मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

चित्रगुप्त ·

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.

यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

फुलांचा फोटो

शिव कन्या ·

अनिंद्य 11/05/2018 - 11:04
@ शिवकन्या, हळुवार, ओघवतं आणि सौष्ठवपूर्ण लेखन. न जानें क्यों ये पढ़ते हुए कहीं दूर से अख्तरी बेगम के स्वर कानों में घुलते-पिघलते से लगे.... अनिंद्य

शाली 11/05/2018 - 11:28
वाह! सुरेखच! लेखनशैली तर भारीच! तुमचे ईतर लिखानही वाचायला घेतोय.

In reply to by शाली

शिव कन्या 11/05/2018 - 12:43
माझ्या इतर लेखनाने तुमचा अपेक्षाभंग होणार नाही, ही आशा. वाचत असल्या बद्दल धन्यवाद.

अभ्या.. 11/05/2018 - 11:30
ओहहहह, फार दिवसांनी असे वाचायला मिळाले. थँक्स शिवकन्या.

In reply to by अभ्या..

शिव कन्या 11/05/2018 - 12:45
तुमच्या सारख्या कलावंताची दाद या कथेला मिळाली, यात सगळं आलं. मनोहर तुमच्या पर्यंत पोहचला, समाधान वाटले. धन्यवाद.

नीलकांत 11/05/2018 - 13:21
अतिशय तलम लिहीलं आहे. लेखन खिळवून ठेवतं. सुंदर कथा. आवडली. - नीलकांत

In reply to by अनन्त्_यात्री

शिव कन्या 11/05/2018 - 18:41
मलाही लिहिताना हे जाणवले. पण ते गालबोटा इतके वाटत असेल, तर परत विचार केला जाईल. पुनर्लेखन करताना, काही सुधारणा करता येईल का ते नक्की पाहीन. उत्तम वाचन. प्रांजळ अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

नाखु 11/05/2018 - 19:11
आणि अव्यक्त दोन्ही आवडलं गुमराह मधील ,"वो अफसाना "हेच कडव तंतोतंत लागू पडते वाचकांची पत्रेवाला नाखु

खिलजि 11/05/2018 - 19:49
असं आठवणींना साथ देणारं अचानक कुणीतरी भेटतं अन मग इथं पुढं आलेलं आयुष्य परत मनाला भूतकाळात रेटतं लिखाणात तो वेग, ती गहनता अशीच कायम आहे हीच तर तुमची ताई , खरं गम्मत आहे मस्तंय लेख शिवकन्या ताई आणि त्यातील अपूर्णता हा त्याचा आत्मा आहे . मला आवर्जून यावर व्यक्त व्हावंस वाटलं म्हणून अभिप्राय देत आहे . पुलेशु सिद्धेश्वर विलास पाटणकर

राही 14/05/2018 - 20:05
कुठे कुणाच्या जुळल्या गाठी त्या झुकल्या सुमनाची गाथा स्मृती अजूनही गाती! अपरिमित अपुरेपणा हेच तर मानवाचे जगणे. कथा आवडली. फोटोग्राफी हा विषय चित्राच्या वॉशसारखा घेऊन एक सुंदर प्रेमकथा मराठीत लिहिली गेली आहे. अनंत सामंताची 'ओश्तोरीज'. कॅमेरा, लेन्स आणि भोवतालची जीवसृष्टी यांचं एक तरल नातं त्यांत उलगडलं आहे. अर्थात ओश्तोरीज आणि या कथेचे पोत आणि मध्यवर्ती सूत्र अगदीच वेगळे, पण या कथेने जुनी आठवण जागी केली.

In reply to by राही

शिव कन्या 15/05/2018 - 21:18
नाही, अनंत सामंत यांची 'ओश्तोरीज' नाही वाचली. आता वाचणार. रसिकतेने वाचन केलेत, आवडले. धन्यवाद.

मिसळपाव 14/05/2018 - 20:34
शिवकन्या, फार छान लेखन आहे हे. परवा एक परिच्छेद वाचून थांबलो. माझा अंदाज होता त्याप्रमाणेच झालं. दोन दिवसानी वेळ काढून, निवांतपणे घुटके घेत चहा प्यावा तशी वाचली. व्वा! असं लेखन हवं - शब्द वाचताना डोळ्यांपुढे दृष्य उलगडत गेलं पाहिजे. मला वाटतं 'एक माणूस मिशी काढून' तुमचीच आहे ना? त्यानंतर दोन-तीन पोस्टस् वाचली होती. आता "अधली-मधली छान टपोरी, फुले नेमकी होती हुकली" असं झालं आहे का बघतो! तुम्ही अनिल बर्वेंची पुस्तकं वाचली आहेत का? नसल्यास 'स्टडफार्म' पासून सुरुवात करा. त्यानंतर 'डोंगर म्हातारा झाला', 'थँक्यू मिस्टर ग्लाड', 'अकरा कोटी गॅलन पाणी' पण वाचा हे मला सांगायला लागणार नाही :-). त्यांचं नाव घेतलं कारण छोट्या-छोट्या वाक्यातनं नेमका आशय सांगणं ही त्यांची हातोटी मला या तुमच्या कथेत जाणवली. टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by मिसळपाव

शिव कन्या 15/05/2018 - 21:15
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 'एक माणूस मिशी काढून' माझीच. अनिल बर्वे यांचे ''थँक्यू मिस्टर ग्लाड', आणि 'बेगम बर्वे' वाचलेय. पण बाकीची आता वाचणार. पुस्तके सुचवल्या बद्दल आभार. कथेच्या प्रकृती नुसार वाक्ये येत जातात मनात.

सविता००१ 15/05/2018 - 17:17
आधी फेसबुक वर वाचून प्रतिक्रिया दिलीच होती तुला. तरीपण परत... खूप खूप हळवं आणि कातर करून टाकणारं लेखन असतं तुझं.. फार छान

शिव कन्या 15/05/2018 - 21:19
धन्यवाद. सविता ताई, दोनदा वाचून, दोनदा प्रतिक्रिया लिहिलीत, माझ्यासाठी फार मोलाचे आहे हे. परत एकदा आभार. :-)

‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

कमलताल

शिव कन्या ·

पलाश 30/12/2017 - 02:29
सुरेखआणि चित्रदर्शी. आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात. हे फारच आवडलं.

(ताल = सरोवर) प्रिय कमलताल, मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते. कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ. अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट.

मजूर

शिव कन्या ·
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........

प्रिय नर्मदेस

शिव कन्या ·

आनन्दा 24/09/2017 - 09:39
मस्त जमल आहे.. मुख्य म्हणजे तुमचं लिखाण मनाला भिडतं अवांतर आम्हाला पहिलं पचवायला थोडा वेळ द्यावा की

अप्रतिम लिहीलेले आहे. माझ्या बडोद्याच्या सहलीवेळी नर्मदेवरचा पुल ओलांडल्याची आठवण झाली. हि नदी नसून नद आहे. तुमच्या लेखनाला सलाम. _/\_

( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

चल, घरी चल .....

शिव कन्या ·
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो. पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस. आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

शब्दबम्बाळ ·

In reply to by प्रसाद_१९८२

शब्दबम्बाळ 25/07/2017 - 20:38
तुम्ही त्या पेडणेकर बाईंसारखे म्हणू नका, त्यांना यमक आणि चाल काय जमलेली नाय... इथं ओरिजिनल गाणं आहे ते बघा!

प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे... नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूचे विमान किती भारी... भारी फिरतंय तेही दुनिया सारी... सारी दुनियेचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा गोट्याचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूला आवडे पुरण पोळी... पोळी पण भलत्याच महाग झाल्या डाळी...

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

ट्रेड मार्क ·

एस 19/01/2017 - 09:11
उत्तम माहिती दिली आहे. अमेरिकन कार्डांवर जितक्या सवलती मिळतात तितक्या भारतातील कार्डांवर मिळत नाहीत असे माझे निरीक्षण आहे. हे चित्र बदलायला हवे. तरच भारतीयांमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय रुजू शकेल. इथे असे दिसते की ग्राहक कार्ड वापरायला उत्सुक असतात. पण दुकानदार कार्ड पेमेंट घ्यायला नाक मुरडतात.

In reply to by नितिन थत्ते

मागे लेखक मला सारखे इकॉनॉमी कॅशलेस व्हायला नको का ? विचारत होते. तेव्हा मी कुठे असता ? विचारलं होतं .

In reply to by संजय क्षीरसागर

ट्रेड मार्क 19/01/2017 - 21:27
फक्त तुम्ही विचारलेला प्रश्न विषयाशी संबंधित नव्हता त्यामुळे दिलं नाही. आता उत्तर मिळालं असेलच.

In reply to by ट्रेड मार्क

भारतातल्या लोकांनाच रांगेत उभं राहावं लागलंय. आणि कार्ड आणि नेट बँकींग चार्जेस त्यांनाच भरावे लागतायंत. कार्ड तर काय आम्ही वयात आल्यापासून वापरतो. तस्मात, इकॉनॉमी कॅशलेस असावी हे आपण सांगावं आणि आम्ही कौतुकानं पाहावं अशी परिस्थिती नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

ट्रेड मार्क 19/01/2017 - 23:55
या सगळ्याचा मी कुठे राहतो याच्याशी काय संबंध? एक तर भारतातील लोकांना रांगा लावायला लागल्या हे कोणीच अमान्य करत नाहीये. चार्जेसचं म्हणाल तर ते लागू नयेत म्हणून योग्य कार्ड वापरायचा मार्ग उपलब्ध आहे. आता कोणाला चार्जेस भरायचेच असतील तर मात्र पर्याय नाही. इकॉनॉमी कॅशलेस असावी असं मी कधीच सांगितलेलं नाहीये आणि कोणाकडून कौतुक करून घ्यायची मला गरज आणि सवय नाही. मी जरा उशिरा कार्ड्स वापरायला लागलो पण अभ्यासांती योग्य ती कार्ड्स वापरतो त्यामुळे मला चार्जेस आणि फी या कटकटी नाहीत.

In reply to by ट्रेड मार्क

चार्जेसचं म्हणाल तर ते लागू नयेत म्हणून योग्य कार्ड वापरायचा मार्ग उपलब्ध आहे. आता कोणाला चार्जेस भरायचेच असतील तर मात्र पर्याय नाही.....अभ्यासांती योग्य ती कार्ड्स वापरतो त्यामुळे मला चार्जेस आणि फी या कटकटी नाहीत. भारतात चार्जेस न लागणारी नॅशनलाईज्ड बँकांची अशी फक्त दोनच कार्ड सांगा . जाहीर आभारप्रदर्शन करू. इकॉनॉमी कॅशलेस असावी असं मी कधीच सांगितलेलं नाहीये मग कार्ड कशासाठी वापरतात ? का कार्ड आणि कॅशलेसचा काही संबंध नाही ? फक्त पॉइंटस कलेक्शन आणि रिडमप्शन इतकाच कार्डचा उपयोग आहे ?

In reply to by संजय क्षीरसागर

गणामास्तर 20/01/2017 - 09:11
भारतात चार्जेस न लागणारी नॅशनलाईज्ड बँकांची अशी फक्त दोनच कार्ड सांगा . संक्षी, मागच्या वेळी सुद्धा मी याबद्दल सांगितले होते परंतु त्या धाग्यावर प्रतिसादांच्या रतिबात माझा प्रतिसाद हरवून गेला असावा. कार्ड चार्जेस हा विषय निघाल्यावर मी नोटबंदीनंतर माझे जुने स्टेटमेंट्स काढून परत एकदा डोळ्यात तेल घालून चेक केले. एसबीआय च्या डेबिट कार्डावर मला पेट्रोल पंप ई. ठिकाणी कुठलेही चार्जेस लागलेले नाहीयेत. तसेचं इतर जे प्रायव्हेट बँकांचे कार्ड्स वापरतो त्यांना सुद्धा चार्ज पडलेला नाही.

In reply to by गणामास्तर

एसबीआय च्या डेबिट कार्डावर मला पेट्रोल पंप ई. ठिकाणी कुठलेही चार्जेस लागलेले नाहीयेत. आणि सांगतो. धन्यवाद !

In reply to by संजय क्षीरसागर

रॉजरमूर 09/03/2017 - 21:33
... वसुली जोरदार सुरु आहे ..... ग्राहकांना दोन्ही बाजूनी मार बसतोय.

In reply to by संजय क्षीरसागर

वगिश 21/01/2017 - 09:03
State Bank of India Credit Card(मला २ वर्षे झाली) , 15000-20000 मासिक उत्पन्न हवे. किंवा सीबील स्कोअर चांगला हवा.

In reply to by नितिन थत्ते

ट्रेड मार्क 19/01/2017 - 21:24
हा हा हा कुठली कार्ड्स घ्यायची आणि कुठली नाही हे आपल्या हातात असतं. ट्रुमनभाऊंची खालील प्रतिक्रिया वाचा. त्यांनी फक्त भारतात मिळणाऱ्या आणि वापरलेल्या कार्ड्सचा अनुभव सांगितला आहे. त्यामुळे आता ह्या सोयीसवलती असणारी कार्ड्स भारतात मिळत नाहीत असे अरण्यरुदन तुम्हाला करता येणार नाही. राहता राहिला प्रश्न ही कार्ड तुमच्याकडे नसण्याचा, तर ती घ्यायची का दुसरी कुठलेही सवलत नसलेली कार्ड्स घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे.

In reply to by एस

गॅरी ट्रुमन 19/01/2017 - 13:59
अमेरिकन कार्डांवर जितक्या सवलती मिळतात तितक्या भारतातील कार्डांवर मिळत नाहीत असे माझे निरीक्षण आहे.
मला दोन कार्डांचे खूपच चांगले अनुभव आहेत. १. एच.डी.एफ.सी रिगॅलिआ कार्डावर खूपच चांगले पॉईंट्स मिळतात. मी २००८ पासून एच.डी.एफ.सी चे क्रेडिट कार्ड वापरत आहे. आणि अर्थातच एकदाही मी बिल भरायला उशीर केलेला नसल्यामुळे बँकेने माझे कार्ड आणि क्रेडिट लिमिट दोन्ही अपग्रेड केल्या आणि २०१४ मध्ये मला हे कार्ड मिळाले. त्यापूर्वी एच.डी.एफ.सी च्या इतर कार्डावर केलेल्या खर्चावर मिळालेले सगळे पॉईंट्स या कार्डावर ट्रान्स्फर झाले. जुने आणि या कार्डावर मिळालेले नवे पॉईंट्स वापरून मी पुढील गोष्टी मिळविल्या--- अ. ऑगस्ट २०१५ मध्ये पिझ्झा हटची ८०० रूपयाची कुपन्स ब. जानेवारी २०१६ मध्ये आमच्या दोघांची मुंबई ते गोवा विमानाची जाऊन येऊन तिकिटे (एकूण ४ तिकिटे) क. सप्टेंबर २०१६ मध्ये माझे मुंबई ते दिल्ली विमानाचे जाऊन येऊन तिकिट (एकूण २ तिकिटे) ड. सप्टेंबर २०१६ मधील दिल्ली भेटीदरम्यान दिल्लीतील एका ठिकठाक "बेड अ‍ॅन्ड ब्रेकफास्ट" हॉटेलात एका दिवसाचे (ओव्हरनाईट) बुकिंग या रिगॅलिआ कार्डावर विमानतळावरील लाऊंज अ‍ॅक्सेसही आहे. त्याचाही दिल्ली विमानतळावर वापर केला होता. रिगॅलिआपेक्षाही मोठे असे इन्फिनिआ कार्ड आहे. पण त्यासाठी आपण अर्ज करू शकत नाही. हे कार्ड "इन्व्हिटेशन ओन्ली" आहे. मला वाटते त्यासाठी वार्षिक उत्पन्न वगैरे अटी बर्‍याच जास्त आहेत. त्यामुळे मला त्याचे आमंत्रण अजून आलेले नाही :) २. अमेरिकन एक्सप्रेसचे कार्डः हे कार्ड मी २०१२-१३ या काळात वापरले होते. त्यावेळी दर महिन्याला २५०+ रूपयांची चार ट्रॅन्झॅक्शन केली की १००० पॉईंट्स मिळत असत. महिन्यातून २५०+ रूपयांचे चार व्यवहार कसेही होत असत. आमच्या दोघांची फोनची बिले आणि वीजेचे बिल हे तीन व्यवहार हटकून २५०+ पेक्षा जास्त असत. तसेच महिन्यातून एखादा चित्रपट तरी बघितला जात असेच. त्यामुळे महिन्यातून हे ४ व्यवहार करायला कसलीच अडचण नसे. तसेच एक वर्ष पूर्ण झाल्यावर लॉयल्टी अ‍ॅडिशन वगैरे पॉईंट्स मिळाले होते. या कार्डाची माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्या वर्षी १००० रूपये की अशी काहीतरी फी होती. हे सगळे पॉईंट्स एकत्र करून मी साडेसात हजाराचे एक आणि एक हजाराची दोन गिफ्ट सर्टिफिकिटे घेतली होती. त्यातून बायकोचा मोबाईल फोन घेता आला :) अमेरिकन एक्सप्रेसने २०१३ मध्ये २५०+ रूपयांऐवजी १०००+ रूपयांचे चार व्यवहार असा बदल केल्यावर मी कार्ड परत केले. मध्यंतरी ते कार्ड परत घेतले आहे. यावर पेटीएमचे १००० रूपयांपेक्षा जास्त केलेले चार रिचार्जही चालतात. त्यामुळे हे चार पेटीएम रिचार्ज पहिल्यांदा करायचे आणि मग फोन बिले, वीज बिल, उबर इत्यादी भानगडी पेटीएमवरून भरायच्या. अमेरिकन एक्सप्रेसकडून पॉईंट्स घ्यायचे आणि पेटीएमकडूनही सवलती घ्यायच्या. हाकानाका :) एक वर्ष झाल्यावर ते सगळे पॉईंट्स वापरून किमान ६ हजार रूपयांचे स्टेटमेन्ट क्रेडिट घेता येणार आहे. २००८ मध्ये मी अमेरिकेतून भारतात परत आलो. त्यावेळी मला क्रेडिट कार्ड घेणे अगदी अत्यावश्यक होते असे अजिबात नाही. पण आपण कधीनाकधी होमलोन घेणार तेव्हा त्यासाठी चांगला सिबिल स्कोअर बनवावा या उद्देशाने मी क्रेडिट कार्ड घेतले. त्यातून सिबिल स्कोअर चांगला झालाच आणि असे इतर फायदेही झाले. तसेच मी कार्ड आहे म्हणून स्वाईप करा आणि विनाकारण काहीतरी विकत घ्या असे करणारा नसल्यामुळे भरायला जड जाईल इतके बिलही कधी आले नाही. अमेरिकेत असताना (२००२ ते २००७) सुध्दा मी क्रेडिट कार्ड भरपूर वापरत असे. त्यावेळी शून्य क्रेडिट हिस्ट्री असतानाही आणि मी विद्यार्थी होतो तरीही अमेरिकन एक्सप्रेसचे कार्ड मिळाले होते आणि त्यासाठी डिपॉझिटही ठेवावे लागले नव्हते. त्यातून क्रेडिट हिस्ट्री चांगली बनवून मग एका वर्षासाठी ०% ए.पी.आर वगैरे ऑफर २००६ पर्यंत यायला लागल्या होत्या. अशा कार्डांवरील पॉईंट्स एकत्र करूनही मी अ‍ॅमॅझॉनची १०० की १५० डॉलर्सची तर स्टारबक्सची १० डॉलर्सची सर्टिफिकिटेही मिळवली होती. मला वाटते की २००७-०८ च्या आर्थिक संकटानंतर अशी कोणालाही कार्डे देणे अमेरिकन बँकांनी बंद केले आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

सुबोध खरे 20/01/2017 - 10:19
रिगालीया कार्ड असं आहे होय? मला ते दोन वर्षपासून घ्या म्हणून मागे लागले होते. पण मलाच माझी पत मर्यादा (credit limit) वाढवून नको होती. उगाच हरवले/ फिशिंग झाले तर अजून जास्त पैसे का भरा म्हणून मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला होता. पण आता माझे प्लॅटिनम कार्ड मुदत बाह्य झाले आणि त्यांनी मला स्वतःच रीगालिया कार्ड पाठवले आहे. ते प्रीमियम लाउंजचे कार्डही त्यात आहे. जुने सर्व पॉईंट या कार्डावर बदली हि झालेले आहेत. (२२०००+ असावेत) आता ते रीडिं करून घ्यायला हवेत.

In reply to by एस

ट्रेड मार्क 19/01/2017 - 22:05
तेवढ्या प्रमाणात सवलती व फायदे आत्ता लगेच मिळाल्या नाही तरी हळूहळू मिळतील. मला खात्री आहे की जेव्हा अमेरिकेत लेस कॅशचे वारे वाहू लागले तेव्हा अमेरिकेतही विरोध झालाच असेल. भारतात जसे जसे लोक्स कार्ड वापरू लागतील तश्या ऑफर्स वाढतील.

In reply to by ट्रेड मार्क

अनरँडम 20/01/2017 - 00:33
मला खात्री आहे की जेव्हा अमेरिकेत लेस कॅशचे वारे वाहू लागले तेव्हा अमेरिकेतही विरोध झालाच असेल.
विरोध झाला नाही. अमेरिकन परंपरेला अनुसरून ज्यांना कार्ड वापरणे फायद्याचे ठरले ते कार्ड वापरू लागले. काही अमेरिकन लोक फक्त रोखीनेच व्यवहार करतात. अमेरिकेत रोकीने पेट्रोलपासून अगदी घर विकत घेण्यापर्यंतचे व्यवहार केले जातात.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 20/01/2017 - 10:05
आपल्याकडे कर्ज घेऊन फेडणार्‍यापेक्षा कर्जच न घेणार्‍याची पत जास्त आहे . संक्षी साहेब आपले मत पटले नाही. (आपण वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ असूनही) . मी आतापर्यंत भरपूर कर्जे घेऊन ती फेडलेली आहेत. १९८९ पासून माझे क्रेडिट कार्ड वापरात आहे परंतु आजतागायत मी त्यावर एक पैसाही व्याज भरले नाही कि एकदाही त्याचे बिल भरण्यात दिरंगाई झालेली नाही. त्यामुळे आता मी घर घेण्यासाठी जेंव्हा नव्या कर्जासाठी अर्ज केला तेंव्हा माझा सिबिलचा स्कोअर काढला तो ८५० कि ८६५ असा काही तरी आला आहे. हा बऱ्यापैकी उच्च आहे असे ऐकले आहे. आपण कर्ज घेतलेच नसले( उदा. शेतकरी) आणि तर आपला सिबिल चा स्कोअर किती येईल ती कल्पना नाही पण तो फार चांगला नसावा आणि त्यामुळे अशा माणसाला कर्ज घेणे जास्त कठीण जात असावे.

In reply to by सुबोध खरे

कर्ज नसलेल्या व्यक्तीला कसलंच ओझं नाही त्यामुळे त्याची प्रतिष्ठा जास्त आहे अशा अर्थानं म्हटलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

कर्ज हे ओझं आहे हे विचार कालबाह्य होऊन सुद्धा बराच काळ गेला. नीट नियोजन केलेले कर्ज बहुतकरुन फायदेशीर ठरते.

In reply to by संजय क्षीरसागर

ट्रेड मार्क 21/01/2017 - 01:24
माझ्यामते आपल्याकडे प्रतिष्ठा ही त्या व्यक्तीकडे काय मालमत्ता आहे (what he/ she possess) यावर असते. मग ते कर्ज काढून आहे का रोख देऊन आहे हे फारसं कोणी बघत नाही. उदा. एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला शून्य कर्ज आहे पण एका व्यक्तीने कर्ज काढून का होईना एक चांगल्या वस्तीत फ्लॅट घेतला आहे. यात कोणाची प्रतिष्ठा जास्त आहे? त्यामुळे कर्ज काढून सुद्धा जी व्यक्ती ते कर्ज वेळेत फेडू शकते त्याची प्रतिष्ठा जास्त असते.

In reply to by ट्रेड मार्क

आपल्याकडे प्रतिष्ठा ही त्या व्यक्तीकडे काय मालमत्ता आहे (what he/ she possess) यावर असते. मग ते कर्ज काढून आहे का रोख देऊन आहे हे फारसं कोणी बघत नाही. प्रश्न मालमत्तेचा नाही, कर्ज नसण्याचायं. क्रेडीट कार्ड वापरतो ही एकमेव गोष्ट सोडता मी आयुष्यात कधी एक पैसाही कर्ज घेतलं नाही. त्यामुळे माझा सिबील स्कोर निघणं शक्य नाही. पण माझी बॅलन्सशीटस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाऊंटस इतके स्ट्राँग आहेत की कोणतीही बँक सिबील रेटींग फाट्यावर मारुन मला हवं तितकं कर्ज (त्यांच्या नॉर्मसमधे) द्यायला एका पायावर तयार होईल, नव्हे आहेच. म्हणजे ज्याला कर्जच नकोयं त्याची फिनान्शियल पत (किंवा प्रतिष्ठा) कर्जबाजारी व्यक्तीपेक्षा जास्त आहे. आता प्रतिष्ठा थोडी बाजूला ठेवून, डोक्यावर कर्जाचं ओझं असणारा आणि नसणारा यांच्या जगण्यातला फरक बघा. मी कधीही डोळे उघडल्याशिवाय उठत नाही. वेळ आणि कॅलेंडर यांच्याशी माझा नाममात्र संबंध आहे. मी घड्याळ वापरत नाही. सकाळी बेसिक गोष्टी आवरल्या की योगासनं करुन मी कामाला नाही, खेळायला जातो. खेळून झाल्यावर मूड असेल तर काम करतो नाही तर पत्नी समवेत भटकायला जातो किंवा गाणी वाजवत बसतो. काम हा माझा छंद आहे कंपल्शन नाही आणि तरीही सगळी कामं वेळेपूर्वीच कंप्लीट असतात. इथलेच काही सदस्य क्लायंट आहेत त्यांना कल्पना आहे, त्यामुळे वेगळ्या पुराव्याची गरज नाही . अगदी फारच मूड असेल तर तीला घेऊन सरळ जवळच्या रिसॉर्टला दोन/तीन दिवस ट्रीपला जातो. मजबूत भूक लागल्याशिवाय मी कधीही जेवत नाही आणि जेवण हा जवळजवळ तासभर चालणारा रसोत्सव असतो, नुसता आयटम टिकमार्क झाला असं नाही. इएमायची भानगडच नाही त्यामुळे आनंद हीच जीवनाची दिशा आहे. इतके वाजले, उद्या उठायचंय म्हणून आता झोपा हा प्रकार नाही. गडद्द झोप आल्याशिवाय झोपत नाही आणि दुपारी झोपलो तर कुणाचाही फोन आला तरी घरचे झोपलेत म्हणून सांगतात, उठवत नाहीत. मला रेग्युलर बेसीसवर कोणतीही मेडीकल टेस्ट करायची कधीही गरज भासलेली नाही आणि काहीही पथ्यपाणी करायला लागत नाही. कर्ज नाही त्यामुळे भविष्यकाळाची फिकीर नाही. सगळं जीवन मनसोक्त जगायला उपलब्ध असलेला निव्वळ वर्तमान काळ आहे. याशिवाय हवी ती वस्तू हव्या त्या वेळेला घेण्याची क्षमता आहे. आता कर्ज घेऊन सिबील रेटींग वाढवायचं आणि हप्ते फेडत जगायचं , का अक्कलहुशारीनं असलेल्या साधन संपत्तीत आवश्यक ती खरेदी करत कर्जमुक्त आणि स्वच्छंद जगायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 23/01/2017 - 10:11
संक्षी आपल्या दुसरया टोकाला मी आहे. मी आतापर्यंत गेल्या दहा वर्षात सात कर्जे घेऊन त्यातील सहा पूर्ण फेडली आहेत. सातवे कर्ज राहत्या घराचे आहे आणि त्यावर करात वजावट मिळत असल्याने ते फेडायची मला घाई नाही. कर्ज घेऊन त्यातून भांडवल निर्मिती किंवा नफा मिळवता येतो आणि तो सुद्धा कायदेशीर रित्या. एक उदाहरण. पाच वर्षपूर्वी माझ्याकडे थोडे पैसे होते( २ लाख) त्यात ८ लाख कर्ज घेऊन मी पनवेल ला एक छोटे घर घेतले (ज्याची किंमत १० लाख रुपये होती.) याच कर्जाचे व्याज म्हणून मी जवळ जवळ दीड लाख रुपये भरले. म्हणजे मला हे घर साडे अकरा लाखाला पडले. या घरातुन मला सरासरी पाच हजार ( सुरुवातीला चार आणि शेवटी साडेसहा हजार रुपये) भाडे मिळत असे.यातील ७५०/- रुपये सोसायटीला मेंटेनन्स गेला तर ४२५०/- रुपये महिना मला भाडे मिळाले. म्हणजे साधारण अडीच लाख रुपये मला पाच वर्षात भाडे मिळाले. पाच वर्षात हे कर्ज मी संपूर्ण फेडले आहे. याचा अर्थ कर्ज घेऊनही मला नक्त नफा साधारण एक लाख रुपये झाला. आजमितीस या घराचे मूल्य ३५ लाख रुपये आहे. याचा अर्थ काय "सुविनियोगात समृद्धी". या घरात मी कधीच राहिलो नाही कि राहणार नाही. परंतु आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक सज्जड असा भांडवली आधार निर्माण झाला. जर मी हे कर्ज घेतले नसते आणि पैसे साठवून घर घेतो म्हणालो असतो तर हेच घर मला स्वतःच्या पैशाने कधीही विकत घेणे परवडले नसते. हीच परिस्थिती माझ्या राहत्या घराची आहे. २००४ साली १८ लाखाला घेतलेल्या घराची आजमितीस किंमत सव्वा कोटी रुपये आहे. (निश्चलनीकरणामुळे कमी झालेली किंमत गृहीत धरून). मी तेंव्हा कर्ज घेतले नसते तर आजही मी रस्त्यावरच(दुसऱ्याच्या घरात भाड्याने) असतो. आज ते कर्ज सहा लाख रुपये बाकी आहे. मारवाडी हिशेबाने ९ टक्के कर्जावर ३० % करमुक्तीने मला ते ६.३ % दराने कर्ज पडते मग कर्ज फेडण्याची घाई करण्याचे कारण नाही. आपला कर्ज न घेण्याचा निर्णय हा दुराग्रही आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. सीबील स्कोअर काय आहे (कि नाही) हा वेगळा मुद्दा आहे.

In reply to by सुबोध खरे

२००४ साली १८ लाखाला घेतलेल्या घराची आजमितीस किंमत सव्वा कोटी रुपये आहे. त्याच सुमारास मी कर्ज न घेतलेल्या घराची किंमत आज दीड कोटी असेल ! आणि घर घेतल्यापासून आजपर्यंत इतरांना स्वप्नवत वाटेल असा जगतो आहे. या घरात मी कधीच राहिलो नाही कि राहणार नाही. परंतु आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक सज्जड असा भांडवली आधार निर्माण झाला. पूर्णपणे स्वेच्छेनं काम करुन सुद्धा, माझ्या मुलाला (गरज असल्यास) सध्याच्या किंमतीत मी नवं घर घेऊ शकतो. आणि घर घेऊन दिल्यावर सुद्धा माझ्या जीवनशैलीत कणमात्र फरक पडणार नाही कारण मला भविष्याची कधीही चिंता नाही. भविष्य ही कल्पना आहे आणि केवळ वर्तमानच जगायला आणि उपभोगायला उपलब्ध आहे. वर्तमानात धमाल करत जगण्याची कला जमून गेली आहे. आपला कर्ज न घेण्याचा निर्णय हा दुराग्रही आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. हा दुराग्रह मी आयुष्याची प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असं जगून सार्थक केला आहे ! सीबील स्कोअर काय आहे (कि नाही) हा वेगळा मुद्दा आहे. या क्षणात समोर असलेल्या प्रसंगासाठी आवश्यक असेल तेवढा पैसा बिनदिक्कत खर्च करण्याचं कौशल्य मी शिकलो आहे. आणि कारण पुन्हा तेच आहे : मला भविष्याची कधीही चिंता नाही. तस्मात, सिबील स्कोर माझ्यासाठी व्यर्थ आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गॅरी ट्रुमन 23/01/2017 - 22:39
त्याच सुमारास मी कर्ज न घेतलेल्या घराची किंमत आज दीड कोटी असेल !
वर डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या आकड्यांबरोबर खेळून बघू. २००४ मध्ये १८ लाखांचे घर असेल तर त्याच्या २०% म्हणजे ३.६० लाख इतकी इक्विटी स्वत: डॉक्टरांनी त्यात टाकली असेल आणि १४.४ लाख इतके कर्ज घेतले असेल. आज घराची किंमत सव्वा कोटी आहे आणि डॉक्टरसाहेबांनी लिहिलेल्या दुसऱ्या प्रतिसादाप्रमाणे ६ लाख कर्ज अजूनही शिल्लक आहे.म्हणजे डॉक्टरसाहेबांची त्या घरातील इक्विटी १.२५ कोटी वजा ६ लाख बरोबर १.१९ कोटी इतकी झाली आहे. म्हणजे २००४ ते २०१७ या १३ वर्षात त्यांची त्या घरातील इक्विटी १.१९ कोटी भागिले ३.६० लाख बरोबर ३३ पटींनी वाढलेली आहे. १३ वर्षात ३३ पटींनी इक्विटी वाढली म्हणजे दरवर्षी सुमारे ३१% ने वाढ झाली. तुमच्या घराची आजची किंमत १.५० कोटी आहे तर डॉक्टरसाहेबांच्या घराची आजची किंमत १.२५ कोटी आहे. आकडेमोडीच्या सोयीसाठी २००४ मध्येही हे गुणोत्तर तेवढेच असेल हे गृहित धरू. म्हणजे डॉक्टरसाहेबांच्या घराची किंमत २००४ मध्ये १८ लाख असेल तर त्यावेळी तुमच्या घराची किंमत १८ लाख गुणिले ६ भागिले ५ = २१.६ लाखच्या आसपास असेल. म्हणजे तुमची घरातील इक्विटी १.५० कोटी भागिले २१.६ लाख = जवळपास ७ पटींनी वाढली. म्हणजे १३ वर्षात दरवर्षी सुमारे १६% ने वाढ झाली. तेव्हा डॉक्टरसाहेबांना हे जास्तीचे ’लिव्हरेज’ मिळाले कर्ज घेतल्यामुळेच. तसेच समजा २००४ मध्ये एखाद्याकडे एकरकमी टाकायला २१.६ लाख नसतील पण साडेतीन-चार लाखच असतील तर मग काय करायचे? कर्ज नकोच असेल तर ज्या वेगाने घरांच्या किंमती वाढत आहेत त्यापेक्षा जास्त वेगाने उत्पन्न वाढले पाहिजे आणि कधीनाकधी १००% इक्विटी टाकता येईल अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. सर्वांचे उत्पन्न दरवर्षी १६% पेक्षा जास्त वेगाने वाढत नसते. तेव्हा कर्ज घेतले नाही तर स्वत:चे घर व्हावे हे स्वप्न मृगजळाप्रमाणे दूरदूर पळत राहिल हीच शक्यता अनेकांच्या बाबतीत होईल. तेव्हा तुम्हाला शक्य झाले ते सगळ्यांना शक्य होईलच असे नाही
आणि घर घेतल्यापासून आजपर्यंत इतरांना स्वप्नवत वाटेल असा जगतो आहे
त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असे आचरणात आणणारा अगदी गरीब माणूसही भरपूर आनंदात राहू शकतो.

In reply to by गॅरी ट्रुमन

सगळेच आकडेमोड करत बसले असते. तस्मात, कॅलक्युलेशन्सना अर्थ नाही. त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही उद्या नाहीच असं जगण्याचा ज्याचा अनुभव आहे तोच स्वप्नवत जगतो, बेफिकीर जगतो. आजचा दिवस मनमानी करत जगू शकतो आणि त्याचा प्रत्येक दिवसच आजचा दिवस असतो. इएमआयचं ओझं असणारा दिवसाच्या प्राईम टाइममधे कर्ज फेडण्याची भ्रांत सोडू शकत नाही. त्याचा काल, आज आणि उद्या अगदी एकसारखा असतो. तो फक्त सुट्टीच्या वाटेकडे डोळे लावून खाली मान घालून ते ओझं ओढत राहातो. तो लाईन क्रॉस करायचा विचार सुद्धा करु शकत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असे आचरणात आणणारा अगदी गरीब माणूसही भरपूर आनंदात राहू शकतो. तुमच्या कल्पनेतला गरीब मी तरी नाही. गाडी, फ्लॅट, सहली, खेळ, विविध व्यासंग, नातेवाईक आणि मित्रांबरोबरची गेटटुगेदर्स, संगीत, योगा, प्राणायाम, स्विमिंग, लेखन, फारच मूड असेल तेव्हा दारुकाम आणि हे काय कमीये म्हणून जीवनाचा अल्टीमेट आयाम, अध्यात्म ! त्यामुळे वेळेपासून सर्वस्वी मुक्त जीवन.... आणि यातला कुठला ही छंद भर वर्कींग डेला, फुल वर्कींग अवर्समधे मन मानेल तसा करण्याचं साहस. भोंगळ संत वचनांची मला कधीही गरज भासत नाही. आणि उपलब्ध असलेला पैसा समोर असलेल्या प्रसंगावर मनमुराद खर्च करायचं कौशल्य असल्यानं मी कायम श्रीमंतच असतो. त्याचा कर्ज घेण्याशी किंवा न घेण्याशी काहीही संबंध नाही. कर्ज घेणारा वर्तमान भविष्यासाठी गहाण ठेवून असतो. त्यामुळे सगळा स्वच्छंद ज्यानं भविष्यकाळ शून्य केला, त्यालाच उपलब्ध असतो. असो, हा सगळा अनुभवाचा भाग आहे. चर्चा करुन काहीही साध्य होत नाही. साहस करायला डायरेक्ट दिवसाचं काँपोझिशनच बदलायला लागतं . सो, तुम्ही कॅलक्युलेशन्समधे जगा, मी वर्तमानाची मजा घेतो. अर्थात, तुम्ही मजेत जगतायं असं वाटत असेल तर चर्चेला अर्थ नाही कारण प्रत्येकाचं जगणं त्याच्या अभिव्यक्तीतून दिसतं. आणि मला आहे त्यापेक्षा अजून श्रीमंत होण्यात रस नाही. त्यामुळे तुमची कॅलक्युलेशन्स माझ्या उपयोगाची नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

गॅरी ट्रुमन 24/01/2017 - 22:25
तुम्ही किती श्रीमंत आहात की गरीब आहात यात इतर मिपाकरांना काही इंटरेस्ट असायचे कारण नाही. म्हणणे एकच. तुमच्या विधानांचा सगळा डोलारा घर विकत घेण्यासाठी लागणारे पैसे गाठीला आहेत या गृहितकावर अवलंबून आहे. या गृहितकाला आधार कोणता? आणि ते मुळातले गृहितकच गंडलेले असेल तर तुमचे वरकरणी कितीही प्रभावी वाटणारे आर्ग्युमेन्ट पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल. आज मुंबईत अगदी लहान घर घ्यायचे झाले तर एखाद कोटी रूपये आणि नवी मुंबई/डोंबिवली इथे घर घ्यायचे झाले तर किमान ४५-५० लाख रूपये लागतात. या घरांच्या किंमती अवास्तवपणे वाढल्या आहेत त्याला आय.टी बूम जबाबदार आहे की अन्य काही कारण जबाबदार आहे याने काही फरक पडत नाही. दिवसाच्या शेवटी सत्य परिस्थिती हीच आहे. तेव्हा घर घ्यायचे असेल तर तितके पैसे मोजणे गरजेचे आहे. समजा एखाद्याकडे ५० लाख रूपये नसतील--स्वतःकडे जे काही असेल नसेल ते सगळे विकले तरी आणि फक्त १०-१२ लाखच उभे राहू शकणार असतील तर त्या माणसाने कर्ज न काढता घर कसे घ्यायचे ते सांगा. मुळात तेवढे पैसे गाठीला असतील तर दुपारी २ ते ४ (की ६) काय मी २४ तास झोपा काढायला तयार आहे आणि हवे तेवढे स्वच्छंदीपणे जगायला तयार आहे. अगदी दर आठवड्याला वेगवेगळ्या रिझॉर्ट्समध्ये जाईन, दर महिन्याला परदेशी टूरही करेन. हाकानाका. पण तेवढे पैसे नाहीत तेव्हा माझ्या सारख्याने काय करायचे की घराचे स्वप्न विसरायचे?

In reply to by संजय क्षीरसागर

गणामास्तर 24/01/2017 - 10:43
हा दुराग्रह मी आयुष्याची प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असं जगून सार्थक केला आहे !
मी जरा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तुमचं एकंदरीत सगळं रुटीन रोचक वाटल्यामुळे तुमचे प्रतिसाद नीट वाचतोय. वरती एके ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेळ आणि कॅलेंडर यांच्याशी तुमचा नाममात्र संबंध आहे, तर प्रत्येक रात्र शनिवार आणि प्रत्येक दिवस रविवार वाटण्यामागे कारण काय? तुमच्या लेखी शनिवार रविवार हे दिवस काही वेगळे असतात काय ?

In reply to by गणामास्तर

फक्त आत्ताचा क्षण आहे . शनिवारची रात्र हा वार नसून मूड आहे. उद्याची फिकीर नसलेली चितदशा समजावी म्हणून तसं म्हटलंय . तत्सम, रविवार सुद्धा हॉलिडे मूड आहे . आजमधे जगणाऱ्याची चित्तदशा समजावी म्हणून तसं लिहीलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी, तुमचा नुसता फुलटॉस नाही तर नो बॉल वाटतोय मला. तुमच्या वैयक्तिक उदाहरणचं सरसकटीकरण कसं काय केलं जाऊ शकतं? तुम्हाला कर्ज नाहीये म्हणून तुम्ही तसं आयुष्य जगताय आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते असं आयुष्य जगू शकत नाहीत हे कसं काय? समजा तुम्ही व्यवसायाच्या ऐवजी नौकरी करत असतात आणि तरी तुम्हाला कर्ज नसतं तर तुम्ही कसं आयुष्य जगला असतात? शिवाय एखादा व्यवसाय करणारा कर्ज घेऊनही असं आयुष्य जगत नसेल असं म्हणण्याला काय आधार असय शकेल?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आणि व्यक्तिगत नक्की आहे पण तसं घेऊ नका. मी जगण्याचा एक अंदाज लिहीलायं. तुम्हाला कर्ज नाहीये म्हणून तुम्ही तसं आयुष्य जगताय आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते असं आयुष्य जगू शकत नाहीत हे कसं काय? इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे. समजा तुम्ही व्यवसायाच्या ऐवजी नौकरी करत असतात आणि तरी तुम्हाला कर्ज नसतं तर तुम्ही कसं आयुष्य जगला असतात? तेच उत्तरे. इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे, ती धंद्याचं साहस करु देत नाही. शिवाय एखादा व्यवसाय करणारा कर्ज घेऊनही असं आयुष्य जगत नसेल असं म्हणण्याला काय आधार असय शकेल? माझ्या बघण्यात तरी अजून नाही. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सांगा, भेटायला नक्की आवडेल.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 23/01/2017 - 18:36
इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे. >> अगदी सहमत. माझे तर मत असे आहे की इएमआय ही आधुनिक व्हाईटकॉलर वेठबिगारी आहे. असो. हे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by संदीप डांगे

एकच सांगितलं : आम्ही आमची उमेदीची वर्ष घालवून जे कमावलं ते सगळं या बिल्डर लोकांनी लुटलं!

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 23/01/2017 - 19:18
इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे. एकदम चूक मी नोकरीत असताना घराचे आणि दवाखान्याचे अशी दोन्ही कर्जे घेतली आणि मग नोकरी सोडली. धंद्याला लागलो असताना मला कोण कर्ज देणार होते? दवाखान्याचे कर्ज लगेच फेडले( व्यावसायिक कर्ज चढ्या दराने होते). घराचे कर्ज वर म्हटल्याप्रमाणे अजून चालू आहे. २००४ साली इ एम आय १४,३५०/- हा डोक्यावर भार होता. आज तो नगण्य आहे. हाच कर्जाचा सर्वात मोठा फायदा असतो. जसा जसा काळ जातो तसे तुमचे उत्पन्न वाढत जाते आणि इ एम आय डोईजड असण्याऐवजी सहज भरता येईल असा होत जातो.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 23/01/2017 - 19:21
धंद्याचं साहस शब्द चपखल आहे ते ज्याला करायचा आहे तो ते साहस करतो. ज्याला धंदा करायचा नाही तो साले पाले लावत राहतो. मग इ एम आय सारख्या सबबी समर्थनासाठी सोप्या जातात. जाता जाता -- सबब हि गोष्ट सर्वात लंगडी असूनही जगात सर्वात जास्त चालणारी बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

रियल इस्टेट बेसुमार वधारली. ज्यांनी त्यापूर्वी घरं घेतली होती त्यांना गृहकर्जाचा हप्ता फक्त रिलेटीवली कमी झाला कारण सगळ्या देशात जास्त पैसा खेळायला लागला. हा कर्तृत्वाचा नाही तर निव्वळ नशीबाचा भाग आहे. बिल्डरनी बांधकामाचा खर्च प्लस नफा हा विचार फाट्यावर मारला. आयटी पब्लिकला कडून किती इएमआय खेचता येईल गुणीले मॅक्सिमम टर्म या हिशेबानं फ्लॅट विकायला सुरुवात केली. महिना सत्तर/ ऐंशी हजार हप्ता म्हणजे वर्कींग कपलला `इटस ओके यार' वाटतं आणि मग बिल्डर फ्लॅटची किंमत दोन कोटी करतो (त्यामुळे तुमच्या आणि माझ्या फ्लॅटची किंमत उगीचच स्वप्नवत वाटते आहे). समजा आयटी बूम आलाच नसता तर तुमचा हप्ता त्याच्या फुल टर्मसाठी, जवळपास पहिल्या हप्त्या इतकाच हेवी वाटला असता. थोडक्यात, पैसा बेसुमार वाढला नसता, तर लोनची फुलटर्म तुम्हाला इएमआय लाईनीवर (म्हणजे रोजचा दिवस एकसारखा) ठेवायला पुरेसा होता. आजच्या घडीला तुम्ही सत्तर हजाराचा इएमआय बसणारं कर्ज घ्याल कां असा विचार करा. मग इएमआयमुळे आयुष्य कसं गहाण पडत असेल याचा अंदाज येईल. कृपया व्यक्तिगत घेऊ नका. तुम्ही लकी आहात कारण बूम येण्यापूर्वीच्या किंमतीला फ्लॅट मिळाला आणि .....मी लकी आहे कारण मी इएमआयच्या फंदातच पडलो नाही आणि कधी पडणारही नाही !

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षि, ते आयटी बुम वगैरे ठीक आहे, पण हि ईएमआयशिवाय घर घेण्याची जादू आम्हालाही सांगाल का जरा?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ठीक नाही, परफेक्ट आहे ! हि ईएमआयशिवाय घर घेण्याची जादू आम्हालाही सांगाल का जरा? तुमच्याकडे सध्या नक्की किती पैसे आहेत, काय वाट्टेल ते झालं तरी आयुष्यात भविष्यकाळ निर्माण होऊ देणार नाही असा दृढ निश्चय तुम्ही आत्ता या क्षणी आणि आयुष्यभरासाठी करु शकता का ? तुम्ही निकड म्हणून फ्लॅट घेतायं की रेंट आणि हप्ता अ‍ॅडजस्ट होईल या हिशेबानं (उगीच) इनवेस्टमेंट म्हणून, उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन तुम्ही फ्लॅटवर लावायला तयार आहात का? यावर ते सगळं अवलंबून आहे. खरं तर वर सांगितलेले सगळे फॅक्टर्स एका वेळी जमवले तर फ्लॅट आणि आपले सोर्सेस सरळ आमने सामने होतात आणि व्यावहार होतो. मी आत्तापर्यंत असे चार व्यावहार केलेत. आयुष्यातल्या अगदी पहिल्या फ्लॅटचा, दुसरा बहिणीसाठी फ्लॅट घेतांना, तिसरा माझं ऑफिस घेतलं तेव्हा आणि चौथा सध्याचा फ्लॅट घेतला तेव्हा. बघा काही उपयोग झाला तर !

In reply to by संजय क्षीरसागर

नाही ब्वा! असलं काहींच्या काही नाही जमणार बुआ! मुळात सगळं लिक्विडेट करायचं म्हणजे काय करायचं हेच नाही कळलं. साधारणपणे 50-55 लाखाचा फ्लॅट घेण्यासाठी काय लिक्विडेट करावं? लोक लोन/ईएमआय कडे वळतात कारण कोणाकडेही घर घेण्यासाठी इतके पैसे नसतात. कसेतरी 20% जमा होतात, तेव्हा 80% लोन घेऊन घर घेतलं जातं. दृढ निश्चय वगैरे आणता येईल पण पैशाचं सोंग आणायचं कसं?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन 23/01/2017 - 22:45
लोक लोन/ईएमआय कडे वळतात कारण कोणाकडेही घर घेण्यासाठी इतके पैसे नसतात. कसेतरी 20% जमा होतात, तेव्हा 80% लोन घेऊन घर घेतलं जातं. दृढ निश्चय वगैरे आणता येईल पण पैशाचं सोंग आणायचं कसं?
मी या अनुभवातून काही काळापूर्वीच गेलो असल्यामुळे हा अनुभव नक्की कसा असतो हे मला चांगलेच माहित आहे. सगळी इन्व्हेस्टमेन्ट --- शेअर्स, म्युच्युअल फंड, युलिप इत्यादी विकूनही मुळातले २०% कसेबसे उभे केले होते. वरचे ८०% कुठून उभे करणार होतो? खरे सांगायचे तर संक्षींचा सल्ला अजिबात व्यवहार्य नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

असलं काहींच्या काही नाही जमणार बुआ! जे वास्तविक आहे ते काहीच्या काही कसं असेल ? मी स्वतः असे चार व्यावहार केलेत आणि मला कधीही मागे वळून पाहावं लागलं नाही की पुढचा विचार करायला लागला नाही . आणि पैश्याचं सोंग वगैरे भानगड तर जन्मात कधी केली नाही ! उलट माझ्या ज्या मित्रांकडे करोडो रुपये आहेत ते अजून रुटीन गाडाच ओढतात आणि कायम मला एकच प्रश्न विचारतात. `आयला, असं जगायला तू नक्की किती पैसे जमवले आहेत ? '

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचा शिष्य बनवाल काय गुरुदेव? अगदी मनापासुन. सालं एक आयुष्यं मिळालय, पुनर्जन्मं मिळाला तरी माणसाचाचं मिळेलं ह्याचा काही भरवसा नाही. तुमच्या सारखं ब्लडप्रेशर नॉर्मलला ठेवणारं आयुष्यं जगायची इच्छा नक्की आहे. मार्गं दाखवाल काय? रिस्कं घ्यायची आणि कष्टं करायची आपली तयारी आहे. फक्तं महिन्याला नोकरी करायचं अथवा धंदा करायचं कारण इएमायसाठी पैसा कमावणं ह्याच्यापेक्षा चांगलं आयुष्यं जगता यावं, आईवडीलांना, बायकोपोरांना (अजुन दोन्ही नाहीत) चिंतारहित आयुष्य देता यावा असा हा मार्ग दाखवण्याचं पुण्यकर्म कराल का? आयुष्यभर आभारी राहिन.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 24/01/2017 - 00:28
संजयसरांच्या प्रतिसादाला सहमत.
आयटी पब्लिकला कडून किती इएमआय खेचता येईल गुणीले मॅक्सिमम टर्म या हिशेबानं फ्लॅट विकायला सुरुवात केली. महिना सत्तर/ ऐंशी हजार हप्ता म्हणजे वर्कींग कपलला `इटस ओके यार' वाटतं आणि मग बिल्डर फ्लॅटची किंमत दोन कोटी करतो (त्यामुळे तुमच्या आणि माझ्या फ्लॅटची किंमत उगीचच स्वप्नवत वाटते आहे).
हेच लिहणार होतो पण तुम्ही आधीच लिहिले आहे. :) २००७ ते २०१३ हा कालखंड चमत्काराने भरलेला आहे त्यामुळे त्याला रेफरन्स पॉईन्ट ठेवू नये. २००४ ला घेतलेले अठरा लाखाचे घर २०१६ ला सव्वा कोटीचे होणे हा चमत्कार आहे, थंबरुल नव्हे. २०१३-१४ साली घेतलेली ३० लाखाला घेतलेली घरे आज फारतर ३५-३८ लाख देऊ शकतात. अजून पुढे पाच वर्षांनी फार तर ४५-५० लाख देतील. आता बोला! आज पस्तीस हजार इएमआय कोणी राहत्या घरासाठी भरत असेल तर त्याचे घराचे सर्व उत्पन्न किमान ९० हजार हवे, आणि हे ९० हजार दरवर्षी किती वाढेल हे किती टक्क्याने पगारवाढ होते, महागाईदर काय, नोकरीत प्रमोशन मिळण्याच्या किती संधी आहेत ह्या वेरियेबल्स वर अवलंबून आहे. आजचे अंदाजे २०१७ ते २०३२ चे गणित मांडूया: १. ३५ लाखाचे कर्ज. ३५ हजार इएमआय पुढची पंधरा वर्ष. २. पगार ९० हजारः पुढच्या पंधरा वर्षात (दरवर्षी अपेक्षित १० टक्के पगारवाढ ) पंधरा वर्षांनी साडेतीन लाख रुपये.* ३. घराची किंमत ४० लाखः पंधरा वर्षाने (दरवर्षी अपेक्षित दरवाढ ६ %) होइल ९५ लाख तर ३५ हजार असणारा इएमआय हा आज पगाराच्या ४०% पासून हळूहळू कमी होत १०% पर्यंत राहिल. हा दरवर्षी २% कमी होत जाईल. तर डॉक्टर आणि संक्षी यांची घरे नॉर्मल दरवाढ राहिली असती तर फारतर जास्तीत जास्त ४० लाख किंमतीची राहिली असती. जी आज सव्वा ते दिड कोटीची आहेत. आज २०१७ मध्ये घेतलेल्या घरांच्या किंमती २०३२ मध्ये फारतर अडीचपट होतील. आठ पट नाही. *(आता ज्यांचे पगार आज ९० हजार आहेत ते पंधरा वर्षांनी साडेतीन लाख होतील काय हा मोठा प्रश्न आहे. २००४ मध्ये १० हजार पगार असणार्‍याला आज ३५ हजार पगार असायला हवा. आमच्यासारख्या फास्टेट ग्रोथ पोटेन्शियल असलेल्या क्षेत्रात ते शक्य होउ शकते. २००६ ला ६ हजार रुपये महिन्यावर लागलेला माझा मित्र आज दिड लाख रुपये महिना कमवतो. पण त्याच्याच ऑफिसातला तेव्हा ८ हजार रुपये महिना वाला मदतनीस २०-२५ पर्यंत तरी पोचलाय का ते माहिती नाही.) आता घरांच्या किंमती आणि लोकांचे पगार यांचे समिकरण जबरदस्त बिघडलेले आहे. एकाच्या पगारात घर शक्यच नाही. पत्नीला त्यासाठी नोकरी करावीच लागते. ह्याबद्दल मागे कुठल्या तरी धाग्यावर लिहिले आहे. त्यामुळे घरांचे इएमाय ही वेठबिगारी होत आहे हे माझे मत आहे. त्याशिवाय दुसरा पर्यायही आजच्या नोकरदारांपुढे नाही हे दुर्दैव आहे, ज्याला कोणीही काहीही करु शकत नाही. घरांच्या किंमती वाढतच राहतील त्यामुळे घरे गुंतवणुकीची उत्तम साधने आहेत ह्या भ्रमातून लवकरात लवकर बाहेर येणे श्रेयस्कर. बाकी, दिलेल्या लिंकचा अभ्यास करुन अभ्यासू लोकांनी आपली मते कळवावीत ही विनंती. http://www.jagoinvestor.com/2009/12/returns-of-real-estate-in-india.html डिस्क्लेमरः वरच्या गणितांत काही भूलचूक झाल्यास माफी असावी. फार काटेकोर आकडेमोड नाहीये ती.

In reply to by संदीप डांगे

ट्रेड मार्क 24/01/2017 - 02:34
घराची किंमत एकरकमी देऊ शकतील एवढे पैसे किती लोकांकडे उपलब्ध असतात? अगदी २००४ साली, दुसरी कुठली प्रॉपर्टी विकल्याशिवाय, १८ लाख रुपये एकरकमी उभे करणे ही अवघड गोष्ट होती. हे संक्षीसरांनी कसे केले हे त्यांनी, किंवा आधीच्या प्रतिसादात जे लिहिलंय ते ज्यांना समजलं असेल त्यांनी, आमच्यासारख्या गरिबांना समजावून सांगितले तर उपकार होतील. मी २००४ साली नोकरी सुरु करून फार काही वर्ष झाली नव्हती, आई वडिलांकडून पैसे घेणे म्हणजे त्यांची म्हातारपणासाठी केलेली बचत आपण काढून घेण्यासारखे होते. मग कर्ज न घेता घर घेणे हे कसे साध्य करता आले असते हा प्रश्न आहे. लेखात घरात पैसा न गुंतवता बाकी मार्केट्स मध्ये म्हणजे सोने, शेअर ईई मध्ये गुंतवणे फायदेशीर आहे असे लिहिले आहे. पण किती लोक हे दोन्ही फक्त गुंतवणूक म्हणून पाहतात? शेअर मार्केट मध्ये गुंतवणे हे किती लोकांना सोयीस्कर आणि फायदेशीर वाटू शकते? अजून एक प्रश्न, जर का घरातील गुंतवणूक फायदेशीर नाही तर संक्षीसरांनी का घरात गुंतवणूक केली? त्यांनीच वर म्हणलय " उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन" फ्लॅट घ्यावा. रच्याकने: ट्रुमन म्हणतात तसे, माझे २०% कसे गोळा केले ते माझे मलाच माहित आहे... १००% गोळा करणे म्हणजे....

In reply to by ट्रेड मार्क

जर का घरातील गुंतवणूक फायदेशीर नाही तर संक्षीसरांनी का घरात गुंतवणूक केली? मी गुंतवणूक वगैरे प्रकार करत नाही, खर्च करतो. घराची गरज वाटली म्हणून प्राइम लोकॅलिटीमधे (म्हणजे आजूबाजूला गर्द झाडी आणि दिवसभर संपूर्ण शांतता ) सगळे पैसे (स्वतःचे) लावून घर घेतलं. उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन" फ्लॅट घ्यावा. तेच तर मी केलं !

In reply to by चिनार

मी अगदी असाच जगतो. लिहीलंय ते आणि जगणं यात कणमात्र फरक नाही. आणि हे सगळं पुरता कुटुंबवत्सल असतांना. आमची एकत्र फॅमिली आहे. आई, भाऊ, मी, बायको आणि मुलगा. पार रोजच्या किराण्यापासून ते हॉस्पिटलपर्यंतचे, संगोपनापासून ते इन्कमटॅक्सच्या काँप्लीकेटेड केसेसचे, लेखनापासून ते साधनेपर्यंतचे सगळे फर्स्ट-हँड अनुभवेत. नुसता कल्पनाविस्तार असता तर स्वतःच्या प्रतिसादांमुळेच नॉनप्लस झालो असतो. विचार आणि आचारातली तफावत लिहीतांना उघड होते. साधी माझ्या लेखनाची आणि प्रतिसादांची टायमींग्ज पाहिलीत तर तुम्हाला समयमुक्ती दिसेल. आणि कंटेंट भावला तर आयुष्य बदलायचं साहस येईल !

In reply to by ट्रेड मार्क

संदीप डांगे 24/01/2017 - 07:40
अहो, तुमचा मुद्दा रास्त आहे व तो मला मान्यच आहे. माझा प्रतिसाद लिहिण्याचा उद्देश इतकाच की डॉक्टर साहेबांनी याधीही बहुतेक एकदोन वेळा हे 18 लाख ते सव्वाकोटी च्या घराचे उल्लेख केले आहेत. त्यामागे आपल्या घराच्या गुंतवणुकीत आपल्याला कसा उत्तम फायदा झाला याबद्दल त्यांना सांगायचे असावे पण अनैसर्गिक वाढीने तो फायदा झालाय हे पुढे यावे व इतर वाचणारानी हुरळून न जाता यामागचे गणित समजून घेऊन निर्णय घ्यावे यासाठी प्रतिसाद दिलाय. स्वतः राहण्यासाठी घर घेतले जात असेल तर ही कर्जाची वेठबिगारी अपरिहार्य आहे. पण गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील. माझेही अकोल्यात घर आहे जे मी अवघ्या 4 लाखात घेतले, आज त्याची किंमत 25 लाख आहे. अर्थात ते पूर्ण माझ्या व वडिलांच्या सेविंग मधून घेतले. तेव्हा मी हि नोकरीला लागून 3 वर्षे झालेली व पगार अगदी फार नव्हता. आज ते 25 लाख असलेलं घर कितीही गरज असली तरी विकू शकत नाही कारण ते एकमेव राहते घर आहे. सो त्याची किंमत कितीही वाढली तरी शून्यच! :-) दुसरं असं की नैसर्गिक वाढ राहिली असती तर ते घर आज फारतर 7 ते 8 लाखात मिळाले असते जे घ्यायला कर्ज काढायची गरज राहिली नसती, कारण 3 वर्षात 4 लाख रोख जमवले तर पुढच्या आठ वर्षात अजून 5 लाख जमवणे अवघड नसते. पण आज 25 लाखाचे घर घेऊ म्हणता कर्जशिवाय शक्यच नाही. तस्मात, संजय सरांचे सर्वच विचार मला पटलेत असे नव्हे. पण त्यात अजिबात तथ्य नाही असेही नव्हे. अनैसर्गिक वाढीने सगळ्यांचे हात दगडाखाली आलेत इतकेच, अन्यथा ते म्हणतायत तेही शक्य असते. नॉर्मल परिस्थितीत दहा वर्षे ते पंधरा वर्षे काम करून साठवलेल्या पैशातून घर घेणे शक्य झाले असते असे माझे मत, अर्थात हे पूर्ण चुकीचेही असू शकते, माझा ठाम दावा नाही.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे 24/01/2017 - 07:48
दुसरं असं की त्यांच्या व तुमच्या-माझ्या वयात, कमाईत अंतर आहे. 2004 मध्ये घर घ्यायच्या वेळेस ते नुकतेच कमाईला लागलेले नसतील, 2004 मध्ये घर घेण्यासाठी पैसे जमायला किमान त्यांच्याकडे पंधरा वर्षे असतील असा अंदाज.. सो 1990 साली नोकरीला लागून घर घेणाऱ्यांची व 2005 नंतर नोकरीला लागून घर घेणाऱ्यांची सरसकट तुलना नाही होऊ शकत. 90-95 च्या दरम्यान चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांनी दहा वर्षात विनाकर्जाची घरे घेतलेली मीही पहिले आहे. तेव्हा काळ वेगळा होता, आता कठीण आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 25/01/2017 - 09:38
डॉक्टर साहेबांनी याधीही बहुतेक एकदोन वेळा हे 18 लाख ते सव्वाकोटी च्या घराचे उल्लेख केले आहेत. त्यामागे आपल्या घराच्या गुंतवणुकीत आपल्याला कसा उत्तम फायदा झाला याबद्दल त्यांना सांगायचे असावे पण अनैसर्गिक वाढीने तो फायदा झालाय हे पुढे यावे मुदलातच खोट आहे. २००४ साली मी घर घेतले ते स्वतःला राहण्यासाठी गुंतवणूक म्हणून नव्हे. त्यामुळे त्यातून फायदा झाला हे म्हणणे मुळातच चूक आहे. राहते घर हि गुंतवणूक नाही हे अर्थशास्त्राचे प्राथमिक गृहीतक आहे. तेंव्हा त्यात फायदा कसा झाला हे सांगून मी किती "शहाणा" आहे हे मला (आपल्या गृहीतकाप्रमाणे ) सिद्ध करण्याची मुळीच गरज नाही. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.यात आपला आकस दिसून येतो. कारण हेच घर मी एका गरजू तरुण इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाला (LECTURER) भाड्याने दिले होते आणि चार वर्षात त्याने आपले पैसे जमवून तेथेच जवळ एक छोटेसे घर विकत घेतले.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 25/01/2017 - 09:48
सरळ साध्या प्रामाणिक मांडणीला आकस, वितंडवाद इ इ बिरुदं चिकटवायला सुरुवात झाली की मी आजकाल माघार घेतो... तुमचं चालु द्या... :-) :-) शुभेच्छा!

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 24/01/2017 - 13:33
समजा आयटी बूम आलाच नसता तर तुमचा हप्ता त्याच्या फुल टर्मसाठी, जवळपास पहिल्या हप्त्या इतकाच हेवी वाटला असता. थोडक्यात, पैसा बेसुमार वाढला नसता, तर लोनची फुलटर्म तुम्हाला इएमआय लाईनीवर (म्हणजे रोजचा दिवस एकसारखा) ठेवायला पुरेसा होता. माझा व्यवसाय हा आय टी बूम किंवा बस्ट शी संबंधीत नाहीच. तो ५० % दराने वाढतहि नाही कि ५% पेक्षा खाली येत नाही. तो मानवी अस्तित्वाशी संबंधित असल्याने एका स्थिर स्थितीत राहतो. मी मुलुंडला घर घेतले कारण मला "स्वतः ला राहण्यासाठी" घर हवे होते. ते किती किमतीला होते आणि आहे याचा त्याच्याशी संबंध नाही. राहते घर हे asset नसते. त्यानंतर घेतलेल्या घरांबाबत मी म्हणतो आहे. आपल्या स्वतःच्या खर्चाला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारी रक्कम बाजूला काढून ठेवल्यावर शिल्लक रक्कमी पैकी किती इ एम आय तुम्ही विनासायास भरू शकता हे ठरवून मग त्यात येईल असे घर घ्यावे( मी घेतले) म्हणजे मग इ एम आय हा डोईजड वाटत नाही. मी जर बांद्र्याला घर घेतले असते तर ते मला डोईजड झाले असते म्हणून मी पनवेलला घेतले. रच्याकने -- पनवेलचे घर हे आय टी बस्ट झाल्यानंतरच घेतलेले आहे. माझ्या बँकेत कमीत कमी एक वर्षाचा इ एम आय जाईल इतके पैसे मी आपत्कालीन स्थिती किंवा इतर परिस्थिती यासाठी मुदत ठेव म्हणून ठेवलेले आहेत. केवळ वादासाठी इ एम आय हा डोइजडच असतो हे म्हणणे हा आपला दुराग्रह असल्याचे जाणवते.

In reply to by सुबोध खरे

माझा व्यवसाय हा आय टी बूम किंवा बस्ट शी संबंधीत नाहीच. बरोबरे पण आयटी बूममुळे रियल इस्टेट बेसुमार वधारली. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या, बूमपूर्वी घेतलेले फ्लॅट आता स्वप्नवत किंमतीचे वाटतात आणि सध्या फ्लॅट घेणं स्वप्नवत वाटतं. मी मुलुंडला घर घेतले कारण मला "स्वतः ला राहण्यासाठी" घर हवे होते. ते किती किमतीला होते आणि आहे याचा त्याच्याशी संबंध नाही. त्याच सुमारास मी ही राहातोयं तो फ्लॅट घेतला. पण तेव्हाची किंमत आणि आताची किंमत यात कोट्यावधी रुपयांचं अंतर पडलंय ते ग्लोबलायझेशनमुळे. त्यानंतर घेतलेल्या घरांबाबत मी म्हणतो आहे. आपल्या स्वतःच्या खर्चाला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारी रक्कम बाजूला काढून ठेवल्यावर शिल्लक रक्कमी पैकी किती इ एम आय तुम्ही विनासायास भरू शकता हे ठरवून मग त्यात येईल असे घर घ्यावे( मी घेतले) म्हणजे मग इ एम आय हा डोईजड वाटत नाही. म्हणजे तुम्ही निकड नसतांना कर्ज काढून, इनवेस्टमेंट म्हणून (किंवा पुढे लागेल म्हणून) दुसरं घर घेतलं. माझा एक फंडा आहे, पैसा ही खर्चासाठी वापरायची गोष्ट आहे, गुंतवणूकीसाठी नाही. याचा अर्थ हप्ते भरणारा स्वच्छंद जगू शकणार नाही असं नाही, त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. त्याचा सगळा प्राईम टाइम हप्ता खेचून घेतो. त्याचे सोमवार ते शुक्रवार (म्हणजे आयुष्याचा जवळपास ऐंशी टक्के काळ ! ) एकसारखेच असतात. याउलट दरम्यानच्या सगळ्या वर्षात मी स्वच्छंद आणि बिनधास्त जगलो. आता दुसरा फ्लॅट घ्यायचा झाला तरी मी आहे तो सर्व पैसा एका वेळी नव्या फ्लॅटसाठी खर्चून टाकीन कारण मला भविष्याची कणमात्र चिंता नाही. आणि मजा म्हणजे दरम्यानच्या काळात मनसोक्त जगून मिळवलेला पैसा नव्या फ्लॅटसाठी पुरेसा आहे. कदाचित तुमच्यासारखे धोरणी व्याही मिळाले तर त्यांना (माझ्या मुलाच्या हिश्श्याची) निम्मी रक्कम लग्न झाल्याझाल्या देऊन टाकीन. म्हणजे पुन्हा निम्मी रक्कम उरेलच. आणि नवदांपत्यानं स्वाभिमानानं सगळं स्वतः मॅनेज करायचं ठरवलं तर तोही प्रश्न येणार नाही. या उप्पर मुलगा एकत्र कुटुंबात वाढला आहे, सूनही तशीच मिळाली तर सगळे आनंदानं एकत्र राहू, मग तर विषयच संपला!

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 24/01/2017 - 18:22
त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. त्याचा सगळा प्राईम टाइम हप्ता खेचून घेतो. त्याचे सोमवार ते शुक्रवार (म्हणजे आयुष्याचा जवळपास ऐंशी टक्के काळ ! ) एकसारखेच असतात. याउलट दरम्यानच्या सगळ्या वर्षात मी स्वच्छंद आणि बिनधास्त जगलो. त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. हे आपल्याला कुणी सांगितले? हाच तो "दुराग्रह". इ एम आय भरणारा माणूस हा आयुष्य आनंदात जगूच शकत नाही हि आपण स्वतःची केलेली ठाम (गैर) समजूत आहे. आजही माझे कर्ज मी एकरकमी फेडू शकतो पण जर मला काही लाख रुपये ६.३ %( ९% वजा २.७%) (३०%) कर सवलत व्याजाने वापरता येतात तर मी ते कर्ज का फेडावे. तेच पैसे मी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत ठेवले तर मला ८.१ टक्के करमुक्त व्याजही मिळते शिवाय दीड लाखापर्यंत कर वजावट सुद्धा मिळते. (हा आर्थिक व्यवहार मी आपल्याला समजावून द्यावा अशी माझी लायकी नाही) मी कॉर्पोरेट रुग्णालयातील नोकरी सोडून व्यवसाय चालू केला त्याचा सर्वात मोठा फायदा मला हाच झाला कि सोमवारची सकाळ हि माझ्या रविवार सकाळ इतकीच प्रसन्न असते. मला विचारणाऱ्या कोणत्याही माणसाला( मिपाकराना सुद्धा) मी हेच सांगतो कि माझ्या कडे भरपूर वेळ आहे.आणि सुदैवाने त्याचा उपभोग करण्यासाठी पुरेसा पैसे हि मिळतो. आपण जगतो तेच आयुष्य हा आपला दुराग्रह सोडून इतर दृष्टीने विचार करायचा प्रयत्न करून पहा एवढीच विनंती आहे.

In reply to by सुबोध खरे

जरा सध्याच्या बव्हंश तरुणाईकडे पाहा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्याच्याकडे तसं जगायला वेळच नसतो. हे आपल्याला कुणी सांगितले? पैसा हा माझा व्यावसाय आहे. पैश्यामुळे लोकांची काय परिस्थिती आहे ते मी जवळून बघितलंय. मला कुणी सांगायची गरज काय ? लोकांची बँक स्टेटमेंटस त्यांच्या जगण्याचा पॅटर्न दाखवतात. सध्याच्या किंमतीत कर्ज काढून फ्लॅट घेणारा आयुष्य भविष्यकाळाला गहाण टाकून आहे. अणि इएमआय त्याला कायम घेरुन आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

ट्रेड मार्क 24/01/2017 - 21:33
तुम्ही जे करताय आणि सांगताय ते छानच आहे. कोणाला असं राहायला आवडणार नाही? तुम्ही म्हणताय की उद्याचा दिवस नाही असं समजून आत्ता खर्च करायचा. हा विचार म्हणून मस्तच आहे पण पैसे आणणार कुठून? उदा. द्यायचं झालंच तर, २००१ साली १८ लाखांचा फ्लॅट खूप आवडला होता पण अगदी मला स्वतःला विकले असते तरी ते कर्ज काढून सुद्धा शक्य नव्हते मग रोखीची तर बातच सोडा. २००८ साली मला ६० लाखाचा एक फ्लॅट आवडला होता. पण अगदी माझ्याजवळचे काहीही विकले असते तरी शक्य नव्हते. तर तुम्ही हे कसं करता ते आम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं तर आम्हाला पण मदतच होईल. पाहिजे तर स्वतंत्र धागा काढा.

In reply to by ट्रेड मार्क

मीही नेमकं हेच विचारलं होतं वर! जीवन जगण्याची प्रवृत्ती आणि आर्थिक नियोजन याची गडबड होतेय का? अवांतर: उद्याचा विचार न करता आहे तो पैसा उधळून आजचा दिवस एन्जॉय करण्याची मनोवृत्ती बाळगून असणाऱ्या अमेरिकन लोकांना २००९ च्या मेरीललिंच/लेहमन प्रकरणाने चांगलाच झटका दिला. हल्ली अमेरिकन लोकांना सेविंगचे महत्व कळाल्याचे ऐकिवात आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हे तुम्हाला मंजूर आहे की नाही ते बघा . मग पैश्याविषयी नवा दृष्टीकोन तयार करायला माझा पैसा हा लेख वाचा. तसं जगायची हिंमत एकतर या क्षणी होते किंवा मग आयुष्यभर होत नाही. उद्याचा विचार न करता आहे तो पैसा उधळून आजचा दिवस एन्जॉय करण्याची मनोवृत्ती बाळगून असणाऱ्या अमेरिकन लोकांना २००९ च्या मेरीललिंच/लेहमन प्रकरणाने चांगलाच झटका दिला. तो लेख समजला तर मी पैसा खर्च करतो उधळत नाही हे लक्षात येईल. आणि अमेरिकन कर्जबाजारी होऊ शकतो पण माझ्याबाबतीत ती शक्यताच नाही कारण मी कर्जच घेत नाही इतकी उघड गोष्ट कळायला अडचण येणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

ट्रेड मार्क 25/01/2017 - 02:43
इएमआय आयुष्याची कोंडी करतो - याच्याशी अंशतः सहमत. कारण इएमआय जर खूप असेल, म्हणजे घरात येणाऱ्या सकल उत्पन्नाचा शक्य तेवढा मोठा भाग इएमआय फेडण्यात जात असेल, तर कोंडी होते. पण अगदी सहज परवडेल एवढा इएमआय असेल तर कोंडी व्हायचा प्रश्न येत नाही. तुम्ही दिलेल्या लिंकमधला पैसा हा लेख आणि प्रतिक्रिया वाचला. पैश्याच्या मागे पळू नये या दृष्टीने तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खूप पैसा मिळवायचाय म्हणून २४ तास व ३६५ दिवस राबू नये हे खरंच आहे. पण मग पण मग जो काही मिळवायचाय किंवा काम करायचंय त्या अनुषंगाने स्वच्छंदीपणाला थोडाफार लगाम येतोच. उदा. द्यायचं झालं तर मी पण नोकरी करत असूनही मनाला येईल तेव्हा सुट्टी घेऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो. पण एखाद्या मीटिंगमध्ये आहे आणि चला फिरून येऊ म्हणून मी मीटिंग मधून बाहेर पडू शकत नाही. तसेच तुम्ही पण क्लायंट समोर बसलाय, महत्वाचं काही बोलतोय आणि तुम्हाला मूड आला म्हणून त्याला ऑफिसमध्ये सोडून लॉन्ग ड्राईव्हला जाऊ शकत नाही. किंवा क्लायंटचे रिटर्न भरायचा शेवटचा आठवडा आहे आणि तुम्हाला काम करावंसं वाटत नाहीये म्हणून तुम्ही हातातलं काम सोडून रिटर्न काय भरू पुढच्या वर्षी असा म्हणून त्यादिवसापासून १ महिना परदेशी सुट्टीवर जाऊ शकत नाही. त्यामुळे कर्ज घेतलं, इएमआयचं शुक्लकाष्ठ मागे लागलं म्हणजे आयुष्याची वाट लागली असं काही नाहीये. उलट मी तर म्हणीन आधीच्या अनुभवांवरून आणि भविष्याचा थोडा अंदाज घेऊन खर्च/ गुंतवणूक केली तर मनासारखे आयुष्य जगता येते. बाकी पैसा हा भाग सोडून जबाबदारी हा एक मोठा फॅक्टर आहे. ज्याच्यामुळे मनुष्याच्या स्वच्छंदीपणाला आवर घातला जातो. पण अर्थात जबाबदारी ही जो घेतो नेहमी त्याच्याच मागे लागते हे स्वानुभवावरून सांगतो. हे विधान तुम्हाला उद्देशून नाहीये त्यामुळे गैरसमज नसावा. तर तुम्ही म्हणताय ते तत्वतः ठीक आहे आणि बहुतेक सगळे मिपाकर ते आचरणातही आणतात. कारण छंद म्हणा वा सवय, आपण सर्व मिपावर वेळ घालवतो, ज्यातून पैसे मिळत नाहीत.

२००६ ला (जेव्हा क्रेडिट कार्ड्स अन् कर्जं अक्षरशः कुणालाही मिळत) मी शेवटच्या वर्षाला असताना एक पार्टटाईम जॉब करत होतो. महिना रु १०,००० पगारावर मला सिटीबँकेचं एक कार्ड (२५,००० मर्यादा), आयसीआयसीआयचं एक कार्ड (७५,००० मर्यादा) अशी दोन कार्ड मिळाली होती. क्रेडिट कार्ड वापरण्याची अक्कल व अनुभव नसल्याने हळूहळू बिल फुगायला लागलं. मित्रांबरोबर हॉटेलात जेवण झालं, की ष्टाईल मारून मी कार्ड स्वाईप करायचो व कॉण्ट्रीची कॅश माझ्याकडे घ्यायचो (जी बिल भरायच्या आधी खर्च होऊन जायची). घरच्यांना लक्ष्मी रस्त्यावर कपडे घेताना कार्ड स्वाईप करायचं व पैसे माझयकडे घ्यायचे.(परत... जे बिल भरायच्या आधी खर्च होऊन जायचे!) असं करत करत २००९ मध्ये सिटीचं बिल ३७,००० झालं व आयसीआयसीआयचं ४५,०००! मग सेटलमेंट केली (जी माझी क्रेडीट कार्डांच्याबाबतीत आतापर्यंत झालेल्या चुकांमधील सर्वात वाईट व मोठ्ठी चूक!!) - सिटी बँक २२,००० रुपये व आयसीआयसीआय ३७,००० रुपये. याचे परिणाम काय झाले ते मला २०१२ मध्ये कळलं, जेव्हा माझं एसबीआयच्या क्रेडीट कार्डचं अ‍ॅप्लिकेशन रिजेक्ट झालं! कारण वाईट्ट सिबील स्कोर ! मग मी स्वत: ऑनलाईन माझा सिबील क्रेडीट स्कोर पाहिला तर त्यात त्या दोन कार्डांचा इतिहास होता आणि स्कोर कुडन्ट बी अनी वर्स!! मग २०१५ मध्ये एसबीआयमध्ये एफडी ठेऊन क्रेडिट कार्ड घेतलंय व डोळ्यात तेल घालून त्यावर आता खर्च व (ड्यू डेटची वाट न बघता, बिल जनरेट झालं की लगेच) बिल भरणं चालू आहे. *अवांतर : दोन महिन्यांपूर्वी सिटीबँकेचा फोन आला होता, तुमचा क्रेडिट स्कोर चांगला आहे, आम्ही तुम्हाला क्षयज्ञ कार्ड ऑफर करतो. पण मी तेव्हा नकार देऊन अजून काही महिने वाट पाहायचं ठरवलंय.

भारतात बहुसंख्य जनतेला कॅशलेस होण्यासाठी क्रेडिट कार्ड नव्हे तर डेबिट कार्ड हाच पर्याय आहे. अनेकांकडे उत्पन्नाचा , नोकरीचा पुरावा नसतो. रुपे नेटवर्कचा प्रचार आणि प्रसार, रुपे नेटवर्कला जोडलेले डेबिट कार्ड आणि अतिशय कमी ट्रान्सॅक्शन चार्जेस या उपायांनीच कॅशलेसचा प्रचार होवू शकतो. पण सध्यातरी आपण कॅशलेस म्हणजे व्हिसा आणि मास्टरकार्ड नेटवर्कला श्रीमंत बनवत आहोत. मी स्वतः कोणतीही वार्षिक फी नसलेले एक क्रेडिट कार्ड वापरतो पण पेट्रोल भरताना यावर चार्जेस लागतात म्हणून त्याने पेट्रोल टाकत नाही, तिथे कॅश किंवा सध्या डेबिट कार्ड वापरतो. या कार्डावर १०० रू खर्च केल्यावर १ पॉइंट मिळतो. हे पॉइंट्स फक्त टाटाच्या क्रोमा , स्टार बझार अशा ठिकाणी रिडीम करता येतात (१ पॉइंट = १ रुपया) . २०१६ मध्ये मी सुमारे ६००० पॉइंट्स रिडीम केलेत !! दुसरे एक क्रेडिट कार्ड आहे त्याला २०० रु वार्षिक फी आहे..पण मला वाटतं वर्षाला ठराविक रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यास (बहूधा २०,००००) वार्षिक फी लागत नाही , पेट्रोल पंपावर विशिष्ट कॉम्बिनेशन असेल (म्हणजे HPCL चा पंप आणि ICICI चे POS ) तर जास्टीचे चार्जेस लागत नाहीत उलट २.५% कॅशबॅक मिळते. हे कार्ड (आणि कारही) माझ्या पत्नीकडे असते.

In reply to by संजय क्षीरसागर

गुप्तता कुठे.. ते उघडच आहे पहिले Tata SBI card आहे.. तुम्ही सहसा स्टार बझार वा क्रोमा मध्ये गेलात की कुणीतरी सेल्समन तुमच्या मागे लागतो ते हेच कार्ड !! दुसरे अर्थातच ICICI चे

नितिन थत्ते 19/01/2017 - 14:05
आता क्रेडिट कार्ड वापरणे सुद्धा किफायतशीर होईल कारण आता कॅश हॅण्डलिंग* वर चार्जेस लावणार आहेत. *म्हणजे काय ते ठाऊक नाही पण बहुधा कॅश काढणे किंवा भरणे यावर चार्जेस लावणार असतील.

In reply to by कैवल्यसिंह

डेबिट कार्ड हे तुमच्या एका बँक खात्याशी (सेविंग वा करंट) लिंक असते. खात्यात असलेल्या शिलकेप्रमाणे तुम्ही खर्च करु शकता. तुम्ही खर्च केलेली रक्कम जेव्हा तुमच्या अकाऊंटमधून तात्काळ कमी होते आणि व्यापार्‍याच्या अकाउंटला जमा होते (प्रत्यक्ष त्याच्या अकाउंटला जमा होण्यात काही अवधी लागतो पण तो भाग वेगळा), यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आज जितका खर्च करायचा आहे किमान तितकी रक्कम तुमच्या खात्यात असणं आवश्यक आहे क्रेडीट कार्डंच तस नसतं. तुमचं एक क्रेडीट अकाउंट असतं , तुमची जी पत आहे त्याप्रमाणे क्रेडीट लिमिट निश्चित होते. त्या लिमिटपर्यंत तुम्ही महिनाभरात खर्च करु शकता, यावेळी तुमच्या बॅक खात्यात शुन्य रक्कम अस्ली तरी त्याने काही फरक पडत नाही. पुढच्या महिन्यात क्रेडिट कार्डचे बिल आले की तुम्ही ते भरायचं. हे म्हणजे घराजवळच्या वाण्याकडे उधारीचं खातं असण्यासारखं आहे, तुमची पत पाहून तुम्हाला किती रकमेपर्यंत उधार देता येईल याचा विचार वाण्याने केलेला असतो त्या मर्यादेपर्यंत खरेदी करत रहा आणि पुढच्या महिन्याला पैसे द्या.. मग पुन्हा उधारि करा...

In reply to by मराठी कथालेखक

कैवल्यसिंह 22/01/2017 - 07:44
धन्यवाद.. पन मग यापैकी फायदेशीर काय ठरते? कोणते कार्ड वापरायला चांगले आहे व कमी त्रासदायक ठरनाऱ्या आहेत?

In reply to by कैवल्यसिंह

माझ्या दूसर्‍या प्रतिसादात मी डेबिट कार्डच्या तुलनेने क्रेडिट कार्डचा फायदा लिहिला आहे. तो वाचा काही शंका असल्यास व्यनी करा कारण पुन्हा कधी धाग्यावर येईनच याची खात्री नाही. डेबिट कार्डाचा मोठा फायदा हा की ते सहज मिळते, त्यासाठी उत्पन्नाची अट नसते. तुमच्या बॅक अकाउंटला ठराविक मिनिमम बॅलन्स असायला हवा (अगदी चेकबूकसारखे समजा ना.. फक्त डेबिटकार्डचे पेमेंट हा तात्काळ क्लिअर होणारा चेक आहे असं म्हणू शकता). त्यातही राष्ट्रीयकृत बँकेत वा सहकारी बँकेतही ही रक्कम (मिनिमम बॅलन्स) खूप लहान असते (शक्यतो १००० रुपये). बहूतेक सर्वच बँका डेबिट कार्डासाठी वार्षिक शुल्क आकारतात. (बहूधा रु १०० + सर्विस टॅक्स इतके असते.. पण कुणाचे वेगळेही असू शकते). पण ATM कार्ड आणि डेबिट कार्ड आता बहूतांशी एकच असते म्हणून तुम्ही शुल्क टाळावे म्हणून डेबिट कार्ड घ्यायचे नाकारले तर ATM ची सूविधा पण मिळणार नाही. आणि काउंटरवरुन पैसे काढावे लागतील. शिवाय खर्चाला लागतात म्हणून तुम्ही बर्‍यापैकी रक्कम काढून ठेवली तर तुम्हाला त्या रकमेवर सेविंग मध्ये मिळणारे व्याजपण मिळणार नाही. समजा तुम्ही वर्षात प्रत्येक दिवशी तुमच्याकडे सरासरी रु ५००० इतकी कमी रक्कम जरी रोख हवी अशा प्रकारे रक्कम काढत राहिलात तरी ५००० वर सेविंगच्या दराने एका वर्षात मिळणारे (४% दसदशे) व्याज म्हणजेच २०० रु व्याजाला तुम्ही मुकणार. शिवाय बँकेच्या शाखेतून पैसे काढण्यासाठी वेळ घालवणे, बँकेपर्यंत जाण्याकरिता येणारा खर्च हा वेगळा.

अनरँडम 19/01/2017 - 22:20
मी फक्त अमेरिकेतच क्रेडिट कार्ड वापरले आहे. अमेरिकेत क्रेडिट कार्ड वापरण्यासाठीचे इन्फ्रास्ट्र्क्चर पूर्णपणे तयार झालेले आहे आणि इथे आयडेंटिटीची चोरी हा धोका सोडल्यास क्रेडिट कार्ड वापरणे हे अत्यंत सोयिस्कर आहे. पण अमेरिकेचा अनुभव हा भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत शून्य मार्गदर्शन करतो. अमेरिकेते क्रेडिट कार्डचा वापर हा सरकारी धोरणातून नागरिकांवर लादला गेलेला नाही. ग्राहक आणि विक्रेता दोघांचा फायदा होत असल्याने (म्हणजे त्यांना क्रेडिट कार्ड वापरल्याने पैसे मिळतात म्हणून नाही तर कॅश वापरण्याच्या गैरसोयीमूळे नॉन-मॉनेटरी ट्रान्सॅक्शन कॉस्ट कमी होत असल्याने) क्रेडिट कार्डचा वापर सार्वत्रिक झाला. त्यासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चरही हळूहळू विकसीत झाले. (जेथे अत्यंत गरीब लोक राहतात (कृष्णवर्णीय, मेक्सिकन) अशा भागांमध्ये अजुनही कॅशच मोठ्या प्रमाणात वापरली जाते.) भारतात ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही रोख व्यवहार केल्याने (कर बुडवून) फायदा होतो म्हणून सोय असूनही क्रेडिट कार्ड वापरले जात नाही. तर भारत सरकारने पहिल्यांदा करप्रणाली आणि तिचे अंमलबजावणी यात सुधारणा केली पाहीजे. पण अशा सुधारणा हळुहळू होतात. लोकांना चटकण दिसत नाहीत. म्हणून नोटाबंदीसारखे (वाचाळ) मध्यमवर्गियांना कमी त्रासाचे कार्यक्रम शून्य गृहपाठ करून राबवले जातात.

In reply to by अनरँडम

ट्रेड मार्क 19/01/2017 - 22:36
मी तुलना कुठेच केली नाहीये कारण ती होऊ शकत नाही. अमेरिकेत १००% कार्ड्स वापरतात असा सुद्धा माझा दावा नाही. लेखाचा उद्देश फक्त क्रेडिट कार्ड्स वापरून माझा कसा फायदा झाला हे सांगण्याचा आणि ज्यांना शक्य असेल आणि इच्छा असेल त्यांना पण करून घेता यावा एवढाच आहे. भारतात क्रेडिट कार्ड कसं वापरावं हे मी अजिबात सांगत नाहीये कारण सध्याचा तिथला अनुभव मला नाही. भारतात हे होऊ शकतं आणि व्हावं असं मात्र मला मनापासून वाटतं. नोटबंदीवर इतरत्र बरीच चर्चा/ वादावादी झाली आहे त्यामुळे परत इथे चर्चा करण्याचा अजिबात हेतू नाही. मध्यमवर्गीयांना वाचाळ म्हणण्याचा उद्देश मात्र मला समजला नाही.

In reply to by ट्रेड मार्क

अनरँडम 19/01/2017 - 22:40
आणि तुम्ही केली असे माझ्या प्रतिसादात ध्वनितही होत नाही. मध्यमवर्गिय आंजावर चर्चा करतात, फेसबुकवर चर्चा करतात म्हणून वाचाळ म्हटले. तुम्हाला पटत नसल्यास सोडून द्या. वाचाळ म्हणजे वाईट असे काही नाही.

In reply to by ट्रेड मार्क

अनरँडम 19/01/2017 - 22:42
'लेख रँडमली वाचला का?' हे विधान माझ्या सदस्यनामाला उद्देश्यून (विषयाला सोडून) आहे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चेस बाधक आहे.

In reply to by अनरँडम

ट्रेड मार्क 19/01/2017 - 23:47
हे विधान माझ्या सदस्यनामाला उद्देश्यून (विषयाला सोडून) आहे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चेस बाधक आहे. मान्य आणि क्षमस्व पण एकूण तुमचा प्रतिसाद सकारात्मक वाटला नाही. एक तर प्रतिसादाचे हेडिंग "संत्रे सफरचंद तुलना" हेच म्हणताय की मी तुलना केली पण चुकीची केली. पुढे "पण अमेरिकेचा अनुभव हा भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत शून्य मार्गदर्शन करतो." हे पण विषयाला सोडूनच आहे कारण लेखाचा उद्देश हा नाहीये. बाकी वाचाळ असण्याबाबत - मी हे लिहिलेलं सगळं स्वतः केलंय आणि मग सांगितलंय. बाकी कोणी वाचाळ आहेत आणि का आहेत हे तुम्ही का सांगताय ते कळलं नाही. असो. पण सकारात्मक चर्चा करायची असेल तर नक्कीच करूया पण कृपया ती विषयाला धरून असावी.

In reply to by ट्रेड मार्क

अनरँडम 20/01/2017 - 00:30
तुम्ही तुलना केलेली नाही. तुमच्या लेखाचा उद्देश्य तुम्ही प्रथमच स्पष्ट केला आहे. त्या उद्देश्याला पूरक असेच माझे मत आहे की अमेरिकेत क्रेडिट कार्ड वापरणे हे निश्चितच (व्यक्तिगत अनुभव आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठीही) फायदेशीर आहे (आयडेंटिटी चोरीचा मुद्दा सोडल्यास). पण कोणी (तुम्ही नाही) या फायद्याचे भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात (ढोबळपणे कारण काही लोकांना क्रेडिट कार्ड वापरणे भारतातही फायदेशीर ठरू शकेल.) सामान्यीकरण केल्यास ती तुलना चुकीची ठरेल. तुम्ही तुमच्या लेखाच्या शेवटी पूर्ण अर्थव्यवस्थेसंदर्भात काही विधान केले आहे ("अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच.") त्यासंदर्भात माझा प्रतिसाद पाहील्यास तो विषयाशी संबंधित कदाचित वाटू शकेल.

चित्रगुप्त 20/01/2017 - 01:38
माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख. तुमच्या वडिलांना वर्षभर अमेरिकेत रहाता आले, ते कोणत्या व्हिसावर ? व्हिजिटर्स व्हिसावर एका वेळी सहा महिनेच रहाता येते ना? आम्ही दर वर्षी भारतातून अमेरिकेत येतो, आणि सहा महिन्यांच्या आत परततो, म्हणून विचारत आहे. तुमचे स्वतःचे/वडिलांचे ग्रीन कार्ड झालेले आहे किंवा कसे ?

In reply to by चित्रगुप्त

ट्रेड मार्क 20/01/2017 - 04:29
लेखाचा उद्देश माहिती देण्याचा आहे आणि कोणाला करता आला तर उपयोग करता येईल हा फायदा आहेच. फारसं काही न करता एका व्यक्तीचं विमानाचं तिकीट फुकट मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. माझे वडील टुरिस्ट विसावरच आले होते. पण ६ महिने पूर्ण व्हायच्या आधी अजून ६ महिने वास्तव्य वाढवण्यासाठी अर्ज करता येतो. याची फी साधारणतः $३५० प्रतिव्यक्ती असते. पण अडचणीच्या वेळेला असा अर्ज करून मुक्काम वाढवता येतो. जाण्यायेणाचा त्रास आणि विमानाची तिकिटं यापेक्षा कमी पैसे लागतात. पण हे एकसारखं करू नये आणि सलग एका वर्षापेक्षा जास्त टुरिस्ट विसावर राहू नये असं म्हणतात. पुढच्यावेळेला येताना इमिग्रेशन ऑफिसर अडवू शकतो.

In reply to by ट्रेड मार्क

एक शंका. अमेरिकेन आयकराच्या अधिकारात येऊ नये यासाठी (काही विशिष्ट कारणे सोडता) अमेरिकेत एका वर्षात १८० दिवसांपेक्षा कमी वास्तव्य असणे आवश्यक आहे असे वाचले होते. हे फार महत्वाचे आहे, कारण अमेरिकेत आयकर ठरवताना करदात्याचे सर्व जगातले (ग्लोबल) उत्पन्न (सर्व जगातले उत्पन्न, मग त्या उत्पन्नाचा अमेरिकेशी काही संबंध असो वा नसो, किंवा अमेरिकेतले उत्पन्न शून्य असले तरी) करपात्र धरले जाते. मात्र हे १८० दिवस सद्य वर्षातले नसून त्यांचे मोजमाप खालीलप्रमाणे होते : १८० = सद्य वर्षातील वास्तव्याचे दिवस + (गेल्या वर्षातील वास्तव्याचे दिवस / ३) + (गेल्या वर्षांच्या अगोदरच्या वर्षातील वास्तव्याचे दिवस / ६) या नियमांने, अमेरिकेन आयकराच्या अधिकारात अडकायचे नसल्यास, भेटीची पहिली २-४ वर्षे सोडली तर, इतर प्रत्येक वर्षात १२० दिवसांपेक्षा (अंदाजे ४ महिने) अमेरिकेत वास्तव्य शक्य होत नाही असा समज होता. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेत करपात्र न होता, तेथे ६ महिने (वास्तव्याचे पहिले वर्ष सोडून) किंवा १२ महिने (कोणत्याही वर्षात) वास्तव्य कसे शक्य होते हे जरा समजावून सांगू शकाल का ? माहितीसाठी आगावू धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ट्रेड मार्क 20/01/2017 - 20:45
डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण ते वर्क व्हिसावर येणाऱ्यांसाठी. आयकराच्या कक्षेत टुरिस्ट येत नाहीत. सरकारच्या दृष्टीने टुरिस्टने येथे काम करणे नियमाविरुद्ध आहे. जर का त्या प्रवाश्याचे त्याच्या मूळ देशात उत्पन्न असेल तर त्याने तिथे आयकर भरणे आवश्यक असते. त्यामुळे तो अमेरीकेत आयकराच्या कचाट्यात सापडत नाही. मुळात आयकर भरण्यासाठी SSN/ ITIN असणे आवश्यक आहे, तो असेल तर आयकर खाते तुमच्यावर नजर ठेवू शकते. टुरिस्ट व्हिसावर SSN मिळत नाही, ITIN बहुतेक मिळेल पण तो तुम्हाला मेन टॅक्सपेयर ठरवत नाही. माझ्यामते टुरिस्ट व्हिसावर येणाऱ्यांना प्रत्येक वर्षात ६ महिने कुठल्याही अडचणीशिवाय राहता येते. मी माझ्या वडिलांच्या वेळेला CPA (CA) ला विचारलं होतं आणि त्यांनी मला वडिलांचा ITIN काढून माझ्या टॅक्स रिटर्न मध्ये एक dependent म्हणून दाखवता येईल असं सांगितलं. त्यादृष्टीने बघता माझे वडील इथे Dependent म्हणून येतात. त्यांचा व्हिसा काढताना मी त्यांचा येण्याजाण्याचा, राहण्याचा आणि इतर जे काही खर्च लागतील ते मी करणार आहे असं शपथपत्र देतो. त्यामुळे ते इथे राहिले त्याचा खर्च मला माझ्या आयकरात दाखवता येतो. पण त्यात सुद्धा एक अट आहे. जर का हा खर्च दाखवायचा असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचे आरोग्यविम्याचे डिटेल्स देणे बंधनकारक आहे. जर आरोग्यविमा नसेल तर त्यासाठी पेनल्टी भरायला लागते.

क्रेडिट कार्ड चांगले आहे. मी hdfc आणि icici अशी 2(फुकट) कार्डे वापरते परवाच hdfc चे पॉईंट्स redeem करून 4000 रु जमा करून घेतले आणखी एकदा मुंबई ते frankfurt विमानाचे तिकीट घेतले Payback चे पण बरेच पॉईंट जमले आहेत याशिवाय पण कार्डचे फायदे असतात जसे की icici कार्ड ने महिन्यातल्या एका मंगळवारी bigbasket वर 400 रु(किंवा25%) डिस्काउंट मिळतो बऱ्याच रेस्टॉरंट मध्ये, दुकानात, वेबसाइट्स वर डिस्काउंट असतो.

अजया 20/01/2017 - 10:03
मी पण HDFC regalia क्रेडिट कार्ड वापरते. शक्यतो परदेशाची तिकिटं काढायला माझा या कार्डाचा वापर होतो. त्यामुळे बरेच points जमतात. त्या कार्डाबरोबर मिळणारा विमानतळावरचा लाउंज अॅक्सेस अनेक देशात मिळतो. ते फिचर फार उपयोगी पडते. आत्ता जुनमध्ये ट्रॅव्हल कंपनीने झुरिक एअरपोर्टवर एक सफरचंद आणि एक ज्युस पॅक देऊन आणुन टाकलं फ्लाइटच्या चार तास आधी. त्यात माझं आणि नवर्याचे वेगळे फ्लाइट होते. पण थँक्स टु क्रेडिटकार्ड लाउंज फॅसिलिटी ,मला व्यवस्थित स्विस पाहुणचार मिळाला! वेळही मस्त गेला. क्रेकाचे आॅनलाइन शाॅपिंग कुपन आणि इतर फायदे मी अजुन फारसे वापरलेले नाहीत.

क्रेडिट कार्डचा (डेबिट कार्डच्या तुलनेने) अप्रत्यक्ष फायदा हा की महिन्याचा खर्च विचारात घेवून तुम्हाला सेंविग अकाउंट मध्ये पैसे ठेवण्याची गरज नाहि. माझा पगार महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी होतो, मग त्यातली काही रक्कम खात्यात ठेवून (ही रक्कम : थोडी कॅश काढता यावी , पण यातली बरीचशी केवळ अधून मधून मार्केट खाली जाईल तसे काही शेअर्स /mutual funds व units खरेदी करता यावेत व ठरलेल्या दिवशी mutual fund व्हावी SIP यासाठी असते ) बरीचशी रक्कम liquid fund मध्ये गुंतवतो. (शक्यतो tata floater fund , दुसरा एखादा चांगला सुचवल्यास आभारी असेन). दहा तारखेला माझा गृहकर्जाचा हप्ता जायचा असतो. त्या आधी दोन तीन दिवस जर शेअर मार्केट वर असेल असेल तर काही शेअर्स विकून टाकतो (profit booking) ..हे असे शेअर्स असतात ज्यात मला खूप दीर्घकाळ गुंतवणूक्क करायची नसते, किंवा काही mutual funds मधून गुंतवणूक कमी करायची असे ठरवलेले असेल आणि त्यांचा NAV थोडा वधारला असेल तर काही units विकून टाकतो. आणि यातलं काही शक्य नसेल तर liquid funds काही units विकून गृहकर्जाच्या हप्त्याची सोय करतो. दहा तारखेलाच माझ्या पहिल्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट येते (Tata SBI) माझा जास्तीत जास्त खर्च याच कार्डावरुन असतो त्यामुळे बिलाचा आकडा मोठा असतो. पुर्वी मी स्टेटमेंट आले की लगेच एक-दोन दिवसात पैसे भरुन टाकायचो (डोक्याला टेन्शन नको ही भावना). पण पैसे भरण्याची मुदत ३० तारखेपर्यंत असते तेव्हा आता मी २५-२६ तारखेला पैसे भरतो. त्यावेळीही वरील प्रमाणेच शेअर्स, म्युच्युअल फंड वा लिक्विड फंड मधून पैसे काढतो. सेविंग मध्ये ४% दसादशे व्याज मिळते पण लिक्विड फंड मधला परतावा साधारण वार्षिक सुमारे ८.५% च्या आसपास असतो. सोयीसाठी ८% धरला तरी ८-४=४ % चा फायदा मिळतो. कल्पना करा की क्रेडीट कार्ड असल्यामुळे तुम्ही वर्षभरात सरासरी १०,००० रु सेविंग अकाउंट मध्ये न ठेवता लिक्विड फंड मध्ये ठेवलेत तरी तुम्ही सरळ ४०० रुचा नफा कमावला आहे.

In reply to by मराठी कथालेखक

ट्रेड मार्क 20/01/2017 - 21:06
पैसे मिळवण्याचा हा पण एक मार्ग आहे. याला बरंच प्लॅनिंग आणि सतत निरीक्षण आवश्यक आहे. तुम्ही नेटाने हे करताय याचे खरंच कौतुक आहे. एकेकाळी मी सुद्धा शेअर मार्केटमध्ये सक्रिय होतो. नुसते शेअर्सच नाही तर derivatives, commodity, forex (फार नाही) यात पण सहभाग होता. पण आता फारसा उत्साह राहिला नाही. जे शेअर्स आहेत ते आहेत व derivatives, commodity तर पूर्णपणे बंद झालंय.

चिनार 20/01/2017 - 12:48
ट्रेडमार्क भाऊ.. कारच्या आणि मोबाईलच्या तुलनेसाठी जश्या वेबसाईट्स आहेत तश्या क्रेडिट कार्डासाठी आहेत का? असल्यास कळवावे..

In reply to by चिनार

ट्रेड मार्क 20/01/2017 - 20:59
अमेरिकेतल्या कार्ड्ससाठी https://www.creditkarma.com/credit-cards/search-cc : इथे तुम्हाला रजिस्टर करून तुमचा क्रेडिट स्कोअर (जो फारसा अचूक नसतो) कळतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठली कार्ड्स मिळतील आणि त्याचे फायदे सांगितले जातात. http://www.creditcards.com/ http://www.comparecards.com/ भारतातल्या कार्ड्ससाठी https://www.bankbazaar.com/credit-card.html http://www.paisabazaar.com/credit-card/

भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.

निश्चलनीकरण व परदेशस्थ भारतीयांच्या समस्येबाबत याचिकेसाठी पाठिंब्याचे आवाहन

श्रीरंग_जोशी ·

In reply to by कंजूस

विविध बातम्यांत वाचल्याप्रमाणे परदेशात राहणार्‍या अनेक भारतीयांनी ट्विटर व विविध मार्गांनी या समस्येबाबत मदतीची याचना केल्याचे वाचले आहे. प्रत्यक्ष निर्णय अर्थ मंत्रालय अन रिझर्व बँकेने घ्यायचा असल्याने परराष्ट्र मंत्रालय केवळ परदेशस्थ भारतीय व अर्थ मंत्रालय यामधला दुवा म्हणून काम करू शकते.

In reply to by श्रीरंग_जोशी

आज एक नवीन वटहुकुम जाहीर होणार आहे त्यात बहुदा तुम्हाला अपेक्षित असलेल्या तरतूदी असण्याची शक्यता आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काल याबाबत अंदाज वर्तवणार्‍या बातम्या वाचल्यावर एक आशा निर्माण झाली होती की बर्‍याच दिवसांनंतर या विषयावर मोठा धोरणात्मक निर्णय जाहीर होणार आहे. परंतु पुन्हा एकदा परदेशस्थ भारतीयांची निराशाच झाली. कदाचित नवा वटहुकूम लागू झाल्यावर परदेशस्थ भारतीयांसाठी काही पर्याय घोषित करण्यात येईल अशी आशा आहे. कारण अशी तरतुद आधीच जाहीर केल्यास भारतात राहणारे काही लोक ज्यांचा बेहिशेबी पैसा जुन्या नोटांच्या स्वरुपात अजुनही शिल्लक आहे ते त्या नोटा परदेशात पाठवून परदेशस्थ भारतीयांद्वारे परत आणु शकतात (कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ₹२५००० एवढीच असल्याने हा पर्याय तसाही फारसा व्यवहार्य नाहीच). वाट बघण्याखेरीज अन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करण्याखेरीज परदेशस्थ भारतीयांजवळ पर्याय नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

माझा अंदाज असा आहे की तुम्ही मांडलेला मुद्दा इतर ठिकाणच्या नाही तर गल्फमधील आनि विशेषतः दुबईमधील मनी एक्चेंजर्सच्या अनिर्बंध पैसे बदलीकरणामुळे सहज सुटणारा नाही. केवळ विमानतळावर बघीतले तरी कोणतीही आयडी न देता भारतिय नोटांची अनेक पुडकी लोक परदेशी चलनात सहज बदलून घेताना नेहमी दिसत असत. अर्थात असा भारताबाहेर जाणारे चलन अवैध तर होतेच पण ते बहुदा काळेही असण्याची जास्त शक्यता आहे. ते मनी एक्सचेंजर्स दिवसाला अनेक कोटी रुपये बदलून देत असत. आता ते अडचणीत आले आहेत. सरसकट पैसे भारतात आणायला दिले तर काळाबाजारी आणि हवालावाल्यांचे आयतेच फावेल. त्यामुळे, नवीन वटहुकुमात सरकार काही इन्नोव्हेटिव्ह उपाय काढू शकेल अशी इच्छा व्यक्त करणेच हातात आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आखातात कधी गेलो नसल्याने या गोष्टींची काही कल्पना नाही. पण पासपोर्ट डिटेल्स नोंदवून घेतल्याशिवाय परदेशातले करन्सी एक्स्चेंजेस चलन बदलून देत नाहीत असा अनुभव आहे. जर कमाल ₹२५००० एवढेच चलन बदलून देण्याचा नियम लावला अन भारतीय पासपोर्ट / पिआयओ किंवा ओसिआय कार्डचे डिटेल्स नोंदवून घेतले तर या पर्यायाचा कुणी फारसा गैरफायदा घेऊ शकेल असे वाटत नाही. याबाबतीत १ तारखेनंतर काही जाहीर केले जाईल अशी आशा आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

गल्फमधून रोज २०-२५ विमाने (प्रत्येकी २०० ते ४०० प्रवासी) भरून लोक सुट्टीवर येतात. त्यातले प्रत्येकी रु२५,००० वैधरित्या बाहेर घेऊन जाणारे फार कमी असतील, हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो (परतताना टॅक्सीसाठी लागणार्‍या ५ ते ७.५ हजारांपेक्षा जास्त पैसे घेऊन जाणे मला गरजेचे वाटत नव्हते, आणि त्यामुळे माझे कधी अडलेही नाही). तर अश्या प्रवाश्यांचा हवाला आणि एक्सचेंजवाल्यांकडून "नोटा बदल हमाल" असा उपयोग होईल. त्यामुळे हा पर्याय दिसतो तितका सोपा किंवा निर्धोक नाही. यात (गल्फ सोडून) बाकी देश (पाश्चिमात्य देशांतही हवालाने मोठमोठे व्यवहार होत असतातच) पकडले तर मग हे समीकरण अशक्य स्तराला जाईल !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

८ नोव्हेंबर नंतर जुने चलन बदलून घेण्याचा पर्याय केवळ एकदा वापरता येईल असा नियम लागू करता आला असता. म्हणजे खाजगी एक्स्चेंजेसने अधिक वेळा केला तरी त्या व्यक्तिच्या नावे केला त्या व्यक्तिचे पासपोर्ट / ओसिआय / पिआयओ कार्ड डिटेल्स आरबीआयला पाठवणे बंधनकारक केल्यास एकापेक्षा अधिक वेळा केलेले असे व्यवहार पकडणे सहज शक्य होईल. भारतातही जुन्या नोटा वापरायचे पर्याय पहिले जाहिर केलेल्या तीन दिवसांपेक्षा अधिक काळ वाढवले गेले तसेच त्यांची व्याप्ती वाढवली गेली. या गोष्टींचा गैरफायदा अनेकांनी घेतला असेलच. असो, आता १ तारखेनंतरही परदेशस्थ भारतीयांच्या सोयीसाठी सरकार व रिझर्व बँक काही करू शकतेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे केवळ दुबईच्या विमानतळाबद्दल झाले. त्याचे उदाहरण दिले कारण तिथे स्टॉप ओव्हर किंवा विमान बदलायला थांबलेले पर्यटक हवे तेवढे भारतिय चलन बद्लून घेऊ शकतात. जीसीसीच्या सहाही देशांत दर शहरातल्या बाजापेठांत भाजीच्या दुकानांसारख्या डझनांनी असलेल्या मनी एक्सेंजेसमध्येही हवे तेवढे नकद चलन सहजासहजी बदलून मिळते. तो हिशेब जमेस धरला तर हा व्याप किती (?हजार) कोटींत जाऊ शकेल याचा अंदाज लावणे कठीण आहे !

नपा 27/12/2016 - 11:38
याचिका दाखल करण्याच्या आपल्या पुढाकाराबद्दल धन्यवाद... एक update ... कतार tribune मधे प्रसिद्ध झालेली बातमी खालील दुव्यावर वाचता येईल: http://www.qatar-tribune.com/news-details/id/४०१०० १ जानेवारी पासून currency exchange house ला ५००/१००० च्या नव्या नोटा उपलब्ध होतील, परंतु जुन्या-नव्या नोटांची अदलाबदली करण्याबद्दल माहिती नाही. आशावादी राहुयात...!!! आपली याचिका RBI व भारत सरकार पर्यंत पोहचली का? तसेच माननीय परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांना याचिकेची लिंक twitter वर देखील पाठवावी हि विनंती.

In reply to by नपा

चांगली बातमी आहे. हो आशावादी राहुया. हो, याचिकेचा दुवा माननीय परराष्ट्रमंत्री, माननीय अर्थमंत्री, व पंतप्रधान कार्यालय यांना ट्विटद्वारे व रिझर्व बँकेला फेसबुक संदेशाद्वारे पाठवला आहे.

मी सुद्धा इमेल पाठविला होता. १४ नोव्हेम्बर २०१६ रोजी. वित्त मंत्रालयाकडे ईमेल पोहोचलाच नाही. मग पीएमो ऑफिसला दुसरा मेल पाठवीला. त्यावर मला असे उत्तर आलेले आहे. cpgrams-darpg@nic.in via nic.in Nov 14 to me Dear Sir/Madam, Your Communication has been registered vide Registration number PMOPG/E/2016/0451179 . Please logon to : http://pgportal.gov.in/ for any further details.Please quote the same in your future correspondence. मी ३० डिसेंबर २०१६ ला अमेरिकेतून निघणार आणि ३१ डिसेंबर २०१६ ला रात्री ११.३० वाजता भारतात पोहोचणार आहे. तेथे गेल्यावर रिझर्व्ह बॅंकेतल्या कोठल्या शाखेत नोटा बदलून मिळतील , हे कोणास माहित असल्यास क्रुपया येथे कळवावे अगर व्यनी करावा ही विनंती.

संदर्भः केंद्रिय अर्थ मंत्रालयाचे ३० डिसेंबर २०१६ रोजीचे प्रसिद्धीपत्रक सदर पत्रकामधील परदेशस्थ भारतीयांसाठी असलेला भाग
As was notified on 8th November, 2016 those persons who were unable to exchange or deposit the SBNs in their bank accounts on or before 30th December, 2016 shall be given an opportunity to do so. Accordingly, this facility has been granted to all Indian citizens who were outside India from 9th November, 2016 to 30th December, 2016 to tender these SBNs at the specified Issue Offices of RBI until 31st March, 2017. For those citizens of India who are not resident in India, this facility would be available till June 30, 2017 in order to allow them adequate time to plan a visit as per their convenience. The above facility would be subject to the regulations of the notification “Foreign Exchange Management (Export and Import of Currency) Regulations, 2015. As per these regulations bringing back such currency into the country is restricted to Rs.25,000/- per person. Separate FEMA provisions are applicable to persons in Nepal and Bhutan which would continue to apply. At the time of return to India the number and denominations of the SBN will need to be declared to the Customs authorities at the airports and other entry points. Necessary form for such declaration will be given out by the CBEC. The details of the declaration and statements that are required to be submitted along with the SBNs at the time of deposit in RBI Issue Offices will be separately announced by RBI. Any false declaration will invite a fine of Rs. 50,000 or five times the amount of the face value of the SBN tendered, whichever is higher.

धन्यवाद संग्राम व डँबिस००७. कस्टम्स विभागाचे प्रसिद्धीपत्रक याच्या शेवटच्या पानावर एक फॉर्म आहे. परदेशस्थ भारतीयांनी ९ नोव्हेंबरनंतर प्रथमच भारतात आगमन झाले असल्यास विमानतळावर जुन्या नोटांचे विवरण या फॉर्मवर लिहायचे आहे.

कर्मधर्मसंयोगाने अजुनही माझ्याकडे जुन्या ₹५०० व ₹१००० काही नोटा आहेत. ज्या स्वतःच्या खात्यात भरण्यासाठी मला ३० जूनच्या आत भारतात पोचून रिझर्व बँकेच्या ५ पैकी एका शाखेत भरण्याची संधी आहे. मला सध्या भारतात जाणे शक्य नाही. उत्तर अमेरिकेत राहणारी भारतीय नागरिक असलेली व्यक्ती जर ८ नोव्हेंबरपासून अजुन भारतात गेलेली नसेल अन स्वतःच्या जुन्या नोटा एन आर ओ अकाउंटमध्ये भरण्यासाठी ३० जून २०१७ अगोदर भारतात जाऊन रिझर्व बँकेत जाणार असेल तर मला मदत करु शकते. ही शक्यता तेव्हाच आहे जेव्हा या व्यक्तीची स्वतःची जुन्या नोटांमधली रक्कम ₹२५००० पेक्षा कमी आहे (प्रती व्यक्ती कमाल मर्यादा). माझ्याकडल्या नोटांचे मुल्य या मर्यादेच्या तुलनेत बरेच कमी आहे. माझ्याकडे असलेल्या जुन्या नोटा यशस्वीपणे भारतात जमा होऊ शकल्यास ती सर्व रक्कम एखाद्या धर्मदाय संस्थेला देणगी म्हणून द्यायचा मानस आहे. मी भारतात जाणार असतो अन कमाल मर्यादेपेक्षा कमी रकमेच्या नोटा नेंणार असतो तर इतर कुणाच्या नोटा जरुर जमा करुन दिल्या असत्या. आशा आहे मला कुणीतरी मदत करणारे नक्की भेटेल. मिपासदस्य नसणार्‍या मिपावाचकांसाठी माझा इमेल पत्ता. रिझर्व बँकेत जुन्या नोटा जमा करण्याचा एका परदेशस्थ भारतीय श्री अमेय गोखले यांचा अनुभव - NRIs and Demonetization | My Experience with the RBI Process

नमस्कार मंडळी, माननीय पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाची घोषणा केली. प्राथमिक प्रतिक्रियांनंतर परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या ₹५०० व ₹१००० च्या जुन्या नोटांचे काय करावे याची काळजीयुक्त चर्चा सुरू झाली. सरकारने जाहिर केलेल्या माहितीनुसार परदेशात राहणाऱ्यांनी ३० डिसेंबर २०१६ किंवा ३१ मार्च २०१७ पर्यंत प्रत्यक्ष भारतात येऊनच स्वतःजवळच्या जुन्या नोटा बदलून घ्यायचा किंवा स्वतःच्या एनआरओ खात्यात जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होता.