'शब्दनाद'...मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचे जन्म, उगम आणि अर्थांचा शोध घेणारे सदर..
'कॉटन ग्रीन' स्टेशन..
हार्बर रेल्वेमार्गावरील एक स्टेशन.
'कॉटन ग्रीन' स्टेशनच्या नांवातच काॅटन असल्याने त्याचा कापसाशी संबंध असावा हे तर उघडच आहे मात्र त्यातील 'ग्रीन'चा अर्थ काय हे कळत नव्हते, त्याचा शोध धेतला असता मस्त मनोरंजक माहिती हाती लागली..
हे स्टेशन मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी व भायखळा स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या पूर्वेस हार्बर लाईनवर येतं. इंग्लंडमधील कापड गिरण्यांना लागणा-या आपल्या देशातील कापसाची निर्यात हार्बर लाईनच्या पूर्वेस असणा-या बंदरातून व्हायची.