हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काही त्रुटी असल्यास नक्की सांगा, पुढच्यावेळी त्या टाळण्याचा प्रयत्न करेन.
---------------------------------------------------------------------------------------------
हा माझा अनुभव २०१० मधील आहे.
१५ जुलै २०१० ला माझा F१ वीसा मंजूर झाला आणि एकच घाई उडाली. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. माझ्या बाबतीत संन्याश्याचं लग्न जरी नसलं तरी तयारी मात्र खूप करावी लागली.