Skip to main content

शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई...

शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई...

Published on सोमवार, 29/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही ! अश्रु बनुन गेला - मग शब्द अर्थवाही तोडून तसबीरिला - ती एकसंध राही ऐना कसा कळेना - जपतो तिला मला ही मागुन ही सुखाला - आले न हाती काही दुःख हेंच मजला - देते अजून ग्वाही सांगुन ही कुणाला - कळले न गुज मनीचे कुसुमास कागदी त्या - कुठला सुवास येई? कळवून ही तुला - मी कळलो कधीच नाही तोच उम्बरा अन - तीच ठेच पाई छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही टाळुन ही मला तू - मी टळलोच नाही जरी चन्द्र मी आता - मी सूर्य उद्याचा ही माझी कविता ...मयुरेश साने...दि १६-औग-10
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 2764
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई आवडली कविता..

लिहित राहा...... छान आहे.... जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही हि ओळ भावली.........

रचना अतिशय भिडणारी आहे.... फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही !- पण हे खर्‍ंच कधी शक्य आहे का?

.