मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी

चित्रगुप्त ·

सुंदर धागा कल्पना ! तुमच्या रसिक दृष्टीतून चित्रे पहायला नेहमीच मजा येते. प्रत्येक चित्राबरोबर तुमची टिप्पणी जरूर टाका, म्हणजे आम्हाला कलाकाराच्या दृष्टीतून दिसलेले चित्रही बघायला मिळेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्त 11/12/2016 - 18:43
@ संजय सर आणि डॉ. म्हात्रे: सूचनांबद्दल आभार. खरेतर चित्रांविषयी शब्दात काही लिहीणे माझ्यासाठी खूपच अवघड आहे, तरी यथानुशक्त्या प्रयत्न करेन. कदाचित 'मला या चित्रात काय आवडले' असे काहीतरी लिहू शकेन.

In reply to by चित्रगुप्त

म्हणजे चित्राचा आस्वाद कसा घ्यावा, त्यामागे चित्रकाराची भूमिका काय आहे , रंगांचा मनावर होणारा परिणाम, बॅकग्राऊंडचं वैशिष्ठय...... वगैरे कळतील. नुसती कलाकृती पाहून तितकासा उलगडा होणार नाही.

मारवा 11/12/2016 - 10:45
अत्यंत सुंदर !!!!!!!! क्रमांक १ उजवी बाजु (भावशुन्य) क्रमांक ९ उजवी बाजु (भडक) च्या दोन सुंदरी वगळता बाकी सर्व अत्यंत सुंदर नेत्रसुखद. चित्रगुप्त सर तुम्ही चांगल्या मुड मध्ये दिसताय याचा फायदा उचलुन काही खुप आवडलेल्या ( पण शुन्य कळलेल्या ) पेंटींग टाकतो प्लीज भाष्य करावे आम्हालाही थोडा आनंद मिळेल. थोडीफार चित्र कसे पाहावे समजेल.

In reply to by मारवा

निंफ्स अँड द सेटीर आहे बहुदा हे, मला नक्की नाही सांगता येत आहे पण 'वासना कसे एका जीवाला ग्रासतात' हे दाखवायचा एक यशस्वी प्रयत्न चित्रकाराने ह्यात केला आहे, त्या नग्न स्त्रिया म्हणजे सेलेस्टिअल निंफ्स (स्वर्गलोकातल्या अप्सरा) असून त्यांना जलक्रीडा करताना आशाळभूत कामातुर नजरेने पाहणाऱ्या एका सेटीरला (अर्धमानव अर्धअज म्हणजेच अर्ध शरीर मानवी अन अर्ध बकऱ्याचे असणारा एक ग्रीक पुराणातला जीव) पाण्याच्या तळ्यात ओढत आहेत, जे काही त्या सेटीरला तितकेसे रुचले नाहीये अन तो अप्सरांच्या त्या प्रयत्नांना विरोध करतोय, काही निंफ्स तळ्याच्या पलीकडल्या किनाऱ्यावर असून त्या कदाचित घाबरलेल्या असाव्यात.

चित्रगुप्त 11/12/2016 - 19:01
@ मारवाश्री आणि कंजूसपंत, चित्रे आवडत आहेत, हे वाचून छान वाटले. मारवाश्री तुम्ही दिलेल्या बुगेरो (William Bouguereau १८२५-१९०५) च्या चित्राबद्दल लवकरच लिहीतो. बुगेरोवर नुक्तेच एक मोठे पुस्तक प्रकाशित झालेले आहे, ते घेण्याचा विचार करतो आहे. बुगेरो हा चित्रकार फ्रेंच अ‍ॅकॅडेमिक कलेचा कळस म्हणता येईल, परंतु पुढे आधुनिक कलेच्या पाठीराख्यांनी त्याची हेटाळणी करून कलाइतिहासातून त्याला बाद केले, ते एक शतक. आता पुन्हा त्याचे पुनर्मुल्यांकन होऊन प्रतिष्ठा मिळत आहे. .

चित्रगुप्त 11/12/2016 - 21:35
बुगेरो विषयी विकिपिडिया पेक्षाही जास्त चांगली माहिती, विविध लेख आणि चित्रे खालील दुव्यावर आहेतः http://www.artrenewal.org/pages/artist.php?artistid=7

पैसा 12/12/2016 - 22:24
मलाही तुमच्याकडून निव्वळ चित्रांपेक्षा त्यावरचे भाष्य जास्त वाचायला आवडेल.

प्रचेतस 14/12/2016 - 18:31
धागा नाही पटला. जालीय साध्या चित्रांपेक्षा डेव्हिड, पिएता , द बर्थ ऑफ द व्हीनस, क्रियेशन ऑफ ऍडम, स्टारी नाईट, चार्ट ऑफ हेल अशा जगविख्यात कलाकृतींवर तुमचं भाष्य अपेक्षित होतं.

चित्रगुप्त 14/12/2016 - 22:50
डेव्हिड, पिएता , द बर्थ ऑफ द व्हीनस, क्रियेशन ऑफ ऍडम, स्टारी नाईट, चार्ट ऑफ हेल अशा जगविख्यात कलाकृतींवर तुमचं भाष्य अपेक्षित होतं.
एका अर्थी खरं आहे, परंतु अश्या विख्यात कलाकृतींवर टनावारी साहित्य उपलब्ध आहे, त्यासमोर मी आणखी काय पणती लावणार ? परंतु सर्वसामान्य नेटकराच्या नजरेतून निसटणार्‍या अनेक सुंदर प्रतिमा असतात. त्यांचा शोध घेण्याचा एक प्रयत्न आहे.

मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे. तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे. १.

इंदिराजी

जॉनी ·

स्वलिखित 20/11/2016 - 18:36
पंतप्रधान या मालिकेच्या ७,८,९,१०,११,१२ या भागामध्येसुद्धा इंदिरा गांधी यांचा कार्यकाल वर्णन आहे.पण आणीबाणी च्या काळातील व कलम बदलांविषयी फारच कमी माहिती.

सर टोबी 20/11/2016 - 19:48
इंदिराजींच्या कार्याची हि थोडक्यात जंत्री: १. बँकांचे राष्ट्रीयीकरण: या मूळे छोटे उद्योग आणि सर्व सामान्य जनता यांना पतपुरवठा होऊन रोजगाराची निर्मिती होण्यास मदत झाली. २. हरितक्रांती: धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्न्न तोड नाही. अन्नधान्याचे रेशनिंग ज्यांनी अनुभवले आहे त्यांना याचे महत्व वाटल्या शिवाय राहणार नाही. ३. अणु ऊर्जा आणि अवकाश संशोधन: आज आश्चर्य वाटेल परंतु आपल्या सारख्या गरीब देशाला या गोष्टींची काय गरज आहे असे त्या काळीं विरोधी पक्ष आणि काही लोक देखील विचारात असत. आज आपण त्या गोष्टींचे फायदे अनुभवत आहोत. ४. अणु स्फोट: हे तंत्र देशात विकसित करून त्यांनी एक प्रकारचा दरारा आणि आदर निर्माण केला. ५. सुंस्थानिकांचे भत्ते रद्द करणे: देशाच्या तिजोरी वरील मोठा भर त्यांनी हलका केला. ६. स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन: या मूळे अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. ७. रशिया बरोबर मैत्री संबंध: आज जेंव्हा आपली सर्व शेजारी राष्ट्रांकडून कोंडी होत आहे तेंव्हा रशिया सारखा मित्र असण्याची गरज समजते. भारत पाक युद्धात जरब बसविणे, भारता बरोबर रुपया वापरून आयात निर्यात करणे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान भारता बरोबर शेअर करणे असे अनेक पदर होते या मैत्रीचे.

In reply to by सर टोबी

गॅरी ट्रुमन 21/11/2016 - 12:00
इतर मुद्द्यांविषयी नंतर लिहितो. पण आताच---
सुंस्थानिकांचे भत्ते रद्द करणे: देशाच्या तिजोरी वरील मोठा भर त्यांनी हलका केला.
मला वाटते की संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हा थोडासा पॉप्युलिझमचा आणि राजकारणाचा भाग होता. पॉप्युलिझमचा का? कारण इंदिराजींनी स्वतःला गरीबांची मसिहा/तारणहार म्हणून लोकांपुढे आणले होते.बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हे दोन निर्णय त्याचा एक भाग होते. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाविषयी माझ्याच मिपावरील दुसर्‍या जन्मातून लिहितो.संस्थानिकांचे भत्ते रद्द करून आपण राजेरजवाड्यांच्या (पक्षी श्रीमंतांच्या) विरोधात आहोत हे दाखवायची उत्तम संधी इंदिरा गांधींकडे होती.हा झाला पॉप्युलिझमचा भाग. यात आणखी राजकारण कुठे आले? तर बरेच संस्थानिक विरोधी स्वतंत्र पक्षात सामील झाले होते. स्वतंत्र पक्ष १९६० च्या दशकात काँग्रेसला एक समर्थ पर्याय म्हणून पुढे येत होता. १९६७ मध्ये स्वतंत्र पक्षाने लोकसभेत ४४ म्हणजे जनसंघापेक्षाही जास्त जागा जिंकल्या होत्या. तेव्हा बरेच संस्थानिक त्या पक्षात सामील झाले याचा राग असावा काय? अगदीच अशक्य नाही. संस्थानिकांच्या भत्त्यांमुळे सरकारी तिजोरीवर फार मोठा भार पडत होता असे नाही. सरदार पटेलांनी संस्थाने विलीन केली त्यावेळी साम-दाम-दंड-भेद या चारही मार्गांचा वापर केला. त्यातील हा दाममार्गाचा भाग होता.१९४७ मध्ये यासाठी सरकारचे दरवर्षी ६ कोटी खर्च होत होते. ही रक्कम पुढील पिढ्यांना कमी केली गेली होती त्यामुळे १९७० पर्यंत हा आकडा ४ कोटींवर आला होता. याविषयी अधिक माहिती इथे. १९४७ मध्ये ६ कोटी ही मोठी रक्कम असली तरी १९७० मध्ये ४ कोटी ही फार मोठी रक्कम होती असे नाही. या लेखातील इतर मुद्देही विचार करण्याजोगे आहेत. संस्थानिकांना भत्ते द्यावेत यासाठी स्वतः सरदार पटेल आग्रही होते आणि त्याचा उल्लेख राज्यघटनेत उल्लेख व्हावा यासाठीही ते आग्रही होते. जर का भारत सरकारने अमुक इतके पैसे दरवर्षी देऊ असे संस्थानिकांना आश्वासन दिले असेल पण नंतर त्याला हरताळ फासला असेल तर त्याला breach of sovereign guarantee असे का म्हणू नये?

In reply to by गॅरी ट्रुमन

संस्थानिकांचे भत्ते रद्द करणे हा निव्वळ पोरखेळ होता ज्याने सामान्य मानसाच्या डोळ्यात धुळ फेकली गेली. कारण संस्थानिकांची नावे सात बार्‍यावरुन निघाली नाहीत. पण ना सरदार पटेलांनी त्यावर विचार केला ना इंदिरा गांधींनी. मोदींनी प्रथम हे काम केले असते तर फार बरे झाले असते. हे काम मोदीच करु शकतात. हे जर झाले तर सरकारला त्यांच्या उपक्रमासाठी जमिनीची कमतरता भासणार नाही... भत्ते इ इ फार किरकोळ संपत्ती आहे. जर भत्ते रद्द करणे न्याय्य असेल तर हा विचार जास्त फायद्याचा होता...

In reply to by गॅरी ट्रुमन

अनुप ढेरे 21/11/2016 - 12:11
स्वतंत्र पक्ष एकमेव उघड आर्थिक उजवा पक्ष असावा भारतातला. रच्याकने, संस्थानिकांचे राजकारणात उतरणे, निवडणुकांमध्ये यश मिळवणे आणि नंतर भत्ते क्यांसल होणे याचा उल्लेख गुलाल चित्रपटात आहे. केकेच्या एका भाषणात.

In reply to by अनुप ढेरे

गॅरी ट्रुमन 21/11/2016 - 12:44
स्वतंत्र पक्ष एकमेव उघड आर्थिक उजवा पक्ष असावा भारतातला.
हो आणि स्वतंत्र पक्षाने पिलू मोदी, मिनू मसानी, एन.जी.रंगा यांच्यासारखे ज्येष्ठ संसदपटूही दिले. १९६० च्या दशकात उघडउघडपणे लायसेन्स-परमीट राज बंद करा ही मागणी करणे त्या वेळच्या वातावरणात इतके सोपे नव्हते. ते स्वतंत्र पक्षाने केले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 21/11/2016 - 15:29
जयपूरच्या संस्थानिक असलेल्या राजमाता गायत्रीदेवी या स्वतंत्र पक्षातर्फे दोनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत राजस्थान विधानसभेच्या एका निवडणुकीत स्वतःत्र पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता व त्यांना बहुमतासाठी जेमतेम ८-१० जागा कमी पडत होत्या. अशा वेळी राज्यपालांच्या सहाय्याने इंदिरा गांधींनी रडीचा डाव खेळून विधानसभा स्थापन होऊन ने देता स्थगित करायला लावली. नंतरच्या ६ महिन्यात आमदारांची पुरेशी फोडाफोडी करून काँग्रेसकडे बहुमत जमविले व नंतर स्थगिती उठवून राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन केले.

In reply to by सर टोबी

वटवट 21/11/2016 - 13:07
अणुऊर्जा आणि त्यासंदर्भात खरंच कोणाला श्रेय द्यायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपले माजी स्व. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि होमी भाभा ह्यांनाच द्यावे लागेल... उगं कोणाची पण बिलं कोणाच्यापण नावे फाडू नयेत... वैमगैन...

In reply to by सर टोबी

मिल्टन 21/11/2016 - 14:06
बँकांचे राष्ट्रीयीकरण: या मूळे छोटे उद्योग आणि सर्व सामान्य जनता यांना पतपुरवठा होऊन रोजगाराची निर्मिती होण्यास मदत झाली.
बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि त्यानंतर खेडोपाडी बँकांच्या शाखांचे जाळे विणले गेले, गरीबांना त्यांचे बँकखाते उघडणे सोपे झाले इत्यादी गोष्टी कोणीच नाकारू शकत नाही. पण बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या बाबतीत काही मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत. १. बँकांनी गावांमध्ये शाखा उघडाव्यात असे वाटत असेल तर रिझर्व्ह बँकेने नियम बदलून ते चालणार्‍यातले नव्हते का? म्हणजे शहरांमध्ये एक नवी ब्रँच हवी असेल तर गावांमध्ये तीन नव्या ब्रँच उघडायला हव्यात अशा स्वरूपाची अट घालून पाहिजे तो परिणाम साध्य करता आला नसता का? आज विमान उद्योग क्षेत्रात डी.जी.सी.ए ही लहान विमानतळांवर सेवा पुरवली पाहिजे अशी सक्ती विमानकंपन्यांना करतेच. अन्यथा सगळ्या विमान कंपन्या मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद, गोवा, जयपूर इत्यादीच मार्गांवर विमानसेवा पुरवतील आणि हुबळी, लखनौ इत्यादी ठिकाणी विमान कंपन्या सेवा पुरवणार नाहीत. तसे नियम रिझर्व्ह बँकेला इतर बँकांना सक्तीचे करता आले असतेच. आजही जनधन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सवाले अकाऊंट उघडायचे हा नियम आल्यानंतर सगळ्या बँकांनी निमूटपणे त्याचे पालन केलेच की. म्हणजे गावांमध्ये बँकांच्या शाखा वाढाव्यात असा उद्देश असेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते का? २. सरकारला बँकिंग बिझनेसमध्ये शिरकाव करायचा असेल तर सरकारला नव्या बँका चालू करायला कोणी रोखले होते? त्यासाठी खाजगी बँका जबरदस्तीने ताब्यात घेणे कसे काय समर्थनीय आहे? ३. वरील मुद्द्याशीच संबंधित-- सरकारने १९६९ मध्ये बँका ताब्यात घेतल्या तेव्हा त्या देशातील १४ सर्वात मोठ्या बँका होत्या.त्यातच धोंडूमामा साठे आणि इतरांनी कष्टपूर्वक उभी केलेली महाराष्ट्र बँकही होती तसेच टी.ए.पै आणि इतरांनी उभी केलेली सिंडिकेट बँकही होती. हे पाऊल उचलून सरकारने नक्की कोणते संकेत दिले? तुम्ही कितीही कष्ट करा, प्रयत्नपूर्वक आपला उद्योग उभा करा आणि एक दिवस सरकार येईल आणि तुम्हाला कवडीमोल रक्कम देऊन तुमचा उद्योग ताब्यात घेईल!! भारतातील entrepreneurial spirit वर मोठाच धक्का लावणारा हा प्रकार होता. याला काय अर्थ आहे? उद्या कोणी दरोडेखोर आला आणि डोक्याला बंदूक लाऊन 'बर्‍या बोलाने तुझ्याकडचे पैसे माझ्या ताब्यात दे नाहीतर गोळी घालीन' असे म्हणत असेल आणि पैसे लुबाडून घेऊन जात असेल तर त्याच्यात आणि सरकारच्या या कृतीमध्ये फरक काय? वर म्हटल्याप्रमाणे बँकेच्या राष्ट्रीयीकरणानंतर बरेच फायदे झाले हे कोणीच नाकारू शकत नाही.पण त्यासाठी राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते का? हे एक पाऊल उचलून गरीबांचा तारणहार ही प्रतिमा लोकांपुढे उभे करून इंदिरांना पक्षांतर्गत विरोधकांना (मोरारजी देसाई आणि इतर सिंडिकेट) धाराशायी करायची मात्र संधी मिळाली.

आझाद हिंद सेनेच्या निवृत्त अधिकारी/जवानांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देऊन पेन्शन सुरु करणाऱ्या सुद्धा बहुतेक इंदिरा होत्या .

एस 20/11/2016 - 20:41
इंदिरा गांधींची धडाडी स्तिमित करणारी होती. त्यांना सलाम! प्रोजेक्ट टायगर सुरू करून वाघांची संख्या वाचवण्याचे त्यांचे कार्य अमूल्य आहे.

जॉनी 20/11/2016 - 20:50
बांगलादेश युद्धावेळी इंदिराजींनी जेव्हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना सैन्याच्या तयारीबद्दल विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर जबरदस्त होतं "आय एम ओलवेज रेडी, स्वीटी"

अमितदादा 20/11/2016 - 21:13
इंदिरा गांधींना सलाम, त्यांचं संपूर्ण जीवन हे व्हाइट किंवा ब्लॅक शेड मध्ये न पाहता ग्रे शेड मध्ये पाहिलं पाहिजे, त्यांचे काही निर्णय चुकीचे आणि राजकीय होते मात्र काही निर्णयाने देशाचं भविष्य बदलण्यास मदत झाली हे नक्की. मूळ लेखात तसेच प्रतिसादात आलेल्या चांगल्या गोष्टीत थोडी भर 1. सिक्कीम भारतात आणायचं काम इंदिरा गांधींच्या कार्यकाळात झालं. 2. बहुतांश तेल कंपन्यांचा सरकारीकरण आणि स्थापना इंदिरा च्या काळी झाली त्यांच्या बाबत च एक वाक्य नेहमी आवडत " The only man in her cabinet" त्याचा बाबतीत अस म्हंटल तरी वावगं ठरणार नाही " She was the only man prime minister india got till now " (इथं man चा अर्थ शब्दशः न घेता खंबीर असा घ्यावा)
.जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला. अतिरेक्यांना प्रवाश्यांना सोडावं लागलं पण त्यांनी विमान पेटवून दिलं. तरी इंदिराजींनी पाकिस्तानी विमानांना आपल्या आकाशात बंदी घातलीच.
या बाबतीत एक थेअरी (माझ्या मते सत्य) प्रचलित आहे की इंदिरानी हे सर्व घडवून आणलं जेणे करून भारताला राजनैतिक लाभ मिळेल (जास्त माहिती जालावर सापडेल)

अनुप ढेरे 20/11/2016 - 21:54
मस्तं. अजून काही योगदान इंदिराजींच, १. राजकीय फायद्यासाठी भिंद्रनवालेला प्रोत्साहन. नंतर तेच अंगाशी २. आणिबाणी आणि त्यातले अत्याचार ३. पक्षांतर्गत विरोधकांना शत्रू समजून त्यांचा नि:पात ४. न्यायव्यवस्थेची मोडतोड. आपल्याला लॉयल जज सुप्रीम कोर्टावर नेमून. ५. स्वतंत्र भारताच्या एकमेव हुकुमशहा ६. राजकारणात हायकमांड कल्चर ७. शिवसेनेसारख्या गुंड पक्षांच्या वाढीला हातभार ८. ९७% पर्यंत आयकर. काळ्या पैशाला हातभार. ९. संविधानाची मोडतोड. खूप सॉलिड काँट्रिभ्युशन आहे राव...

In reply to by पुंबा

श्रीगुरुजी 21/11/2016 - 15:32
इंदिरा गांधींनी आपल्या हयातीतच घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले. पूर्वी नेहरूंच्या कारकीर्दीत इंदिरा गांधींचा प्रभाव फारसा नव्हता. परंतु नंतर स्वतःच्या कारकीर्दीत इंदिरा गांधींनी स्वतःच्या मुलांना (आधी संजय गांधी व नंतर राजीव) पक्षाच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेत स्थान दिले व ती उच्च परंपरा नंतर पक्षातील सर्वांनीच सुरू केली व इतर बहुतेक पक्षांनी त्याचे अनुकरण केले. म्हणूनच सद्या सोनिया पक्षाध्यक्ष तर चिरंजीव राहुल उपाध्यक्ष, मुलायम पक्षाध्यक्ष तर चिरंजीव अखिलेश मुख्यमंत्री इ. फळे दिसत आहेत.

In reply to by अनुप ढेरे

गॅरी ट्रुमन 21/11/2016 - 11:33
बरेचसे मुद्दे मान्य. नेहरूंच्या काळात राजकारणात काही प्रमाणात तरी नैतिकतेला महत्व होते. ते इंदिरांच्या काळात बर्‍याच अंशी लयाला गेले. पण
८. ९७% पर्यंत आयकर.
९७% मार्जिनल टॅक्स रेट हा १९७३-७४ या वर्षात लावण्यात आला होता. त्या वर्षी सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ताही देण्यात आला नव्हता.याचे कारण १९७१ मध्ये जवळपास एक कोटी बांगलादेशी निर्वासित आले होते त्यामुळे सरकारचा खर्च वाढला होता, तसेच पुढे १९७१ चे बांगलादेश युध्द, १९७३ मध्ये मध्यपूर्वेतील युध्द आणि गोल्ड स्टँडर्ड बंद होणे इत्यादींमुळे आलेली अनिश्चितता हे होते. पण १९७६-७७ मध्ये तो दर सी.सुब्रमण्यम अर्थमंत्री असताना ६६% पर्यंत खाली आणला गेला. याविषयी अधिक इथे . १९८० पर्यंत अगदी अमेरिकेतही ७०% इतका सर्वात जास्त आयकर होता.१९८० च्या दशकात अमेरिकेत रॉनाल्ड रेगन यांनी तो ५०% पर्यंत खाली आणला. त्याप्रमाणेच भारतातही १९८५-८६ मध्ये वि.प्र.सिंग अर्थमंत्री असताना तो ५०% पर्यंत खाली आणला होता. तेव्हा कदाचित इतका जास्त कराचा दर असणे त्या काळाची गरज होती किंवा फॅशन होती असे दिसते.

In reply to by गॅरी ट्रुमन

जॉनी 21/11/2016 - 23:27
गॅरी सर, काही प्रश्न 1.97 % टॅक्स म्हणजे मी कमावलेल्या 100 रुपयांमागे 97 रुपये टॅक्स भरायचा? 2.असं असेल तर हीच काळा पैसा वाढायची सुरवात म्हणता येईल का? 3.प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन 70 च्या दशकातच होतं का आपल्याकडे?

In reply to by जॉनी

गॅरी ट्रुमन 22/11/2016 - 10:54
1.97 % टॅक्स म्हणजे मी कमावलेल्या 100 रुपयांमागे 97 रुपये टॅक्स भरायचा?
य नव्हते. आज समजा वर्षाला ५ कोटीवरील उत्पन्नावर ९७% कर लावला तर ५.५ कोटी उत्पन्न असलेल्याला पहिल्या ५ कोटीवर जितका कर येईल तितका अधिक वरच्या ५० लाखच्या ९७% म्हणजे ४८.५ लाख इतका कर भरावा लागेल. त्यावेळी टॅक्सेशनच्या स्लॅब काय होत्या ते बघायला हवे. आंतरजालावर कुठेतरी माहिती मिळेलच.
2.असं असेल तर हीच काळा पैसा वाढायची सुरवात म्हणता येईल का?
नक्कीच. वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे ५ कोटीवरच्या उत्पन्नावर ९७% कर असेल तर कोणालाही ५ कोटीपेक्षा जास्त कमावायचा इन्सेन्टिव्ह राहणार नाही. त्यामुळे एकतर आपले उत्पन्न कमी दाखवून करचुकवेपणा करणे आणि ते जमत नसेल तर ५ कोटीच्या वर कमावायला जायच्या भानगडीत न पडणे हेच दोन मार्ग लोकांपुढे होते.
3.प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन 70 च्या दशकातच होतं का आपल्याकडे?
हो अगदी पहिल्यापासून प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन 22/11/2016 - 10:56
काही कारणाने पहिले वाक्य उडले. पहिले वाक्यः ९७% टॅक्स म्हणजे सर्वांना सरसकट ९७% कर असे नव्हते. तर ९७% हा सर्वाधिक कराचा दर होता. सर्वात कमी स्लॅब १०% होती आणि सर्वाधिक स्लॅब ९३% होती आणि विविध सरचार्ज इत्यादी मिळून तो ९७% पर्यंत जात असे.

मृत्युन्जय 21/11/2016 - 11:00
इंदिरा गांधी एक फार धडाडीची बाई. भारतीय राजकारणातले त्यांचे योगदान दुर्लक्षुन चालणार नाही. त्यांच्या कारकीर्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले गेले जे घेण्यासाठी निधडी छाती लागते. दुर्दैवाने त्यांची कारकीर्द जितक्य्या उल्लेखनीय गोष्टींनी झळाळली तितक्याच किंबहुना त्याहुन कैक पटींनी जास्त कलंकित निर्णयांनी झाकोळली गेली. खासकरुन ज्या लोकशाहीचा आपण गर्व बाळगतो त्याची सर्वात जास्त मोडतोड बाईंनीच केली. देशातली एकमेव हुकुमशाही त्यांच्या नावावर आहे. असे असताना त्यांची उज्ज्वल बाजु बघुन् त्यांचे गुणगान करावे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होतो.

गॅरी ट्रुमन 21/11/2016 - 14:35
दोन दिवसात रवींद्र म्हात्रे यांचं टॉर्चर केलेलं प्रेत सापडल्याची बातमी भारतात आली, आणि 4 दिवसात स्पेशल ऑर्डर काढून इंदिराजींनी मकबूल भट ला फासावर लटकावला!
मकबूल बटला इंदिरा गांधींनी असे तडकाफडकी फासावर लटकविले असे नेहमी म्हटले जाते. पण त्यात तितकेसे तथ्य नाही असे मला वाटते.लोकशाही पध्दतीत असे रविंद्र म्हात्रेंना मारले म्हणून मकबूल बटला असे तडकाफडकी फासावर लटकवायचा अधिकार पंतप्रधानांकडे नसतो. मकबूल बटला १९६६ (की १९६९) मध्ये अमीर चंद या जम्मू-काश्मीर पोलिसदलातील अधिकार्‍याची हत्या केल्याचा आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने आधीच फाशीची शिक्षा सुनावली होती.तो १९६८ मध्ये तुरूंगातून पळालाही होता आणि १९७१ मधल्या लाहोर विमान अपहरण प्रकरणात (लेखात उल्लेख केलेल्या) सहभागी होता. १९७४ मध्ये त्याला काश्मीरमध्ये परत पकडण्यात आले होते.त्याने राष्ट्रपतींकडे फाशीच्या शिक्षेसंदर्भात दयेचा अर्ज केलाही होता. तो अर्ज राष्ट्रपती झैलसिंग यांनी फेटाळला. इंदिरा गांधींनी सांगितले तर आपण झाडू मारायलाही तयार होऊ असे जाहिरपणे झैलसिंग यांनी म्हटले होते तेव्हा या बाबतीत झैलसिंग यांनी स्वतःच्या मताने निर्णय घेतला असायची शक्यता कमीच. कदाचित म्हात्रे हत्याप्रकरणामुळे इंदिरांनी झैलसिंगना दयेचा अर्ज फेटाळा असे सांगितले असेल तर त्याबद्दल इंदिरांना योग्य ते श्रेय द्यायलाच हवे. पण तरीही रविंद्र म्हात्रेंना काश्मीरी दहशतवाद्यांनी ठार मारले म्हणून ताबडतोब इंदिरांनी मकबूल बटला फासावर लटविले हे म्हणणे तथ्याला धरून नाही कारण त्याला फाशीची शिक्षा न्यायालयाने आधीच ठोठावली होती. २००४ मध्ये धनंजय चॅटर्जीला फाशी दिले होते त्यावेळी वाचल्याचे आठवते की फाशी द्यायची तयारी काही दिवस आधीपासूनच चालू होते. म्हणजे दोराला पिकलेली केळी चोळून कैद्याच्या मानेवरून तो सहजपणे स्लाईड होईल, तसेच कैद्याच्या वजनाचा आणि उंचीचा पुतळा घेऊन मॉक फाशी दिली जाते इत्यादी इत्यादी. या सगळ्याला काही दिवस जातात.रविंद्र म्हात्रेंचे अपहरण केले १ फेब्रुवारी १९८४ रोजी आणि त्यांचा मृतदेह सापडला ४ फेब्रुवारी १९८४ रोजी इंग्लंडमधील वेळेनुसार संध्याकाळी (म्हणजे भारतात रात्री). तर मकबूल भटला फाशी दिले ११ फेब्रुवारी १९८४ रोजी. शक्यतो फाशी पहाटेच दिले जाते. त्यामुळे म्हात्रेंची हत्या केली म्हणून मकबूल बटला फासावर चढवायचे असेल तर त्यासाठी ५ ते १० फेब्रुवारी हे ६ दिवसच होते.त्या ६ दिवसात सगळी तयारी करायला पुरेसा वेळ होता की मकबूल बटला फासावर लटकवायचा निर्णय आधीच झाला होता आणि त्यातच हे रविंद्र म्हात्रे प्रकरण घडले हे समजायला मार्ग नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

मृत्युन्जय 21/11/2016 - 14:48
ज्या तडफदारीने बाईंनी ते प्रकरण हाताळले त्याची प्रशंसा केलीच पाहिजे. " ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे.

In reply to by मृत्युन्जय

गॅरी ट्रुमन 21/11/2016 - 14:58
ज्या तडफदारीने बाईंनी ते प्रकरण हाताळले त्याची प्रशंसा केलीच पाहिजे.
हो बरोबर. जेवढे श्रेय द्येय आहे तेवढे द्यायलाच हवे. पण अनेकांंना असे वाटते की म्हात्रे प्रकरण घडले म्हणून मकबूल बटला फाशी दिली. प्रत्यक्षात मकबूल बटला फाशी अमीर चंद हत्या प्रकरणी दिली गेली. म्हात्रे प्रकरणानंतर सूत्रे जोरात हलली असतील तर त्याचे श्रेय इंदिरांना द्यायलाच हवे पण त्याचवेळी रविंद्र म्हात्रेंना मारले म्हणून मकबूल बटला इंदिरांनी फासावर लटकवले असे म्हटले जाते ते योग्य नाही इतकेच.
" ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे.
असणारच. असल्या उदारमतवाद्यांची किड भारताला फार पूर्वीपासून लागलेली आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

मोदक 21/11/2016 - 15:16
" ज्युडिशियल किलिंग " ची बोंबाबोंब तेव्हाही झाली होती असे ऐकुन आहे. असहिष्णुतेचा साक्षात्कार, पुरस्कार वापसी, अल्पसंख्यांकांच्या मतांची गळचेपी वगैरे प्रकार झाले नाहीत का नंतर..?

आणिबाणीचे समर्थन करताना आजही त्यांच्या पक्षाच्या लोकांची फेफे होते. १९७१ च्या पाकीस्तान युद्धावेळी भारतातील परदेशी तेल कंपन्यांनी मिलिटरीसाठी राखीव तेलसाठा उपलब्ध करुन देण्यास नकार दिल्यामुळे त्या तेल कंपन्यांचे इंदीरा गांधींनी राष्ट्रीयीकरण केले हे खरं आहे काय? ह्या तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केल्याने भारताचा फायदा झाला की तोटा? इंदीरा गांधींना खरंच आपल्या जीवाची पर्वा नव्हती असे त्यांच्या शेवटच्या भाषणातील हे वाक्य ऐकल्यावर वाटते.

In reply to by मार्मिक गोडसे

इंदीरा गांधींना खरंच आपल्या जीवाची पर्वा नव्हती असे त्यांच्या शेवटच्या भाषणातील हे वाक्य ऐकल्यावर वाटते.

गामा पैलवान 21/11/2016 - 18:51
लोकहो, इंदिरा गांधींचं विवाहपश्चात नाव मैमुना बेगम होतं हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोज खान होतं. मोहनदास करमचंद गांधींनी त्याला स्वत:चं आडनाव घेयायची सूचना केली होती! सत्याचे मेरुमणीच जणू!! सांगायचा मुद्दा काये की नेहरू-गांधी घराणं मुळातून मुस्लिम असून नावालाच हिंदू आहे. १९७१ साली बांगलादेशच्या युद्धात भारताने पाकिस्तानची ९३००० डुकरं कैद केली होती. त्यांना पोटंभर बिर्याण्या चारून परत पाठवण्यामागे काय कारण असेल ते लक्षात आलं असेलंच. विनोबा भाव्यांनी आणीबाणीला पाठींबा दिला तो गोहत्याबंदीच्या आश्वासनावर विसंबून. अर्थात मैमुनाबाईंनी नंतर विनोबांच्या तोंडाला पानं पुसलीच. कारण लक्षात आलं असेलंच. १९८० सालानंतर बाईसाहेबांनी अकाली दलाला शह देण्यासाठी भिंद्रनवाल्याला वर चढवण्याचं धोरण पत्करलं. मात्र त्यातून त्याने सुवर्णमंदिराचा कब्जा घेतला. आता परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून सुवर्णमंदिरात सैन्य घुसवलं. सैन्य धाडण्याबद्दल आक्षेप नाही, पण जो दिवस निवडला त्या दिवशी सणासुदीची गर्दी होती. त्यामुळे निरपराध भाविकांची नृशंस कत्तल झाली. तिथे लालफुल्लीसही प्रवेश नव्हता. तुलनेने कमी गर्दीचा दिवस का निवडला नाही यामागील कारण लक्षात आलं असेलंच. येथपर्यंत आपण इंदिरा गांधींच्या मुस्लिम पार्श्वभूमीमुले हिंदूंची झालेली हानी बघितली. आता एक वेगळा परिणाम बघूया. लोकहो, इंदिरा गांधींचं विवाहपश्चात नाव मैमुना बेगम होतं हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोज खान होतं. मोहनदास करमचंद गांधींनी त्याला आपलं स्वत:चं आडनाव देऊ केलं! सत्याचे मेरुमणीच जणू!! सांगायचा मुद्दा काये की नेहरू-गांधी घराणं मुळातून मुस्लिम असून नावालाच हिंदू आहे. १९७१ साली बांगलादेशच्या युद्धात भारताने पाकिस्तानची ९३००० डुकरं कैद केली होती. त्यांना पोटंभर बिर्याण्या चारून परत पाठवण्यामागे काय कारण असेल ते लक्षात आलं असेलंच. तसंच युद्धानंतर पूर्व बंगाल भारतात समाविष्ट व्हायला हवा होता. त्याऐवजी बांगलादेश हा वेगळा देश म्हणून का उदयाला आला याचं कारणही कळलं असेलंच. विनोबा भाव्यांनी आणीबाणीला पाठींबा दिला तो गोहत्याबंदीच्या आश्वासनावर विसंबून. अर्थात मैमुनाबाईंनी नंतर विनोबांच्या तोंडाला पानं पुसलीच. कारण लक्षात आलं असेलंच. १९८० सालानंतर बाईसाहेबांनी अकाली दलाला शह देण्यासाठी भिंद्रनवाल्याला वर चढवण्याचं धोरण पत्करलं. मात्र त्यातून त्याने सुवर्णमंदिराचा कब्जा घेतला. आता परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून बाईंनी सुवर्णमंदिरात सैन्य घुसवलं. सैन्य धाडण्याबद्दल आक्षेप नाही, पण जो दिवस निवडला त्या दिवशी सणासुदीची गर्दी होती. त्यामुळे निरपराध भाविकांची नृशंस कत्तल झाली. तिथे लालफुल्लीसही प्रवेश नव्हता. तुलनेने कमी गर्दीचा दिवस का निवडला नाही यामागील कारण लक्षात आलं असेलंच. येथपर्यंत आपण इंदिरा गांधींच्या मुस्लिम पार्श्वभूमीमुळे हिंदूंची झालेली हानी बघितली. आता एक वेगळा परिणाम बघूया. 'आम्हाला ५००० वर्षांचा विजयाचा इतिहास आहे' हे बाईंचं युद्धापूर्वीचं वक्तव्य मोठं महत्त्वपूर्ण आहे. हिंदूंचा पाठींबा मिळावा म्हणूनच उच्चारलेलं आहे याबद्दल शंका नाही. मात्र याचा पाकिस्तानवर विपरीत परिणाम झाला. एका मुसलमान बाईला हिंदूंचा इतिहास आपलासा वाटतो, आणि हीच बाई पुढे पाकिस्तानाचा तुकडा पाडून हिंदूंना विजय मिळवून देते. हा वेगळ्या पाकिस्तानच्या संकल्पनेवर झालेला मर्माघात आहे. आपली मुळं नक्की कशात आहेत याचं उघड व/वा छुपं विचारमंथन पाकिस्तानात सुरू झालं असावं. भुत्तो सत्तेवर होता तोवर त्याने दुर्लक्ष केलं, पण झिया सत्तेवर आल्यावर त्याला निर्णय घेणं भाग पडलं असावं. त्यातून पाकिस्तान्यांनी आपली मुळं अरबांमध्ये शोधायचा प्रयास केला असावा असं दिसतंय. अल-बाकीस्तान मागे अप्रत्यक्षरीत्या मैमुना बेगम कारणीभूत ठरल्या असाव्यात. असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 21/11/2016 - 19:03
वाचकहो, वरील प्रतिसादातला काही भाग कापला जाऊन सुरुवातीस परत चिकटला आहे. हे कशामुळे झालं ते माहित नाही. बहुतेक प्रतिसाद पूर्ण करतांना बराच खंड पडला. तस्मात सांभाळून घ्यावे ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वटवट 21/11/2016 - 20:39
गा. पै... फार मोठा घाव घातला आहे आपण, मुळावरच... आता येतीलच मुघल...

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 21/11/2016 - 21:46
तुमच्यासारखे लोक अवतीभवती असतांना हुशार न होऊन कसं व्हईल... ??? =)) उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे प्रत्यक्ष होऊन गेलेल्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याबद्दलच्या तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल पुरावे मागतात काय हे पाहणे रोचक असेल. म्हणजे कसे, मलाही 'विश्वासार्ह' माहीती मिळेल ना! =))

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान 21/11/2016 - 23:09
संदीप डांगे, अगदी बरोबर बोललात पहा. आता हेच बघा ना, मैमुना बेगम नावाच्या मुसलमान स्त्रीस हिंदूंचा गौरवशाली इतिहास आपलासा वाटतो. त्यामुळे ती पाकिस्तानला पराभूत करून त्याचे दोन तुकडे करते. यावरून हिंदू धर्माच्या सहवासाची महती कळते. माझ्या सहवासात राहून तुमची हुशारी वाढली आहे, ती याच धर्तीवर बरंका. ही वार्ता संतोषजनक आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती चालू राहू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विजुभाऊ 28/12/2016 - 20:39
ना, मैमुना बेगम नावाच्या मुसलमान स्त्रीस हिंदूंचा गौरवशाली इतिहास आपलासा वाटतो. त्यामुळे ती पाकिस्तानला पराभूत करून त्याचे दोन तुकडे करते. यावरून हिंदू धर्माच्या सहवासाची महती कळते.
यावरुन गामा यांचे डोके ठिकाणावर नाही किंवा ते सनातनी झालेले असावेत अशी खात्री पटायला लागली आहे. इतके मूर्खासारखे विधान करत सुटला आहात की पुरावे वगैरे गोष्टी तुमच्यासाठी कधीच महत्वाच्या नसतात हे ओघाने आलेच. बाकी या तोडलेल्या अकलेच्या तार्‍यांपुढे नभाम्गणही फिक्के पडेल

In reply to by संदीप डांगे

प्रदीप 22/11/2016 - 13:56
उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारे प्रत्यक्ष होऊन गेलेल्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याबद्दलच्या तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल पुरावे मागतात काय हे पाहणे रोचक असेल. अन्यत्र, वेगळ्या संदर्भात तुमच्या विधानापुष्ट्यर्थ काही पुरावे तुम्हाला काही जणांनी मागितले, त्यांनी डोळ्यात तेल घालून, मिपावर ठणठणपाळासारखे वावरले पाहिजे, आणि कुणीही कसलीली विधाने केली म्हणजे पुरावे मागितलेच पाहिजेत, हे काही समजत नाही. इथे तुम्ही मागताय ना? मग तेव्हढे पुरेसे आहे की! आणि गामांनी तसे दिले नाहीत, तर त्यावरून काय जो निष्कर्ष काढायचा, तो सर्व वाचक काढतीलच की!

In reply to by संदीप डांगे

प्रदीप 22/11/2016 - 14:24
'समजले नाही' असे मी केवळ औधत्य टाळण्यासाठी म्हटले होते. तुमचे 'लॉजिक' गंडले आहे, असे म्हणायचे होते. असो. तुमचे चालूंदे.

In reply to by गामा पैलवान

तुमच्या आवडत्या पक्षाच्या पंतप्रधान नाहीत म्हणून काहीही 'बेसलेस' लिहित सुटायचे का ? भारताच्या शत्रूराष्ट्राचे २ तुकडे करण्यात यांचे योगदान फार मोठे आहे. बाकी, फिरोज गांधी पारशी होते आणी उत्कॄष्ट संसदपटू होते. त्यांची उत्तर क्रिया सुद्धा बहुधा अलाहाबाद येथे पारशी स्मशानात झाली आहे. इंदिराजी मोदींपूर्वीच्या सर्वात धडाडीच्या पंतप्रधान असाव्यात.

In reply to by गामा पैलवान

विजुभाऊ 28/12/2016 - 20:35
इंदिरा गांधींचं विवाहपश्चात नाव मैमुना बेगम होतं हे सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या नवऱ्याचं नाव फिरोज खान होतं
हे सर्वात मोठ्ठे विनोदी विधान आहे. सनातनी लोकानी वारंवार केलेल्या धादांत खोट्या विधानामुळे हल्ली लोकांना हे ठार खोटे विधान खरे असावे अशी शंका येतेय.

पुंबा 22/11/2016 - 11:38
मॅकीयव्हॅलीच्या स्वप्नातील प्रिन्सला इंदिराजी हे भारतीय उत्तर आहे असे वाटते. अफाट लोकप्रियता, वचक त्याचबरोबर realpolitic ची समज या बळावर इंदिरा गांधींनी भारतावर अक्षरश: राज्य केले. माझ्या मते, त्यांचे भारताच्या प्रगतीसाठीचे सर्वात मोठे योगदान: बांगला देश युद्ध आणि operation ब्लू स्टार आणि हरित क्रांती

In reply to by पुंबा

शब्दशः सहमत मला सुद्धा इंदिरा नाव ऐकले की पहिले निकोलो मॅकियावेली आठवतो अन द प्रिन्स सुद्धा

आणीबाणी आणि जोरजबरदतीचे राजकारण असे काळे डाग असले तरी त्याबरोबरच इंदिराजींचे भारतीय राजकारणातले भारतासाठी असलेले सकारात्मक भागही मानावेच लागतील... १. केवळ नेहरूंची मुलगी या सर्टिफिकेटवर नाहि तर काँग्रेसमधल्या जुन्या धेंडांना धूळ चारून त्या सत्तेवर आल्या होत्या. त्यांनी "मी नेहरूंची मुलगी आहे. त्यांनी देशासाठी किती त्याग केला होता पहा. म्हणुन मला मते किंवा महत्व द्या." अशी भीक मागितली नाही. २. १९७१ च्या बांगलादेश युद्धाअगोदर जगभर फिरून 'पाकिस्तानच्या क्रूर कारवाया व त्यामुळे भारतात येणारे विस्थापित' यामुळे ते युद्ध कसे अटळ आहे हे महत्वाच्या देशाना पटवून देण्यात त्यांनी जी मुत्सद्दीगिरी दाखवली होती ती अप्रतिम होती यात शंका नाही. ३. ते झाल्यावर, प्रत्यक्ष युद्ध छेडण्याचा आदेश देण्यात दाखवलेला राजकिय इच्छाशक्तीचा कणखरपणाही प्रशंसनीय होता. या वरच्या गोष्टींमुळे काही काळ तरी भारतिय लोकांना अभिमान आणि परदेशात भारताबद्दल अभिमानाची जाणीव निर्माण झाली होती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुंबा 22/11/2016 - 15:09
मला वाटतं बऱ्याच प्रमाणात इंदिराजींचं version of secularism खूप चांगलं होतं. अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन करणं हा भाग यात नव्हता, म्हणजे ब्लू स्टारच्या वेळेला सुवर्णमंदिराच्या ऐवजी मशीद असती तरीही त्यांनी तोच निर्णय घेतला असता. शिवाय उगाचच ममता बनर्जींसारखी मुस्लिमांच्या समोर जाताना ओढणी ओढ वगैरे प्रकार नसत. ते चंद्रास्वामी वगैरे प्रकार होते म्हणा. पण, तुमच्या शीख अंगरक्षकांना बदला असा सल्ला दिला असता 'aren't we all secular' असे उत्तर देणे मला तरी ग्रेट उदाहरण वाटते.

In reply to by पुंबा

श्रीगुरुजी 22/11/2016 - 15:28
असहमत. इंदिरा गांधींची धर्मनिरपेक्षता म्हणजे काँग्रेसच्या इतर नेत्यांप्रमाणे मुस्लिम लांगूलचालनच होते. १९७० च्या दशकात एकदा सौदी अरेबियात मुस्लिम राष्ट्रांची कसलीतरी परीषद होती. भारताचा त्या परीषदेशी काहीही संबंध नसताना, भारतात मुस्लिमांची संख्या बरीच जास्त आहे हे कारण पुढे करून इंदिरा गांधींनी निमंत्रण नसताना सुद्धा आपला प्रतिनिधी त्या परीषदेला पाठविला होता. त्याला पाकिस्तानने आक्षेप घेऊन बराच आरडाओरडा केल्यावर भारताच्या प्रतिनिधीला परीषदेत सहभागी होऊन न देता निरीक्षक असे स्थान देऊन परीषदेला उपस्थित राहून दिले होते. फक्रुद्दिन अली अहमद यांच्या सारख्या सामान्य व्यक्तीला राष्ट्रपती बनविण्याचे काम इंदिरा गांधींचेच होते. महाराष्ट्रात सुद्धा अंतुलेच्या रूपाने मुस्लिम मुख्यमंत्री लादण्याचे काम इंदिरा गांधींचेच. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळी सुवर्णमंदीराच्या ऐवजी मशीद असती तर इंदिराजींनी तिथे सैनिक कधीच पाठविले नसते. मुळात ऑपरेशन ब्लू स्टार जून १९८४ मध्ये केले त्यामागे शीख अतिरेक्यांना हुसकून लावण्याऐवजी डिसेंबर १९८४ मधील लोकसभा निवडणुक इंदिरा गांधींच्या डोळ्यासमोर होती. १९७९ मध्ये बिहारमधील पांडे बंधूंनी ईंडिअन एअर लाईन्सच्या विमानाचे अपहरण करून ते श्रीनगरला नेले होते व इंदिरा गांधींवरील खटले काढून टाकावेत अशी त्यांची मागणी होती. याच पांडे बंधूंविरूद्ध कोणताही खटला दाखल न करता इंदिरा गांधींनी त्यांना बिहार राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री केले होते. १९७१ मधील नगरवाला प्रकरणसुद्धा इंदिरा गांधींच्या कारकीर्दीतच घडले होते. दिल्लीतील स्टेट बँकेला एक दिवस अचानक एक फोन आला. फोन करणार्‍याने आपण पंतप्रधान कार्यालयातून बोलत असून इंदिराजींना तातडीने ६० लाख रूपये हवे असल्याचे सांगितले. काही वेळाने नगरवाला नामक व्यक्ती येऊन ६० लाख रूपये घेऊन गेला. तो माणूस व ६० लाख रूपये आजतगायत सापडलेले नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

मोदक 22/11/2016 - 17:11
१९७९ मध्ये बिहारमधील पांडे बंधूंनी ईंडिअन एअर लाईन्सच्या विमानाचे अपहरण करून ते श्रीनगरला नेले होते व इंदिरा गांधींवरील खटले काढून टाकावेत अशी त्यांची मागणी होती. याच पांडे बंधूंविरूद्ध कोणताही खटला दाखल न करता इंदिरा गांधींनी त्यांना बिहार राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री केले होते. बिहार नाय वो... उत्तर प्रदेश. १९७१ मधील नगरवाला प्रकरणसुद्धा इंदिरा गांधींच्या कारकीर्दीतच घडले होते. दिल्लीतील स्टेट बँकेला एक दिवस अचानक एक फोन आला. फोन करणार्‍याने आपण पंतप्रधान कार्यालयातून बोलत असून इंदिराजींना तातडीने ६० लाख रूपये हवे असल्याचे सांगितले. काही वेळाने नगरवाला नामक व्यक्ती येऊन ६० लाख रूपये घेऊन गेला. तो माणूस व ६० लाख रूपये आजतगायत सापडलेले नाहीत. इथे काहीतरी वेगळी माहिती आहे गुरूजी.. - https://en.wikipedia.org/wiki/1971_Nagarwala_scandal

In reply to by मोदक

श्रीगुरुजी 23/11/2016 - 14:16
बिहार नाय वो... उत्तर प्रदेश.
बरोबर. ते उत्तर प्रदेशचे होते.
इथे काहीतरी वेगळी माहिती आहे गुरूजी.. - https://en.wikipedia.org/wiki/1971_Nagarwala_scandal
विकिपिडीआच्या माहितीवर पूर्ण भरवसा ठेवता येत नाही. हे प्रकरण जवळपास ४५ वर्षांपूर्वी घडल्याने याविषयी फारशी माहिती प्रसिद्ध झालेली नाही.

lakhu risbud 22/11/2016 - 15:12
७१ चे युद्ध जिंकले असताना, ९३ हजार युद्धकैदी पकडले असताना पाकिस्तान नावाच्या कर्करोगाचे मुळातून निर्दालन करता आले असते. Demilitarisation आणि काश्मीर प्रश्नाचे भारतासाठी समाधानकारक उत्तर मिळवता असते, ते न करता सिमला कराराचे हाडूक मात्र गळ्यात अडकून घेतले.या मुद्द्यांवर चर्चा होताना का दिसत नाही ते इंदिराजींनाच ठाऊक असावे बहुधा.

बोका-ए-आझम 22/11/2016 - 15:59
आर्थिक निर्णयांबद्दलही बोलावे. MRTP (Monopolies and Restrictive Trade Practices) नामक एक महाभयंकर (draconian) आर्थिक कायदा आणण्याचं श्रेयही त्यांच्याच नावावर आहे. या कायद्याचा हेतू हा कुठल्याही उद्योगाला मक्तेदारी किंवा monopoly बनण्यापासून रोखणं हा होता, पण त्यामागचं तर्कशास्त्र फार अजब होतं. समजा बजाज आॅटोच्या एका प्लँटची क्षमता दिवसाला १,००,००० स्कूटर्स बनवायची आहे, तर बजाज आॅटो बाजारात मक्तेदारी निर्माण करु शकते. साधं अार्थिक तर्कशास्त्र वापरलं गेलं नाही, की निव्वळ उत्पादन करुन कुणीही मक्तेदारी बनू शकत नाही. त्यासाठी ते बाजारात विकलंही गेलं पाहिजे. पण निव्वळ उत्पादन करण्याच्या क्षमतेवरुन हे ठरवलं गेलं आणि अशा कंपन्यांना कोटा ठरवून देण्यात आला. परिणामी त्यांची वाढ खुंटली. त्यांना जर इतरत्र कुठे प्लँट काढायचा असेल तर सतराशेसाठ परवानग्या. त्यातून भ्रष्टाचार वाढला. धीरूभाई अंबानींसारख्या लोकांनी यात स्वतःचा फायदा करुन घेतला. कंपन्यांनी किती भांडवल उभारावं यावर नियंत्रण आलं. सर्वात मोठा तोटा म्हणजे खाजगी क्षेत्रातलं job creation थंडावलं. आणि हे सगळं समाजवदाच्या आणि गरिबी हटाओ च्या नावावर बरं का!राजीव गांधींनी आणि त्यांचे पहिले अर्थमंत्री (आणि नंतर विरोधक आणि प्रतिस्पर्धी) विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्यात थोडीशी सुधारणा केली, पण १९९१ चं नरसिंह राव- मनमोहन सिंग कृत उदारीकरण सुरु होईपर्यंत त्यात काही ठोस सुधारणा झाल्याच नव्हत्या. मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून तितकेच जबरदस्त होते जितके पंतप्रधान म्हणून निष्प्रभ होते. MRTP ची उचलबांगडी होऊन Competition Act आला, ज्याने अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. आणि हे सगळं इंदिरा गांधींनी केव्हा केलं - जेव्हा दुष्काळाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती आणि उत्पादन वाढवण्याची गरज होती तेव्हा. नेहरूंच्या सरकारने अर्थव्यवस्थेत ढवळाढवळ सुरु केली होती, पण खाजगी क्षेत्राला स्वातंत्र्य होतं. इंदिरा गांधींनी ते स्वातंत्र्य काढून घेतलं. आणि का - तर आपले समाजवादी credentials दाखवून त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी. एक प्रकारे काँग्रेसने उदारीकरणाचं धोरण आणणं हा काव्यगत न्याय होता, कारण आपली अर्थव्यवस्था हा जो mess झाला होता त्याला निस्तरणं ही नक्कीच काँग्रेसची जबाबदारी होती. तेही डाॅ.सिंग यांच्यासारख्या non-political अर्थमंत्र्यामुळे शक्य झालं. त्याबद्दल पी.व्ही.नरसिंहराव या माणसाचं ऋण या देशाने मानलं पाहिजे.

मिल्टन 22/11/2016 - 16:46
कोटा राजचे कारण होते की विविध रिसोर्सेसची टंचाई असताना एखाद्या कंपनीने जास्त रिसोर्सेस वापरले तर इतर कंपन्यांना कमी रिसोर्सेस वापरायला मिळतील आणि त्यातून इतरांची अडचण होईल. कोटा राज नेहरूंच्या काळातही होते. १९५६ च्या औद्योगिक धोरणात खाजगी कंपन्यांना परमिट लागेल आणि उत्पादन वाढवायचे 'लायसेन्स' जर त्या वाढलेल्या उत्पादनाची देशाला गरज असेल तरच देण्यात येईल असे म्हटले होते. म्हणजे एका अर्थी अमुक एका मर्यादेपेक्षा उत्पादन करण्यावर बंदीच होती आणि त्याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे टंचाई हे असावे. प्रश्न इतकाच की इंदिरा गांधींच्या काळापर्यंत तितकी टंचाई राहिली होती का? तसे असेल तर इंदिरांनाच लायसेन्स-परमीट-कोटा राज कमी करता आले असते. किंबहुना त्यांनी ते कसे करायला हवे होते हे गुरचरण दास यांच्या इंडिया अनबाऊंड सारख्या पुस्तकात म्हटलेही आहे. त्याउपर इंदिरांनी एम.आर.टी.पी सारखा कायदा आणलाच पण अनेक उद्योगांमध्येही सरकारचे स्थान वाढविले. कुठल्यानाकुठल्या कारणावरून राष्ट्रीयीकरण करणे हा तर स्वातंत्र्योत्तर भारतात स्थायिभाव होताच. खाजगी विमा कंपन्यांमध्ये भ्रष्टाचार चालतो म्हणून नेहरूंच्या काळात विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण झाले. इंदिरांनी 'सामाजिक न्याय' या गोंडस नावाखाली बँकांचे राष्ट्रीयीकरण केले हे वर लिहिलेच आहे. कोळसा कंपन्या कामगारांचे शोषण करतात म्हणून कोळसा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले आणि कोल इंडिया लिमिटेड स्थापन केली.त्याचबरोबर वीजनिर्मिती क्षेत्रात त्यापूर्वी राज्य सरकारे असायची पण १९७० च्या दशकात केंद्रही त्यात आले आणि एन.टी.पी.सी, एन.एच.पी.सी इत्यादी कंपन्यांची स्थापना झाली. इंदिरांच्याच काळात १९६७ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. हीच कंपनी पूर्वीच्या काळी असलेला "इसी" टिव्ही बनवत असे. इंदिरांच्या काळात सरकारचा हस्तक्षेप सगळ्या क्षेत्रात वाढलाच आणि अचानक राष्ट्रीयीकरण होऊ शकेल ही भिती entrepreneurial spirit ला नक्कीच मारक होती. एकूणच इंदिरांची कारकिर्द म्हणजे आर्थिक आघाडीवर एक "वाया गेलेला काळ" होता.

गॅरी ट्रुमन 22/11/2016 - 17:05
तेरा दिवसात पाकिस्तान ला पाणी पाजून भारतीय सेना विजयी झाली आणि नवा बांगलादेश जन्माला आला.
बांगलादेश युध्दाविषयी मला नेहमी एक प्रश्न पडतो.१९७१ चे युध्द होणे क्रमप्राप्तच होते. किंबहुना ते युध्द व्हावे या दृष्टीनेच इंदिरांची पावले पडत होती. आता पश्चातबुध्दीने वाटते की आपण तसे करायला नको होते. पाकिस्तानने हल्ला केला तर तो परतावून लावायची क्षमता आपल्याकडे नक्कीच होती. युध्द आपण नुसता हल्ला परतावून लावण्यापुरते सिमीत ठेवले असते आणि पूर्वेत थेट ढाक्क्यापर्यंत घुसून बांगलादेश निर्माण केला नसता तर बरे झाले असते. तशीही बांगलादेशातील जखम ठसठसत होतीच आणि १९७१ नाही तर कदाचित १९७६-१९७७ पर्यंत बांगलादेश वेगळा झालाच असता. पण पाकिस्तानच्या अंगातील ती जखम आणखी काही काळ ठसठसत राहिली असती तर ते आपल्याला चांगले झाले असते. त्याऐवजी झाले असे की पूर्व पाकिस्तान ही शत्रूच्या अंगातील कॅन्सरची गाठ कापून देण्यात आपण मदत केली. त्यापेक्षा ती कटकट पाकिस्तानच्या डोक्याला आणखी काही वर्षे लागली असती तर बरे झाले असते. त्यावेळी हे इंदिरांच्या लक्षात आले नसेल असे वाटत नाही.पण एक सामान्य माणूस आणि १९७१ मध्ये पडद्यामागे नक्की काय चालू होते याची केवळ विविध लेखांमधून माहिती मिळवून एक पश्चातबुद्धी म्हणून मला हे नक्कीच वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

जॉनी 22/11/2016 - 18:57
पाक सैनिकांच्या दडपशाही ला कंटाळून हजारो निर्वासित भारतात येत होते. हे एक कारण म्हणून पुढे येतं. अर्थात नंतर हि ते येत राहिलेच म्हणा..

In reply to by गॅरी ट्रुमन

गामा पैलवान 22/11/2016 - 19:21
गॅरी ट्रुमन, बांगलादेश वेगळा काढायचं एक (माझ्या मते महत्त्वाचं) कारण म्हणजे अमेरिकेचा हिंदी महासागरात वावर वाढला होता. तसंच चीनही पाकिस्तानस मदत करंत होता. जर पूर्व पाकिस्तान तसाच राहू दिला असता तर भारतीय नौदलास पूर्व बंगालच्या सागरी सीमा पाळाव्या लागल्या असत्या. बांगलादेश वेगळा झाल्याने त्याच्याशी स्वतंत्र करार करून भारतीय नौदलास बंगालचा उपसागर मोकळा मिळवून दिला. हे युद्ध भारत विरुद्ध पाक एव्हढंच सीमित नाही. अमेरिका आणि चीन दोन्हींना एकत्रितरीत्या पराभूत केलं गेलं आहे. इंदिरा गांधींना आंतरराष्ट्रीय राजकारणाची खोलवर जाण होती. आ.न., -गा.पै.

In reply to by गॅरी ट्रुमन

बोका-ए-आझम 23/11/2016 - 16:59
जनरल झिया-उल-हक यांनी पाकिस्तानचं इस्लामीकरण केलं. तारेक फतेह यांच्या म्हणण्यानुसार ते भुत्तोंच्या तुलनेने उदारमतवादी विचारसरणीला उत्तर म्हणून झियांनी राबवलं कारण भुत्तोंच्या अशा धोरणामुळे पराभव झाला असं त्यांना हेतुपुरस्सर पसरवायचं होतं. अाय.एस.आय. चा वापर करुन भारतात अशांतता माजवणं झियांच्या काळात अजून आक्रमकरीत्या सुरु झालं. पंजाब आणि काश्मीर ही दोन उदाहरणं. याला भुत्तो सिंधी आणि झिया पंजाबी असल्याचाही पैलू आहे. १९७१ च्या निर्णायक पराभवामुळे पाकिस्तान covert operations कडे वळला असं आज आपण म्हणू शकतो. त्यावेळी अर्थातच इंदिरा गांधींच्या मनात असा विचार आला नसावा. नाहीतर भिंद्रनवाले नावाचा भस्मासूर त्यांनी निर्माण केला नसता.

गामा पैलवान 28/12/2016 - 23:41
विजुभाऊ,
इतके मूर्खासारखे विधान करत सुटला आहात की पुरावे वगैरे गोष्टी तुमच्यासाठी कधीच महत्वाच्या नसतात हे ओघाने आलेच.
मी मूर्ख आहे तर काय झालं. तुम्ही शहाणे आहात ना! मग तुमच्या शहाण्या मेंदूस कामाला लावा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या : १. फिरोझ गांधींची कबर हे काय प्रकरण आहे? पारशी लोकांत कबर बांधतात का? २. अलिगड मुस्लिम युनिव्हार्सिटीत विद्यार्थिनींसाठी इंदिरा गांधी हॉल आहे. इंदिरा गांधी मुस्लिम असल्याशिवाय कोणी हे नाव ठेवेल का? ३. संजय गांधीची सुंता झाली होती. (संदर्भ : जॉन मथाई यांचं पुस्तक) तर सुंता कोणत्या पंथात करतात? ४. मी एका हिंदूशी लग्न करायचा विचारही करू शकंत नाही. - इति इंदिरा गांधी. संदर्भ : जॉन मथाई यांचं पुस्तक. इंदिरा गांधीला हिंदूशी विवाह करण्यात कसला कमीपणा वाटंत होता? तूर्तास इतकं पुरे. आ.न., -गा.पै.

'गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है.' माजी पंतप्रधान इंदिराजी यांचा आज जन्मदिवस. यानिमित्तानं त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडंसं... कित्येक वर्षं नेहरूंची मुलगी यापेक्षा वेगळं स्थान नव्हतंच इंदिराजींचं. गुंगी गुडीया वगैरे म्हणायचे त्यांना. आणि बरंच तथ्य पण होतं त्यात. केरळ सरकार खाली खेचणं सोडलं तर अत्यंत साधारण असाच कार्यकाळ राहिला होता त्यांचा. झंझावाती कारकिर्दीला सुरवात झाली 70-71 साली. जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला.

जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स !

जॅक डनियल्स ·

In reply to by आदूबाळ

जॅक डनियल्स 15/11/2016 - 07:04
डिस्टीलरीमध्ये गुप्त राखण्यासारखे काही नाही. पण बहुतेक safety च्या आणि contamination च्या भीतीनी टूरमध्ये दाखवत नसतील. माझा एक मित्र तिकडे काम करायचा intern म्हणून तो म्हणलेला खूप lastest कंट्रोल system आहे जेडी प्लांट ची.

गवि 14/11/2016 - 08:22
मस्त लेख.. चारकोल नाकात दरवळून गेला. पण कोक? छ्या... डॅनियलअंकलनी इतक्या वेगवेगळ्या नोट्स त्यात आणल्या आणि नाकाला त्याचा पूर्ण फील देण्याऐवजी कोकाकोला मिसळला?

In reply to by गवि

जॅक डनियल्स 14/11/2016 - 08:51
ज्याक आणि कोक हे टेनसी मधले famous cocktail आहे. त्यामुळे सुरूवातीला काही दिवस ते चाखून नंतर फक्त बर्फावर आलो. तसेच आम्ही 8 वाजता आत जाऊन 3 am बाहेर पडायचो त्यामुळे कोक शुद्धीत ठेवायला मदत करायचा.

खुद्द पुण्यात असताना जॅक डॅनियल म्हणजे प्राइझ्ड प्रकरण होते. कोणाचा मित्र ऑन साईट जातोय त्याने ती तुंबा भरून जॅक आणणे मग एक पार्टी जॅक स्पेशल त्या पार्टी मध्ये जॅक नीट न पिल्यामुळे मित्रांनी एकमेकांना 'तू गावठी बेवडा आहेस' वगैरे चिडवणे असे सगळे धार्मिक कार्यक्रम होत असत. नंतर मात्र चॉईसेस्ट आयरिश अन स्कॉटिश स्पिरिट्स सोबत ओळख वाढली तशी जॅक वेड कमी झाले, स्पाय साईड किंवा आईल साईड स्पिरिट्स वर चर्चा झडू लागल्या, बेलीज आयरिश क्रीम किंवा ग्लेनफिडीच ग्लेनमोरेंज पैकी सोवळे काय ह्यावर जास्त(च) खल होऊ लागला देवा. अशात अगदी शिवास रिगल किंवा जॉनी वाकर सुद्धा तितक्याश्या अपील होत नसत त्यात गरीब बिचाऱ्या जॅकला कोण पुसणार, तरीही तरुणपणाचा मद्यपानाचे प्राथमिक एटिकेट्स अन रॉयल ड्रिंकिंगचे आद्य धडे देणारा साथी म्हणून जॅक कायम आठवणीत राहील

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जॅक डनियल्स 15/11/2016 - 07:13
ज्या बार मध्ये प्यायचो तिकडे सगळ्या अमेरिकन व्हिस्की होत्या, आणि अमेरिकन व्हिस्की टेनसी मध्ये कंट्री लोकांबरोबर प्यायची मजा जास्त यायची. त्यामुळे जेडी, केंटकी बर्बन - जिम बीम, बेसल हैदन इ. मधेच मन रमले म्हणून आत्ता सिंगल माल्ट कडे कधी वळीन असे वाटत नाही. काटाकिर मिसळची तल्लफ लागली की बेडकर आवडत नाही तसे ..दोन्ही ही आपल्यापरीने सर्वश्रेष्ठ पण तल्लफ एकाचीच लागते !

In reply to by जॅक डनियल्स

चियर्स ब्रदर, एन्जॉय सेफली स्टे सेफ रॉक ऑन!! अमेरिकन व्हिस्की सुद्धा उत्तमच असतात, रच्याकने कधी प्रॉपर चिल्ड ग्रॅनाईट स्टोन्स घालून व्हिस्की ची मजा घेतली आहेत काय? नसल्यास तडक घ्या, एक अनुभव असतो दस्तुरखुद्द रॉक्स वर घेणे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जॅक डनियल्स 15/11/2016 - 07:25
चियर्स ब्रदर ! बाहेर पडणारा बर्फ टाकून घेतली आहे ! पण आत्ता तुम्ही म्हणता तसे बर्फाचा दगड टाकून या winter ला अनुभव घेतो.

In reply to by जॅक डनियल्स

नाही नाही बर्फाचा दगड नाही प्रॉपर दगड असतो तो हायलँड स्कॉटिश भागातला, त्याचा गुणधर्म असा असतो की तो खूप लवकर गार पडतो, असे क्यूब आकारातले दगड फ्रिझर मध्ये अर्धातास ठेवले की गार होतात मग ते ग्लास मध्ये (२ दगड) ठेऊन त्यावर स्कॉच/अमेरिकन ओतायची, पाणी नसल्यामुळे ड्रिंक डायल्युट होत नाही अन गारेगार दगडामुळे फ्युमिंग कंट्रोल होऊन टेस्ट अन अरोमा क्लासिक मेन्टेन राहतो https://www.vat19.com/item/whiskey-stones इथे बघा मजा. टीप - संपादक मंडळ, लिंक पेस्ट करता येत नाहीयेत मिपावर कालपासून

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

असे क्यूब आकारातले दगड फ्रिझर मध्ये अर्धातास ठेवले की गार होतात मग ते ग्लास मध्ये (२ दगड) ठेऊन त्यावर स्कॉच/अमेरिकन ओतायची, पाणी नसल्यामुळे ड्रिंक डायल्युट होत नाही अन गारेगार दगडामुळे फ्युमिंग कंट्रोल होऊन टेस्ट अन अरोमा क्लासिक मेन्टेन राहतो हायला, मी तर कल्पनेनेच गारेगार झालो. निवांत गप्पा मार्त पिताना शिंच्या त्या डायल्यूशन ने वैताग येतो. भारतात कुठे मिळते हे ?

In reply to by अप्पा जोगळेकर

अमेझॉन वर आहेत की अप्पा उपलब्ध, स्टेनलेस स्टील क्युब्स पण असतात ते ही मिळतील, पण स्कॉटिश स्टोन्सची बात न्यारी, त्यांचा सुगंध स्कॉचच्या फ्लेवरला पूरक असतो. ₹ ३५० ते ₹५००० / संच (४ स्टोन, पुसायला मखमली कापड अन ठेवायला एक चंची) असा सेट असतोय बघा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मोदक 15/11/2016 - 15:55
"व्हिस्की क्युब" किंवा "वाईन पर्ल्स" असे शोधा. आणखी एक वाचलेला प्रकार म्हणजे डायरेक्ट जेडीला गोठवून त्याचे क्युब करायचे. (याबाबत अधिक माहिती नाही)

In reply to by महासंग्राम

आदूबाळ 15/11/2016 - 16:35
पण अल्कोहोलचा गोठणबिंदू शून्याच्या बराच खाली असतो ना? (म्हणून ध्रुवीय प्रदेशात पार्‍याऐवजी अल्कोहोल भरलेले थर्मामीटर वापरत असत असं ज्यूल व्हर्नच्या कादंबर्‍यांत वाचलं होतं.)

In reply to by आदूबाळ

जॅक डनियल्स 16/11/2016 - 09:38
Ethanol चा गोठण बिंदू −114.9 °C असल्यामुळे तो कमी तापमानाला वापरला जातो. तसेच ethanol, पाऱ्यापेक्षा कमी विषारी असल्यामुळे पण तो वापरला जातो. कॉकटेल करताना ५० % पाणी आणि ५० % जेडी ( म्हणजे खरी २५ % volume %) असल्यामुळे ७५% पाणी गोठते आणि २५% जेडी तशीच राहते. मी जेली चे वोडका जेलो करयचो, ते याच तत्वाने !

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ह्यावर एक लेख होऊ द्या बापु ... बाकी तिकडले जॅक, मॉर्गन ,अन इक्डले साधुबाबा झ्याक. आम आदमी की चॉईस ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बाबौ, म्हातारा बुडा (ओल्ड मॉन्क) लैच खास आहे, मध्यंतरी मोहन मिकिन्स ओल्ड मॉन्क बंद करणार म्हणून खबर आली होती (अर्थात खोटी) तेव्हाच मनात विचार आला होता, जोवर तरुणाई आहे इंजिनीरिंग कॉलेज आहेत, हॉस्टेल्स आहेत, खिशात कडकी आहे, मिलिटरी आहे तोवर ओल्ड मॉन्कला मरण नाही महाराजा. आमचा एक मित्र ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीला होता, पुढे त्याने अमेरिकेत खूप भ्रमंती केली नोकरी निमित्त, पार सीएटल ते मियामी अन जर्सी ते सेक्रेमेंटो फिरला शेवटी शिकागोला स्थाईक झाला गडी, तो सांगत असे की त्याच्या सीएटल ऑफिस मधली स्थानिक एतद्देशीय गोरी, घारी, काळी सगळी मित्रमंडळी त्याला घरी सुट्टीला आला की येताना ओल्ड मॉन्क सोबत आणायची विनंती करत असत. आता ते खरे का आमचा ओल्ड मॉन्क प्रेमी अहं सुखावयला सांगितलेली गोष्ट ते माहिती नाही तरी, आपले अमेरिका स्थित मिपाकर ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते. :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कोलोरॅडोसारख्या (म्हणजे, तितकेसे भारतीय नसलेल्या) राज्यात लिकर मॉलमध्ये ओल्ड माँक आढळला होता. दर्दीलोक्स घेत असतील तिथले. अत्तापोतुर जगातली सगळ्यात जास्त विकली जाणारी रम होती ती!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ज्जे बात !! खुद्द जावईबुआ रिपोर्ट देणार म्हणजे दस्तुरखुद्द शिक्कामोर्तब!. ओल्ड मॉन्क ओल्ड मॉन्क है हुजूर. कडाक्याच्या थंडीत हाती ओल्ड मॉन्क ऑन रॉक्स अन सोबत तंदुरीत खरपूस भाजलेला देशी कोंबडा बस्स, हमीअस्तु हमीअस्तु हमीअस्तु.

जगप्रवासी 14/11/2016 - 17:52
डिस्कव्हरी चॅनेल वर "how they do it?" की अजून असल्या कुठल्यातरी प्रोग्राम मध्ये ही पूर्ण प्रोसेस दाखवली होती. तो झरा देखील. खूप छान झालाय लेख.

मारवा 14/11/2016 - 19:35
कुठे दर्जेदार दुध विकणारे सात्विक चितळे कुठे दारु गाळणारा कलाल डॅनियल ! कुठे एकही गर्लफेंड नसणारे गर्लफ्रेंडविहीन सत्वशिल चितळे कुठे सात गर्लफ्रेंडा असणारा चरीत्रहीन जॅक डॅनियल ! कुठे मास्टर ऑफ बाकरवडी चितळे कुठे तो भट्टी पेटवणारा डॅनियल कुठे पुण्यात्मा चितळे कुठे अपवित्रात्मा डॅनियल कुठे किंग चितळे कुठे जॅक डॅनियल कुठे पुण्यनगरीचा मानबिंदु कुठे.... छे छे आमच्या भावना दुखावल्यात तुम्ही हे खपवुन घेतले जाणार नाही संपादक मंडळ धागा तात्काळ उडवावा मारवा

In reply to by मारवा

जॅक डनियल्स 15/11/2016 - 07:33
भावना समजल्या गेल्यात ! प.पु. चितळे किंवा प.पु.डॅनियल च्या वैकीक्तिक आयुष्याबद्दल तुलना करणे, हा लेखाचा उद्देश नाही तर डॅनियल ने मेहनत केल्यामुळे तयार झालेल्या "brand" बद्दल माहिती देणे हा लेखाचा उद्देश आहे.

In reply to by जॅक डनियल्स

मारवा 15/11/2016 - 20:21
लेख खरच सुंदर आहे आवडलाही सहज तुलना गमतीदार वाटली तुमचे म्हणुन मी ही गंमत करत होतो. कृपया हलक्यात घ्यावे ही विनंती.

In reply to by पिलीयन रायडर

मुनशाईन फक्त जेडी बेस प्रॉडक्टला म्हणतात असे नाही, तर बेकायदेशीरपणे तयार केल्या गेलेल्या अन थोडक्यात हातभट्टीच्या दारूलासुद्धा हमरिकेत मूनशाईन म्हणतात असे ऐकले होते. खखो देव, जॅक अन मिपा वरले जॅक जाणोत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टिवटिव 15/11/2016 - 06:15
स्मोकी माउंट्न मध्ये गटलिनबर्गला मूनशाईन ची अनेक दुकाने आहेत.शार्लेटजवळपण लोणच्याच्या बरणी सारख्या बरणीमघ्ये हि मूनशाईन मिळ्ते..

In reply to by टिवटिव

जॅक डनियल्स 15/11/2016 - 07:44
गटलिनबर्गला किंवा कुठल्या पण दुकानात जी लोणच्याच्या बरणीत मिळते ती लीगल मूनशाईन आहे. त्याची बनवण्याची पद्धत सारखीच असते पण चांगल्या distillary मध्ये (without contamination) बनवली असते आणि अल्कोहोल चे प्रमाण पण कमी (१०० प्रुफ, ५० v%v% ) असते. ती पण उग्र वासामुळे प्यायली जात नाही - पण त्यामध्ये बुडवून ठेवलेल्या चेरया आणि स्टोबेरी चावायला मजा येते.

In reply to by जॅक डनियल्स

महासंग्राम 15/11/2016 - 10:04
अल्कोहोल चे प्रमाण पण कमी (१०० प्रुफ, ५० v%v% )
जेडी वर लिहिलेलं १०० प्रुफ म्हणजे काय आणि अल्कोहोलचे प्रमाण कसे ठरवतात.

In reply to by महासंग्राम

जॅक डनियल्स 16/11/2016 - 09:45
अल्कोल्होल हा abv - अल्कोहोल बाय व्होलूम मध्ये मोजतात - जेडी ४०% असते म्हणजे ४० ml ethanol आणि ६० ml पाणी. अमेरिकत तीच ८० प्रुफ असते (volume % च्या दुप्पट).

In reply to by जॅक डनियल्स

गटलिनबर्गला किंवा कुठल्या पण दुकानात जी लोणच्याच्या बरणीत मिळते ती लीगल मूनशाईन आहे. म्हणजे आपली नारिंगीच. 'सरकार मान्य' दारुचे दुकानात मिळणारी.

मूनशाइनचा उगमही कळला. जिथे जेडी, तिथे मूनशाइन!
- अजयाताईंशी १०००% सहमत. एक खास पुणेकर प्रश्न (पुण्यात राहत नसूनसुद्धा) मनात आला - 'बाकरवडी संपली'प्रमाणे 'जेडी संपली' असा बोर्ड (इंग्लिशमध्ये) दिसला काय हो? आता माझा आयडी 'ओल्ड माँक' असा बदलून घ्यावा असा विचार करतोय.

In reply to by सुधांशुनूलकर

जॅक डनियल्स 15/11/2016 - 07:49
तिकडे लिंचबर्ग जेडी विकत नसल्यामुळे "तसा" बोर्ड दिसण्याचे प्रमाण नगण्य होते. जे काही विकायला होते ते सिंगल ब्यारेल किंवा अजून महाग पर्याय होते की जे संपायचे प्रमाण खूप कमी असेल. आता माझा आयडी 'ओल्ड माँक' -- नक्कीच बदलून घ्या ! "कीप काम आणि फिनिश द ओल्ड माँक"

कंजूस 15/11/2016 - 05:32
ही दारू कशाची बनवतात ?कॅार्न? सापांना { अथवा इतर प्राण्यांना} दारू आवडते का? चढते का? लेखनशैली फारच आवडली. असं पाल्हाळ न लावता चटकदार लिहिणारे{इथे} फारच थोडे आहेत. सॅमसंग ६ चे फोटो मस्त आलेत.

In reply to by कंजूस

जॅक डनियल्स 15/11/2016 - 07:56
कॅार्न पासून अमेरिकन व्हिस्की बनवतात, बाकी विकी करा ! ज्यांना मेंदू असतो त्यांना सगळ्यांना दारू चढू शकते, अजून माहिती पाहिजे असेल तर गोल्ड फिश अल्कोहोल स्टडी असेल शोधा ! धन्यवाद् !

गेल्या वर्षी ग्लेनफ़िडीचं च्या ३ आणी जॅक डॅनियल्स ची एक बाटली नेली होती यु.के. मधून. ग्लेनफ़िडीचं तितकीशी आवडली नाही पण जॅक डॅनियल्स संपवली. आता कुठल्या घेऊन जाव्यात इथून ह्याचा विचार करतोय.

ट्रेड मार्क 15/11/2016 - 06:05
जॅक अँड कोक हे माझं फेवरीट आहे, ज्यावेळेला काहीतरी मिसळून प्यायला लागते तेव्हा ;) नाहीतर नुसती जॅक मस्तच. अवांतर: विषय निघालाच आहे तर स्पेबर्न (Speybern) नावाच्या एका १० इयर्स ओल्ड सिंगल माल्ट स्कॉच चा शोध लागला आहे. जॅकनंतर आता ही फेवरीट आहे. किंमत पण फार नाही म्हणजे $३० ला एक खंबा मिळतो आणि मस्त स्मूथ चव आहे वर नो ह्यांगोवर.

John McClain 15/11/2016 - 08:28
शानदार, जबरदस्त जिंदाबाद! JD आमचा पण आवडता ब्रँड. सोन्याबापू च्या उलटा आमचा प्रवास... स्कॉटिश सिंगल malt वरून JD वर गेलो आम्ही :) त्यातल्या त्यात silver select आणि Gentlemans jack हे आम्हाला भारी वाटतात. त्यांची honey वाली liqueur तर बढिया आहे. (मधाची चव आणि कडवटपणा नाही) JD+coke+लिम्बु किंवा maple syrup 1 नंबर मिश्रण :) जॅक भाऊ, मस्त लेख आणि फोटू. त्यांच्या वेगवेगळ्या ब्रँड्स च्या वेगवेगळ्या डिस्टीलररिएस असतात का?

वेल्लाभट 15/11/2016 - 15:57
इतकं सुंदर 'रस'ग्रहण केलंयत की साला दारूशी संबंध नसूनही ज्याक ड्यानियल्स चाखावीशी वाटलीय. उत्तम. अप्रतिम परिचय करून दिलात.

आदिजोशी 15/11/2016 - 16:02
लेख मस्तच. छान माहिती मिळाली. जेडी वरून आमच्या एका जुन्या मिपा बंगळूरू कट्ट्याची आठवण ताजी झाली :)

सचित्र जॅडॅपुराण आवडले ! प्रत्येक प्रसिद्ध डिस्टिलरीच्या आणि वायनरीच्या मागे रोचक कथा असतेच, आणि तिही वारूणीसारखीच काळाबरोबर अधिक रोचक होत जाते.

नेसीत चार वर्ष काढलीत जॅझ आणि ब्लूज सोबत टेनेसीत बरेच उद्योग केलेत (ट्रेकिंग , कानूइंग ई.. ) पण पण पण whiski ला स्पर्शहि केलेला नाही जगाच्या पाठीवर टेनेसीत राहून जॅक न प्यालेला एकटाच असेन कदाचित , पण टाकिला , कॉकटेल्स आणि बिअर चा प्रचंड प्रमाणात रिचवली आहे टेनेसी बद्दल काही वाचाल कि मन भुर्रर्रकन उडून आठवणीत रमत .... काश जाने दो यार छोड आये हम ओह गलिया

गामा पैलवान 16/11/2016 - 19:46
जॅक डनियल्स, घनफळाने मद्यार्काचं प्रमाण कसं ठरवतात? समजा माझ्याकडे बाटलीत १ लिटरभर प्यायची दारू आहे. बाटलीवर समजा ४०% मद्यार्क (=अल्कोहोल) म्हणून छापलंय. यावरून बाटलीत ४०० मिली अल्कोहोल सापडेल असं गृहीत धरूया. म्हणूनच ६०० मिली पाणी आहे. आता असं बघा की ४०० मिली मद्यार्कात ४०० मिली पाणी टाकलं. उरलेलं २०० मिली पाणी वेगळं ठेवलं. पाणी आणि मद्यार्क एकमेकांत विरघळतात. त्यामुळे घनफळ ८०० मिली न होता ६४० मिली होतं. त्यात बाजूस ठेवलेलं २०० मिली पाणी मिसळलं की एकत्रित घनफल ८४० मिली होतं. म्हणजे लिटरभर दारूच्या जागी ८४० मिली दारू मिळणार. यावरून पुढे आकडेमोड करता येईल. बाटलीवर ४०% चा छाप मारायला ४०० मिली मद्यार्क वापरला तर फक्त ८४० मिली प्यायची दारू तयार होते. म्हणून एका फुल लिटरच्या खंब्यासाठी १०००*४००/८४० = ४७६.२ मिली मद्यार्क वापरावा लागेल. तर १ लिटर बाटलीवरचा ४०% छाप नेमका किती मद्यार्क दर्शवतो ४०० मिली की ४७६.२ मिली ? आ.न., -गा.पै.

मारवा 16/11/2016 - 20:01
घनफळाने मद्यार्काचं सुवर्णाक्षरांत कोरुन ठेवावा असा शब्द तुम्ही आज दिलेला आहे. आहाहा धन्य धन्य झालो. घनफळी मद्यार्क वा वा हा शब्द वाचुन माझा त्रिफळा च उडाला.

तसे अल्कोहोल आणि माझे तसे जुने नाते आहे. पिण्याच्या निमिताने किंवा अभ्यासाच्या निमित्ताने हे केमिकल माझ्या आयुष्यात येतच गेले. थर्ड इअरला असताना distillary डिझाईनचे फक्त प्रश्न सोडवून मी plant technology चा पेपर सोडवला होता. जेडीला तर मी पुण्यात ओळखतच नव्हतो, आपले मित्र सुरवातीचे मित्र म्हणजे white mischief आणि ओल्ड मोन्क (हा मित्र अजून टिकून आहे.)!

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

शिव कन्या ·

अभ्या.. 14/10/2016 - 12:01
छान. दोन काट्यातले अंतर जाणवले. . मनाचा एकांत, उत्तम एकांत अशी टुकार लाईन डोक्यात आलेली पण आवरली. ;)

सिरुसेरि 17/10/2016 - 16:51
छान कविता . आपल्या कुटुंबियांना सोडुन परदेशात कामाला आलेल्याची घालमेल जाणवली . मनाचा एकांत - स्मरणाचा काटा ओळ वाचुन "जळणाला लाकुड - गुरांना चारा" हि चाल आठवली .

आत्ता इथे इतके वाजलेत, म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील..... तिथे आता हे हे असे असे घडत असेल आणि इथे हे हे असे असे ..............! स्मरणाचा एक तास काटा तिथे तर एक इथे! बाकी मन, सेकंद काटा होऊन सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे टिकटिकत राहते दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर.............. . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -शिवकन्या

नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?

स्वीट टॉकर ·

स्वीट टॉकर 21/09/2016 - 22:29
सर्वजण, धन्यवाद. प ग -अंश काय, वेग काय, आणि वेळ काय. अहो सगळंच सापेक्ष आहे! एस च्या घड्याळ्यात प्रॉब्लेम आहे. खरे पहिले तुम्हीच!

खेडूत 21/09/2016 - 22:45
फारच छान माहिती. (आता चिरंजीवास समजावून सांगावे म्हणजे अजून पक्कं होईल!) असले विचार आम्हांस पडत नसल्याने आत्ताच पहिल्यांदा वाचले. नाही म्हणायला युरोपात जाताना आणि येताना वेगवेगळा वेळ का लागतो असा विचार करून एकदा गुगलले होते. 'डे-लाईट सेव्हिंग' आणि प्रवासाचे तास यात जाम घोळ करून प्रयत्न सोडला होता, आता परत पहातो. अवांतरः मिपावर अनेक दिवसांनी वाचनीय लेख आल्याने फार आनंद जाहला...

अकिलिज 21/09/2016 - 23:42
काय हा योगायोग. विकिपीडीयावर आजचं विशेष चित्र म्हणून हेच वाचलं. खरंतर माझी पुर्वी समजूत होती की डेंजर देश चुकवायला असं काहीतरी करत असावेत.

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे 22/09/2016 - 11:53
सोप्पंच आहे हो, फक्त तुम्ही वर्गात पहिल्या बाकावर बसला आहात आणि समोर सर लेक्चर देत आहेत असं इमॅजिन करा, सरांनी अगदी सहज बोलता बोलता जसं सांगतात तसं सांगितलं आहे, थोडी चित्रांची मदत घेतली असती तर अजून सोपं झालं असतं म्हणा. 1

In reply to by संदीप डांगे

एक बॉल घेतला (आमच्याकडे रबरी हलका फुटबॉल साईजचा मिळतो, दहा रुपयांना.) एक दोरा घेतला. अन् अंदाजे भारत अमेरिका मार्किंग केलं. मग नकाशाप्रमाणे सरळ रेषेत एक मार्ग आखला. आणि दोरा भारत-अमेरिके दरम्यान ताणून धरला. फरक पडता है भाई!

jo_s 22/09/2016 - 19:53
मस्त दोन्ही प्रकार छान समजावलेत धन्यवाद

मी दुसऱ्यांदा अमेरिकेत पोहोचलो, तरीही माझ्या मनातील शंका दूर होत नव्हती. विमानात बसल्यानंतर,आपल्या समोर स्क्रीनवर जो नकाशा येत होता,त्यावर मुंबईहून निघालेले, आमचे विमान मुंबई ते न्यूयॉर्क अशा सरळ रेषेत जाण्याच्या ऐवजी,थेट उत्तर दिशेने वळत वळत,अगदी रशियाच्या भूमीवरून,मग अटलांटिक समुद्रावरून, न्यूयॉर्क ला पोहोचले.कदाचित एकाच वेळी जवळपास पाच हजार विमाने आकाशात उडत असतात, म्हणून हा लांबचा मार्ग स्वीकारलेला असावा असेही वाटून गेले, पण पुन्हा प्रश्न निर्माण झाला की कोणतीही विमान कंपनी,उगाच महागडे इंधन का वाया घालवेल?लेख पूर्णपणे वाचल्यावर उत्तर मिळाले.धन्यवाद .पुलेशु .

श्रीगुरुजी 22/09/2016 - 21:30
खूपच मस्त माहिती! मनातील गैरसमज दूर झाले. पूर्वी एकदा टोकयोहून लॉस एंजल्सला जाताना विमान उत्तरेला जाऊन, अलास्का व तिथून नंतर सॅन फ्रानसिस्कोवरून शेवटी दक्षिणेला येऊन लॉस एंजल्सला आले होते. त्यावेळी प्रश्न पडला होता ही हे विमान सरळ रेषेत ४००० हजार मैलांचा प्रशांत महासागर ओलांडून आले असते तर प्रवासाचा किमान ३ तास वेळ कमी झाला असता. हे विमान सरळ रेषेत न जाता असा प्रवास का करते हे एकाला विचारल्यावर त्याने सांगितले होते की विमानाला जर काही समस्या निर्माण झाली तर इमर्जन्सी लँडिंगसाठी जमीन जवळ असावी लागते. जर विमान सरळ रेषेत प्रशांत महासागरावरून गेले तर जवळची जमीन किमान २००० मैल दूर असू शकेल. म्हणूनच विमान शक्यतो खाली जमीन असेल अशाच भागातून जाते. तुमचे वरील वर्णन वाचल्यानंतर हा गैरसमज दूर झाला.

पृथ्वीच्या गोलाकारामुळे त्या रेषा रिलेटिव्ह फ्रेम नुसार गोल होतात हे इतकं सुंदर आधी कोणीच समजावलं नव्हत :)

बॅटमॅन 23/09/2016 - 01:11
मस्त लेख! मर्केटर प्रोजेक्शन आणि अ‍ॅक्चुअल क्षेत्रफळ यांचा परस्परसंबंध आणि स्फेरिकल जॉमेट्री हे सांगितलेत हे उत्तम. या विषयावर मराठीत अगोदर कधी लेखन झाल्याचे ठाऊक नाही.

मराठमोळा 23/09/2016 - 04:24
लेख छानच.. बरीच मेहनत घेतली आहे सोपे करुन सांगायला. आजकाल कोणतीही किचकट गोष्ट सोपी करुन सांगायला Infographic पद्धत प्रभावी पडते असे निरिक्षण आहे. कॉर्पोरेट जगतात त्याला Visual story telling म्हणतात. वरील लेख ज्यांना समजायला अवघड वाटतोय त्यांनी हा तुनळीवरचा व्हिडीओ पहा. थोडे गणिताचे बेसिक्स माहिती असतील तर चटकन लक्षात येईल.. नाही आले, तर एखाद्या शाळकरी मुलाकडून पुन्हा उजळणी करुन घ्या. ;) दुवा: https://www.youtube.com/watch?v=634GucAdzzA

लीना कनाटा 23/09/2016 - 07:27
स्वीटॉकाका अतिशय सुरेख माहिती. छान समजावून सांगितले आहे. वरचा तुनळीचा व्हिडीओ देखील छान आहे खरतर पृथ्वी गोल (spherical ) असल्याने कोणतीही दोन ठिकाणे खऱ्या अर्थाने सरळ रेषेत नसतात. एक प्रश्न - Great circle distance हे नेहमी पृथ्वीची समुद्र सपाटीवरची त्रिज्या वापरून काढतात का? कारण एका सरळ रेषेत (?) जाणाऱ्या जहाज पेक्षा १० किमी उंचीवरून उडणाऱ्या त्याच मार्गावरील विमानाला जास्त अंतर कापावे लागेल. अर्थात पृथ्वीच्या त्रिज्येच्या मानाने १० किमी खूप कमी असल्याने पडणारा फरक नगण्य असेल.

स्वीट टॉकर 23/09/2016 - 12:10
ज्यांना कळलेलं नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. या माहितीचा दैनंदिन जीवनात किती उपयोग आहे? तर रूबिक्स क्यूब सॉल्व्ह करता येण्याचा किती उपयोग होता? तितकाच. नगण्य! डांगेंनी टाकलेल्या अ‍ॅनिमेशनमुळे समजायला सोपं जात आहे. संदीपभाऊ, स्पेशल धन्यवाद! ज बा शि - आज विमानाच्या फ्लाईटच्या खर्चातला सगळ्यात मोठा वाटा इंधनाचा असतो. त्यामुळे मुद्दामून लांबून जाण्याचा प्रशनच उद्भवत नाही. श्रीगुरुजी - जे कारण तुम्हाला सांगितलं गेलं ते प्रथमदर्शनी अगदी लॉजिकल असल्यामुळे पटण्यासारखंच आहे हे मात्र खरं! जेव्हां पहिल्यांदा आपण फॅक्स बघितला तेव्हां कोणीतरी मला सांगितलं होतं की FAX हा शब्द Fully Automatic Xerox याचा शॉर्ट फॉर्म आहे. मला ते पटलं होतं. एक तर तेव्हां झेरॉक्स हा शब्द चुकीचा आहे हे मला माहीत नव्हतं आणि त्यात हा तर ऑटोमेशनचा बापच होता! तो कॉपी तर काढत होताच, पण इथे नव्हे, हजारो मैल दूर! मराठमोळा - तूनळी इथे फायरवॉलच्या मागे लपलेली आहे. नंतर बघीन. लीनाताई - बरोबर आहे. विमानाला नगण्य प्रमाणात जास्तं अंतर कापावं लागेल.

In reply to by स्वीट टॉकर

ट्रेड मार्क 24/09/2016 - 01:39
लीनाताईंना जो प्रश्न आहे तोच मलाही आहे. भारत अमेरिका प्रवासात विमान साधारणतः ३०००० फुटांपेक्षा जास्त उंचीवरून उडतं. मुंबई न्यू यॉर्क अंतर ७८०० मैल आहे असं सांगतात हे अंतर जमिनीवरूनचे (किंवा जमीन + समुद्र) आहे का विमान ज्या उंचीवरून उडते त्याचे? या दोन्ही अंतरातील फरक नगण्य म्हणजे किती असेल?

चिनार 23/09/2016 - 12:41
उत्तम लेख..समजण्यासाठी 2-3 वेळा वाचावा लागला..शक्य तितक्या सोप्या शब्दात मांडला आहे.. स्वगत : तेच्याआयला हे असं बी असते व्हय..आमची जिंदगी गेली यष्टीनं घुमन्यात..येकडाव झोप लागल्यावर थो डायव्हर मसनात नेते की अजून कुठं कोनाच्या बापाले मायती..!!

In reply to by मराठी_माणूस

गामा पैलवान 23/09/2016 - 17:21
मराठी_माणूस, तुमचं बरोबर आहे. पण पृथ्वीच्या पाठीवर न्यूयॉर्क मुंबईच्या जवळजवळ विरुद्ध दिशेला मागे आहे. त्यामुळे पश्चिमेकडून केलं काय वा पूर्वेकडून गेलं काय, साधारणत: सारखंच अंतर पडतं. फक्त दिशा वायव्येच्या (म्हणजे उत्तर-पश्चिम) ऐवजी ईशान्य म्हणजे (उत्तर-पूर्व) होते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पक्षी 23/09/2016 - 18:13
पृथ्वीच्या पाठीवर न्यूयॉर्क मुंबईच्या जवळजवळ विरुद्ध दिशेला मागे आहे.
म्हणजे, जर का मुंबईत खड्डा केला तर तो सरळ न्यूयॉर्क मध्ये निघू शकतो?

In reply to by पक्षी

गामा पैलवान 23/09/2016 - 19:04
पक्षी, खरंतर मुंबई आणि न्यूयॉर्क यांची रेखावृत्तं असं म्हणायचं होतं. मुंबई आणि न्यूयॉर्क यांची रेखावृत्तं १५० अंशांच्या कोनात आहेत. १८० अंशाचा कोण असता तर एकमेकांच्या बरोब्बर विरुद्ध बाजू साधली असती. तेव्हढा ३० अंशांचा फरक पडतोच. खड्डा कुठूनही कुठेही पाडता येतो. तो पृथ्वीच्या केंद्रातून जाईल का ते बघायचं असतं. मुंबईत नेमकं खाली खणंत पृथ्वीकेंद्रातून पुढे गेल्यास कुठे बाहेर निघेल ते गूगलच्या सहाय्याने पाहता येईल. मुंबईचे अक्षांश-रेखांश आहेत 19.0760° N, 72.8777° E. तर खड्ड्याचे असतील 19.0760° S, 107.1223° W. गूगलवर शोधल्यास हे स्थान सापडतं. ही जागा भर प्यासिफिकात दक्षिण अमेरिकेच्या बऱ्याच पश्चिमेला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by पक्षी

ठाणे जिल्ह्यातील गुंदवली गावापासून भांडूपपर्यंत (अंतर १०० किमी.) मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी जमीनीखालुन अंदाजे १०० मीटर खोल बोगद्याचे काम चालू आहे. एवढ्या लांब अंतराच्या बोगद्याची पातळी कशी कायम केली जाते हे मी ओळखीतल्या एका BMC civil engineer ला विचारले असता त्याने ती 'लेझर' किरणाच्या सहायाने कायम केली जाते असे सांगितले. बोगद्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत एका सरळ रेषेत बोगदा खणल्यास बोगद्याला मधे घळ पडून पुढे चढाव होउन पाण्याला रोध होणार नाही का? जसे मोठ्या पुलाचे बांधकाम करताना पृथ्वीची वक्रता लक्षात घेउन पुलाच्या खांबांचा कोन ठरवला जातो ज्यामुळे पुलाचे जमिनीपासूनचे अंतर समान रहाते. बोगद्याच्या बाबतीत तसे वाटत नाही. तसे होत नाही असे त्या civil engineer ने सांगितले. माझी शंका चुकीची आहे का?

स्वीट टॉकर 23/09/2016 - 15:55
मराठी_माणूस - धन्यवाद! तुमचं अगदी बरोबर आहे. माझी वाईट टायपो झाली! तुम्ही ती दर्शवल्यानंतर मला असा प्रश्न पडला आहे की दुसर्या कोणाच्या लक्षात कशी आली नाही? संपादित करतो.

ओम शतानन्द 23/09/2016 - 20:20
दुबई ते सान फ्रन्सिस्को विमान मार्ग प्रथम उत्तर ध्रुवाच्या दिशेने जाउन नन्तर दक्शिणेकडे कनडावरुन खाली यअसेल, असा द्राविडि प्राणायाम करन्याचे कारण असलेच काही असावे

स्वीट टॉकर 24/09/2016 - 00:31
ओ श - बरोबर. तोच मार्ग सगळ्यात जवळचा. मात्र आपल्या नकाशावर तो द्राविडी प्रायाणाम असल्यासारखा वाटतो फक्त. सं ता - नाही होत. उत्तर दक्षिण प्रवास म्हणजे एकाच रेखांशावरून प्रवास. सपाट नकाशावर देखील रेखांश उभेच दाखवंत असल्यामुळे ती एक सरळ उभी रेष दिसतो.

स्वीट टॉकर 24/09/2016 - 09:01
पृथ्वीचं परिवलन तर गृहित धरावंच लागतं. नाहीतर विमान तिथे पोहोचेपर्यंत न्यूयॉर्क थोडंसं पूर्वेकडे निघून गेलेलं असेल. मात्र मी या लेखात त्याला पूर्णपणे नजरेआड केलेलं आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे एक खोटा (fictitious) फोर्स निर्माण होतो. याला 'कोरियॉलिस फोर्स' असं नाव आहे. नॉर्मल माणसाच्या शिक्षणात त्याचा ह्या फोर्सशी संबंध येत नाही. याच कोरियॉलिस मुळे उत्तर गोलार्धातील प्रत्येक चक्री वादळ अ‍ॅन्टीक्लॉकवाइज घोंघावतं आणि दक्षिण गोलार्धातलं क्लॉकवाइज. मी ह्या लेखात जर कोरियॉलिस सुद्धा जर घेतला असता तर आधीच किचकट असलेला हा मुद्दा पूर्णपणे अगम्य झाला असता. म्हणूनच चालण्याचं उदाहरण घेतलं आहे. उडण्याचं उदाहरण घेतलं की कोरियॉलिसबरोबरच 'हवेचा वेग आणि दिशा' नावाची आणखी दोन व्हेरिएबल त्यात शिरली असती. हा एक लेख न होता प्रचंड रटाळ पीएच. डी. चा थीसिस झाला असता.

In reply to by स्वीट टॉकर

लीना कनाटा 25/09/2016 - 07:40
सिंक आणि टब मधले पाणी ड्रेन होताना कोरियॉलिस मुळे तयार होणाऱ्या भवऱ्या बद्दल बरीच भवती-नभवती आहे. दक्षिण गोलार्धात राहणारे मिपाकर सिंक आणि टब मधले भोवरे क्लॉकवाईज फिरतात कि नाही हे चेक करू शकतील काय? स्वीटॉकाका जर अगदी बरोब्बर उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर चक्री वादळ झाले तर ते कोणत्या दिशेने फिरेल? आणि आता नाकासमोर म्हणजेच वळत वळत हे समजले असल्याने कोरियॉलिस मुळे पडणारा फरक कसा करेक्ट करतात या बद्दल देखील लिहा.

In reply to by स्वीट टॉकर

हो ते लक्षात आलं. की तुम्ही विषय सोप्पा ठेवायला परिवलन बाजुला ठेवलं असणार. मला ह्यात फोर्सेसचा काही खेळ असेल असं वाटलंच नव्हतं. मी पहाते गुगलुन. धन्यवाद!

फारच सोप्या भाषेत समजावून सांगितले, खासकरून फोटो फिल्म वापरून नकाशा तयार करण्याची कल्पना आवडली. मुंबई-जळगाव ह्या उदाहरणात 'North-West कडे चालंत' असे म्हटले आहे, नकाशात तर जळगांव हे मुंबईच्या North- East ला दिसते आहे.

स्वीट टॉकर 25/09/2016 - 14:37
लीनाताई, एक प्रश्न. 'भवती-नभवती' म्हणजे वादविवाद असा मी अंदाज लावला तो बरोबर आहे का? उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर वादळं भरपूर होतात. उत्तर ध्रुवावरची anti-clockwise अन् दक्षिणेकडची उलटी! कोरियॉलिस हा weak फोर्स आहे. वॉश बेसिनमधल्या पाण्याचा mass भरपूर, उपलब्ध वेळ मात्र काही सेकंदच. तेव्हड्या वेळात तेवढ्या पाण्याला ठराविक दिशा देण्याची क्षमता कोरियॉलिसमध्ये आहे असं मला वाटंत नाही. त्या ऐवजी वॉश बेसिन चा आकार, आउटलेटमध्ये एक ट्रॅप असतो त्याची दिशा, आपण वॉशबेसिमनमध्ये पाणी भरतो त्यानंतर आपल्याला जरी डोळ्यानी दिसले नाही तरी त्यात पाणी ओतताना निर्माण झालेले करंट्स जे बराच वेळ त्यात फिरत राहातात,(विजेचे नव्हे, पाण्याचे) यांचा जास्त प्रभाव भोवर्याच्या दिशेवर पडतो असं मला वाटतं. (मात्र याला गणिती सिद्धांत माझ्याकडे नाही.) शिवाय हा इफेक्ट आपण जसजसे विषुववृत्तापासून दूर जातो तसा वाढत जातो. विषुववृत्ताच्या जवळ अगदी नगण्य असतो. मी असं ऐकलं आहे की केनियामध्ये खालील प्रयोग पर्यटकांना दाखवतात. श्री. दामले यांच्या आफ्रिकन सफारीच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. तिथे 'EQUATOR' असा बोर्ड आहे. त्याच्या काही मीटर उत्तरेकडे जाऊन वॉश बेसिनचं पाणी anti-clockwise फिरतात दाखवतात आणि काही मीटर दक्षिणेकडे जाऊन उलटं फिरताना. मला स्वतःला यात हातचलाखी असल्याची शंका आहे. संदीपभाऊ - जी आर एफ म्हणजे काय?

उत्तम लेख ! आवडला !!
पृथ्वीच्या आकाराची (shape, not size. मराठीत दोन्हीला आकारच म्हणतात)
साईज ला मराठीत 'माप' म्हणता येते. तुमच्या वाक्यात हा अर्थ बसतो का बघा बरे ! अवांतर : हाच प्रश्न मला घाटरस्त्यांच्या बाबतीत पडतो. सरळ सरळ डोंगर कापून सरळसोट रस्ता न बनविता तो नागमोडीच असतो. त्यामागे देखील हेच शास्त्र आहे की दुसरे काही ?

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 25/09/2016 - 22:24
डोंगर कापणे हे नागमोडी रस्ते बनवण्यापेक्षा कैकपटीने कठिण काम आहे म्हणून. डोंगर चढण्यासाठी डोंगराचाच आधार घेऊन घाट बनवला जातो, बाकी सिविल इंजिनियर्स जास्त नीट सांगू शकतील.

In reply to by धर्मराजमुटके

अगम्य 26/09/2016 - 22:13
डोंगराच्या पायथ्याशीच बोगदा करून आरपार सरळ रास्ता करणे कठिण आणि खर्चिक असते. म्हणून आपण डोंगर चढून उतरतो. आता डोंगरावर चढायचे तर खालून वरपर्यंत सरळसोट रास्ता का करत नाही? तर असे केल्यास चढ फारच तीव्र (steep ) होईल. तो चढ चढण्यासाठी गाडीला खूपच शक्ती (power ) लागेल. उदाहरणार्थ ८०० cc च्या गाडीची शक्ती २२०० cc च्या गाडीपेक्षा कमी असते. तर असा तीव्र चढ कमी शक्तीच्या गाड्यांना चढताच येणार नाही. म्हणून सर्व गाड्यांना रस्त्यावरून जात यावे ह्यासाठी नागमोडी रस्ता बनवतात ज्याचा चढ कमी असतो. ह्याचा तोटा असा आहे की गाड्यांना एकंदर अंतर जास्त कापावे लागते. म्हणजे उभे (vertical ) अंतर तितकेच कापले जाते (डोंगराच्या उंची इतके) पण आडवे (हॉरीझॉन्टल) अंतर नागमोडी रस्त्याने जास्त कापावे लागते. पण सर्वांना जाण्यासारखा मार्ग हवा असेल तर ही तडजोड करावी लागते. सुरक्षितता हे कारण आहेच.

उत्तम, माहितीप्रद लेख.. 'जो वक्राकार मार्ग असतो तो प्रत्यक्षात...' ही संकल्पना आवडली, थोडीशी हळहळ ही, की थोडी आधी कळली असती तर माझ्या दिवळी अंकालरिता लिहिलेलेया लेखांत संद्रभ देवु शकलो असतो. असो पुन्हा केंव्हातरी उल्लेख करीन. धन्यवाद.

शिद 26/09/2016 - 22:34
माहीतीपुर्ण लेख. विमानात सिनेमे पाहून कंटाळा आला की माझा फेवरेट टाईमपास म्हणजे रूट पहात बसणे. जर खिडकीजवळ जागा मिळाली असेल तर नकाशात विमानाचा रुट पहात खाली पाहताना कळत जाते की आपण नक्की कुठून उडत चाललो आहोत ते.

मदनबाण 27/09/2016 - 15:52
ज्यांना कळलेलं नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. या माहितीचा दैनंदिन जीवनात किती उपयोग आहे? तर रूबिक्स क्यूब सॉल्व्ह करता येण्याचा किती उपयोग होता? तितकाच. नगण्य! हुश्श्श्य...मला वाटलं माझ्याच टकुर्‍यात गुळाचा खडा ठेवलेला आहे आणि त्यामुळेच मुंग्या आल्या आहेत ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)

स्वीट टॉकर 27/09/2016 - 19:45
संदीपभाऊ - तुम्ही टाकलेली सगळीच अ‍ॅनिमेशन संकल्पना कळण्यासाठी उपयोगी असतात. धन्यवाद! ध मु - तुमचं म्हणणं बरोबर आहे. मात्र बोली भाषेत आपण 'छोट्या मापाचा चेंडू' म्हणण्या ऐवजी 'छोट्या आकाराचा चेंडू' असं म्हणतो. प्रसाद भागवत - तो दिवाळी अंकाचा लेख तुम्ही इथे टाकलेला दिसत नाही. मदनबाण - :)

सुमेरिअन 28/09/2016 - 14:44
खूप उपयुक्त माहिती दिलीत स्वीटो काका! आणि व्यवस्थित कळली पण. सोप्पी करून सांगितलीत तुम्ही. इतकी महत्वाची गोष्ट आम्हाला अजून माहिती नव्हती याचंच आश्चर्य वाटतंय मला. अभ्यासक्रमात असायला पाहिजे हे. पुन्हा एकदा धन्यवाद! या लिंकमूळे प्रमाण/रेशो समजण्यात अजून मदत झाली - http://thetruesize.com/#?borders=1~!MTc4NDY3NDU.NTk1OTIyNQ*MzYwMDAwMDA(MA~!CONTIGUOUS_US*NDM4MjIzOA.MTk3NTkwMjQ(MTc1)MQ~!IN*NTI2NDA1MQ.Nzg2MzQyMQ)MA~!CN*MTI0ODcwNDA.MTY0MzAwNjU(MjI1)Mg .

गतीशील 17/10/2016 - 11:05
वाचून खरंच मजा आली. पु लं चे वाक्य आठवले. मुलगी सरळ वळणाची आहे म्हणजे नेमकं काय हे आत्ता कळलं..!!

आनंद 19/10/2016 - 22:53
१००० किमी जास्त अंतर असुन टेल विंडचा फायदा घेत २ १/२ तास विमान लवकर पोचले. दिल्ली ते स.फ. पोलर रुट घेतला नाही. https://blog.flightradar24.com/blog/air-india-taking-advantage-of-tailwinds/

स्वधर्म 21/10/2016 - 18:31
बरेच दिवस पडलेले कोडे सुटले. धन्यवाद. समजा, पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’ सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला, जो बहुश: महासागरावरून जाईल. दुसरा एक दोरा, जो या विमानांच्या ‘सो कॉल्ड’ वक्रमार्गाने (‘ग्रेट सर्कल रूट’) जाईल, म्हणजेच जमिनीच्या लगत व बराचसा उत्तर दिशेकडून. तर या दुसर्या दोर्याची लांबी कमी भरेल का? मी करून पाहिले नाही, पण जर उत्तर होय, असे असेल, तर इतके conceptual न वाचता, हीच गोष्ट आधिक सोप्या पध्दतीने व लगेच कळेल का? ** जर दुसर्या दोर्याची प्रत्यक्षात लांबी कमी भरली नाही, तर वरचे स्पष्टीकरण समजूनही पटायला अवघड आहे.

In reply to by स्वधर्म

पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’ सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला, जो बहुश: महासागरावरून जाईल. दुसरा एक दोरा, जो या विमानांच्या ‘सो कॉल्ड’ वक्रमार्गाने (‘ग्रेट सर्कल रूट’) जाईल,
पृथ्वीच्या गोलावर सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला तर तो फ्रान्सवरून जातो. ‘ग्रेट सर्कल रूट’ म्हणजे ग्रीनलँड वरून गेल्यास अंतरात फारसा फरक पडत नाही,परंतू सपाट नकाशावर सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क हा मार्ग सौदी अरेबिया ,इजिप्त, मोरोक्को मार्गे जातो. हे अंतर ‘ग्रेट सर्कल रूट’ पेक्षा अधिक आहे.

स्वीट टॉकर 23/10/2016 - 14:29
प्रवासात असल्यामुळे दखल घेऊ शकलो नाही. क्षमस्व! आनंद - असे जे साधारण ताशी साठ ते ऐंशी मैल वेगवेगानी २५००० ते ४०००० फूट उंचीवरून वाहाणार्या वार्याच्या करंट्सना 'जेट स्ट्रीम्स' म्हणतात. ऋतूंप्रमाणे त्यांची जागा, उंची आणि वेग बदलंत असतात. उपग्रहांकडून मिळणारी माहिती आणि historical data मधून त्यांची जनरल जागा माहित असते पण दहा तासांनंतर त्यानी त्याची उंची अथवा रस्ता थोडासा बदललेला नसेल अशी ग्वाही कोणीही देऊ शकत नाही. प्रत्येक इन्टरनॅशनल एअरलाईनचं 'डिस्पॅच डिपार्टमेंट' प्रत्येक फ्लाइटच्या आधी याची माहिती काढूनच आपापल्या विमानांचा मार्ग ठरवतात. प्रत्येक विमानाला एअर ट्रॅफिक कंट्रोलरने दिलेल्या उंचीवर आणि मार्गावरच विमान उडवावं लागतं. नाहीतर अपघात होतील. त्यामुळे जेट स्ट्रीम शोधायला 'थोडं खाली उडून बघतो, उजवीकडे वळून बघतो!' असं वैमानिकाला स्वातंत्र्य नसतं. एअर इंडियाच्या बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे पूर्णपणे मार्ग बदलणं क्वचितच केलं जातं. याचं कारण असं की मार्ग इतका बदलून जर का त्या विमानाला तो जेट स्ट्रीम बरोब्बर मिळाला नसता तर ते एक तास उशीरा पोहोचलं असतं. मग आपल्याला ही न्यूज वाचायला मिळाली नसती मात्र त्या employee च्या प्रमोशनची काशी होऊ शकली असती. स्वधर्म आणि मार्मिक - दुसर्या दोर्याची लांबी कमी भरायलाच पाहिजे. आपण हा प्रयोग छोट्या पृथ्वीगोलावर करून बघंत असल्यामुळे आपली छोटीशी experimental error हा प्रयोग फसवू शकते. मात्र मुंबई न्यूयॉर्क ऐवजी दिल्ली व्हॅन्कूव्हर अशा फ्लाइटचा मार्ग पृथ्वीगोलावर दोर्याने तपासला तर ग्रेट सर्कल आणि र्हम्ब लाईनच्या अंतरात जास्त फरक पडेल आणि प्रयोग जास्त यशस्वी होईल असं वाटतं.

आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (ऍटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत? हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस मिपावर उपस्थित झाला आहे. शिवाय माझ्या व्यनिमध्ये देखील ही विचारणा झाली आहे. विचारलंत ना? घ्या आता!

अमेरिकेतले अनुभव - मेडिकल ट्रीटमेंट आणि इन्शुरन्स

ट्रेड मार्क ·

अर्धवटराव 01/09/2016 - 02:35
मग आपला मध्यमवर्गीय विचार करून मी इन्शुरन्स घ्यायचा नाही असं ठरवलं.
सर्वात पहिली चुक. परदेशी, खास करुन अमेरीकेत जात असाल तर व्हिसा नंतर सर्वात आवष्यक गोष्ट म्हणजे इन्सुरन्स, असं म्हणतात. इन्सुरन्स सुद्धा भारतीय कंपन्यांकडुन नाहि तर अमेरीकन कंपन्यांकडुन.

In reply to by अर्धवटराव

ट्रेड मार्क 01/09/2016 - 04:45
गणिती विचार केला तर मला प्रतिमहिना $४०० असे किमान ५ महिने (आम्ही गाशा गुंडाळून परत गेलो म्हणून) प्रीमियम भरायला लागला असता. तेवढा भरून पण Deductible पूर्ण होईपर्यंत (साधारण $४५००) सगळे मलाच भरावे लागले असते आणि त्यावर २०% माझा हिस्सा द्यावाच लागला असता. म्हणजे मी सांगितलेल्या केस मध्ये ३६०० मला भरायला लागले असते. एकूण खर्च: प्रीमियम: $२००० + बिल $३६०० = ५६०० मी एकटा पुढे अमेरिकेत राहिलो असतो तर $४००*१२ = ४८००... त्यामुळे!!! कंपनी देते तो सोडून दुसरा इन्शुरन्स घेतला असता तर त्याचा प्रीमियम खूपच जास्त असतो, साधारण $८०० ते $१००० प्रतिमहिना. त्या हिशोबाने साधारण $४००० ते $५००० भरायला लागले असते, वर Deductible ची भानगड आहेच. म्हणजे हा पर्याय खूपच महागडा आहे. वरील दोन्ही पर्याय टाळून मला फक्त $८०० मध्ये काम झालं ही देवाची कृपाच म्हणायची. अमेरिकेत येताना इन्शुरन्स घ्यावा म्हणतात पण फारच tricky decision आहे. नुसतं भेट द्यायला येणाऱ्यांना फक्त $५०,००० कव्हरेज साठी सहा महिन्यांना २००० ते ३००० प्रीमियम कमीतकमी पडतो. त्यातही दुर्दैवाने तुम्हाला मोठ्या आजारावर (उदा. हार्ट अटॅक) उपचार घ्यावेच लागले तर इन्शुरन्स कंपनी, अगदी अमेरिकन असली तरी, आधीपासून असलेला आजार (Pre-existing ailment) म्हणून भरपाई नाकारतात. बहुतेक वरिष्ठ नागरिकांना रक्तदाब, मधुमेह असतो व असे लोक दुर्दैवाने यात सापडले तर मग हार्ट अटॅक येण्याचं कारण रक्तदाब आहे असं सांगता येतं. माझ्या एका मित्राची आई इथे आली असताना तिला हार्ट अटॅक आला. ४ दिवस ICU मध्ये ठेवला पण दुर्दैवाने त्यांचे निधन झालं. बिल फक्त १३०,००० डॉलर्स सांगितलं आणि इन्शुरन्सने हात वर केले. एवढे पैसे देणं शक्यच नव्हतं त्यामुळे माझ्या मित्राने पण देऊ शकत नाही म्हणून सांगितलं, दहा वर्ष होऊन गेली अजून तो ते निस्तरतोय. त्यामुळे तुमच्या नशिबावर हवाला ठेवायचा आणि निर्णय घ्यायचा.

In reply to by ट्रेड मार्क

अर्धवटराव 01/09/2016 - 04:51
पॅट्रीयट अमेरीका वगैरे अनेक कंपन्या आहेत. प्रति माणुस ~१०० डॉलर्/महिना रेट पडतो साधारणतः असो. अमेरीकी हेल्थ इन्सुरन्स हा वेगळा कटकटीचा विषय आहे हे खरं.

In reply to by अर्धवटराव

ट्रेड मार्क 01/09/2016 - 05:02
पण गणित मांडलं तर बरेच पैसे जातात (३ माणसांचे ३०० प्र .म.) * ५ महिने = १५००+ (२०% पहिल्या ५००० साठी) = १००० म्हणजे २५०० गेलेच असते. असो. खर्चाच्या बाबतीत मी नशीबवान ठरलो म्हणायचं (काष्ठ - स्पर्श).

In reply to by रुपी

ट्रेड मार्क 02/09/2016 - 00:28
आधी प्रोसेस समजावून घेऊ - १. हॉस्पिटल बिल पाठवते २. भरलं नाही तर ३ रिमाईंडर्स येतात ३. तुम्ही काहीच केलं नाहीत तर बिल कलेक्शन एजन्सीला पाठवतात. - इथपासून तुमच्या क्रेडिट स्कोअर वर परीणाम व्हायला सुरुवात होते. ४. कलेक्शन एजन्सी तुमच्याकडे पैश्याची मागणी करत राहते. यात दहशत, गुंड पाठवणे, धमक्या देणे हे प्रकार नसतात. पण तुमच्याकडून पैसे कुठल्या मार्गाने वसूल करता येतील ते बघतात. ५. तुमच्या क्रेडिट स्कोअर वर परीणाम झाल्याने तुमच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात. म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळत नाही, कर्ज मिळत नाही, जरी मिळालंच तरी खूपच जास्त व्याजाने मिळतं ई. तुम्ही काय करू शकता - १. हॉस्पिटल कडून बिल मिळणे ते ३ रिमाईंडर्स या काळात तुम्ही हॉस्पिटलबरोबर बोलून काही मांडवली होते का ते बघू शकता. हॉस्पिटल तुम्हाला बिल कमी करून देऊ शकतं किंवा अश्या प्रसंगी मदत करणारे लोक वा काही धर्मादाय संस्था यांचे पत्ते देतात. अजून एक मार्ग म्हणून तुम्हाला महिन्याचा हप्ता बांधून देतात. २. क्रेडिट रेटिंग एजन्सी (कलेक्शन नव्हे) उदा. Transunion, Experian and Equifax यांच्याशी बोलून क्रेडिट रिपोर्टवरील नोंद कशी कमी करता येईल ते बघावे. ३. अगदीच मोठी रक्कम असेल तर वकील नेमावा. माझा अनुभव - मुलीला डॉक्टरांना दाखवण्यासाठी मी मध्यंतरी ७-८ महिने अमेरिकेत नव्हतो. त्याकाळात एक $६० चं बिल त्या हॉस्पिटलने माझ्या त्यांच्याकडे असलेल्या पत्त्यावर पाठवलं. मी ते घर साहजिकच सोडलेलं होतं. आणि मला माहितीही नव्हतं की ते अजून काही बिल पाठवतील. पुढे मी अमेरिकेत परत आल्यावर कारसाठी कर्ज मागितलं. तर जवळपास १२-१४ ब्यान्कांनी कर्ज नाकारलं, शेवटी होंडा फायनान्सकडून व्याजदर ९.५% नी कर्ज मिळालं. मी क्रेडिट रेटिंग एजन्सीला फोन केला की मला कर्ज का मिळत नाहीये. तेव्हा त्यांनी सांगितलं की $६० चं एक बिल तुम्ही भरलं नाहीये त्याची नोंद क्रेडिट रिपोर्टवर आहे. मग त्यांना मी सगळी कहाणी सांगितली. मी अमेरिकेत नव्हतोच म्हणून मला बिल आलेलं कळलं नाही वगैरे. त्यांना ते पटल्यावर ती नोंद काढून टाकण्यात आली. तोपर्यंत २-३ महिने मी ९.५% नी व्याज भरलं. मग एका क्रेडिट युनियन कडून मला १.९९% नी refinance कर्ज मिळालं. थोडक्यात तुम्ही मुद्दाम पैसे बुडवत नसाल तर ते तुम्हाला शक्य तेवढी मदत करतात.

In reply to by स्रुजा

ट्रेड मार्क 02/09/2016 - 01:24
फटके खाऊन काही गोष्टी शिकलोय, तीच माहिती आपल्यापैकीच कोणालातरी उपयोगी पडेल. आणि मला पण इतरांचे अनुभव वाचून शिकता येईल. बाकी फेअर प्राईसबद्दल म्हणाल तर काही प्रश्न विचारून, खटपटी करून बरी प्राईस मिळवता येते. सुरुवातीला इथे मला पण वाटायचं आपण असं कसं विचारायचं किंवा लोक काय म्हणतील. एवढंच काय तर एखाद्या रेस्टॉरंटचं कूपन असेल ते दाखवायला पण मला लाज वाटायची. पण मग एकदा कळलं हे कसं चालतंय सगळं मग बिनधास्त विचाराला लागलो. मिळालं तर मिळालं नाहीतर नाही :) या धाग्याच्या विषयाला थोडं अवांतर होतंय पण फेअर प्राईसचा विषय निघाला म्हणून राहवत नाहीये म्हणून अजून एक उदा. - बहुतेक सगळी डिपार्टमेंटल स्टोअर्स प्राईस मॅच करतात. म्हणजे काय तर मी टारगेटच्या वेबसाईटवर बार्बेक्यु $२४ ला बघितला. पण साईझ नक्की कळेना म्हणून म्हणलं आपणच दुकानात जाऊन बघू आणि घेऊ. तर दुकानात तोच बार्बेक्यू $३५ ला होता. बिल करताना मी त्यांना मोबल्यावर साईट उघडून दाखवलं की ऑनलाईन तुम्हीच $२४ ला विकताय तर मी ऑनलाईन मागवतो स्टोअरमधे (स्टोअर पिक-अपला डिलिव्हरी चार्जेस नसतात) आणि ४ दिवसांनी इथूनच घेऊन जाईन. तर त्यांनी तो तिथेच मला $२४ ला दिला. याचप्रमाणे कॉम्पिटिटर प्राईस मॅच पण असतं.

In reply to by ट्रेड मार्क

स्रुजा 02/09/2016 - 03:08
बाकी फेअर प्राईसबद्दल म्हणाल तर काही प्रश्न विचारून, खटपटी करून बरी प्राईस मिळवता येते. सुरुवातीला इथे मला पण वाटायचं आपण असं कसं विचारायचं किंवा लोक काय म्हणतील. एवढंच काय तर एखाद्या रेस्टॉरंटचं कूपन असेल ते दाखवायला पण मला लाज वाटायची. पण मग एकदा कळलं हे कसं चालतंय सगळं मग बिनधास्त विचाराला लागलो. मिळालं तर मिळालं नाहीतर नाही :)
हो, असं मला ही बिचकायला व्हायचं. माझ्या हक्काचं इन्क्रीमेंट मागायला पण माझी झीभ पटकन चालत नाही. पण नशिबाने आत्तापर्यंत इन्क्रीमेंट साठी किंवा फेअर पगारासाठी भांडायची वेळ आली नाही , टच वुड. माझा नवरा असल्या प्राईसेस किंवा माझा फायदा मला दे टाईपच्या गोष्टी अत्यंत सहज आणि कौशल्याने करत असतो, त्याला करताना बघितलं की वाटतं, अरेच्या, सोप्पय. पण पुन्हा पुढची वेळ आली की माझे आपले पहिले पाढे ५५. त्यामुळे आमचे सगळे इन्शुरन्स फिन्शुरन्स चे डिल्स् तो करतो. मी सोप्पय, सोप्पय करत स्वतःचं समाधान करते ;) मला तर वाटतं की भारतात नवश्रीमंतांनी उगाचच " मांडवली" किंवा " स्वस्तातली" गोष्ट याला बदनाम करुन ठेवलंय . किंमत बघुन घेताय म्हणजे तुम्ही गरीब. आजुबाजुला अनेक जणं उगाच मोठे पणा मिरवायला असं दुसर्‍याला जज करत असतात. इथे सुरुवातीला समोरची सेल्स मन पण सेल वर ची गोष्ट आहे का वगैरे बघताना मनातल्या मनात आपल्याला चिंधी म्हणेल असं वाटायचं पण नंतर वाटायला लागलं , की नाही. ती जी वस्तु विकुन पगार कमावते आहे ती विकत घ्यायची माझी तयारी असेल तर मी चिंधी नाही. मग ती काहीही म्हणो. अगदी कंपनीचा सी ईओ ला सुद्धा मुलीवर वैतागताना पाहिलं की "ही सारखी मित्र-मैत्रिणींबरोबर जाते सिनेमाला आणी मग अगदी सहज ३५-४० $ खर्चुन येते, त्यापेक्षा कमी पैशात मी आणि माझी बायको छान जेवतो." आता त्याला पैशांची कमी नाहीये पण व्हॅल्यु फॉर मनी मिळावी अशी त्याची ही इच्छा आहे. इथे हा फार मोठा फरक आहे. एका कलिग ची मुलगी खुप चांगली अ‍ॅथलीट आहे, तिला मोठ्या लीग मध्ये टाकायचं तर पैसा खुप लागतो पण तो बिनदिक्कत पणे मला परवडत नाही हो हे सांगत असतो, स्पॉन्सर शोधत असतो. पैशांचा डोळ्यावर पडदा नसावा आणि आव ही आणु नये. या कन्स्झुमर मार्केट मध्ये तुम्हाला तुमचा फायदा ही करुन घेता यायला हवा. नाही तर परवडते म्हणुन २ $ ची गोष्ट ४ $ ला आणली दर वेळेस तर लाखाचे १२ हजार व्हायला कितीसा वेळ लागणार? तसं होऊ नये त्यासाठी भीड पडता कामा नये, हे सूत्र मी इथे सगळ्यांना पाळताना बघते. आपण ही हा विचार करायलाच हवा.

In reply to by स्रुजा

ट्रेड मार्क 02/09/2016 - 05:12
जोपर्यंत कोणाला फसवून किंवा धमकावून कमी किमतीत मिळवत नाही तोपर्यंत लाज का वाटून घ्यावी.

In reply to by स्रुजा

हेमन्त वाघे 02/09/2016 - 09:48
बऱ्याचदा मी असे अति श्रीमंत लोक पहिले आहेत कि ते त्यांच्या LUXURY वस्तू वर हि पैसे वाचवतात 1) माझ्या ऐका बिल्डर मित्राने जेव्हा मर्सिडिस ई क्लास 3 वर्षांपूर्वी घेतली - तेव्हा त्याने मुंबई , पुणे व ठाणे मधील सर्व डिलरशिप कडून कोटेशेन घेतली होती . 3 महिने त्याने वाईट घासाघीस केली . एकदा अभिमानाने त्याने मला सांगितले कि बँकॉक मधून त्याला 1.5 लाखाची पर्स 45 हजारात मिळाली ! 2) अजून माझा ऐक क्लायंट जो के अब्जाधीश आहे , माझ्या 30-40 हजाराच्या बिलाचा प्रत्येक हिशोब बघतो . त्यानेसुद्धा ऑडी A6 अशीच हार्ड बार्गेन करून घेतली होती . आणि अनेकदा तो सोया म्हणून रिक्षा , टॅक्सी नाहीतर आमच्यासारख्या व्हेंडर च्या छोट्या गाड्यातून फिरतो . आमच्या माहितीत खरे तर त्याला मर्सिडिस एस क्लास पण परवडेल . हिरानंदानी नवीन असताना , आणि मार्केट पडले असताना त्याच्या वडिलांनी 3500 squre फूट चा ( होय !) फ्लॅट आणि 6 पार्किंग कशी XX फाट भावात ( तो पारशी आहे , शिव्याच देतो) घेतली ते अभिमानाने सांगितले .आणि त्याचे कफ परेड ला पण फ्लॅट्स आहेत . त्याला आम्ही विदेशी कंपन्यांबरोबर तासंतास भावासाठी खिचखीच करताना आम्ही स्वतः बघितले आहे ! 3) माझ्या एका माजी बॉस ने मुलीचे लग्न करायचे आहे म्हणून 4-5 वर्षे विदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात सिंगल माल्ट च्या बाटल्या जमवल्या होत्या. लग्नाआधीच्या 2 पार्ट्या त्याने घरातच देऊन दारू वर बरेच पैसे वाचवले !! 4) एक बँकर मित्र घड्याळ घ्यायचे म्हणून 6-7 महिने थांबला होता .. तो गरीब नक्कीच नव्हता कारण त्याचे बजेट 1.5 लाखाचे होते . शेवटी त्याला 40% सवलतीत ओमेगा मिळाले ! 5) लुक्सरी हॉटेल मद्ये फुकटच्या दारू पार्टीत मी सर्वानाच रांग लावताना बघितले आहे ! तसेच तेथे हि सर्वात महागडी दारू आदी संपते ( मी अशा रांगेत बराच पुढे असतो किंवा पहिला राहायचा प्रयत्न करतो)! म्हणून पैसे वाचवायची लाज बाळगू नका !

In reply to by हेमन्त वाघे

संदीप डांगे 02/09/2016 - 10:08
निगोशिएशन ही एक कला व गरज आहे, त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. आपले मध्यमवर्गिय संस्कार आपल्या मानसिकतेला फ्रॅक्चर करुन आहेत. त्यामुळे चैनीच्या वस्तूंसाठी पैसा खर्च करतांना हात आखडता घेऊ नये हे आपल्या मनावर बिंबवलेले असते (राजे-महाराजान्चा इतिहास), म्हणून आपण एकतर पैसाच खर्च करत नाही किंवा केला तर अविचाराने करतो.

In reply to by ट्रेड मार्क

अनन्त अवधुत 02/09/2016 - 06:44
क्रेडिट कर्मा वर तुमचा क्रेडिट स्कोर विनामूल्य कळू शकतो. तसेच सगळ्या क्रेडिट रेटिंग एजेन्सी कडून एक क्रेडिट रिपोर्ट दरवर्षी फुकट मिळतो. अधिक रिपोर्ट हवे असतील तर पैसे (डॉलर्स) द्यावे लागतात. क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी क्रेडिट कार्ड आवश्यक आहे पण क्रेडिट कार्ड नसले तरी तुमचा क्रेडिट स्कोर असतो. मी जेव्हा या (क्रेडिट कर्मा) संस्थळाचा सभासद झालो तेव्हा माझ्याकडे केवळ डेबिट कार्ड होते. थोडे अवांतर झाले पण क्रेडिट चा विषय निघाला म्हणून सांगितले.

रुपी 01/09/2016 - 02:59
हा हा.. २०%च भरावे लागल्यामुळे गमतीदार अनुभव, नाहीतर चांगलाच तापदायक झाला असता. पण खरं सांगायचं तर तुमचा इन्शुरन्स कोणता वगैरेवर बरेच अवलंबून आहे. इन्शुरन्स कंपनीकडून बरेच पैसे मिळवता यावेत म्हणून काही डॉक्टर्स तुम्हाला जास्त आजारी दाखवायचा प्रयत्न करतात. इथली आरोग्यसेवा महाग आहे, म्हणूनच इन्शुरन्स महत्त्वाचा आहे. त्यातही वेगवेगळे प्लॅन्स असतात, त्यामुळे आपल्या गरजेनुसार योग्य घेणेही महत्त्वाचे आहे. मला स्वतःला बाळ झाले तेव्हा प्रसूतीचा खर्च एक पैसाही झाला नाही. फक्त तो खूप आजारी पडला तेव्हा इमर्जन्सीतून न्यावे लागले, दोन दिवस दाखल करुन घेतले आणि आमचे राहणे, (तो खूप लहान असल्यामुळे) माझे खाणे/पिणे वगैरे धरुन फक्त $३५ द्यावे लागले - जे इमर्जन्सीतून गेल्यामुळे लागतात हे प्लॅन घेतानाच माहीत होते. कुठल्या भेटीसाठी स्वतः किती पैसे भरावे लागणार ते आधीच माहीत असते आणि तेवढेच पैसे लागतात. फक्त माझ्या प्लॅनमध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोडे जास्त आजारी आहोत असे भासवावे लागते ;) मी माझ्या प्लॅनमुळे १००% समाधानी आहे असे नाही म्हणणार, पण २-३ प्रसंगी जी अफाट तत्परतेने सेवा मिळाली आहे त्याबद्दल मी ऋणीच आहे. थेट तुमच्यासारखा नाही, पण एका स्नेह्यांकडून एक किस्सा ऐकला होता - त्यांनाही कॅश द्यायची तयारी असेल तर अशीच बिलात सूट दिली होती एका डॉक्टरने. डेंटीस्ट मात्र या प्लॅनमध्ये येत नाही, म्हणून जरा डोळे उघडे ठेवावे लागतात. इन्शुरन्स कंपनीने पाठवलेले स्टेटमेंट आणि तीने आकारलेले पैसे यात कधीकधी मला तफावत जाणवते, पण मी ते पैसे सोडत नाही - १५/२० $ असले तरी.

In reply to by रुपी

स्रुजा 01/09/2016 - 03:19
डेंटिस्ट स्टेटमेंट मधला हा फरक मला इथे पण जाणवतो. डोळे उघडे ठेवावेच लागतात त्या बाबतीत. पण प्लान बरा असल्याने फार त्रास होत नाही. आमच्या इथे दोघांचे एम्प्लोयर इन्शुरन्स असतील आणि दोन्ही प्लान्स ८०-८० % समजा एका विशिष्ट ड्रग साठी कव्हर करत असतील तर जी काही रक्कम असेल ती आधी माझ्या इन्शुरन्स मधुन घेतात , उरलेला को-पे त्याच्या इन्शुरन्स कडुन ८०% कव्हर होतो . म्हणजे १००-८० - १६ असा ४ $ चा को पे होतो. जर १००% कव्हरेज असेल तर प्रश्न च मिटला. पण दोघांचे इन्शुरन्सेस तुमच्या फार्मसी मध्ये फाईल वर तत्परतेने आणणे आणि ते लोकं नीट कॅल्क्युलेट करतायेत ना हे बघणं फार महत्त्वाचं ! बाकी
मला अगदी गहिवरून आलं... मनात म्हणलं माउली (दिसायला आणि वयाने ती तशी नव्हती म्हणा) तुझे चरणकमल कुठे आहेत. पण स्वतःला सावरलं, कारण इथल्या प्रथेप्रमाणे मिठी मारायला पाहिजे, पण मग बाजूला उभ्या असलेल्या माझ्या धर्मपत्नीकडे बघून भावना आवरायलाच लागल्या. मला झालेल्या फ्रॅक्चर्ससाठी यांनी सवलत दिली असती की नाही जाणे.
ही ही ही.. फार च आवडलं.

In reply to by स्रुजा

खटपट्या 01/09/2016 - 05:08
दातांचा विमा वेगळाच असतो. मी एकदा रूट कनाल (बरोबर आहे शब्द?) करुन घेतले त्याचे २१००$ झमला, त्यातले मला ६००$ भरावे लागले. पण काम असे केले की परत कधी दाढ दुखली नाही.

In reply to by खटपट्या

रेवती 01/09/2016 - 06:37
दातांच्या कामाबाबत सहमत. दोनदा /वर्ष तपासण्या, दुरुस्त्या, क्लिनिंगे वेळेवर झाल्याने ते काम चांगले होते, नाहीतर भारतातही दातांचे खर्च कमी नसतात.

In reply to by रेवती

सुबोध खरे 01/09/2016 - 18:57
माझा चुलत भाऊ अमेरिकेत आहे. त्याला त्याच्या दांत वैद्याने रूट कॅनॉल चा उपचार करायला सांगितला ज्याचा खर्च २२०० डॉलर्स सांगितला. मी चुलत भावास सांगितले कि याच पैशात (१,४३,०००/- )तुला भारतात तिकीट काढून भारतात येऊन उपचार करणे परवडेल. त्याप्रमाणे तो भारतात येऊन आपली रूट कॅनॉल( खर्च रु ४५००/- ) करून आपल्या आईवडिलांना( आमच्या काकांना) भेटून परत गेला. यानंतर तो दरवर्षी आला कि न चुकता माझ्या दंतवैद्याला भेट देऊन ( आणि जे असेल ते करून) येतो. चार दिवसापूर्वी माझ्याकडे एक एन आर आय बाई चेक अप साठी होत्या त्यांना पण खर्च २३०० डॉलर्स सांगितला होता

In reply to by सुबोध खरे

खटपट्या 01/09/2016 - 21:39
तुमचा भाउ आइ वडीलांना भेटून आला ही जमेची गोष्ट. नाहीतर जेवढे दीवस तो भारतात आला तेवढ्या दीवसांचा पगार गेला. वर सुट्ट्या वापरल्या गेल्या. (काही ठीकाणी सुट्ट्या एनकॅश करुन देतात.) अवांतर - काही मित्रांना असा अनुभव आला आहे की जेव्हा जेव्हा ते सुट्टीवर गेले त्यानंतर लगेच त्यांची नोकरी गेली. बर्‍याच ठीकाणी माणूस रजेवर गेल्यावर त्याशिवाय काम चालू शकते का याची खातरजमा करतात. आणि जर सुट्टीवर गेलेल्या माणसाशिवाय काम होत असेल तर लगेच नारळ दीला जातो. सद्या मंदी आल्यापासून हेच धोरण आहे. त्यामुळे सुटी मागायला भीती वाटते.

स्रुजा 01/09/2016 - 03:09
ई.आर साधारण नेहमीच असा केऑटिक असतो. अगदी मुद्द्याची गोष्ट सांगायची झाली तर जर तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तिकडे गेला असाल तर तुमची टक्कर मरायला टेकलेलया पेशंट्स शी असते. तुम्ही थांबु शकता, ते नाही. त्यामुळे पहिलं प्राधान्य अशांनाच दिलं जातं. कॅनडा आणि अमेरिका दोन्हीमध्ये जाणवलेला एक खुप मोठा गैरसोयीचा भाग म्हणजे कोपर्‍यावरच्या डॉ. कडे तो " जवळ" आहे म्हणुन जाऊन येता येत नाही. साधारण एक दिवस वॉक इन्स साठी असतो आणि उरलेले दिवस आधी वेळ ठरवुन च जावं लागतं . वॉक इन दिवस सोडुन इतर दिवशी ताप आला तर टु बॅड ! बराच वैताग येतो.. शिवाय तिथे जाऊन पण असे काही दिवे लागत नाहीत. थातुर मातुर डोस देऊन परत पाठवलं जातं. ही गोष्ट खरं म्हणजे चांगली आणि वाईट दोन्ही आहे. छोट्या मोठ्या सिझनल आजारांना परस्पर हँडल करायची क्षमता शरीरात तयार होते पण तो छोटा मोठा आजार नस्ला तर वेळ वाया जातो. सगळं कसं बाय द बुक ! आधी ३ दिवस थांबा, मग एक माईल्ड डोस घ्या, नाहीच बरं वाटत का? मग अजुन एक डोस घ्या कारण तो डोस दिलाय हे कागदोपत्री दिसल्याशिवाय स्पेशालिस्ट कडे नाही पाठवणार. स्पेशालिस्ट कडे तुमची फाईल गेली की आधी तो त्याचा अंदाज लावणार. काय नुसती अ‍ॅलर्जीच आहे का? थांब मग तू ! ९-९ महिने देखील लागतात छोट्या मोठ्या खेळताना झालेल्या इन्जरिजना स्पेशालिस्ट दिसेपर्यंत. अ‍ॅलर्जी बिलर्जी तर पार एक सिझन जाऊन दुसरा येऊन तुमची वाट लावतो तरी तुम्ही वाट च पाहत असता. ई आर मध्ये जायचा मला ही एकदा योग आला होता. मैत्रिणीच्या नवर्‍याचं अ‍ॅपेन्डिक्स चं ओपरेशन होतं. तो पहाटे ५ वाजता गेला, पोटात दुखतं म्हणुन. मग टेस्ट्स , त्यात २ वाजले. हा उपाशीच. मग सर्जरी करायची ठरवली म्हणुन खायचं काही नाही. कधी तरी पहाटे २ ला नेलं सर्जरी ला. आमच्याकडे सगळं म्ह्यणजे सगळं हेल्थ कव्हरेज सरकारकडुन होतं त्यामुळे आम्ही आणि आमचे एम्प्लॉयर्स फक्त प्रीस्क्राईब्ड ड्रग्ज साठी तेवढा इन्शुरन्स आहे का बघतो पण म्हणून या वेळाचा त्रास व्हायचा तो होतोच. अशा वेळेला भारतीय सिस्टीम फार म्हणजे फार आठवते. विश्वासावर पेशंट्स जातात आणि डॉ देखील त्याला पात्र ठरतात , आणि हे उलटं देखील खरं आहे. मात्र एक आहे , एकदा इकडे तुम्ही सिस्टीम मध्ये आलात, पहिले वेळखाऊ सोपस्कार झाले की मग तुमची सगळी चिंता त्यांना . तुम्ही निवांत राहु शकता.

In reply to by स्रुजा

ट्रेड मार्क 01/09/2016 - 05:07
जे होते ते सगळे अगदी निवांत होते. बहुतेक वेगास मध्ये सकाळी ८ ला कोणी येणं ही दुर्मिळ गोष्ट असावी. त्यामुळे सगळ्यांना कळवून ते येईपर्यंत वेळ गेला असावा. पण बाकी शहरात पण काही फार त्वरित सेवा मिळते असं नाही. रच्याकने: तुम्ही कॅनडामध्ये असता का?

In reply to by ट्रेड मार्क

स्रुजा 01/09/2016 - 09:08
हो, मी कॅनडामध्ये आहे. त्यामुळे उठ सुठ इन्शुरन्स लागत नाही. प्रिस्क्राईब्ड् ड्रग्स, डेंटल आणि आय चेकप एवढ्यासाठी लागतो. मात्र आमचं ई आर तुमच्यापेक्षा वाईट आहे. कॅनडाच्या हेल्थ केअर चे स्वतःचे असे इशुज आहेत च पण एकदा सिस्टीम मध्ये आलात की बर्‍यापैकी सोपं होतं.

रेवती 01/09/2016 - 04:03
मलाही लिहायचय पण उजव्या हाताला कास्ट असल्याने आत्ता शक्य नाही. माझा इन्शू. असताना भारतात काय झाले ते सांगितले असते, तरी ट्रीटमेंट चांगली मिळाली.. आता पुढील अठवड्यात येथील को पे कळतील. गेली २ वर्षे को पे देऊन अनेक अनुभव आलेत. भारतातही लूट केल्याचे अनुभव वडिलांचे आहेत.

अजया 01/09/2016 - 12:09
बापरे! अमेरिकेत डेंटल क्लिनिक काढून मिपाकरांकडुन रुपयात पैसे घ्यावे काय ;)

In reply to by अजया

ट्रेड मार्क 01/09/2016 - 17:07
भारी शब्दप्रयोग आहे... ट्रीटमेंटची किंमत रुपयात घ्या पैश्यात नको. नाहीतर न संपणारी रांग लागेल तुमच्या क्लीनिकबाहेर. कृहघ्या... तसेही रुपयात घेतलेत तरी रांग लागेलच. इथे दातांची ट्रीटमेंट खूपच महाग आहे. नुसता दात काढायला मला $६० द्यायला लागले, वर इन्शुरन्सने त्यांचा हिस्सा दिलाच असेल. दाताच्या इन्शुरन्समध्ये दरवर्षी फुकट दात स्वच्छ करून देतात. त्यात तुम्हाला कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्याला किती पैसे लागतील तेही सांगितलं जातं. मला त्यांनी $७५०० माझा हिस्सा सांगितला आणि माझ्या पत्नीला $७००० फक्त, इन्शुरन्स कडून येणारे वेगळे. याच्या कितीतरी कमी पैश्यात आम्ही भारतात येऊन सगळी ट्रीटमेंट करून गेलो.

In reply to by ट्रेड मार्क

रेवती 01/09/2016 - 17:46
$७५००+$७००० हे तुम्ही फक्त दातांचे सांगताय असे गृहित धरतिये. आपल्याकडे लहानपणापासून मुलांच्या दंतारोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही व दातांची काळजी घेण्याविषयी शिकवले जात नाही. माझ्याही दातांच्य विकारांबाबत हेच झाले आहे. अनेक गावे व अनेक डेंटिस्ट बदलून झाले पण समाधानकारक ट्रीटमेंट मिळाली नाही. मला हामेरिकेत दातांवर बराच पैसा खर्च करावा लागला पण जी उपाययोजना झाली त्याबद्दल एकही तक्रार नाही. उलट माझ्या आईवडिलांनी त्यांच्या दातांवर भारतात काही लाख खर्च केले व परिस्थिती जैसे थे अशी आहे. अर्थात हे ज्याचे त्याचे दातांचे प्रश्न व उपलब्ध असलेले दंतवैद्य यांच्यवरही अवलंबून आहे. पण येथील दातांच्या ट्रीटमेंटबद्दल माझी काही तक्रार नाही.

In reply to by रेवती

दातांचा विमा आहे, तर दातांची कुठलीही ट्रिटमेंट करण्याची अजिबात इच्छा नाही पण फक्त क्लिनिंग करायचे आहे. त्यांनी बेनिफीट्स मध्ये लिहीलय की क्लिनिंग फ्री आहे. पण तरी दुधाने तोंड पोळल्याने.... =) तर खरंच क्लिनिंग फ्रि होईल का?

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/09/2016 - 18:05
हो. पण क्लिनिंगदरम्यान समजा त्यांना तुझ्या दातात क्या व्हिटी आढळली तर तुझ्या कानावर घालणे, ट्रीटमेंट प्लान बनवणे हे त्यांचे काम असल्याने ते सांगितलेले तुला चालेल का? पोस्टपोन करणे, न करणे तुझ्या हातात असेल हे नक्की. अपॉ. मेक करताना फ्री क्लिनिंग, तुझा इन्शू. याबद्दल फोनवर खात्री करून घे.

In reply to by रेवती

सुबोध खरे 01/09/2016 - 18:47
भारतात दुर्दैवाने दातांच्या आरोग्याबद्दल अक्षम्य अशी अनास्था आढळते. दाताच्या उपचाराचा खर्च थोडासा जास्त असेल तर बरेच लोक दात "काढून टाका" सांगतात. अगदी पहिली दाढ असेल तरीही( हा एक अतिशय महत्वाचा दात आहे) हेच अगदी पायाचे महत्त्वाचे नसलेले एक बोट कापायचे म्हटले तर लोक कितीही पैसे खर्च करायला तयार असतात. दाताला टाचणी टोचली तर दुखत नाही हे कारण. जाता जाता -- कवळीची चावण्याची क्षमता मूळ दाताच्या फक्त १५ % असते.

In reply to by सुबोध खरे

अजया 01/09/2016 - 19:15
हो. हा रोजचा संवाद आहे आमचा.पार वाट लावून लोक येतात.मग मोठी ट्रीटमेंट मोठा खर्च यात दात पाडणे हा आॅप्शन लोकांना बरा वाटतो.आधी न येण्याचे कारण कायम दात कालच दुखायला लागला हे असते. दात हा इतर अवयवांसारखाच जिवंत अवयव आहे हे कळायला लोकांना दात ठणकायला लागतो :(

In reply to by सुबोध खरे

योगेश कोकरे 01/09/2016 - 19:32
शहरी भागात थोडीफार जागरूकता आहे . ती पण सुशिक्षित लोकांमध्येच ,,,,गावी खूप कमी जागरूकता आहेत . लोकांना कोलगेट वर ज्यास्त विश्वास आहे .एक्दम चवीने कोलगेट खातात घासतात ,,,,अगदी ब्रश कसा घासावा इथपासून सुरवात होते ,,,,,,काही काही लोक लिंबाच्या काटक्या चघळतात ,,,,लिंबामध्ये गुणधर्म आहेत पण दात किती स्वच्छ निघतात याबद्दल शंका आहे .बाकी वरील खर्च ऐकून दंतवैद्य थोडे निराश होणे साहजिक आहे . पण काय करणार प्रक्रियांचा खर्च वाढवला /रेट वाढवला कि पेशंट कमी व्हायची भीती...

In reply to by योगेश कोकरे

विवेकपटाईत 02/09/2016 - 20:19
कडू लिंबाच्या काडीने दातून करणार्यांचे दात मजबूत राहतात. प्रत्यक्ष बघितले आहे. पण त्या साठी २०-२५ मिनिटे कडू चाववी लागते. तेवढा वेळ कुणा कडे.

In reply to by सुबोध खरे

ट्रेड मार्क 01/09/2016 - 20:24
एकूणच भारतीयांमध्ये तब्येतीच्या बाबतीत अनास्था आहे, त्यात दातांच्या बाबतीत जास्तच. आपण काय, कधी आणि किती खातो याच्यावर आपला काही कंट्रोल नाही. वर व्यायाम फारसा नाही (यात मी पण आलो). त्यामुळे भारतीय लोक तसे मालन्यूट्रीशन्ड म्हणले पाहिजेत. विशेषतः हे परदेशात राहिल्यावर जास्त जाणवतं. अर्थात इथेही काही सगळेच तब्येतीने चांगले असतात असे नाही. पण बरेच लोक्स अगदी बांधेसूद असतात, नियमित व्यायाम करतात, खाण्यावर कंट्रोल ठेवतात. जे नसतात ते मात्र शब्दशः वेडेवाकडे सुटलेले असतात. दाताच्या बाबतीत म्हणायचं तर भीती जास्त असते असं मला वाटतं. कॉलेजमध्ये असताना आमच्या आजोबांचा एक ठरलेला दंतवैद्य होता. माझी दाढ दुखत होती म्हणून मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तिथे माझ्या शेजारीच एक गाल सुजलेला माणूस बसलेला होता. तो म्हणाला रूट कॅनाल काही महिन्यांपूर्वी केलं त्यानंतर हे असंच आहे. बरीच सीटिंग्स झाली पण काही सुधारणा नाहीये. ते ऐकून मी जी धूम ठोकली ते पार त्या दाढेचे तुकडे पडल्यावर काढायला गेलो. विनोदाचा भाग सोडला तर ती खुर्ची, विविध टूल्स आणि हिरडीत दिलं जाणारं इंजेकशन याची बऱ्याच जणांना भीती वाटते.

In reply to by पिलीयन रायडर

अनन्त अवधुत 02/09/2016 - 05:39
पण क्लिनिंग झाल्यावर दातात फ्लुराईड का क्काय भरतात ते इन्शुरन्स देत नाही. आधीच डॉक्टरला आणि इन्शुरन्सला विचारून घेणे. त्याचे 15-20 डॉलर होतील, अर्थात डेंटिस्ट डेंटिस्ट चार्जेस भिन्न:

In reply to by पिलीयन रायडर

रुपी 02/09/2016 - 05:46
हे हे.. डेंटीस्टने माझे तोंड एकदा पोळवल्याने मी तर एका भेटीत सुरुवातीलाच तिला सांगितले की - मी माझे वॉलेटच घेऊन नाही आलेय, त्यामुळे जेवढे काही १००% कव्हर्ड असेल तेवढेच काम कर =) तिने त्या भेटीत तसेच केले, पण मला वाटते एकंदरीत तिने माझ्या बाकी दातांचे भविष्यात काम निघेल असे काही काही करुन ठेवले, त्यामुळे इन्शुरन्स असूनही मी २-३ वर्षे कुठल्याच डेंटीस्टकडे गेले नाही :(

माझ्या मनातल्या भावना आहेत अगदी.. इथे येताना मी माझ्या मुलाच्या हृदयाचय सर्व टेस्ट करुन आले होते. सर्व काही नॉर्मल आहे. इथे पहिल्या डॉकला वेलनेस चेकप मध्ये दाखवलं, त्यांनी हिस्टरी सांगितली, त्यांनी तपासलं.. सगळं नॉर्मल होतं. फक्त "इथल्याही" कारडिओलोजिस्टला दाखवा म्हणे. आम्हाला वाटलं शाळेसाठी कंपल्सरी आहे. पण आम्ही थांबलो आणी तसंही अपॉईंटमेंट मिळतच नव्हती. मग पुढची लस द्यायला वेगळ्या डॉककडे गेलो. तिला काही हिस्टरी माहिती नव्हती. तिने मानेवरची ऑपरेशनी खुण बघुन विचारलं की हे काय आहे? मी सांगितलं तर म्हणे इथल्या कार्डिओलॉजिस्टला का दाखवत नाही? म्हणलं का दाखवु पण? तर म्हणे "कारण तुम्हाला अ‍ॅव्हलेबल आहे इथे".. म्हणजे काय तर तुम्हा नॉन अमेरिकन लोकांना इथली लय भारी लोकं अव्हलेबल आहेत तर तुम्ही धन्य धन्य होऊन आधी इथे दाखवुन घ्यायला हवं!! मग म्हणे.. आणि हो.. ह्याच्या छातीत मर्मर ऐकु येतेय.! आता गेल्या चार वर्षात न जाणे किती डॉक्टरांनी त्याला तपासलय, कधीही कुणालाही काही ऐकु आलं नाही ऑपरेशन नंतर.. ना कुठल्या टेस्ट मध्ये काही डिटेक्ट झालंय.. हिला आम्ही ऑपरेशनचं सांगितलं की लग्गेच मर्मर ऐकु आली! पण आम्ही अर्थातच टरकलो! शोधाशोध सुरु केली.. आणि नेमकी त्याच वेळेला ही बिलं यायला सुरवात झाली.. आता आमचं फुल्ल धाबं दणाणलं आहे.. इथे कार्डिओलॉजिस्टला दाखवायला कदाचित किडन्या विकाव्या लागतील असा अंदाज आहे!!

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/09/2016 - 18:00
आम्हालाही नसलेल्या मर्मरबद्दल मुलाच्या तपासण्या करवण्यास सांगितले होते. असं लिहिता येत नाही, कधितरी फोनवर बोलू. आणि काहीतरी बोलू नकोस. कश्याला किडन्या विकाव्या लागतायत!

In reply to by स्रुजा

ओ आम्ची पहिलीच वेळ आहे ना..!! आम्हाला सवय नाहीये हो ५००$ ची बिलं पहाण्याची.. बरं एकदाही काही आजार आहे म्हणुन दवाखान्यात गेलो नाही आहोत.. तरी कसं काय ह्यात अडकलो देव जाणे! ती जी क्षयाची चाचणी आहे ना.. पीपीडी.. स्किन टेस्ट.. ती जर भारतातुनच करुन येता येणार असेल तर तसं सांगा लोकांना इथे यायच्या आधीच.. बिचार्‍यांचे पैसे तरी वाचतील!

In reply to by पिलीयन रायडर

ट्रेड मार्क 01/09/2016 - 20:01
शाळेला फक्त तुम्ही सगळ्या लसी दिल्या आहेत आणि टीबीची टेस्ट एवढंच लागतं. उगाच ती डॉक्टर सांगते म्हणून कार्डिओ ला भेटायची गरज नाही. तिला सांगायचं तुझ्या स्टेथो मध्ये मर्मर होत असेल. इथे डॉक्टर जे काही सांगतात त्यातलं काय काय खरंच गरजेचं आहे ते तिथल्या तिथे विचारायचं. अगदी आपलं समाधान होईपर्यंत. होतं काय की अमेरिकन लोक्स जरा काही इकडे तिकडे झालं की केस टाकतात आणि भरपाई मिलिअन्समध्ये मागतात. त्यामुळे डॉक्टर्स पण ज्या काही शक्य आहेत त्या सगळ्या टेस्टस करायला सांगतात. कारण त्यांच्या दृष्टीने इन्शुरन्स पैसे देणार असतं. आपण प्रश्न विचारले की आपल्याला त्यातला काय पाहिजे काय नाही ते कळू शकतं, माहिती घेऊन आपल्या भारतातल्या डॉक्टरला विचारू शकतो. त्यामुळे प्रश्न विचारणे गरजेचे आहे - - कसली टेस्ट आहे? - त्यातून काय काय कळेल? - मला आत्ता होणाऱ्या त्रासासाठी ती कशी गरजेची आहे? किंवा आत्ता काही त्रास होत नाहीये तरी का करायला पाहिजे? - साधारण किती खर्च येतो? - इन्शुरन्स मध्ये कव्हर होते का?

In reply to by पिलीयन रायडर

इथे कार्डिओलॉजिस्टला दाखवायला कदाचित किडन्या विकाव्या लागतील असा अंदाज आहे!! -- अबबबब. नुसती कटकट. आता मी बायको आणि मुलाला इकडे घेऊन आलो नाही ते योग्य केले असे वाटायला लागलेय.

योगेश कोकरे 01/09/2016 - 18:27
भारत एक मेडिकल टुरिजम : ह्या वर धागा काढा आता . कोणी कोणी कोणत्या वैद्यकीय मदतीसाठी भारतात आले होते आणि त्यामुळे त्यांचे किती पैसे वाचले ह्या बद्दल मिपाकरांनी प्रामाणिकपणे माहिती द्यावी . मेडिकल ट्रीटमेंट चा दर्जा ऊस(US) मध्ये चांगला असेल तर मग इकडे का बरं यावं. असो अखिल भारतीय स्वस्तात मस्त संघटना आपले कायम स्वागत करेल भारतात ......

In reply to by योगेश कोकरे

मलाही अजुन दर्जात फरक नाही जाणवलाय. म्हणजे हे पैसे नक्की कशाचे आहेत आणि तमाम अमेरिकन जनता का ते सहन करते आहे देवच जाणे!

In reply to by पिलीयन रायडर

चौकटराजा 01/09/2016 - 18:50
दुसर्‍या देशामधे युद्ध लावायचे शस्स्त्रात्रे विकायची अर्थव्यवस्था मोठी होते दरडोकी उत्पन्न वाढते क्रयशक्ती वाढते अशावेळी दर्जाचा काय संबंध....आपल्या कडील काही श्रीमंत मंडळी कांदा आवक कमी झाली की कोणत्याही भावाने कोणत्याही दर्जाचा कांदा घेतोच की.

In reply to by योगेश कोकरे

रेवती 01/09/2016 - 18:46
मी सुट्टीसाठी आले असताना धडपडले. हॉस्पि. मध्ये सेवा चांगली मिळाली. इन्शुरन्स आहे पण त्यासाठी २४ तास अ‍ॅडमिट व्हावं लागेल, त्याकळात फक्त निरिक्षणाखाली ठेवलं जाईल असं सांगितलं. मला फ्रॅक्चर असल्याने कास्ट घालावा लागणारच होता पण नियमात बसण्यासाठी थांबायची तयारी नव्हती म्हणून इन्शू. न वापरता उपचार करवून घेतले. तिथे काही तासां चे १५०००रु बिल आले ते भरले. हामेरिकेत असे करणे परवडले नसते. हामेरिकेत अनुभवलेली सेवा (दर्जा) व भारतातील सेवा सुदैवाने सारखी अनुभवास आली. इथे किरकोळ फरक ध्यानात घेतले नाहीत. सुदैवाने दिसेल त्या हॉस्पि. मधे जाण्याची वेळ आली नाही तर चांगल्या ठिकाणीच नेले गेले हे ही होतेच. अगदी चुका काढायच्याच तर मोडक्या पेशंटास कमीत कमी दुखवून कपडे बदलावेत ही गरज होती, त्यावेळी इतर गप्पा चालू होत्या, तसेच हामेरिकेत पेशंटास तयार करून ठेवले व दीड तास वाट बघत झोपवले. हे सोडता तक्रार नाही. हॉस्पि.च्या बर्‍या सेवेबद्दल तुम्ही समधान व्यक्त करू शकता ..........आनंद नाही.

फेरफटका 01/09/2016 - 20:08
तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कुठेही रहायचं असल्यास तिथल्या पद्धतीनं राहिल्यास गोष्टी सुकर होतात. अमेरिकेत टेंपररी येणारे - बहुतेक आय.टी. वाले, अमेरिकेत राहून, देसीपणा, जुगाड करून रहातात आणी चटका बसला की भारताचे गोडवे गातात असं माझं निरिक्षण आहे. तसच आणी तितकच, अमेरिकेतून भारतात सुट्टीसाठी गेल्यावर अमेरिकन सुविधांची अपेक्षा भारतात करतात आणी नाकं मुरडतात हा सुद्धा अनुभव कॉमन आहे. ह्या वाक्यात जनरलायझेशन वगैरे नाहीये आणी ते ज्याला लागू पडत नाही त्याने मनावर घेऊ नये. पण हा अनुभव खोटा नाहीये आणी अपवादात्मक सुद्धा नाहीये. ज्याला जिथे आवडतं, पटतं, जमतं तिथे रहाण्याचा चॉईस असल्यास आनंदाने तिथे रहावं पण एकीकडे राहून, दुसर्या ठिकाणचे फायदे हवेत, पण तिथल्या त्रुटी नकोत असे नकाश्रू वहायचे - बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स- ही अपेक्षा अवास्तव आहे.

In reply to by फेरफटका

मुद्दा पटतोय तुमचा कारण मी सुद्धा असे लोक पाहिले आहेत. पण फक्त वैद्यकीय सुविधेसारखी गोष्ट आवाक्यात हवी हे माझे मत आहे. ह्यात बेस्ट ऑफ बोथ वर्ड्ल्सचा प्रश्न नाही. ही मुलभुत गरज आहे.

In reply to by पिलीयन रायडर

फेरफटका 01/09/2016 - 20:40
"वैद्यकीय सुविधेसारखी गोष्ट आवाक्यात हवी" - सहमत. चांगले - वाईट अनुभव दोन्हीकडचे आहेत. प्रश्न आपल्या कंफर्ट झोन चा आणी कुठल्याही सिस्टीम ला सरावायचा आहे. अमेरिकेत सुद्धा डॉक्टर ला संध्याकाळी घरी फोन करून किंवा टेक्स्ट मेसेज करून सल्ला घेतला आहे, किंबहून डॉक्टर ने स्वतः सुद्धा शनिवारी टेक्स्ट करून मुलाच्या तब्ब्येतीची चौकशी केलेली आहे. भारतात जायच्या दिवशी मुलगा आजारी पडला असताना, त्या पिडीयाट्रीशीयन ने ऑफिस अवर च्या अर्धा तास आधी येऊन तपासणी करून औषध प्रिस्क्राईब केलं आणी फारमसिस्ट ला फोन करून ते अगदी तयार करून ठेवायला सांगितलं आणी वेळ आलीच तर म्हणून स्वतःकडची सँपल्स पण दिली. हे अनुभव सगळीकडे येतात. चांगला ईंश्यूरन्स असेल तर बाळंतपणं पूर्णपणे फुकट सद्धा होतात. आणी त्या च्या विरुद्ध टोक म्हणजे भारतातल्या एका दंतवैद्याने अर्धवट केलेलं रूट कॅनॉल, केवळ तुम्ही अमेरिकेत रहाता म्हणून आम्ही तुमच्याकडून जास्त पैसे घेतो असं सांगून घेतलेले जास्त पैसे (मग, आम्ही गरिबांकडून घेत नाही . आयजीच्या जीवावर बायजी उदार) हे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत. तरीसुद्धा कुठलीही एक सिस्टीम संपूर्ण चांगली / वाईट आहे असं मी म्हणणार नाही. ज्या सिस्टीम मधे रहायचं त्या सिस्टीम चे संकेत, नियम पाळल्यास ते सुकर - सुसह्य होतं ईतकच मी म्हणीन.

In reply to by फेरफटका

अर्थातच.. भारतातल्या वैद्यकीय सुविधेबद्दल खुप चर्चा आधीच झालेली आहे. मुर्ख डॉक्टर सगळीकडेच असु शकतात. भारतातली सुविधा किमान आवाक्यात तरी आहे हेच काय ते सुदैव! ह्या चर्चेतुन ह्या सिस्टीममध्ये ज्यांना रहायचं आहे त्यांना ती अधिकाधिक सुकर कशी होईल हेच शोधायचे आहे. नवख्यांना अनेक गोष्टी माहिती नसतात. अनेकदा केवळ माहिती नाही म्हणुन अकारण बरेच जास्त पैसे भरावे लागतात. त्या दृष्टिने ही चर्चा महत्वाची आहे.

In reply to by फेरफटका

ट्रेड मार्क 01/09/2016 - 20:57
याला पूर्ण सहमत ते संकेत, नियम सांगणे हाच उद्देश होता. बहुधा सफल झाला नसावा. लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, कमी जास्त झालं असेल ते सांभाळून घ्या.

In reply to by फेरफटका

ट्रेड मार्क 01/09/2016 - 20:54
धाग्याचा उद्देश फक्त माझा अनुभव सांगणे आणि त्यातून बाकीच्यांना काही झालीच तर मदत हा आहे. इथली वैद्यकीय व्यवस्था गंडलेली आहे हे म्हणणं म्हणजे शिव्या घालणं नसून फक्त माझं झालेलं इम्प्रेशन आहे. तिथल्या पद्धतीने राहायचं म्हणजे या प्रसंगात काय करायला पाहिजे होतं ते स्पष्ट केलंत तर आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन होईल. तुमच्याशी काही अशी अंशी सहमत. तुम्ही म्हणताय अनुभव खोटा नाहीये पण तो मनुष्य स्वभाव नाही का? साध्या हॉटेलात बसून खाताना लोक म्हणतात की कधी ५ स्टार मध्ये खायला मिळेल आणि ५ स्टार मध्ये गेल्यावर खाद्यपदार्थांना साध्या हॉटेलात कशी चव छान असते हे बोलतात. फक्त भारतीयच नाही तर अमेरिकन्स पण इथल्या हेल्थ सिस्टिमला शिव्या घालतात. पिरा म्हणतात तसं वैद्यकीय सेवा ही जीवनावश्यक आहे. त्यामुळे ती तरी आवाक्यात हवी. आपल्याकडून कोणी उगाच पैसे जास्त काढत नाही ना, जे पैसे आपण मोजतोय ते त्या सेवेसाठी योग्य आहेत ना, एखाद्या डीलमध्ये वस्तू स्वस्त मिळत असताना घेणं याला देसीपणा, जुगाड कसं म्हणता येईल? असो.

फेरफटका 01/09/2016 - 21:28
अगदी सुरूवातीला लिहील्याप्रमाणे तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. ह्या शेअरींग मधून खूप गोष्टींचा उहापोह होतो आणी बरीच वेगळी माहिती मिळते. ईंशूरन्स ईंडस्ट्री ने बर्याच क्षेत्रांना वेठीस धरलय हे तर खरंच आहे. पण त्यातही अधिक - उणं आहेच. आणी कितीही सरकर-बदल वगैरे झाले तरी ईतकी मोठी आणी खोलवर रुजलेली सिस्टीम फार मोठे बदल सामावून घेऊ नाही शकत. आपल्या हातात चांगला ईंश्यूरन्स घेणं, तुम्ही म्हणता तसं जास्तीत जास्त प्रश्न विचारून स्वतःला वेल-ईन्फॉर्म्ड ठेवणं हे असतं. एक चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेत डॉक्टर ला प्रश्न विचारल्याचा राग येत नाही. किंबहूना तुम्ही विचाराल तितकी तुमच्या तब्ब्येतीची माहिती, औषधांची माहिती, आफ्टर-केअर विषयी महिती तुम्हाला दिली जाते. ह्यातली बरीचशी न विचारता सुद्धा दिली जाते. कदाचित ह्या ईंश्यूरन्स ईंडस्ट्री च्या दणक्यामुळे सुद्धा तसं असावं. पण सवय नसताना कधी कधी गांगरून जायला पण होतं. २०% पैसे मागण्यामागे मला वाटतं की जर तुमचा ईंन्शूरन्स नसेल तर निदान ऑपरेटींग कॉस्ट तरी वसूल व्हावी हा उद्देश असावा. बाकीचं बिल बहूदा बॅड डेट म्हणून राईट-ऑफ केलं असावं. पण ईंश्यूरन्स नाही म्हणून उपचार थांबवले नाहीत. ईमर्जन्सी रूम मधे वाट पहायला लागणे हा मात्र सार्वत्रिक अनुभव आहे. पण वर कुणीतरी लिहील्याप्रमाणे तुम्ही बरेच वेळा मरणाशी झुंजणार्या पेशंट्स बरोबर लाईन मधे असताना, तुमचा क्रम उशीरा लागतो. "एखाद्या डीलमध्ये वस्तू स्वस्त मिळत असताना" - ह्या बाबतीत माझं तरी असं मत आहे की यू गेट व्हॉट यू पेड फॉर.

In reply to by फेरफटका

ट्रेड मार्क 01/09/2016 - 23:21
पण ईंश्यूरन्स नाही म्हणून उपचार थांबवले नाहीत.
हे महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगली गोष्ट. इथे नियमाप्रमाणे पहिले उपचार करणे आवश्यक आहे. तुम्ही पैसे देऊ शकता की नाही, कसे आणि कधी देणार हे सगळं नंतर येतं. त्यामुळे पहिले पैसे भरा मगच उपचार सुरु करू असं इथे होत नाही.
मरणाशी झुंजणार्या पेशंट्स बरोबर लाईन मधे असताना, तुमचा क्रम उशीरा लागतो
मान्य. मी केवळ ER मध्ये गेलं की तत्पर सेवा मिळेल अशी कोणी अपेक्षा ठेवू नये म्हणून सांगितलंय. मी तिथे भांडलो नाही, आवाज चढवला नाही वा शिव्याही घातल्या नाहीत. पण मी म्हणल्याप्रमाणे सगळे निवांत दिसत होते, म्हणून मग असं वाटलं की इथे माझी मुलगी त्रासात आहे तर तिला तरी पटकन ट्रीटमेंट द्या. दुसऱ्याबाजूने विचार केला तर ER मध्ये आलो म्हणून जास्त पैसे घेतात, मग काहीतरी SLA पाहिजे ना. नुसता एक्सरे काढायला २ तास, पुढे प्लॅस्टर (?) घालायला ३ तास. तेवढा वेळ मुलींसकट आम्ही उपाशी. पाणी प्यायचं असेल तर फक्त फाऊंटनवरून. बाहेर जाता येत नाही कारण ते कधी बोलावताहेत ते माहित नाही. त्यामुळे जरा अनुभव सांगावासा वाटला. तसंही प्रत्येकाला आपला पेशंट जास्त महत्वाचा वाटतो त्यामुळे मलाही वाटले असेल तेव्हा की लवकर उपचार मिळावेत.
यू गेट व्हॉट यू पेड फॉर
नॉट ऑल्वेज ट्रू. एखाद्या नामांकित हॉटेलमध्ये मी हॉटेलच्या वेबसाईट वरून रूम बुकिंग केलं तर $XX मध्ये मिळते आणि तेच priceline, expedia ई वरून केलं तर $XX - Y मध्ये मिळते. तर इथे काय फरक असेल? अश्या वेळेला उगाच बाणेदारपणा कशाला दाखवा? काही काही गोष्टीत देसीगीरी दाखवायला लागते त्याला काही उपाय नाही. उदा. इथे रेस्टोरंटमध्ये एका प्लेटमध्ये एवढं मिळतं की आम्ही दोघे खाऊ शकतो. मग आम्ही सरळ २ प्लेट घेऊन चौघे खातो. काही लोक विचित्र नजरेने बघतात पण काही पर्याय नाही. उगाच ४ प्लेट घ्यायच्या आणि टाकून द्यायचं पटत नाही आणि बांधून घरी घेऊन गेलं तर शिळं चांगलं लागत नाही. त्यामुळे आम्ही इग्नोर करतो त्या नजरा.

सुबोध खरे 01/09/2016 - 21:29
http://mobile.nytimes.com/2015/09/21/business/a-huge-overnight-increase-in-a-drugs-price-raises-protests.html औषधांच्या किमतीवर नियंत्रण नसल्याचे तोटे.

In reply to by सुबोध खरे

फेरफटका 01/09/2016 - 21:43
मुक्त बाजारपेठेची फायदे-तोटे आपण सर्वजण च भोगतो. त्याची दुसरी बाजू - खुली स्पर्धा ही पण आहेच. हे बघा: http://www.cbsnews.com/news/express-scripts-will-offer-1-alternative-to-750-daraprim-pill/

पद्माक्षी 01/09/2016 - 21:32
काही असले तरी प्लास्टर घालण्यासाठी ३५००डॉलर्स चे समर्थन कसे काय होऊ शकते ? रच्याकने, अमेरिकेसंदर्भात काही अडचण सांगितली तर लोकं लगेच डिफेन्सिव्ह का होतात?

In reply to by पद्माक्षी

फेरफटका 01/09/2016 - 21:40
"प्लास्टर घालण्यासाठी ३५००डॉलर्स चे समर्थन कसे काय होऊ शकते" - किती डॉलर्स पर्यंत समर्थन होऊ शकेल? हा प्रश्न उपरोधिक आहे ह्याची मला जाणीव आहे. पण कुठल्याही गोष्टीची किंमत ठरवताना बर्याच गोष्टी त्यात अंतर्भूत असतात - ज्यात फिक्स्ड कॉस्ट, ओव्हरहेड वगैरे पण येतं. "अमेरिकेसंदर्भात काही अडचण सांगितली तर लोकं लगेच डिफेन्सिव्ह का होतात" - मी कुठेही अमेरिकेचा बचाव वगैरे केला नाहीये. ज्याला जिथे सुखानं रहाता येईल तिथे रहावं, ज्या सिस्टीम मधे रहायचं असेल त्याचे संकेत / नियम पाळून रहावं, चांगले-वाईट अनुभव सगळीकडे येतात असा साधारण माझा सूर आहे. मांडलेल्या अडचणीवर एक दुसरी बाजू मांडली तर ते बचाव / समर्थन नाही तर, चर्चेची दुसरी बाजू आहे. हा अनुभव शेअर केल्याबद्दल धागाकर्त्याचं अभिनंदन केलं ते त्याच भुमिकेतून.

In reply to by फेरफटका

कॉस्ट संदर्भात. अगदी इमर्जन्सी नसली तरी इथे खुप जास्त पैसे लावतात. जसे की डोळ्यांच्या डॉक कदे पहिली व्हिजिट मुलाची,५८२$, एक्स रे - ४००$ इ. मुलाच्या वेलनेस व्हिजिट्चे (ज्यात अगदीच प्राथमिक तपासणी झाली) आम्हाला काही बिल नसले तरी डॉक्टरने ८५०$ क्लेम केले आहेत. तर इतकी कॉस्ट का? हीच गोष्ट भारतात फार स्वस्तात होते. एकवेळ जिथे मनुष्यबळ लागते तिथे मी समजु शकते. पण केवळ एक्स रे "काढण्याचे" ४००$ कसे काय होऊ शकतात? इतकी कसली कॉस्ट आहे? इथल्या जनतेचे पगार काय ते नक्की माहिती नाही, पण उत्पन्नाच्या मानाने अशा साध्या गोष्टींची कॉस्ट मला तरी जास्त वाटत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/09/2016 - 21:59
तुमचा इन्शू पुन्हा एकदा तपासावास असे सुचवते. आम्हीही डोळे तपासून घेतो पण एवढी बिले अजून तरी आली नाहियेत.

In reply to by रेवती

कसा तपासुन घेऊ? म्हणजे नक्की काय तपासुन घेऊ? डोळे तपासले, काही प्रॉब्लेम नाही म्हणाले आणि इतकं बिल पाठवलं.. ह्यात मी नक्की काय करु शकते. आमचा डोळ्यांचाही इनशुरन्स आहे.

In reply to by पिलीयन रायडर

ट्रेड मार्क 01/09/2016 - 22:45
तुम्हाला एवढे पैसे देणं आहे का टोटल बिल एवढं आहे? डोळ्याच्या इन्शुरन्समध्ये नेत्रतपासणी फुकट असते. एक्सरे चे जास्त पैसे लावलेत असं मला वाटतंय. रेवतीताई म्हणतायेत त्याप्रमाणे एकदा इन्शुरन्स काय आहे ते तपासून बघा. इथल्या जनतेचे पगार तुलनेने कमी असतात. NJ मध्ये personal per capita income of $50,781 आहे तर हाऊसहोल्ड इनकम (दोघेही काम करतात असं समजलं तर) $७२००० च्या आसपास आहे. बहुतेक करून IT वाल्यांना यापेक्षा बरा पगार असतो. अवांतर: इथल्या शाळाशिक्षकाला पगाराची सुरुवात साधारण ३०-३५००० डॉलर पासून होते तर पोलिसाला साधारण ४५-५०००० डॉलर्स पगार मिळतो. मला व्यनी करून कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवलेत तर मी काहीतरी सांगू शकेन.

In reply to by पिलीयन रायडर

बहुगुणी 01/09/2016 - 22:54
इतकी कॉस्ट का? हीच गोष्ट भारतात फार स्वस्तात होते. पिराताई: तुमच्या दुसर्‍या धाग्यात दिलेलं स्पष्टीकरण (चार्जमास्टर) हे कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मदत करेल. तुमच्या इंन्शुरन्स कंपनीला फोन करून 'साध्या' टेस्ट्स ची त्या हॉस्पिटल मधील त्यांची निगोशिएटेड किंमत काय आहे ते विचारा (तो तुमचा हक्क आहे), तुमच्या विभागातल्या फेअर प्राईस अंदाजावरून ती अवास्तव असेल तर ती तशी का आहे ते त्यांना विचारा. काही वेळा ते सभासद गमावण्यापेक्षा निगोशिएट करून चार्जेस कमी करतात. वचने किं दरिद्रता? फोन-पलिकडचे इंन्शुरन्स एजंट काही तुम्हाला व्यक्तिशः ओळखत नाहीत, ना तुम्ही त्यांना, नुसतं विचारण्याने फायदा होत असेल तर बोलून पहायला काय हरकत आहे?

In reply to by पिलीयन रायडर

पैसे जास्त का वाटतात ते कळले नाही ? डॉलर वि. रुपया अश्या हिशोबामुळे तुम्हाला कदाचित ते जास्त वाटत असावेत. तुम्ही भारतात आहात आणि एक्स रे साठी ५०० रु. डॉक्टर चार्ज ८५० रु. असा विचार करुन पाहिला तर कदाचित जास्त वाटणार नाही. फक्त डॉलरच्या जागी रुपया असे लिहून पहा बरे एकदा ! अवांतर (तुम्हाला उद्देशुन नाही) : बाहेर देशात जाताना घी देखा लेकीन बडगा नही देखा अशी अवस्था होत असते काय लोकांची ?

In reply to by धर्मराजमुटके

ट्रेड मार्क 01/09/2016 - 23:35
फक्त डॉलरच्या जागी रुपया असे लिहून पहा बरे एकदा !
याच धर्तीवर रुपयाच्या जागी डॉलर लिहा... भारतात मला समजा रु. १० लक्ष पगार असेल आणि मग अमेरिकेत आल्यावर मला $१० लक्ष पगार मिळणार असेल तर मग एक्सरे साठी $५०० द्यायला काहीच हरकत नाही. $१० लक्ष पगार - कधी येणार तो दिवस? सगळ्यांनी प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा रे.
घी देखा लेकीन बडगा नही देखा अशी अवस्था होत असते काय लोकांची ?
तसं नाही म्हणणार मी. फेफा साहेब/ ताई (?) जसं म्हणताहेत की नवीन जागी तुम्हाला तिथले नियम किंवा हे कसं चालतं हे माहित नसतं म्हणून सुरुवातीला त्रास वाटतो. कोणी सांगणारं असेल किंवा स्वानुभवातून एकदा कळलं की मग काही वाटत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

भारतात मला समजा रु. १० लक्ष पगार असेल आणि मग अमेरिकेत आल्यावर मला $१० लक्ष पगार मिळणार असेल तर मग
हा तुमच्या आणि तुमच्या एम्प्लॉयरच्या मधला प्रश्न आहे की नाही ट्रेडमार्कसाहेब? त्याचा अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या हेल्थ केअर सिस्टम आणि किंमत ह्याच्याशी काय संबंध आहे? :) अमेरिकन हेल्थ केअर सिस्टीम ही त्यांनी त्यांच्या नागरिकांसाठी बनवलेली आहे. तिथे प्रत्येक काम करणार्‍या व्यक्तिने हेल्थ इन्शुरन्स बाळगणं हे अपेक्षित आहे. जे रिटायर्ड वा अतीगरीब अमेरिकन्स आहेत त्यांच्यासाठी अनुक्रमे मेडिकेअर आणि मेडिकेड हे फुकट/स्वस्तातले इन्शुरन्स आहेत. दर्जाच्या दृष्टीने विचार केला तर किरकोळ कारणांसाठी भारत आणि अमेरिका इथे फारसा फरक नाही. पण इमर्जन्सी/ मोठ्या कारणांसाठी उपचार (इन्क्लूडिंग चाईल्डबर्थ) ह्याचा विचार केला तर दर्जात अजीन-अस्मानाचा फरक आहे. एक स्वतःचा अनुभव सांगतो... अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या पत्नीला एकदा अचानक भोवळ आली. तेंव्हा मी तिच्यासमोरच उभा असल्याने मी तिला पडण्यापासून सावरलं आणि बेडवर निजवलं. ९११ ला कॉल केलं. आता हॉस्पिटलला जावं लागणार म्हणून कपडे बदलले आणि शूज घालेपर्यंत (५-७ मिनिटे) दारावर नॉक झालं. दार उघडून बघतो तर बाहेर पोलीस उभा. "मेडिकल इमर्जन्सी?" "येस" "व्हेअर इज द पेशन्ट?" "इन द बेडरूम" तो पोलीस बाजूला झाला, त्याच्यामागे उभे असलेले दोन पॅरामेडीक्स आत शिरले. त्यांनी पेशंटला त्यांच्याबरोबर आणलेल्या फोल्डिग व्हीलचेअरवर बसवलं, तिथेच सलाईन चालू केलं. पेशन्ट अजून बेशुद्धच.... मी काही सांगू गेलो तर त्यांनी मला थांबवून त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, "विच इज युवर हॉस्पिटल?" मी सांगितल्यावर ते ती व्हीलचेअर घेऊन दोन जिने उअतरून निघून गेले. मी घराला कुलूप लावून खाली येऊन बघतो तर पुढे पोलीस कार आणि मागे अ‍ॅम्ब्युलन्स लाईटस लावून सायरन मारत बघता बघता भरधाव निघून गेले. त्यांच्या मागे मी शक्य तितल्या वेगाने पण सिगन्ल्स पाळत हॉस्पिटलात पोहोचलो (अंदाजे १५ मिनिटांचा ड्राईव्ह). मी गाडी पार्क करून आत जाऊन बघतो तर त्यांनी तिला अ‍ॅडमिट करून घेऊन आधीच उपचार सुरू केले होते. पेशन्ट शुद्धीवर आणला गेला होता, टेस्टींगसाटी ब्लड घेऊन ते लॅबला पाठवलं गेलं होतं.... लॉन्ग स्टोरी शॉर्ट, रात्रभर ऑब्झर्व्हेशनखाली ठेवून दुसर्‍या दिवशी पेश्न्टला डिस्चार्ज मिळाला. दुखण्याचं निदान आणि त्यावरची प्रिस्क्रिप्शन्स मिळाली... खर्च डॉलर ३० आला, इआरचा डिडक्टिबल. बाकी सगळा खर्च इन्शुरन्स कंपनीने भरला.... सारांश काय, की इन्शुरन्स चांगला भरवशाच्या कंपनीकडून हवा.

In reply to by पिवळा डांबिस

ट्रेड मार्क 02/09/2016 - 02:15
त्याचा अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या हेल्थ केअर सिस्टम आणि किंमत ह्याच्याशी काय संबंध आहे?
धर्मराजांनी $५०० आणि रु. ५०० सारखे माना म्हणलं म्हणून मी ते उदाहरण दिलं हो. माझा आणि माझ्या एम्प्लॉयरमधला हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय. कळकळीची विनंती आहे. बाकी तुम्ही सांगितलेला अनुभव बरोबर आहे आणि इतकी तत्पर सेवा मिळते यात वादच नाही. बाकी भरवशाच्या इन्शुरन्सकडून पण बरेच अडवणुकीचे किस्से आहेत. त्यामुळे भरवशाची म्हैस कधी कधी टोणगा पण देऊ शकते ;) इन्शुरन्स असो वा नसो इतकीच तत्पर सेवा प्रत्येकाला मिळेल याची खात्री आहे.

In reply to by ट्रेड मार्क

माझा आणि माझ्या एम्प्लॉयरमधला हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय. कळकळीची विनंती आहे.
मी फारसा आस्तिक नाही त्यामुळे माझ्या प्रार्थनेचा कितपत उपयोग होईल ते माहिती नाही... पण तुमच्यासाठी आणि अशा अन्य लोकांसाठी मी जरूर प्रार्थना करीन. शेवटी सगळ्यांचं कल्याण झाल्याशी मतलब.

In reply to by पिवळा डांबिस

उदय 13/09/2016 - 21:44
पिडाकाका, हे असे पाहिजे. एक स्वतःचा अनुभव सांगतो... अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे........ खर्च डॉलर ३० आला, इआरचा डिडक्टिबल. बाकी सगळा खर्च इन्शुरन्स कंपनीने भरला.... आता कुठलाही इंश्युरन्स ३० डॉलरमध्ये इआरमध्ये पाऊल टाकू देणार नाही.

In reply to by रुपी

पण तुझी डिलिव्हरी सुद्धा काहीही न देता झालीये ना? इकडे आम्च्या मित्राला ६ हजार खर्च आलाय. इन्शुरन्स मुळे हा फरक पडतोय. तुझा इन्शुरन्स खुप चांगला असणारे.

In reply to by पिलीयन रायडर

रुपी 14/09/2016 - 04:39
खूप चांगला आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल. कारण माझ्या इन्शुरन्समध्येही बरे-वाईट सगळेच आहे. माझा आत्तापर्यंतचा अनुभव चांगला आहे खरा. शिवाय, डिडक्टेबल हा त्यातला एक भाग झाला. कुठल्या डॉक्टरकडे जाता येऊ शकते, स्पेशॅलिस्टची गरज पडली तर काय, ट्रॅव्हल करताना गरज पडली तर काय अशा अनेक बाबी आहेत. त्यादृष्टीने सगळ्यांनाच हा इन्शुरन्स जमेल/ आवडेल असेही नाही.

In reply to by संदीप डांगे

ट्रेड मार्क 01/09/2016 - 22:51
मला फारशी माहिती नाही याबद्दल. पण माझ्यामते हे फक्त सिटिझन्ससाठी आहे. त्यातही इन्शुरन्स कंपन्यांचा बऱ्यापैकी विरोध आहे याला. कोणी माहितगार असेल तर अधिक माहिती पुरवावी.

In reply to by ट्रेड मार्क

बहुगुणी 01/09/2016 - 23:02
अफोर्डेबल हेल्थकेअर अ‍ॅक्ट (ओबामाकेअर) मधील तरतुदींचा फायदा* फक्त अमेरिकन नागरिक आणि ग्रीन कार्ड-धारक पर्मनंट रेसिडेंट्स यांना उपलब्ध आहे. (* फायदा: ही वादग्रस्त गोष्ट आहे, निवडणूकीत बरंच भलंबुरं ऐकायला मिळेल!)

अभ्या.. 01/09/2016 - 23:06
हामरिकेत असे अचानक तर रेटस वाढले नसतील ना? एकतर पहिल्यापासूनच डॉक्टर हा प्रकार महागडा असतो असे काहीतरी असणार किंवा काहीतरी ट्रिगर झाले असणार कि (उदा रिस्टरिक्षन्स, अव्हेलिबिलिटी, सिक्युअर दृष्टिकोन) तेव्हापासून वैद्यकीय सेवा महागल्या.

पिराताईंच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे अमेरिकेतील मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा किती गंडलेला प्रकार आहे हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव. ही घटना घडली त्यावेळेला मी न्यू यॉर्क मध्ये कामाला व जर्सी मध्ये राहायला होतो. माझी पत्नी व मुली सुट्टीसाठी साधारण ३ महिने म्हणून अमेरिकेला आल्या होत्या. ते यायच्या आधी मी माझ्या कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समध्ये माझ्या पत्नी व मुलींना सामील करण्यासाठी म्हणून विनंती केली. ती नाकारली गेली आणि कारण काय तर म्हणे ते फारच कमी दिवस येत आहेत. वर सांगितलं की त्यातूनही मला पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो पण मग उर्वरित पूर्ण वर्षाचे पैसे भरायला लागतील.

काय, कधी कुठे? - अमेरिका

पिलीयन रायडर ·

चित्रगुप्त 27/08/2016 - 19:01
न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध मेट्रोपॉलिटन म्यूझियम हे खरेतर 'पे अ‍ॅज यू विश' आहे, परंतु तसे लिहिलेले नसते. २५ डॉलरचे तिकीट घेणारांची मोठी रांग असते, परंतु बाजूला रिकाम्या असणार्‍या काउंटर वर जाऊन मला ५ डॉलर डोनेशन द्यायचे आहे, आम्ही चार (किंवा जितकेही) जण आहोत, असे सांगितले तरी सर्वांना प्रवेश मिळतो. .

पद्मावति 27/08/2016 - 19:37
लायब्ररी फ्री असतात. एका ब्रांच मधून पुस्तकं घेऊन दुसर्‍या ब्रांच मधे रिटर्न करता येतात. तसेच एखादं पुस्तक मिळालं नाही तर लायब्ररी च्या कॅटलोग मधून मागवता येतं. मराठी पुस्तकं पण मिळतील. cleveland च्या पब्लिक लायब्ररी मधे प्रचंड संख्येत मराठी आणि हिंदी पुस्तके आहेत. अजुन एक पर्याय मराठी पुस्तकांसाठी म्हणजे रसिक डॉट कॉम ही लायब्ररी. सहा माहिने किंवा एक वर्षांसाठी पैसे भरून पुस्तके ऑर्डर करता येतात. अगदी घरपोच सेवा आहे. पुस्तके वाचून झाली की पोस्टाने पुस्तकं पाठवून द्यायची. रिटर्न लेबल तेच देतात. बार्न्स & नोबल सारख्या दुकानात आणि लायब्ररी मधे सुद्धा मुलांसाठी स्टोरी टेलिंग सारखे छान कार्यक्रम असतात.

चतुरंग 27/08/2016 - 23:04
सार्वजनिक वाचनालयात संगणक वापरता येतात. प्रिंटिंगची सोय असते. काही महत्त्वाचे प्रिंट करुन घ्यायचे असेल तर जुजबी पैसे भरुन करता येतं. इंटरनेट साधारणपणे दोन तास एका व्यक्तीला वापरु देतात. फारच गर्दी असेल तर लोक आपणहूनच जरुर तेवढा वेळ वापरुन पुढच्यास जागा देतात. ऑडिओबुक्स हा फारच सुंदर प्रकार बहुतेक सर्व वाचनालयातून मिळतो. मुलांसाठी ही फारच छान सोय असते. चालत्या गाडीत ऑडिओ सीडी लावली की मुलं तासंतास गोष्टी ऐकतात. याचा मला जाणवलेला फायदा म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तीला ताण मिळतो. फक्त ऑडिओ असल्यामुळे मुलं गोष्टीत हरवून जातात आणि एकेक प्रसंग डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न करत असतात. या पुस्तकांचं वाचनही अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं असतं. बहुतेक वाचक मंडळींना नाटकाचं प्रशिक्षण मिळालेलं असावं इतकं उत्तम वॉइस मॉड्यूलेशन, गोष्टीतले भाव व्यक्त करणं हे असतं. मला तर मोठ्यांची ऑडियोबुक्स देखील आवडली. :)

In reply to by चतुरंग

रुपी 29/08/2016 - 23:45
"चीपर बाय द डझन"चे ऑडिओ-बूक ऐकायला खूपच छान आहे. मी पुस्तक वाचले होते, पण ऐकण्यातली मजा वेगळीच! मुलांसाठीचे अजून ऐकले नाहीत, आता आणायला पाहिजेत. बाकी जास्त आमच्या गाडीत "सेल्फ-हेल्प" प्रकारातलेच ऑडिओबूक्स चालायचे आणि मला बर्‍याचदा त्या वाचणार्‍या व्यक्तीचा आवाज फारच तीव्र वाटतो :( लायब्ररीची आणखी एक चांगली सोय म्हणजे Link+. यात वेगवेगळ्या शहरांच्या लायब्ररीज एकत्र आलेल्या असतात आणि तुम्हाला हवे असलेले पुस्तक दुसर्‍या शहराच्या लायब्ररीत असेल तरी तुम्ही मागवू शकता. फक्त उशीराचा दंड वगैरे नियम थोडे वेगळे आहेत, पण फारच चांगली सोय आहे ही. इंटर-लायब्ररी-लोन असाही एक प्रकार आहे, पण मी स्वतः अजून वापरुन पाहिला नाही, त्यामुळे नक्की कसा वापरावा हे माहीत नाही.

In reply to by रुपी

ऑडिओ बुक्स असतात हे पाहिलं होतं पण घेऊन पाहिली नाहीत. आता मात्र घ्यायला हवी होती असं वाटतय! एक दोन दिवसात पुस्तक बदलायला चक्कर होणार आहेच. तेव्हा नक्की घेते. पब्लिक लायब्ररी हा एक फार सुंदर प्रकार आहे अमेरिकेत. भारतातही उत्तम वाचनालयं आहेत खरं तर, इथे वेळ हाताशी आहे हे आनंदाचं खरं कारण आहे!

ट्रेड मार्क 29/08/2016 - 19:21
बँक ऑफ अमेरिका डेबिट कार्ड असेल तर बरीच म्यूझियम फ्री असतात. त्याची माहिती बँक ऑफ अमेरिकेच्या वेबसाईट वर मिळते. आता तुम्ही न्यूयॉर्क मध्ये आहात तर Intrepid म्यूझियम जरूर बघा. खरी पाणबुडी अँड खरे कंकॉर्ड विमान आहे ते आतून पण बघायला मिळतं (जास्त पैसे देऊन). पण हे म्यूझियम बँक ऑफ अमेरिका डेबिट कार्ड असेल तर फ्री आहे (सद्यस्थितीतील माहिती आंतरजालावर बघून जावे). या सारखंच इतर बॅंक्स पण काही ना काही पर्क्स देत असतात. बाकी पैसे देऊन असणारे शो ई साठी goldstar.com वा groupon वर चांगली डील्स मिळतात. बऱ्याच कंपन्यांची पण कॉर्पोरेट पर्क्सची वेब साईट असते. त्यातून बऱ्याच गोष्टींसाठी डील्स मिळतात अगदी हॉटेल बुकिंग, रेंटल कार, रेस्टॉरंट पासून ते डिस्ने पार्क्स, सिक्स फ्लॅग्स, फ्लाईट बुकिंग साठी पण चांगली डील्स मिळतात. तुमची आवड आणि किती वेळ आहे ते कळलं तर अजून बऱ्याच ठिकाणांची माहिती मी देऊ शकेन.

In reply to by ट्रेड मार्क

Intrepid म्यूझियम बघण्याचे केव्हाचे नवर्‍याच्या मनात आहे. डेबिट कार्ड तर नाहीये, पण तरीही जाणार आहोतच. डिल्स बद्दल ऐकुन आहे. कधी घेतल्या नाहीत पण. आत्ता येणार्‍या लॉन्ग वीकेंदसाठी वॉशिंग्टन डिसीला जाण्याचे चालु आहे. तेव्हा उपयोगी पडतील का ते पहायला हवे! तुम्हाला असलेली सर्वच माहिती इथे टाकत रहा. सगळ्यांच्याच कामाला येईल. फॉल्स मध्ये काय करता येईल हे जर सांगितले तर मला फार मदत होईल. सध्या नेमकी आमच्याकडे ना कार आहे ना लायसन्स. अशांच फार अवघड आहे अमेरिकेत.. :(

In reply to by पिलीयन रायडर

ट्रेड मार्क 30/08/2016 - 00:00
तुम्ही megabus किंवा goto bus च्या पॅकेज टूरने डीसीला जाऊ शकता परंतु स्थलदर्शन करायला फारच कमी वेळ मिळतो. न्यू जर्सीत अमेरिकेत आल्यापासून एक वर्ष तुमच्या भारतीय वाहन परवान्यावर रेंटल कार मिळते. पूर्ण वाहन विमा त्यांच्याकडूनच घ्यायचा म्हणजे अनपेक्षित प्रसंगात काळजीचे कारण नाही. अजून एक ऑप्शन म्हणजे amtrack रेल्वे किंवा ग्रेहाउंड. थोडं महाग आहे पण चांगलं ऑप्शन आहे. डीसी मधील सर्व म्युझियम्स फ्री आहेत. एअर अँड स्पेस, नॅचरल हिस्टरी हे तर बघाच. परंतु लायब्ररी ऑफ काँग्रेस पण बघण्यासारखी आहे. एअर अँड स्पेस मध्ये Flight Simulator आहे त्याचा अनुभव पण मस्त. बाकी कॅपिटॉल बिल्डिंग, लिंकन मेमोरियल आणि इतर वॉर मॉन्यूमेन्ट्स आहेतच. कार घेऊन डीसी मध्ये गेलात तर एखादं पूर्ण दिवसाचं पब्लिक पार्किंग बघायचं. यासाठी parkingpanda वगैरे साईट्स चांगल्या आहेत. तिथे जागेवर पार्किंग साधारण $२०-$२२ ला मिळत असेल तर parkingpanda वरून $९ ला मिळतं. डीसीजवळ National Museum Of Marine Corps आहे. त्यात WW१ पासूनच्या सगळ्या युद्धांचे देखावे आहेत, त्यावेळची शस्त्रास्त्रे वगैरेची माहिती आहे. बाल्टिमोरचे Aquarium मस्त आहे. फॉलमध्ये पोकोनो माऊंटन्स, पेनसिल्वेनिया मध्ये जा. फॉल कलर्ससाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. पण तुमच्याकडे कार असणं गरजेचं आहे. अगदीच कार शक्य नसेल तर ग्रेहाउंड बस चा पर्याय आहे. लेक जॉर्ज पण छान आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

संदीप डांगे 30/08/2016 - 00:49
तुम्हाला आंतरराष्ट्रीय परवाना लागेल, जो भारतातल्याच आरटीओ कडून मिळाला असता.

In reply to by अभिजीत अवलिया

राघवेंद्र 30/08/2016 - 00:53
भारतीय परवान्यावर कर विकत किंवा भाड्याने मिळेल. कार विमा थोडा जास्त असेल पण ठीक आहे. एकदा लोकल शो रूम मध्ये चौकशी करा.

In reply to by अभिजीत अवलिया

खटपट्या 30/08/2016 - 01:20
तुम्हाला अमेरीकेतील चालक परवाना मिळेपर्यंत काही महीने तुम्ही भारतीय परवान्यावर गाडी चालवू शकता.

In reply to by अभिजीत अवलिया

ट्रेड मार्क 30/08/2016 - 01:35
भारतीय परवान्यावर रेंटल कार मिळेल. पण तो जुना पुस्तक परवाना असेल तर अवघड आहे. प्रत्येक राज्यातील वाहन परवाना नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे स्थानिक रेंटल ऑफिस मध्ये चौकशी करणे चांगले. पण रेंटल कार मिळायला हरकत नसावी. स्मार्ट कार्ड असेल तर अडचण येणार नाही. राघव यांनी म्हणल्याप्रमाणे रेंटल कार विमा पण मिळेल. विम्याचा दर जास्त असेल असं वाटत नाही, पण जो असेल तो, विमा मात्र घ्याच. भारतीय परवान्यावर कार विकत घेता येत नाही. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला त्या राज्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

In reply to by ट्रेड मार्क

अनन्त अवधुत 30/08/2016 - 05:43
गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र गाडी घेण्यासाठी पुरेसे आहे. वाहनाच्या नोंदणीसाठी स्थानिक पत्ता हवा असतो जो राज्याच्या ओळखपत्रावर सुद्धा असतो. Link

In reply to by अनन्त अवधुत

ट्रेड मार्क 30/08/2016 - 19:08
केवळ राज्य ओळखपत्र आणि भारतीय परवाना यावर गाडी विकत घेता येईल? इन्शुरन्स पण मिळेल का? मी कधी पेनसिल्वेनिया मध्ये राहिलो नसल्याने मला तेथील माहिती नाही. परंतु मी जिथे जिथे गाड्या विकत घेतल्या आहेत तिथे मला अमेरिकन वाहन परवाना आवश्यक आहे असे सांगितले.

In reply to by ट्रेड मार्क

अनन्त अवधुत 31/08/2016 - 00:01
गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. अमेरिकन नाही, भारतीय नाही कोठलाच नाही. विम्यासाठी सुद्धा पहिले 6 महिने परवान्याची आवश्यकता नाही. अर्थात तुम्ही नवीन वाहनचालक असाल तर तुमचा विमा हप्ता पण तगडा असतो. माझ्या मित्राने इथला किंवा भारतातला परवाना नसताना विमा घेतला होता. त्याने 6 महिन्यात परवाना मिळवला. 6 महिन्यात परवाना न मिळाल्यास विमा रद्द होतो किंवा नाही याबद्दल मला काही कल्पना नाही. मी स्वतः राज्य ओळखपत्रावर गाडी घेतली होती. गाडीचा विमा करताना भारतीय परवाना चालतो. विमा देताना मला दुचाकीच्या परवान्यावर विमा दिला होता, परवान्यांचा त्यांनी केवळ क्रमांक घेतला होता.

In reply to by अनन्त अवधुत

संदीप डांगे 31/08/2016 - 00:06
अर्थात, जितकी राज्ये तितके वेगवेगळे कायदे आहेत म्हणून असेल तसे, हो ना?

In reply to by अनन्त अवधुत

ट्रेड मार्क 31/08/2016 - 01:10
गाडी विकत घेता येईल हे खरंच आहे पण मला प्रश्न होता रस्त्यावर आणता आणि त्या व्यक्तीला चालवता येईल का. पण जर का परवाना नसताना फक्त पत्ता बघण्यासाठी राज्य ओळखपत्र वापरून सगळं करता येत असेल तर भारीच आहे. तसाही नवीन अमेरिकन परवाना असेल तर विमा जास्त पडतो. थोडक्यात काय तर पैसे जास्त द्या आणि गाड्या उडवा असं इथे पण आहे तर. नियमांचं काही उल्लंघन झालंच तर परवाना नाही म्हणून पॉईंट्स मिळण्याची भानगड नाही. पैसे द्या आणि सुटा :). थोडक्यात नो परवाना नो पर्वा. रच्याकने - हे सांगणारा मला का नाही कोणी भेटला या पूर्वी. उगाच माझ्या पत्नीसाठी ३ वेळा रोड टेस्टसाठी खेपा घातल्या. बाकी पण बरेच मित्र उगाच खटपटी बसले... सांगतोच आता सगळ्यांना.

In reply to by अभिजीत अवलिया

सुकुमार 30/08/2016 - 01:38
पिट्सबर्ग मध्ये भारतीय driving licnce वर rental कार मिळणे कठीण आहे, बहुतेक नाहीच. NYC किंवा Jersey मध्ये शक्य आहे.

In reply to by सुकुमार

आत्ताच गुगल रावांनी हे दाखवले. Can I drive in Pennsylvania with my Foreign Driver’s License? Individuals who possess a valid foreign driver’s license from their country are authorized to drive in Pennsylvania for up to one year from their date of entry into the United States, or upon expiration of their foreign license, whichever comes first. International driving permits are strongly recommended, but not required. एकदा रेंटल कार ऑफिस मध्ये चौकशी करतो. सर्वांचे धन्यवाद.

राघवेंद्र 29/08/2016 - 19:38
धन्यवाद पितातै धाग्याबद्दल !!! सार्वजनिक गणेश उत्सव या वर्षी एडिसन मध्ये नसुन तो जर्सी सिटी मध्ये आहे. स्थळ : 792 Newark Avenue, Jersey City, NJ 07306 तारीख : ५ -११ सप्टेंबर, २०१६ सकाळी १० ते रात्री १० वाजता संदर्भ :http://www.oaktreeroad.us/edison-news-corner.html

In reply to by राघवेंद्र

मी आजच इथे विचारणार होते की गणपती कुठे असतो! यंदा काही इथे घरात करण्याचे जमत नाही असे दिसते. दिवाळीची सुद्धा माहिती द्या!

रमेश आठवले 29/08/2016 - 20:46
पुण्यात आणि इतर ठिकाणी वयस्क नागरिकांच्या साठी अथश्री सारखी घरे बांधणारे परांजपे बंधू सध्या अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांच्या भेटीवर आहेत.. ही योजना तेथिल भारतीय मूळाच्या वयस्क स्थायी मंडळी साठी राबवता येईल का याची पहाणी करत आहेत. मंगळवारी लॉस अँजेल्स मध्ये एका मराठी कुटुंबाच्या घरी ते इच्छुकांना भेटणार आहेत .

In reply to by संदीप चित्रे

पद्मावति 29/08/2016 - 21:11
सॉरी संदीप तुम्ही मराठी विश्व ची लिंक आधीच दिलेली होती ती मी बघितली नाही. या वेळी गणपती वेस्ट विंड्सर ला आहे नं?

पद्मावति 29/08/2016 - 21:09
खास मराठी पदार्थांसाठी सुमा फुड्स आहे नॉर्थ ब्रनस्विकला. मराठी विश्व सुद्धा खूप मोठं आहे. त्यांची मराठी लायब्ररी आणि रविवारी मराठी शाळा असते.

In reply to by पद्मावति

स्रुजा 29/08/2016 - 21:13
सुमा फुड्स मध्ये प्रत्येक ट्रिप ला जातेच. केसरी कडुन ज्या अमेरिका टुर्स येतात त्यांच्यासाठी केटरिंग पण सुमा फुड्स कडुन होते. आमच्या घरचा गणपती पण तिथुन च येतो.

In reply to by पिलीयन रायडर

राघवेंद्र 29/08/2016 - 23:07
सुमा फूड्स चे पटेल दुकानातील मधले पॅकेट घ्यायचे. नॉर्थ ब्रनस्विकला जायची गरज नाही कारण ते खायचे ठिकाण नाही फक्त किचन आहे. कार नसेल तर फॉल कलरसाठी टेक टूर्स झिंदाबाद. फॉल कलरसाठी न्यू यॉर्क मध्ये सेंट्रल पार्क सगळ्यात जायला सोपे आणि मस्त ठिकाण.

In reply to by राघवेंद्र

खायचे ठिकाण नाही का?! अरेरे मग! मग पटेल ब्रदर्स झिंदाबाद! आणि सेंट्रल पार्कतर आहेच काहीच झालं नाही तर.. टेकटुर्स हाच मुख्य प्लान आहे.. हे ही एक सापडलय.. Fall Foliage Train Rides - September 24 https://www.facebook.com/events/174667926248210/ Trip Duration: 2 1/2 Hours All Fall Foliage Trains that are not Train Robberies are standard fare. Adults $16, Seniors (62 and over) $15, Children (3-12) $13, Under 3 FREE. Reservations Encouraged but Not Required. Food and beverages for sale on board. Picturesque ride through the Susquehanna River Valley. Travel along the tranquil Susquehanna River, through farm fields with beautiful views, and forests with colorful foliage.

In reply to by पिलीयन रायडर

खटपट्या 30/08/2016 - 01:24
पाथ ट्रेन पकडून जर्नल स्क्वेअरला उतरा. स्टेशनला उतरून कोणालाही इंडीयन स्ट्रीट विचारा. इथे खाण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. रस्त्यावरचा कचरा बघून भारतात आल्यासारखे वाटेल. हे ठीकाण जर्सी सीटीमधे येते.

निशदे 30/08/2016 - 02:50
उत्तम धागा. गडबडीत असल्याने एकच जागा शेअर करतो. गेटी सेंटर लॉस एंजिलीसमध्ये ब्रेंटवूड या भागात डोंगरावर हे सुंदर म्युझियम आहे. लॉस एंजिलीसला भेट देणार्‍या प्रत्येकाने पहावीच अशी ही जागा आहे. सुमारे १३० कोटी डॉलर्स खर्च करून बांधलेले हे म्युझियम १९९७ साली जनतेसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आले. मुख्यत्वे युरोपिअन कलाविष्कारांसाठी हे म्युझियम प्रसिद्ध आहे. पण रिचर्ड मायर(Richard Meier) या आर्किटेक्टची स्थापत्यशैली पाहण्यासाठीही इथे अनेक जण येतात. म्युझियमच्या अधिकृत माहितीनुसार येथे दरवर्षी सुमारे १० ते १२ लाख लोक भेट देतात. लहान मुलांसाठी त्यांनी तयार केलेले कार्यक्रम दर वीकांताला ओसंडून भरलेले असतात. जर लॉस एंजिलीसला भेट देणार असाल तर गेटी सेंटरला भेटायला विसरू नका. g चित्र जालावरून साभार.

बहुगुणी 30/08/2016 - 03:08
या धाग्यात ही किंचित अवांतर माहिती दिली तर चालेल असं वाटतं. ८ वर्षांपूर्वी निघालेल्या "आवर्तन" या पहिल्या दृक्-श्राव्य दिवाळी अंकाचे जवळजवळ पंचवीस-एक डिव्हीडी सेट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत. (ते नेमके कुणाकडून माझ्यापर्यंत पोहोचले हे देखील मला आता आठवत नाही!) मोहन आगाशे यांच्या संपादकत्वाखाली निर्मित झालेले दोन डिव्हीडी चे हे डिव्हीडी सेट्स तसे प्रत्येकी १५ डॉलर्स किंमतीचे होते, आणि मुक्तसुनीत या मिपाकरांखेरीज कुणी विचारणा केली नसल्याने ते विकले जात नव्हते. म्हणून मी त्यांना (निर्मात्यांना) डिव्हीडीज् परत घेण्याविषयी विचारणा केली; पण ते घेऊन जाण्याचा खर्च मानवणारा नसल्याने त्यांनी ते इच्छुकांना मोफत द्यावेत असं सुचवलं. पण गेली कित्येक वर्षे ते माझ्याकडे पडून आहेत आणि खूप प्रयत्न करूनही इथल्या मराठी कुटुंबाना ते घ्यावेसे वाटलेले नाहीत :-( या पाच तासांच्या डीव्हीडींविषयी आधिक माहिती या जुन्या धाग्यावर मिळेल. बाबा आमट्यांच्या कार्यावरील डॉक्युमेंटरी तसेच इतरही बहुतांश कार्यक्रम प्रेक्षणीय आहेत. काही उदाहरणं आंतर्जालावर प्रोमोज मध्ये उपलब्ध आहेत, पण दुर्दैवाने असे दिवाळी अंक पुन्हा नंतर निघाल्याचं मी तरी ऐकलं नाही. त्यामुळे माझ्याकडच्या डीव्हीडीज हे collector's items असावेत! आताच शोध घेतला तर २०१४ मध्ये बहुधा त्याच निर्मात्यांनी आवर्तन हा यू ट्यूब चॅनेल सुरू केल्याचं दिसलं. पण तिथेही गेल्या वर्षानंतर काही भर पडलेली दिसत नाही. ही मालिका चालू राहिली तर पहायला नक्की आवडेल. तेंव्हा अमेरिकेतील मिपाकरांना व त्यांच्या मराठी आवडणार्‍या इतर परिचितांना हे डिव्हीडी सेट्स मोफत हवे असल्यास व्य नि द्वारे मला कळवावे. सेट्स पाठवण्याचा स्थानिक पत्रखर्च माझ्यापर्यंत कसा पोचवायचा ते कळवेन. माझा आवर्तनच्या प्रवर्तकांशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही, आणि मी हे केवळ मराठीतील कौतुकास्पद उपक्रमाला माझा हातभार लागावा या भावनेने करतो आहे, हे कृपया लक्षात घ्यावे.

In reply to by कंजूस

नवीन नाही काका. मोदकने आधीच पुणे - मुंबईसाठी हे धागे काढलेले आहेत. काय..? कुठे..? कधी..? (पुणे) काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

नियतीचं काय सांगता येतं नै, नियती माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकते. कधी चुकुन अमेरीकेच्या रस्त्याने गेलो तर माहिती उपयोगी पडेल. प्रतिसाद नुसते चाळले. (इकडे प्रतिसाद वाढवायचा काय स्कोप दिसत नै) धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे 30/08/2016 - 20:16
+1000 बाकी, प्रतिसाद वाढवायचे का? तर घ्या: सदर धागा 'आमी हामरिकेत कशी मज्जा करतो, तुम्हाला टुकटुक' एवढ्यासाठी काढलाय! ;) =))

In reply to by संदीप डांगे

मोदक 30/08/2016 - 20:21
डॉलरात पैशे उधळण्यापेक्षा मायदेशातल्या कितीतरी गरजूंना त्या पैशाचा लाभ होईल असे काहीतरी काम करायचे सोडून असले रिकामे उपद्याप... वगैरे वगैरे... किंवा.. पिराकाकूंनी इंजिनीवर / पोस्ट ग्रॅड असे हुच्चभ्रू शिक्षण घेवून एका गरजूची नोकरी खाल्ली आणि आता मायदेशाला टाटा करून परप्रांतात खुशाल मजा करत आहेत... वगैरे वगैरे (मी पळतो आता..!!) ;)

बहुगुणी 30/08/2016 - 19:29
पण चित्रपटांच्या डीव्हीडी मिळवण्याचा हाही एक मार्ग अमेरिकेत उपलब्ध आहे. वरील दुव्यावरून संजीव कुमारचे १५० सिनेमे उपलब्ध असावेत असं दिसतं.

सही रे सई 30/08/2016 - 19:47
मी या लाँग विकांताला नायगारा धबधबा पाहायला जात आहे. कार रेंटने घेतली आहे. नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे. नायगाराचा डिस्कव्हरी पास ज्यात ५ अ‍ॅट्रॅक्शन्स आहेत तो ऑनलाईन विकत घेणार आहे. तरी याबद्दल अधिक माहिती, उपयुक्त टिपा असतील तर त्या जाणकारांनी द्याव्यात.

In reply to by सही रे सई

लंबूटांग 30/08/2016 - 19:57
तेव्हा त्या तयारीने जा :). तो डिस्कव्हरी पास मीही घेतला होता. तुम्ही इतर कुठली aquariums बघितली असतील तर मग तिथले नाही बघितले तरी चालेल. अगदीच छोटेसे आहे. आमचे मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विन्ड्स आणि ती मूव्ही होईपर्यंत ते डिस्कव्हरी सेंटर बंद झाले होते. भरपूर इंडियन रेस्टॉरंट्स आहेत तिथे. बाकी नायाग्रा धबधबा अतिप्रचंड आहे. मेड ऑफ द मिस्ट मधे गेल्याशिवाय कल्पना येत नाही त्याच्या आकाराची.

In reply to by लंबूटांग

बहुगुणी 30/08/2016 - 20:16
मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विन्ड्स ही दोन प्रमुख आकर्षणं आहेत. दहा वर्षांपूर्वीचा अनुभवः एकच दिवस हाताशी असेल आणि मुलं/ वयस्कर मंडळी बरोबर असतील तर धावाधाव होते आणि बाकीच्या गोष्टींना वेळ पुरतही नाही.

In reply to by बहुगुणी

सही रे सई 30/08/2016 - 20:44
शुक्रवारी दुपारी निघून रात्री पर्यंत नायगारा ला पोहोचू. शनिवार रविवार राहाणार आहोत. त्यामुळे थोडा जास्ती वेळ असेल हाताशी असा अंदाज आहे.

In reply to by सही रे सई

ट्रेड मार्क 30/08/2016 - 20:29
कॅनडा व्हिसा असेल तर तिकडून पण बघून या. पूर्ण व्ह्यू मिळतो. अमेरिकन साईडने नायगरा अनुभवता येतो. तुमच्या अगदी जवळून पाणी प्रचंड वेगाने वाहत असते. दोन्हीची मजा वेगळी. कॅनडा साईडला गेलात आणि साहसाची आवड असेल तर तिकडे झिपलाईन करता येईल. डिस्कव्हरी पास घेतला तर बहुतेक सगळं कव्हर होईल. मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह मध्ये फोन/ कॅमेरा ओला होऊ शकतो. ते सांभाळा. जाता येता कॉर्निंग ग्लास म्युझियम बघू शकता.

In reply to by ट्रेड मार्क

लंबूटांग 31/08/2016 - 21:06
कॉर्निंग म्युझियम ऑफ ग्लास मस्त आहे. अपस्टेट न्यु यॉर्क आणि पेनसिल्व्हेनिया मधे गेले की खरी अमेरिका दिसते.

In reply to by सही रे सई

पद्मावति 30/08/2016 - 22:14
कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा ऑन द लेक ला जरूर जा. अर्धा तासाचा सुंदर ड्राइव आहे. छोटंसं पण अतिशय सुरेख गाव आहे आणि खूप छान लेक. तसेच नायगारा फॉल्स या गावात सुद्धा खूप काही करण्यासारखे आहे. खास करून मुलांसाठी. बॉटनिकल गार्डन, आकाश पाळणा, बटरफ्लाइ गार्डन. आणि एक उलटं घर पण आहे. आप्साइड डाउन असे. तिकीट घेऊन आत जाता येते. खूप मजेदार आहे. मान वरती करून छताला लावलेले सोफे, बेड्स वगैरे बघायचे. मजा येते :))

In reply to by सही रे सई

अनन्त अवधुत 31/08/2016 - 00:15
त्याला काहीही अर्थ नाही. गर्दीमुळे तुमचे ५ अ‍ॅट्रॅक्शन्स पाहणे होणार नाहीत. लंबूटांग यांनी म्हटल्याप्रमाणे aquarium पाहण्यात काही विशेष नाही. डिस्कवरी सेंटर लवकर बंद होते. मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विंडस पाहण्यातच वेळ सत्कारणी लागणार आहे.

In reply to by सही रे सई

सही रे सई 22/09/2016 - 22:27
नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे. हे घर आणि त्याचा मालक यांचा फारच चांगला अनुभव आला. त्यांच्या घरात बाकी सुविधा तर होत्याच पण घरात स्वैपाक करण्यासाठी खूपच सोय होती, अगदी कुकर पासून सर्व भांडी व जुजबी वाणसामान सुद्धा. कोणाला कधी जाऊन राहायचे असेल नायगारा मधे तर नक्की विचारा, मी माहिती देईन.

रेवती 30/08/2016 - 22:28
भारतीय मनुष्याचं घर नाही पण मोटेल एकदा अनुभवावं लागलं होतं. नायगर्‍यातच! अगदी वाईट अनुभव होता. तुम्हाला तसा न येवो. कॅनडातून नायगरा पहाच!

In reply to by सही रे सई

रेवती 31/08/2016 - 01:30
सॉरी हां, आठवत नाही, बारा पंध्रा वर्षे झाली, पण नंतर आणखी दोन नायगरा वार्‍या झाल्या तेंव्हा हॉटेले चांगली मिळाली. जमल्यास तुम्ही घरून एक दोन बेड शीटस घेऊन जावा. घरच्या स्लिपर्सही! (अर्थात जमल्यास)

In reply to by अभिजीत अवलिया

ट्रेड मार्क 31/08/2016 - 01:57
एकदाही पाहिलेला नसेल तर कुठल्याही साईडने पाहावाच. अमेरिकन बाजूने अनुभवता येतो... तुमच्या अगदी जवळून एवढा मोठा जलप्रपात कोसळत असतो. तर कॅनडाच्या बाजूने पूर्ण हॉर्सशूचे दर्शन होते.

In reply to by अभिजीत अवलिया

रेवती 01/09/2016 - 01:13
ट्रे मा यांच्याशी सहमत. कनेडियन व्हिसा नसेल तर अमेरिकी बाजूने पहा. क्यानडातून पाहिल्यास जास्त चांगला दिसतो.

In reply to by रेवती

अंतु बर्वा 12/09/2016 - 19:52
आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो. नायगारा अमेरिकन साईडने आधी पाहिला होता, या वे़ळी कनेडियन बाजुने पाहिला. मोठा विकांत असल्याने भरपुर गर्दी होती. त्यामुळे एकाही फोटोत दुसर्या कुणाचा हात, डोकं, पाय, बॅग इत्यादी न येण, ऑलमोस्ट अशक्य कोटीतली गोष्ट झाली होती :-). कॅनडा बाजुने पाहु इच्छिणार्यांसाठी: अमेरिकन बाजुच्या केव्ह ऑफ द विंड आणी तिकडच्या जर्नी बिहाईंड द फॉल्स मधे थोडा फरक आहे. अमेरिकन बाजुने केव्ह करताना जितकी मजा येते, तितकी जर्नी ला नाही असे माझे मत झाले आहे (रादर, सिटी पास नं घेता, कॅनडा बाजुने फक्त मेड ऑफ द मिस्ट करावी आणी केव्ह अमेरिकन बाजुने). बाकी टोराँटो सिटी सुद्धा छान आहे, मि एक आठवडा आधी गेल्यामुळे सध्या चालु असलेला टोराँटो फिल्म फेस्टिवल मिस झाला :(

माझ्या मुलाचा इथे एक्स रे करावा लागला (क्षयाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने) तर त्याचे बिल ३८२$ आले आहे. पैकी डिड्क्टबिल मीट न झाल्याने ते सर्व आम्हालाच भरायचे आहे. (कोण म्हणलं रे अमेरिकेत मज्जा आहे!) माझा प्रश्न असा की एखाद्या चाचणीचे बिल किती असायला हवे हे कसे कळणार? इथे बिल येईपर्यंत नक्की किती पैसे झाले हे कळतही नाही. आपण हे बिल जास्त आहे अशी काही तक्रार करु शकतो का? की मुकाट्याने भरुन टाकायचे? (अवांतर - मागे इथे बहुदा शिल्पा ब ह्यांनी अमेरिकेत डिलीव्हरीचा खर्च ५००००$ झाला असे लिहीले होते, तेव्हा खुप जणांनी अविश्वास दाखवला होता. आता कळतय की अगदी सहज शक्य आहे...)

In reply to by पिलीयन रायडर

ट्रेड मार्क 31/08/2016 - 02:12
कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. खरं तर डॉक्टरने सांगितलेल्या Diagnostic Tests कव्हर करायला पाहिजेत. डॉक्टरकडे गेल्यावर आणि कुठल्याही ट्रीटमेंटच्या किंवा टेस्टच्या आधी तुम्ही किती खर्च येईल आणि इन्शुरन्समध्ये कव्हर होईल का ते विचारू शकता. बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांच्या वेबसाईटवर एखाद्या टेस्ट/ ट्रीटमेंटसाठी किती खर्च येईल हे सांगणारे एस्टीमेटर्स असतात. इन्शुरन्स कंपनीला फोन करून पण विचारू शकता. तुम्ही जर्सी सिटी मध्ये राहत असाल तर Palisade Avenue वर North Hudson Community Hospital (नक्की नाव लक्षात नाही) तिथे जा. चांगली सेवा स्वस्तात मिळते (मिळायची.. कधी काय बदलेल सांगता येत नाही). मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा अमेरिकेतला एक गंडलेला प्रकार आहे. काय वाट्टेल ती बिलं लावतात आणि ती आपल्याला भरायला लागतात. एवढं करूनही एकदम भारी सेवा मिळते असं काही नाही. माझा एक भारी अनुभव आहे... जमल्यास एखादा धागा काढून सांगीन.

In reply to by ट्रेड मार्क

निशदे 31/08/2016 - 03:11
कोणता इन्श्युरन्स, कोणता प्लॅन(पीपीओ वगैरे), इन-नेटवर्क की आऊट ऑफ नेटवर्क डॉक्टर अशा अनेक गोष्टींवर ते ठरते. ER ला गेला असाल तर खर्च नेहेमीच जास्त येतो. तुमचा डिडक्टिबल किती आहे ते तपासून घ्या. आणि इन्श्युरन्स कंपनीला फोन करून तर घ्याच. त्यांच्याशी बोलल्यावर चार्जेस कमी केल्याची अनेक उदाहरणे माहितीतली आहेत. माझा एक भारी अनुभव आहे... जमल्यास एखादा धागा काढून सांगीन. > नक्की काढा धागा. त्यानिमित्ताने माहिती कळेल.

In reply to by ट्रेड मार्क

हो हे हॉस्पिटल पाहिले आहे. कधी गरज पडली तर जाते. मला असं वाटलं होतं की Jersey city medical center हा सरकारी दवाखाना आहे आणि म्हणुन स्वस्त असेल! म्हणुन मी तिथे फारसा विचार न करता गेले! एस्टिमेटर पाहिला नव्हता. :( तुम्ही नक्की एक धागा काढा. कच्चुन शिव्या द्यायची इच्छा आहे इथल्या ह्या सिस्टिमला!!

In reply to by ट्रेड मार्क

अनन्त अवधुत 31/08/2016 - 23:02
इथल्या वैद्यकीय सेवा (त्यात फिजिशियन, दंतवैद्य, डोळ्यांचे डॉक्टर, स्पेशालिस्ट, आणि अर्जेंट केअर) वर खूप काही बोलण्यासारखे आहे. जोडीला विमा आहेच. तुम्ही धागा काढा. 100 प्रतिसाद तर कोठे जात नाहीत :)

In reply to by पिलीयन रायडर

बहुगुणी 31/08/2016 - 02:22
अमेरिकेत वैद्यकीय सेवांच्या किंमती पुरवठादारांनुसार (providers) बदलतात! "People don't realize the same procedure may vary by 500 percent or more in the same town, or even on the same block" चेस्ट एक्स रे ची साधारण किंमत खरं तर $६७ ते $६९ असायला हवी असं दिसतं :-(

In reply to by बहुगुणी

अरे! कमाल आहे! मग आता मी तक्रार करु शकते का Jersey city medical center मध्ये? की एवढी किंमत का लावली आहे म्हणुन? बरं आणखीन रेडिओलॉजिस्ट्ने वर ७०$ चे वगळे बिल लावले आहे. आम्हाला ना तो डॉक्टर भेटला ना कधी तो एक्स रे सोडा, रिपोर्ट पाहायला मिळाला. आमच्या पिडीयाट्रिशनकडे डायरेक्ट तो रिपोर्ट आला आणि त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं. :(

सगळ्यांनाच धन्यवाद! इथे मी बरीच चौकशी केली तर बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी फटका पडलेला आहे. लहान मुलाच्या तापासाठी इमर्जन्सी मध्ये गेल्याने १४००$ बिल लावले वगैरे किस्से ऐकले. मला हीच एक गोष्ट अजिबात आवडली नाही इथे. मेडिकल सारख्या गोष्टीत खरं तर माणसाला विचार न करता पटकन डॉक्टरकडे जाता यायलाच हवे. आपला देश अमेरिके एवढा विकसित नसला तरी अत्यंत परडवडेल अशी वैद्यकीय सुविधा तर देऊ शकतो. अगदी कितीही भारी दवाखान्यात गेलात तरी एवढे बिल होत नाही जेवढे अमेरिकेत साध्या तापासाठी होते. मी अजुन २-३ च डॉक्टर्स पाहिले आहेत, पण मला ते काही फार महान वाटले नाहीत. अगदीच साधारण होते. हॉस्पिटल्स सुद्धा ठिकच आहेत. इथे ज्यांना नोकर्‍या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे?

बहुगुणी 31/08/2016 - 07:07
इथे ज्यांना नोकर्‍या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे? आजारी न पडणे! कितीही दुष्टपणा वाटला तरी हे इथलं क्रूर वास्तव आहे! या सगळ्या अतिरेकी, अवास्तव बिलांच्या मुळाशी आहे चार्जमास्टर. २०१३ सालच्या ४ एप्रिलच्या टाईम नियतकालिकाच्या अंकात स्टीव्हन ब्रिल याने या प्रकाराची पोलखोल केली होती. हा अंक मिळवून लेख पूर्ण वाचाच! थोडक्यात, चार्जमास्टर ("hospital chargemaster" किंवा "charge description master" उर्फ CDM) एक master file असते ज्यात ५००० हून आधिक वेगवेगळ्या वैद्यकीय सेवांसाठीचे दर निश्चित केलेले असतात आणि हे दर वापरून बिलिंग केलं जातं. वास्तविक पहाता हे दर अतिरेकी चढ्या आणि अशक्य कोटीत वाटावेत इतक्या उच्च किंमतीचे ठेवलेले असतात. प्रत्येक हॉस्पिटलला आपलं वेगळ चार्जमास्टर राखण्याची कायद्याने मुभा आहे, आणि बरेचदा हा चार्जमास्टर अतिशय क्लिष्ट किंवा हॉस्पिटलच्या चीफ फायनॅन्शियल ऑफिसरलाच कळेल अशा सांकेतिक भाषेत असतो (हो, अगदी डॉक्टर्स ना देखील हा सहज कळू शकत नाही!) आणि हे अतिरेकी उच्च दर हा रेफरन्स पॉइंट धरून इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या सभासदांच्या संख्येच्या जोरावर हॉस्पिटल्सशी करार करून 'कमी' करून घेतात. आणि या अशा निगोशियेट केलेल्या दरांपैकी रुग्णाने किती आणि इंन्शुरन्स कंपन्यांनी किती भाग उचलायचा ते तुमच्या प्रिमियम प्रमाणे ठरतं. वर दिलेल्या दुव्यातूनः The impact of the chargemaster is such that those with good insurance or better access to means to afford quality healthcare pay the least for that care, whereas conversely uninsured, and others who pay out-of-pocket for healthcare pay the full chargemaster listed price for the same services. तेंव्हा - शक्यतोवर आजारीच न पडणं आणि उत्तम विमा घेणे इतकंच माणसांच्या हातात असतं! (अमेरिकेत व्हिटॅमिन्सची / सप्लीमेंट्सच्या दुकांनाची रेलचेल दिसते त्याच्या मागे ही प्रतिबंधात्मक उपाय करून आजार पण टाळणं ही प्रवृत्ती आहे.)

अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं.. तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं. जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत. आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली! किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!

सरहद पर

महासंग्राम ·

भाऊ, तुमच्यात एक प्रचंड मोठा लेखक/अनुवादक लपलेला आहे हो! त्याला जोपासा, संगोपन करा त्याचे, त्याला मोठे करा , तुमचे शब्द वाचता वाचता मन कधी फाळणीकालीन सेपिया टोन मध्ये पोचले कळले ही नाही मला ! जियो और खूब लिखो जनाब

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महासंग्राम 28/08/2016 - 22:03
एक प्रचंड मोठा लेखक/अनुवादक लपलेला आहे हो! त्याला जोपासा, संगोपन करा त्याचे, त्याला मोठे करा
नक्कीच प्रयत्न करेन बापूसा !!!

नाखु 29/08/2016 - 08:55
धूमाकूळ घालायचेच ठरवले आहे... गुलजारांच्या लिखाणावर वाचलेला लेख आठवला. संपुर्ण पुस्तक वाचायला घ्यायला अजूनही मन होत नाही,पण घ्यायला पाहिजेच असेही वाटते नेमस्त अनुवाद

फाळणीच्या कथा तश्या वेदनादायकच असतात. गेले खूप दिवस हि कथा मनात घर करून होती, काल जयंत काकांच्या मंटोच्या कथा वाचतांना पुन्हा आठवली. उर्दू कथा : नन्दकिशोर विक्रम __________________________________________________________________________ "सोड रे मला सामान बांधून आवरू दे पटापट", शाहिदा पदर सोडवत म्हणाली. "मग सांग ना अम्मी ??

एन्टरप्रेन्युअर

अरुण मनोहर ·

कंजूस 31/07/2016 - 08:23
शिरडीलाही हे आंतरप्रिन्योर पुजा तबक विकण्याच्या गोंडस नावाखाली फसवतात.तबक घेतल्यावर नोंदवहीत लिहिणे बंधनकारक आहे कारण हप्ता वरती कुणालातरी द्यावा लागतो.तिकडे पैसे ओतायलाच जाणारी भाविक मंडळी असल्याने आपण गप्पच राहावे लागते.

सातव्या वेतन आयोगाचे समर्थक आता गप्प बसतील आणि भ्रश्टाचाराविरोधात आपण सर्वांनीच कसे लढायला हवे या बद्दल प्रवचन देतील

In reply to by सामान्यनागरिक

बोका-ए-आझम 31/07/2016 - 18:32
सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. खाजगी ते सगळं कार्यक्षम आणि सरकारी ते सगळं भ्रष्ट असं समजू नये. शिवाय खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही असंही नाही. असं सरसकटीकरण करणे ही काही दुस-या क्षेत्रातील मसीहांची मक्तेदारी असल्यामुळे त्यात trespassing करु नये.

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 01/08/2016 - 09:24
म्हणून मी भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांच्या फक्त बातम्याच वाचतो आणि कार्यक्षम सरकारी अधिकार्यांच्या सेवकांब्बत माहीती पुर्ण लेख वाचतो (जलयुक्त शिवार मालीकेच्या निमित्ताने काहींशी फोनवर बोललोही आहे) आणि अनुभव चांगला आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वाईट्टखोड असलेला नाखु

सर्वसाक्षी 31/07/2016 - 23:34
वेतनवेतन वाढ झाली, चांगला पगार मिळाला म्हणुन प्रामाणिक वर्तन घडेल असे नाही. पगार मिळतो तो सही कराय्चा, कामाचे पैसे ज्याचे काम असेल त्याने द्याय्चे ही सर्रास वृत्ती. अनेक सफाई कर्मचारी आपल्या जागी कमी पैशात गरजूंना कामावर ठेवतात व स्वतः अन्य उद्योग करतात हे सर्वज्ञात आहे. बहुसंख्य ठिकाणी हेच पाहायला मिळते

मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध

विकास ·

अमितदादा 28/07/2016 - 23:38
छान आढावा जाणकार लोकांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक .....सिनिअर बुश (वडील) आणि ज्युनिअर बुश (मुलगा) यातील फरक करायचा राहून गेला लेखात, दोनी ना बुशच संबोधलं आहे।

शीतयुद्ध संपल्यापासून आणि भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून भारत-अमेरिका संबंध हे वाढत्या पातळीवरच आहेत. ते पुढे तसेच राहतील याविषयी मलातरी शंका वाटत नाही... यंदाच्या अमेरिकन निवडणुकीत ह्या दोन उमेदवारांपैकी कोणीही निवडून आलं तरी त्याचा भारत आणि अमेरिका यांतील संबंधांवर अनिष्ट परिणाम होईल असं मला वाटत नाही. ट्रंप हा बेकायदेशीर इमिग्रेशनच्या विरुद्ध आहे, कायदेशीर इमिग्रेशन्च्या विरूद्ध नाही. भारतीय कायदेशीर इमिग्रंन्ट्सबद्दल तर त्याने चार चांगलेच उद्गार काढलेले आहेत. हिलरीतर इतकी भारतप्रेमी आहे की तिच्यासारखे उकडीचे मोदक अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर कोणीच बनवत नाही (असं तिथल्या मिपामैत्रिणींकडून ऐकून आहे!). आणि ह्या दोघांपैकी कुणीही निवडून आलं तरी त्यांच्यासमोर त्यांना व्यग्र ठेवणारे इतर अनेक प्रॉब्लेम्स आहेत. भारताबाबतीत मुद्दाम प्रतिकूल निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि इन्क्लिनेशन आहे असं वाटत नाही. आपणच सध्या (महापलिकेतले उंदीर संपलेले असल्यागत) चर्चा करत आहोत, इतकंच! :)

In reply to by पिवळा डांबिस

विकास 29/07/2016 - 02:44
हिलरीतर इतकी भारतप्रेमी आहे की... हिलरी अजून अमेरीकाप्रेमी होण्याची प्रॅक्टीस करतीय. तिला कुठे मिळणार हो शिंचा भारतावर प्रेम करण्याइतका वेळ! ;) शीतयुद्ध संपल्यापासून आणि भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून भारत-अमेरिका संबंध हे वाढत्या पातळीवरच आहेत. ते पुढे तसेच राहतील याविषयी मलातरी शंका वाटत नाही... तेच मला म्हणायचे होते. पण माझे दोन शब्द हे ब्रम्हदेवाच्या एका क्षणासारखे असतील कदाचीत झालं! भारताबाबतीत मुद्दाम प्रतिकूल निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि इन्क्लिनेशन आहे असं वाटत नाही. स्वतः राष्ट्राध्यक्ष (जे कोणी असतील ते) तसे वागतील असे मला देखील वाटत नाही. पण त्यांच्यामागचे जे समर्थक असतात ते तसे निर्णय घेयला लावतात. नाहीतर सांगा त्या जॉर्ज बुश आणि काँडोलिझा राईस ला १९९८ चा कायदा फक्त आणि केवळ फक्त मोदींसाठीच वापरण्याची काय गरज होती? ते असले काही शोधत बसले होते का? अर्थातच नाही. आपणच सध्या (महापलिकेतले उंदीर संपलेले असल्यागत) चर्चा करत आहोत, इतकंच! कोरड्या दुष्काळामुळे कॅलिफोर्नियात उंदीर वाढल्याचे ऐकून होतो. आता आपल्याला पण चर्चेत उंदीर आणताना पाहून खात्री झाली इतकेच! ;) विनोदाचा भाग सोडा. पण या पद्धतीने अमेरीकेत ज्यू, स्पॅनिश, कृष्णवर्णीय, आदी लोकांनी पण राजकारणावर बोलण्याची गरज नाही असेच म्हणावे लागेल की हो! मग हा देश कसा काय "with liberty and justice for all" म्हणू शकणार?

In reply to by विकास

नाहीतर सांगा त्या जॉर्ज बुश आणि काँडोलिझा राईस ला १९९८ चा कायदा फक्त आणि केवळ फक्त मोदींसाठीच वापरण्याची काय गरज होती? ते असले काही शोधत बसले होते का? अर्थातच नाही.
मी काही सांगत बसण्यापेक्षा फरीद झकेरिया काय म्हणतो ते बघा, विशेषतः ३.२२ मिनिटांपुढे... https://www.youtube.com/watch?v=IAR3cb1V_ss :)
पण या पद्धतीने अमेरीकेत ज्यू, स्पॅनिश, कृष्णवर्णीय, आदी लोकांनी पण राजकारणावर बोलण्याची गरज नाही असेच म्हणावे लागेल की हो!
असं मी कुठं म्हणतोय? तो क्लिंटन (सॉरी, गॅरी ट्रुमन. त्याच्या दुसर्‍या बारशाचं आमंत्रण नव्हतं आम्हाला!!) इथे अमेरिकन निवडणुकांवर धागा चालवतोयच की. आम्ही कुठं गेलो त्याला थांबवायला? तुम्ही ह्या निवडणुकांच भारत-अमेरिका संबंधांशी बादरायणी नातं लावू जाताय असं मला वाटलं म्हणून प्रतिसाद दिला. कळावे. लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती.. :)

In reply to by पिवळा डांबिस

विकास 29/07/2016 - 17:29
मी काही सांगत बसण्यापेक्षा फरीद झकेरिया काय म्हणतो ते बघा, विशेषतः ३.२२ मिनिटांपुढे... मला नक्की समजलेले नाही की मला काही वेगळे म्हणायचे आहे असे माझ्या आधीच्या लेखनामुळे वाटते आहे का ते. मी लिहीताना माझ्या डोक्यात कधीकाळी वाचलेले वॉल्स्ट्रीट वरील लेखन होते. ते नंतर मी परत काल शोधले.... झकेरीया पण तेच म्हणाला आहे की केवळ मोदींपुरताच १९९८चा वापर केला गेला आहे. वॉलस्ट्रीट वरील लेखावरून गेलो तर असे म्हणता येईल की ते बुश आणि काँडोलिस्सा राईस यांनी व्यक्तीगत केले होते. पण झकेरीया जे म्हणले ते झालेले असण्याची शक्यता आहे...कमिशन ऑन रिलिजियस इन्टॉलरन्स च्या हट्टापोटी हे झाले. या कमिशनकडून काड्या लावणारे कोण होते हे पाहीले तर समजेल. (तसे देखील मी रिपब्लीकन प्रेसिडंट आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट ची बाजू घेतो असे वाटून मला या मुद्यावर सोडून द्यायला हवे होते. :( ;) ) असं मी कुठं म्हणतोय? तो क्लिंटन (सॉरी, गॅरी ट्रुमन. त्याच्या दुसर्‍या बारशाचं आमंत्रण नव्हतं आम्हाला!!) इथे अमेरिकन निवडणुकांवर धागा चालवतोयच की. आम्ही कुठं गेलो त्याला थांबवायला? तुम्ही ह्या निवडणुकांच भारत-अमेरिका संबंधांशी बादरायणी नातं लावू जाताय असं मला वाटलं म्हणून प्रतिसाद दिला. म्हणजे काय? मला इक्वल अपॉर्च्युनिटी नाही? ;) बाकी तुमच्या नंतरच्या वाक्यातील मुद्यांबद्दल... निवडणुकांचा संबंध हा प्रत्येक गोष्टीशी लागतो. विशेष करून जेंव्हा अमेरीकेसारख्या राष्ट्रातली निवडणूक असते तेंव्हा. मी जेंव्हा ज्यू, कृष्णवर्णीय, स्पॅनिश वगैरेचा उल्लेख केला, तेंव्हा मला केवळ निवडणूक या अर्थाने म्हणायचे नव्हते. गुगलले तर समजेल की प्रत्येक समुदाय हा आपल्या समुदायाला (अमेरीकेत आणि अमेरीकेच्या बाहेर जिथे मूळ असेल तेथे) फायदा होईल हा विचार आणि चर्चा करताना दिसेल. भारत-अमेरीका संबंध ही चर्चा त्यातलाच एक भाग आहे. तुम्हाला त्याची गरज भासली नाही तरी तशी वाटणारे भरपूर आहेत. मला वाटते त्यांना नुसते उंदीर मारणारे म्हणून काहीच हशील होणार नाही. कारण तसे काय नुसत्या पाट्या टाकत बसून कशावरच कोणीच काही चर्चा करायची गरज नाही. ..त्यामुळेच लेखाच्या सुरवातीस "...इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. " असे म्हणले होते. कळावे. लोभ आहेच, किमान या बाबतीत आपला गैरसमज नाही... सगळे पावले! :)

In reply to by विकास

कळावे. लोभ आहेच, किमान या बाबतीत आपला गैरसमज नाही... सगळे पावले! :)
ते महत्वाचं. बाकी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही जाउद्या **** ***!! :)

गॅरी ट्रुमन 03/08/2016 - 14:24
यामुळे अमेरीका कायमच संशयाने आपल्याकडे पहात होती...
गेले काही दिवस या चर्चेत यायला तितका वेळ आणि उत्साह नव्हता. या क्षणी दोन्ही गोष्टी असल्यामुळे आणि विशेषतः मुविकाकांनी लिहिल्याप्रमाणे इथे प्रतिसाद देत आहे. हा प्रतिसाद मी पूर्वी मिपावर लिहिलेल्या प्रतिसादांचे एकत्रिकरण करून लिहित आहे. मला वाटते की १९४७ नंतरच्या काळात भारत आणि अमेरिकेचे वितुष्ट येणे क्रमप्राप्तच होते. कारण दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परविरोधी झाले होते.तसेच काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता आणि त्याचवेळी चीनमध्ये यादवी चालू होती ती अस्थिरता लक्षात घेता काश्मीरात आपला तळ असणे हे अमेरिकेला नक्कीच महत्वाचे वाटत असणार.आणि तसे करायला नेहरूंचा भारत तसे करायला कधीच परवानगी देऊ शकणार नाही पण पाकिस्तान देऊ शकेल हे काही अमेरिकन नेत्यांच्या लक्षात आले नसेल असे अजिबात नाही.त्यातूनही नंतरच्या काळात भारताने नॅममध्ये महत्वाची भूमिका स्विकारणे, अमेरिकेच्या कुठल्याही आगळीकीचा ताबडतोब निषेध करणे पण रशियाने हंगेरीत जे काही केले त्याविरूध्द निंदाव्यंजक ठराव यु.एन मध्ये आल्यावर त्या ठरावाचे समर्थन न करणे, १९५० च्या दशकात अमेरिका आणि चीनचे वाकडे असताना भारताचे मात्र वरकरणी चीनशी गळ्यात गळे असणे, सीएटोमध्ये सामील व्हायचे आमंत्रण पाकिस्तानने स्विकारणे पण भारताने नाकारणे इत्यादी अनेक कारणांमुळे भारत आणि अमेरिका नंतरच्या काळात एकमेकांपासून आणखी दूर गेले. नंतर १९६० च्या दशकामध्ये एक तर १९६५ चे भारत-पाक युध्द आणि नंतर भारताने व्हिएटनाम प्रकरणी अमेरिकेचा जोरदार निषेध करणे या कारणांची आणखी भर पडली. लिंडन जॉन्सन यांनी पाकिस्तानला भेट दिली पण भारताला भेट द्यायचे मात्र टाळले. त्यामुळे इतकी वर्षे भारत आणि अमेरिका या दोन estranged democracies होत्या. शीतयुध्दाच्या काळात भारत अमेरिकेचे सर्वात चांगले संबंध होते केनेडी अध्यक्ष असताना. त्यावेळी चीनविरूध्दच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेने भारताला मदतही केली होती.तर सर्वात वाईट संबंध होते रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना.१९७१ च्या युध्दाच्यावेळी अमेरिकेने भारताविरूध्द सातवे आरमार बंगालच्या उपसागरात धाडले होते. १९७७ मध्ये झिया उल हकने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तान आणि झिया हे दोघेही parriah ठरले होते (ज्याप्रमाणे ९/११ होण्यापूर्वी मुशर्रफ parriah ठरले होते). ज्याप्रमाणे ९/११ मुशर्रफला आपला वनवास संपवायला उपयोगी ठरले त्याप्रमाणे रशियाचे अफगाणिस्तानातील आक्रमण झियाला आपला वनवास संपवायला उपयोगी ठरले.त्यानंतर रशिया अफगाणिस्तानात असताना अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांनी पाकिस्तानला अगदी भरपूर मदत केली होती. इतकेच नाही तर अफगाणिस्तानातील मुजाहिदींना "the moral equivalent of our founding fathers" असेही म्हटले होते. पुढे जॉर्ज डब्ल्यू बुशनी मुशर्रफला कसे समर्थन दिले हे पण आपण बघितलेच.पण बुशच्या दुसर्‍या टर्ममध्ये मात्र भारत-अमेरिका संबंध बरेच सुधारले. मला वाटते की या सर्व घडामोडी झाल्या त्यात दोन्ही देशांची भूमिका त्या त्या काळाला अनुसरून आपापले हितसंबंध जपायला घेतलेली होती.म्हणजे १९८१ ते १९८९ या काळात रॉनाल्ड रेगन यांच्याऐवजी कोणी डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष असता तरी त्याने रेगन यांनी केले त्यापेक्षा फार काही वेगळे केले असते असे नाही. कारण ती अमेरिकेच्या तत्कालीन राजकारणाची गरज होती. अनेकदा आपण असे निर्णय त्या काळच्या परिस्थितीच्या आणि राजकारणाच्या चष्म्यातून न बघता व्यक्ती/पक्ष या चष्म्यातून बघतो. त्यामुळे भारतासाठी केनेडी १९६२ मध्ये चांगले पण निक्सन १९७१ मध्ये वाईट म्हणून भारतासाठी डेमॉक्रॅटिक पक्ष हा रिपब्लिकन पक्षापेक्षा चांगला वगैरे समज पूर्वी रूढ होते--आजही काही प्रमाणावर आहेतच.भारतातही नेहरू समाजवादाकडे झुकलेले होते आणि भांडवलदारांना त्यांचा विरोध होता या कारणामुळे नेहरूंचा ओढा अमेरिकेपेक्षा रशियाकडे जास्त होता असेही काही लोक म्हणतात.मला तसे वाटत नाही.कारण असेच लॉजिक लावायचे झाले तर अमेरिका हा लोकशाही असलेला आणि लोकशाही रूजलेला देश होता तर रशियाचा आणि लोकशाहीचा दुरूनदुरूनपर्यंत संबंध नव्हता.नेहरूंचा लोकशाहीवरील विश्वास किती होता हे आपल्याला माहितच आहे. मग नेहरूंचा ओढा त्याच न्यायाने अमेरिकेकडे राहायला हवा होता!! तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या काही घटना घडल्या त्यात तत्कालीन राजकारणाचा आणि हितसंबंधांचा वाटा जास्त होता. (अवांतरः तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन राज्यकर्ते असे वरकरणी अनाकलनीय वाटणारे निर्णय घेत असतात. उदाहरणार्थ १९९०-९१ च्या आर्थिक संकटाच्या वेळी चंद्रशेखर पंतप्रधान होते. ते समाजवादी विचारांचे होते. अशा मंडळींचा आय.एम.एफ सारख्या संस्थांना किती विरोध असतो हे वेगळे सांगायलाच नको. तरीही तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता चंद्रशेखर यांचेच सरकार आय.एम.एफ ला अ‍ॅप्रोच झाले आणि त्यांनीच सोनेही गहाण टाकले होते. तेव्हा अशा निर्णयांमध्ये वैचारिक भूमिका वगैरे गोष्टी प्रत्येक वेळी येतीलच असे नाही). याचा अर्थ सत्तेत कोण होते हा मुद्दा पूर्ण गैरलागू होता का? अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या दृष्टीने सत्तेत कोण होते यावर भारताविषयीचे धोरण तितक्या प्रमाणावर अवलंबून होते असे मला तरी वाटत नाही.याचे कारण १९४७ नंतर कित्येक वर्षे भारत हा अमेरिकेसाठी फार महत्वाचा देश होता असे नाही.पण इतर देशांमधील सत्ताधारी मात्र अमेरिकेला अनुकूल्/प्रतिकूल भूमिका घेऊन दोन देशांमधील संबंध वेगळ्या वळणाला नेऊ शकत होते.उदाहरणार्थ इराणमध्ये पेहलवी अमेरिकेचे मित्र होते पण त्यानंतरचे खोमेनी विरोधात. त्यामुळे अमेरिकेची त्या देशाबरोबरच्या भूमिकेत पेहलवी आणि खोमेनी सत्तेत असतानाच्या काळात अगदी जमीन-अस्मानाचा फरक दिसेल. भारतात मात्र अगदी १९४७ पासून दोन देशांमध्ये वितुष्ट यावेच अशीच परिस्थिती असल्यामुळे नेहरूंऐवजी अन्य कोणी सत्तेत असते तरी फार मोठा फरक पडला असता आणि दोन देशांचे गळ्यात गळे असते असे वाटायचेही काही कारण नाही. हा प्रतिसाद काहीसा विस्कळीत झाला आहे याची कल्पना आहे.पण याक्षणी यापेक्षा वेगळे लिहिता येत नाही. नंतर १९९० च्या दशकापासूनच्या घटनांविषयी लिहेन.

In reply to by गॅरी ट्रुमन

अमितदादा 03/08/2016 - 14:38
माहितीपूर्ण प्रतिसाद. बाकी ट्रम्प जर सत्तेत आले तर अमेरिकेचे रशिया बरोबर चे संबंध सुधारील आस दिसतंय आणि ते भारतासाठी महत्वाचं असेल. ट्रम्प यांनी NATO ही संघटना बिनकामाची झाली आहे असं मत प्रदर्शित केलं तसेच रशिया हा अमेरिकेचा दुश्मन नाही हे हि सांगितलं। अमेरिकेपुढं चीन, मेक्सिको यांचे प्रश्न महत्वाचे आहेत असं ट्रम्प च मत आहे। बाकी सध्या अमेरिका आणि रशिया यांच्या वितुष्टमुळे रशिया भारतापासून दूर चालली आहे हे दिसत होतं तसेच अलीकडच्या काळात रशिया चे पाकिस्तान बर संबंध सुधारतयात असे दिसत होते. यामधून पाकिस्तान रशिया आणि चीन असा ऍक्सिस तयार होण्याची भीती होती. मात्र जर रशिया चे अमेरिकेबर संबंध सुधारले तर भारताला अमेरिकेबरोबर रशिया च सुद्धा सहकार्य भविष्यात लाभू शकेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

विकास 05/08/2016 - 01:52
अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या दृष्टीने सत्तेत कोण होते यावर भारताविषयीचे धोरण तितक्या प्रमाणावर अवलंबून होते असे मला तरी वाटत नाही. असेच म्हणायचे आहे. धन्यवाद! म्हणून भारतासाठी डेमॉक्रॅटिक पक्ष हा रिपब्लिकन पक्षापेक्षा चांगला वगैरे समज पूर्वी रूढ होते--आजही काही प्रमाणावर आहेतच. ह्याच संदर्भात उलटे देखील बोलले जाते. सध्याच्या निवडणूकीच्या काळात डेमोक्रॅटीक पक्षाला विरोध करणार्‍या भारतीयांची कारणे विविध आहेत. त्यातील एक स्थानिक (अमेरीकन) राजकारणाशी आहे. ते म्हणजे हिलरीकडे विश्वासार्हता नाही. ते अगदी मान्य आहे आणि त्यामुळेच माझे देखील मत हिलरीच्या समर्थानात नाही. पण नंतर मी असे देखील ऐकले आहे की हिलरीचा उपराष्ट्राध्यक्षपदासाठीचा साथिदार टिम केन हा कधीच्या काळी ख्रिस्ती धर्मप्रसारात पण गुंतला होता. पण मग रॉमनी पण त्याच्या ऐन उमेदीच्या काळात मॉर्मन मिशनरी म्हणून धर्मप्रसार करत होता हे (त्याला पाठींबा देताना) विसरले जाते. बुश तर काय रिबॉर्न ख्रिश्चन आहे. त्याच्या वडीलांच्या व्हाईट हाऊसच्या काळात त्याच्या आईवडीलांना (जॉर्ज एच डब्ल्यू बुश आणि बार्बरा बूश) यांना सांगायची वेळ आली होती की धर्म इतका गांभिर्याने घेऊ नकोस म्हणून. (हा किस्सा एकदा रेडीओवर ऐकलेआ आहे. आत्ता संदर्भ शोधत बसलेलो नाही!). दुसरा मुद्दा धरला जातो तो म्हणजे व्यापाराचा. त्या संदर्भात देखील असे ठाम पणे म्हणता येणार नाही हे वर मूळ लेखात दाखवून दिले आहेच. आज तर लॉकहीड मार्टीन ने भारताला संपूर्ण एफ-१६ चे उत्पादन टेक्सास मधून भारतात हलवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. असले प्रस्ताव ठेवण्याआधी येथे इथल्या राज्यकर्त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असते. विशेष करून जेंव्हा ते संरक्षण खात्याशी संबंधीत असते तेंव्हा.... आज तर पेंटॅगॉनने पाकीस्तानची $३०० मिलियन्सची मदत रोखून ठेवली आहे. कारण पाकीस्तान दहशातवादाच्या विरोधात ठोस करताना दिसत नाही म्हणून! २००१ साली जेंव्हा क्लिंटन नंतर बुश (रिपब्लिकन) सरकार आले, तेंव्हा काही जणांना म्हणताना ऐकले होते की आता काय भारत-अमेरीका जवळ येतील कारण त्यावेळेस भारतात देखील "उजव्यांचे" राज्य होते. :) पण तसे काही झाले असे वाटत नाही. किंबहूना बुश-मनमोहनसिंग (उजवे-डावे) यांनी त्या आधी चालू झालेल्या क्लिंटन-वाजपेयी (डावे-उजवे) संबधांना पुढे नेले. तेच आत्ता देखील मोदी-ओबामा करताना दिसत आहेत. अर्थात ओबामा हे मनमोहनसिंग यांच्या वेळीस देखील होते आणि त्यावेळेस पण संबंध वृद्धींगतच होत गेले होते. थोडक्यात शीतयुद्धानंतर बदलेला हा ट्रेंड आहे. जो दोन्ही देश आणि अगदी जगासाठीपण चांगला आहे. म्हणून असे म्हणावेसे वाटते की डाव्या-उजव्या विचारसरणीचा विचार करत असताना भारतातले डावे आणि अमेरीकन डावे तसेच भारतातील उजवे आणि अमेरीकेतील उजवे हे समान आहेत असे सोपे गणित नाही. विशेष करून अमेरीका हा स्वतःच्या देशाचा विचार करत परराष्ट्रधोरण अवलंबते. त्यात गैर काही नाही... मग राज्य कुणाचे का असेना... म्हणूनच उदाहरणच देयचे झाले तर, इयू आणि अगदी अँजेला मर्कलच्या फोनवर पण पाळ्त ठेवताना मैत्री आड आली नव्हती. अर्थात यात मी त्यांचे प्रत्येक निर्णय योग्य होते असे म्हणू इच्छीत नाही. त्या संदर्भात "चार्ली विल्सनज् वॉर" हा ८०च्या काळाती सत्यघटनेवर आधारीत चित्रपट (कसे चुकतात ते) बरेच काही सांगून जाईल! असो.

मनो 05/08/2016 - 02:40
एफ-16 हे जनरेशन-4 म्हणजे 38 वर्षांपूर्वी 1978 मध्ये सेवेत दाखल झालेले लढाऊ विमान आहे. कालानुरूप त्यात सुधारणा झाल्या असल्या तरी ते जुने तंत्रज्ञान आहे. ते भारतात हलवल्यानंतर अमेरिकेत त्याचे उत्पादन बंद होईल आणि ते फक्त भारतात बनवले जाईल असा तो प्रस्ताव होता. त्यात अमेरिकन कंपनीचा फायदा (कारण इथे खर्च कमी) आणि स्वदेशी बनलेले विमान म्हणून भारताचा फायदा असा तो हिशेब होता. वायुदलाने जुने तंत्रज्ञान म्हणून हा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला आहे. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानकडेही हीच एफ-16 विमाने आहेत, म्हणून भारताला त्यापेक्षा वरचढ असे लढाऊ विमान हवे आहे.

रमेश आठवले 05/08/2016 - 03:58
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई, हिलरी क्लिंटन या राष्ट्रपति पददासाठीच्या उमेदवार बाईंच्या प्रमुख सहायक म्हणून कैक वर्षा पासून कार्यरत आहेत. भारताच्या हिताचा विचार करून येत्या निवडणुकीत मतदार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक या बाबत विचार करतील असे वाटते. या बाई अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अगदी नजीकच्या गोटात वावरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे . https://en.wikipedia.org/wiki/Huma_Abedin

In reply to by रमेश आठवले

विकास 05/08/2016 - 04:58
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई, हिलरी क्लिंटन या राष्ट्रपति पददासाठीच्या उमेदवार बाईंच्या प्रमुख सहायक म्हणून कैक वर्षा पासून कार्यरत आहेत. अगदी सहमत. त्या कारणामुळे देखील मला हिलरीबद्दल reservation आहे. फक्त त्याउलट ट्रंपचे तरी काय आहे? त्याचा उजवा हात ज्याला म्हणले जाते तो पॉल मॅनाफोर्ट हा देखील उपद्व्यापी आहे. काही गोष्टी येथून चिकटवत आहे... And in 2010, Manafort helped pro-Russian candidate Viktor Yanukovych remake his tarnished image and win a presidential election in Ukraine.The effort was arguably the high point in a decade of political and business consulting in that country involving figures such as gas tycoon Dmytro Firtash, who was separately charged in 2014 by US officials with being part of a bribery scheme in India. El-Assir has said that in 1988, Manafort introduced him to Pakistani leader Benazir Bhutto, whose government Manafort’s firm represented in Washington for a few years. Manafort later lobbied from 1990 to 1995 for the Kashmiri American Council – as Yahoo News recently reported – which was revealed as a Washington-based front group for Pakistan’s spy agency ISI when the US Department of Justice charged it in 2011 with covertly influencing US policy towards Kashmir, the long-disputed area between Pakistan and India. The Kashmiri council’s director, Syed Ghulam Nabi Fai, pleaded guilty to conspiracy and tax fraud charges, and was sentenced to two years in federal prison.

In reply to by रमेश आठवले

नंदन 08/08/2016 - 13:47
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई,
हुमा अबेदीन यांचे वडील भारतीय आहेत. हुमा अबेदीन यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे. त्या अमेरिकन नागरिक आहेत. हुमा अबेदीन यांचे पती ज्यू धर्मीय आहेत. आपणच दिलेल्या लिंकमध्ये ही माहिती आहे, ती इथे निदर्शनास आणून दिली. बाकी चालू द्या.

In reply to by शाम भागवत

रमेश आठवले 30/08/2016 - 06:05
हुमा अबेदीन त्यांच्या जु पति पासुन विभक्त झाल्या आहेत. http://www.nytimes.com/2016/08/30/nyregion/anthony-weiner-sexting-huma-abedin.html?emc=edit_ne_20160829&nl=evening-briefing&nlid=45503233&te=1

In reply to by रमेश आठवले

विकास 31/08/2016 - 21:23
हुमा अबेदीन यांच्याबद्दल मला जरी थोडेफार reservation असले, विशेष करून त्यांचे नाव हिलरीच्या इमेल्स आणि फाउंडेशनच्या भानगडींमधेपण असल्याने... तरी या बाबतीत त्यांचा वैयक्तीक मामला आहे आणि दुर्दैवी आहे. आणि जे काही माध्यमांमधे आले आहे त्यानुसार त्यांचा नवरा अतिशिय "लंपट-लोलूप-लुब्रा" category मधे बसणारा आहे हे स्पष्ट होते. त्याच्या आधीच्या अशा वागण्याने त्याची राजकीय कारकिर्द बरबाद झाली. आता परत तसेच वागल्याने त्यांचा कसाबसा चालू ठेवलेला संसार देखील मोडावा लागला...

In reply to by शाम भागवत

रमेश आठवले 08/08/2016 - 20:49
नन्दन आणि भागवत यांनी वर दिलेली माहिती मला विगत आहे. तरीही माझ्या मनातील ह्या किन्तुचे निराकारण होत नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणीबाणीची परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते.आणि अणू युद्ध पेटू शकते . कारगिलचे उदाहरण घेतले तर पाकिस्तान अणुशस्त्र वापरायला तयार झाला आहे अशी बातमी समजताच बिल क्लिंटन यांनी नवाझ शरीफ यांना तातडीने वाशिंग्टन ला बोलावून घेतले आणि दबाव आणून अनर्थ टाळला. या दोन देशात आणीबाणीची परिस्थिती पुन्हा उभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तत्कालीन अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका पुन्हा महत्वाची ठरेल. आत्ता पर्यंतच्या ऐतिहासिक अनुभवा वरून मुस्लिम धर्मीय हुमा पाकिस्तानच्या खबऱ्या म्हणून कटोकटीच्या वेळी काम करणार नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय ? मी फक्त भारताच्या दृष्टिकोनातून काय हिताचे आहे या मुद्द्यावर लिहीत आहे.

In reply to by रमेश आठवले

अर्धवटराव 08/08/2016 - 23:14
पाकिस्तानचा खबरी बनायला मुस्लीम (आणि भारताचा खबरी असायला हिंदु/शिख वगैरे) असणं हि काहि अट नाहि. पुरेशा हरी पत्ती देखकर कुण्याही रंगाचा व्यक्ती ते काम चोख करु शकतो.

रमेश आठवले 05/08/2016 - 21:00
अमेरिकेच्या राजधानीत वेगवेगळ्या देशांच्या किंवा संस्थाच्या बाजूने काम करणारे पगारी दूत बरेच आहेत. ट्रूम्पचे सद्याचे सहायक त्या पैकी एक वाटतात. ते शास्वत नाहीत आणि ट्रम्प अध्यक्ष झाल्या नन्तर ही त्यांच्या आतल्या गोटात असतील असे खात्रीपूर्वक म्हणता येणार नाही. या उलट हुमा बाई या हिलरी यांच्या बरोबर १९९६ पासून आहेत आणि त्यांचे सबंध मायलेकी सारखे असल्याचे लिहिले आहे. तरी त्या अध्यक्षांच्या आतल्या गोटात असतील याची खात्री वाटते. उडदामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे ?

In reply to by रमेश आठवले

विकास 08/08/2016 - 19:18
आजची स्थिती अशी आहे की दोन्ही राष्ट्राध्यक्षिय उमेदवार इथल्या मतदारांना नकोसे आहेत. तरी देखील सँडर्समुळे हिलरीला कँपेन आणि धोरणे किमान आत्तातरी बदलावी लागत आहेत. हे कमी नाही. पण या उलट ट्रंप हा जिंकूनच येताना disruptive innovation(?) च्या तत्वावर आला आहे. त्यामुळे त्याला काही नमते घेण्याची गरज नाही. आपण सांगू ती पूर्व दिशा ठरू शकेल असेच वाटते... मला हुमा अबेदीन या व्यक्ती ऐवजी, मला व्यक्तीगत तशी पाकिस्तानी व्यक्तीबद्दल खात्री वाटत नाही. त्यांच्या धर्माचा मला प्रश्न नाही. मला वाटते त्या कॉलेजला येई पर्यंत सौदी अरेबियात शिकलेल्या आहेत. पण त्यांचे पाकीस्तानी आणि सौदी कनेक्शन मला भारताच्याच नाही तर अगदी अमेरीकेच्या दृष्टीकोनातूनही खटकते, इतके निश्चित. पण त्यात माझा अंदाजच विचाराल तर, हिलरीच्या कॅबिनेट मधे अगदी हुमा अबेदीन ला घेतले तरी त्यात एकाहून अधिक भारतीय असण्याची शक्यता आहे. आता ते भारताच्या बाजूने असण्याची शक्यता आहे का? तर तत्वतः नाही कारण ते अमेरीकन नागरीक आहेत आणि अमेरीकन घटनेच्या बाजूनेच विचार करतील. त्यात काही गैर नाही... किंबहूना त्यामुळेच आपण (भारताने) देखील त्यांना अमेरीकन अधिकारी म्हणूनच वागवले तर संबंधांना योग्य वळण राहील. उगाच भारतीय वंशाचा म्हणून गरजेपेक्षा जास्त भावनीक होण्याची गरज ठेवली नाही, म्हणजे झाले! त्या उलट ट्रंपच्या कॅबिनेट मधे भारतीयच काय अल्पसंख्यांकांनापण वाव मिळेल असे वाटत नाही. ट्रंपचे सल्लागार पॉल मॅनाफोर्ट हे आंतर्राष्ट्रीय राजकीय धंदा करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांनी जर आयएसआयकडून वेगळ्या कारणाने, पण आधीच पैसे घेतले असतील, ते देखील काश्मीर च्या संदर्भात, युक्रेनमधे उचापती केल्या असल्या तर त्यांचे हेतू समजतात. ट्रंपने रशियाने केलेल्या क्रामिआवरील अतिक्रमणास मान्यता देण्याच्या तयारीत आहे. रिपब्लीक्न पक्षाने अधिकृत भुमिका देखील आता मृदू केली आहे... असले दलाल हे भारतच काय अमेरीकेसाठीपण धोकादायक ठरू शकतात... त्यामुळे केवळ ह्याच कारणावरून बोलायचे ठरले तरी देखील ट्रंप महाशयांपेक्षा हिलरी बरी असेच म्हणावे लागेल.

In reply to by विकास

हुप्प्या 08/08/2016 - 22:06
ट्रंपने काहीही केलेले नसताना केवळ आकसाने त्याला ह्या मुद्द्यावर हिलरीपेक्षा दुय्यम ठरवायचा प्रयत्न केविलवाणा वाटतो आहे. कसे ते पहा: हिलरीने इजिप्त आणि लिबियात ज्या ढवळाढवळी केल्या त्या ढळढळीत दिसत आहेत. गद्दाफी हा दुष्ट माणूस असला तरी सद्दामच्या उदाहरणामुळे धडा शिकून गप्प बसलेला होता. तो एक हुकुमशहा होता. त्याने इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना वेसण घातलेली होती. हिलरीने व ओबामाने ह्या बंडखोरांना फूस देऊन गद्दाफीला पदच्युत केले. माणुसकीला काळिमा फासणारे, चारचौघात सांगताही न येण्याजोगे अमानुष अत्याचार करून बंडखोरांनी गद्दाफीला ठार केले आणि लिबियाला धर्मांध यादवीत ढकलले. असल्या उपद्व्यापांमुळे जगाचेच काय अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा राजदूत मारला गेला. गद्दाफी मेल्याबद्दल प्रतिक्रिया काय? तर हिलरीने आपले विकट हास्य करुन काहीतरी बालिश प्रतिक्रिया दिली. इजिप्तमधे काय केले? तिथेही होस्नी मुबारक नामक हुकुमशहाला पदच्युत करण्याकरता बंडखोरांना पाठबळ दिले. आणि कोण आले सत्तेवर? मुस्लिम ब्रदरहूड जे जवाहिरी आणि बिन लादेनसारख्या लोकांचे स्फूर्तीस्थान होते! आपण कुणाला पाठिंबा देत आहोत, त्याने काय बदल संभवतात, त्याचे दूरगामी परिणाम काय? एक तर ह्या प्रश्नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष किंवा बेदरकारपणा. हिलरीने आपण नको तिथे नाक खुपसून जे आहे त्याचा बट्ट्याबोळ करू शकतो हे सप्रमाण दाखवले आहे. तरी तिच्यापरिस ट्रंपच जास्त वाईट म्हणण्याचा अट्टाहास गंमतीचा आहे!

In reply to by हुप्प्या

अमितदादा 08/08/2016 - 22:26
लिबिया आणि इजिप्त यातील गोंधळाचा पूर्ण दोष हिलरी वरतीच का? प्रेसिडेंट म्हणून ओबामाची काहीच जबाबदारी नाही. जरी हिलरी ची Secretary of State म्हणून जास्त जबाबदारी असली तरी सगळा दोष तिच्यावर ढकलुन मोकळं होणं चुकीचं वाटतंय. लिबिया बाबतीत हिलरी चा दोष दिसून येतो पण ओबामा नि इजिप्त आणि सीरिया मध्ये घातलेल्या घोळाचा भोभाटा होताना दिसत नाही. बर हिलरी चे as Secretary of State म्हणून असणारे गुण दोष माहित आहेत तसे ट्रम्प चे नाही. त्या तुलनेत ट्रम्प ची पाटी कोरी असल्याने दाखवायला दोष नाहीत, मात्र बाळाचे पाय पाळन्यात दिसतात त्या प्रमाणे ट्रम्प कुणाची पत्रास ठेवणार नाही असं वाटतंय अगदी भारताची हि. स्वस्त आयात थांबण्यासाठी चीन ला धमक्या देणारा ट्रम्प भारतातील IT कंपनी मधून होणारी आउटसोर्सिंग बंद किंवा कमी कराय मागे पुढे पाहिलं अस वाटत नाहीत. फक्त चीन ला आव्हान देण्याकरता भारताचा वापर करून घेईल आस वाटतंय. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत ट्रम्प ची स्टेटमेंट पाहता ते काधि हि u turn घेऊ शकतात.

In reply to by अमितदादा

हुप्प्या 09/08/2016 - 01:16
१. ओबामा निवडणुकीला उभा नाही. त्यामुळे तो ह्या वादाच्या कक्षेत येत नाही. हिलरीच्या पारड्यात तिचे दोष घालणे आवश्यक आहे. आपल्या परदेशी सत्तांशी व्यवहार करण्याच्या प्रदीर्घ अनुभवाची जाहिरात करायला ती कधीच विसरत नाही. पण अगदी अलीकडच्या काळात तिने केलेल्या घोडचुका सोयिस्कररित्या काणाडोळा केल्या जातात. त्याकरता हा खुलासा. २. हिलरची राष्ट्राध्यक्षीय कारकीर्द हे ओबाच्या अध्यक्षपदाचे पुढचे पान असेल. अर्थात त्याची सगळी धोरणे ती तशीच पुढे चालवणार असे स्पष्ट दिसते आहे. तेव्हा शितावरून भाताची परीक्षा असे पहाता मागील कारकीर्दीचा आढावा घेणे उद्बोधक ठरावे. ३. परराष्ट्र मंत्र्याचा (जे पद हिलरीकडे होते) परदेशी उलाढालीतील वाटा हा राष्ट्राध्यक्षाच्या तोडीचा असतो. बक स्टॉप्स हियर ह्या न्यायाने सगळी जबाबदारी ओबामाकडे येते पण तरी हिलरीने तिचा प्रभाव टाकणे आवश्यक असते. जर ओबामा चुकत असेल तर तिने आपले ज्ञान वापरुन त्याला बदलणे अभिप्रेत आहे. हिलरी ही निव्वळ कळसूत्री बाहुली होती आणि ओबामाच तिचा बोलवता धनी होता असे म्हणत असाल तर त्या मुद्द्यामुळेही हिलरीचे तथाकथित मुत्सद्दीपण फोल ठरेल. ४. प्रत्यक्ष कर्तृत्त्व आणि अंदाज वा मुलाचे पाय पाळण्यात ह्यात जबरदस्त फरक आहे. जाणून बुजून जे हिलरीचे खरोखरचे कर्तृत्त्व आहे त्याकडे दुर्लक्ष करून "पण ट्रंप काय त्याही पेक्षा वाईट असेल" असे छाती ठोकून सांगणे हे पटण्याजोगे नाही. देशाची परराष्ट्र धोरणे ठरवायचे कुठलेही पद ट्रंपने भूषविलेले नाही. हिलरीने भूषवलेले आहे पण त्यात तिचे कर्तृत्त्व सुमार वा देशाकरता/जगाकरता घातक ह्या दोन टोकांच्या मधे कुठेतरी आहे. ५. एकंदरीत गेल्या ८ वर्षाचा इतिहास असे सांगतो की ओबामा (व त्याचीच प्रतिकृती हिलरी) हा निधर्मी वा उदारमतवादी पण जुलमी हुकुमशहांपेक्षा मूलतत्त्ववादी इस्लामी लोकांना झुकते माप देतात. ओसामाला मारणे हा एकमेव अपवाद म्हणावा लागेल. पण बाकी सगळा आनंद आहे. सिरिया, लिबिया, इजिप्त, इराण इथे त्यांनी मूलतत्त्ववादी लोकांची पाठराखण केलेली आहे. आणि हे भारताकरता नि:संशय घातक आहे कारण भारत हा मुस्लिम बहुल देश नाही.

In reply to by हुप्प्या

अमितदादा 09/08/2016 - 01:54
बहुतांश खुलासे पटले पण हिलरी ला दोष देऊन ओबामा ला दोष न देणे हे नाही पटलं, जरी ते निवडणुकीत उभे नसतील तरी. वैयक्तिक मतांतरे असू शकतात. ट्रम्प यांचा विषयी कोणता हि राग लोभ नाहीये, ट्रम्प ने भारताबद्दल त्याची काय पॉलिसी असेल हे उघड केले नाही, एक दोन स्टेटमेंट सोडता. जसे ट्रम्प ची रशिया, चीन, मेक्सिको, जपान, युरोपिअन युनियन यांच्याबद्दल ची मते माहित आहेत तसे भारतबद्दल काय पॉलिसी आहे हे माहित नाही. हिलरी मात्र ओबामाची भारतांबद्दल ची पॉलिसी चालू ठेवतील आस वाटत. ट्रम्प मुळे रशिया अमेरिकेच्या जवळ आली तर भारताला इंडिरेक्टली फायदा होईल पण ट्रम्प भारताला चीन विरुद्ध फक्त एक काउंटर वेट म्हणून वापरले कि खरोखराचा लॉंग टर्म पार्टनर मानून काम करेल हे सध्या माहित नाही. बाकी हिलरी आणि ट्रम्प यापैकी अमेरिकन लोकांना कोण फायदेशीर आहे या अनुषंगाने तुम्ही जी मते मांडत आहात यातील मला काही जास्त माहिती हि नाही आणि इंटेरेस्ट हि नाही, फक्त दोगापैकी भारताला कोण उपयोगी पडेल यात मला इंटरेस्ट आहे. या संदर्भातील तुमचे किंवा इतर माहितीगार लोकांच्या प्रतिसादावर मी लक्ष ठेवून आहे, ते वाचाय आवडतील.

In reply to by अमितदादा

हुप्प्या 09/08/2016 - 08:22
तसे बुशचाही दोष आहे. पण सध्याची चर्चा भविष्यातील अध्यक्षांचा भारत-अमेरिका संबंधांवर पडणारा प्रभाव असा आहे म्हणून शेवटचे ३ महिने शिल्लक असणार्‍या राष्ट्रपतीचा उल्लेख नाही. पण होय ह्या सगळ्याकरता ओबामाही जबाबदार आहेच. ओबामाचे ड्रोनहल्ले हे बुशच्या युद्धाइतकेच घातक आहेत. जिनिव्हा करारासारखी कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे नाही, जबाबदारी नाही. हजारो मैल दुरून ड्रोन वापरून शत्रूवर हल्ले केले जातात. हजारो लोक मरतात. त्यातले किती निरपराध असतात नाही पत्ता नाही. ह्या भयानक प्रकारामधे ज्यांची मुले, आईबाप, कुटुंब मरतात त्यातले अनेक बिनदिक्कत आत्मघातकी अतिरेकी बनतात. पाकिस्तानात अलीकडे घडलेले भयानक हल्ले, जसे पेशावरची शाळा, हॉस्पिटलवरचा हल्ला वगैरेचा ड्रोन हल्ल्याशी संबंध असल्याचे दावे वाचले आहेत. मूर्ख नोबेल पारितोषक समितीने कुठलीही लायकी वा कर्तृत्त्व नसताना ओबामाला शांततेचा पुरस्कार देणे हे अत्यंत विकृत कृत्य होते. केवळ एक काळ्या वंशाचा माणूस राष्ट्राध्यक्ष बनल्यामुळे हुरळून जाऊन आतातायीपणा करुन हे केले गेले. त्यातल्या काही लोकांना हे पारितोषिक दिल्याचा पश्चाताप होतो आहे. आणि तो झालाच पाहिजे. असो. इतकी ओबामानिंदा पुरेशी असावी! ज्याला आपण अमेरिकन लोकांना फायदेशीर धोरणे समजत आहात ती जगाच्याही (म्हणजे भारताच्याही) फायद्याची आहेत. बुश आणि ओबामाच्या धोरणांमुळे आयसिस फोफावले. आणि आता ते भारतासह सगळ्या जगाकरता दुखणे आहे. आयसिसवर जो कठोर उपाय करेल तो राष्ट्रपती अमेरिकेच्याच नव्हे तर भारताच्याही हिताचा आहे. अतिरेकी मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे ओबामा वा हिलरी हे अमेरिका भारत संबंधांकरता आजिबात चांगले नाहीत. कारण भारतातही वेळोवेळी अतिरेकी हल्ले होतच असतात.

In reply to by विकास

रमेश आठवले 19/08/2016 - 22:26
पॉल मॅनाफोर्ट यांनी राजीनानाम दिल्याची आणि ट्रम्प यांनी तो स्वीकारल्याची बातमी आहे. हुमा अबेदीन बाबतीत हिलरी असेच काहीतरी करतील अशी आशा करूया. http://www.dnaindia.com/world/report-donald-trump-s-campaign-chairman-paul-manafort-resigns-2246949

अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. ओबामाच्या विशेष करून पहील्या निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यावर संशय घेत मॅकेनला पाठींबा देणारे होते आणि आत्ता देखील हिलरी ऐवजी ट्रंप (भारत-अमेरीका संदर्भात) अधिक योग्य असेल असे देखील म्हणणारे आहेत.