Skip to main content

चुंबिण्या येऊ नको तू............

Published on रवीवार, 21/11/2010
संपलेला ध्यास आता दोन उरले श्वास आता मोडुनी त्रिज्या सुखाच्या विश्व केले व्यास आता स्वप्न ती देऊन गेली सत्य भासे भास आता जिंकुनी पैजा विजांच्या सोसुदे मधुमास आता ओंजळी अश्रु तुझा "ही " फक्त उरली प्यास आता चुंबिण्या येऊ नको तू डंख मुरले आत आता घेउनी संन्यास जावे हा खरा हव्यास आता मयुरेश साने..दि.२५-ऑक्टोबर-२०१०
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1618
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

विशेषतः मोडुनी त्रिज्या सुखाच्या विश्व केले व्यास आता

कवीता एकदम घूसलीच काळजामधे........