मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देशांतर

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

परदेशस्थ भारतीय

पराग१२२६३ ·
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

खंडाळ्याच्या घाटासाठी...

पराग१२२६३ ·
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.

पंचगंगातिरीचा दिपोत्सव

पराग१२२६३ ·
पंचगंगा घाट पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.

पुस्तक परिचय - काबुलीवाल्याची बंगाली बायको

चिमी ·
आता ऑफिस सुरु होणार म्हणून एकदा घरी जाऊन येऊ म्हणलं आणि गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाय खूप वाईट मुरगळला. आईच्या शब्दात “आल्या आल्या घेतलं का तंगडं मोडून?” तिची कामामुळे होणारी दगदग पाहून खूप वाईट वाटत होतं पण आता गप एका जागेवर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. घरी गेल्यावर मोबाईलला हातपण लावायचा नाही असा ठरवलं होतं पण एका जागी बसून दुसरं करणार तरी काय? म्हणून मग किंडलवर “काबुलीवाल्याची बंगाली बायको” वाचायला सुरु केलं. सुश्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या या मूळ बंगाली सत्यकथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी.

पर्यटकांचे आकर्षण - आयफेल टॉवर

पराग१२२६३ ·
आयफेल टॉवर – फ्रांसचे बोधचिन्ह. संपूर्ण फ्रांसमध्ये व्हर्सायपासून मार्सेलिसपर्यंत कितीही भव्यदिव्य राजवाडे आणि अन्य ऐतिहासिक वास्तू उभ्या असल्या तरी फ्रांस हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर जी प्रतिमा उमटते ती असते केवळ आयफेल टॉवरचीच. पॅरिसमधून वाहणाऱ्या सेईन नदीच्या किनाऱ्यावर हा टॉवर उभा आहे. त्याच्या उभारणीला सुरुवात झाली, त्या घटनेला यावर्षीच्या सुरुवातीलाच 135 वर्षे पूर्ण होत आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पॅरिसमध्ये 1889 मध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने एका आकर्षक रचनेची उभारणी करण्याचे ठरले होते.

बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवतरला नव्या रुपात

पराग१२२६३ ·
जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मधूनच वाहणाऱ्या स्प्रे नदीच्या किनाऱ्यावर ‘स्टाड्टश्लोस’ (सिटी पॅलेस) म्हणजेच ‘हम्बोल्ड्ट फोरम’ (Humboldt Forum) उभारण्यात आलेला आहे. या नवनिर्मित राजवाड्याचा उर्वरित भागही 20 जुलै 2021 पासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात आला आहे. बर्लिन शहराच्या स्थापनेला 2012 मध्ये 775 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकेकाळी बर्लिनची ओळख असलेल्या या राजवाड्याची पुन:उभारणी करण्याची योजना जर्मन सरकारने आखली होती. ‘स्टाड्टश्लोस’ला ‘बेर्लिनर श्लोस’ म्हणूनही ओळखले जात होते. याच्या पुन:उभारणीचा विचार मांडला जाऊ लागला तेव्हापासूनच ही संपूर्ण योजना सतत वादात सापडत राहिली.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!