.
मस्त !
छन आहे...
सुंदर... झोकून देतो मझ्यातला
सुंदर... :)
झोकून देतो मझ्यातला मी
तुझ्यातच असे सापडावे कशाला ?
वा... :)
मस्त
मस्त
गझल
कविता आवडली
एवढी प्रतिभा प्रगल्भ असताना
लिहिण्याचा आळस कशाला
लगे रहो
पसारे तुझे आवरावे कशाला ? वा
पसारे तुझे आवरावे कशाला ?
वा ! अगदी माझ्या मनातली ओळ ....!
सुरेख !
वा वा वा!! अतिशय तरल.. लाघवी
वा वा वा!! अतिशय तरल.. लाघवी कविता आहे.
आवरावे कशाला..!
ही गजल..? सुंदर प्राजू म्हणाली तसं लाघवी कविता..!!
तुझ्या
कोण मंद? :-(
मस्त कविता! :-)