Skip to main content

अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

लेखक मयुरेश साने यांनी मंगळवार, 30/11/2010 21:34 या दिवशी प्रकाशित केले.

(व्रुत्त पंचचामर... एक लघु आणि एक गुरु या क्रमाने ...अक्षरे योजली आहेत, पहिलाच प्रयत्न आहे.)

मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.....

पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?
मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा

जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी
उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......

अजून चंद्र चांदण्या ! तुला मलाच शोधती
बनून स्वप्न जागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा

जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा
तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......

जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ?
अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

मयुरेश साने ........दि..१६-ओक्ट-10

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1995
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अतिशय सुरेख!! शब्दच नाहीत!

जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा
तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......

जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ?
अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

हे जास्ती आवडले..


सुंदर कविता..

पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?
मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा

वा


आई ग! बरच प्रभुत्व दिसतय शब्दांवर! मला काव्य बांधायला कधिच नाही जमल अन तुम्ही अगदी लघु गुरु पर्यंत .. वाव्व!


पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?
मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा

मस्त जमलीय एकदम आवडली.!!


पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?
मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा

जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ?
अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

अतिशय छान


मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा... .. वा !

सुरेख !