Skip to main content

भूगोल

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

हे हृदय कसे बापाचे......!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/06/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

विश्वास वासावरचा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/05/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

'कॉटन ग्रीन' स्टेशन..हे नाव या स्थानकाला कसं प्राप्त झालं ?

लेखक ग्रेटगणेश यांनी मंगळवार, 28/04/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
'शब्दनाद'...मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचे जन्म, उगम आणि अर्थांचा शोध घेणारे सदर.. 'कॉटन ग्रीन' स्टेशन.. हार्बर रेल्वेमार्गावरील एक स्टेशन. 'कॉटन ग्रीन' स्टेशनच्या नांवातच काॅटन असल्याने त्याचा कापसाशी संबंध असावा हे तर उघडच आहे मात्र त्यातील 'ग्रीन'चा अर्थ काय हे कळत नव्हते, त्याचा शोध धेतला असता मस्त मनोरंजक माहिती हाती लागली.. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी व भायखळा स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या पूर्वेस हार्बर लाईनवर येतं. इंग्लंडमधील कापड गिरण्यांना लागणा-या आपल्या देशातील कापसाची निर्यात हार्बर लाईनच्या पूर्वेस असणा-या बंदरातून व्हायची.

अष्टवृक्षासौभाग्यवती

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 21/04/2015 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या 'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद. झाड झाडांचे सहोदर.

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 20/04/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाची देवाला विनंती: असूनही रणरणत्या उन्हाची वेळ का चालवलायस तू पावसाचा खेळ? बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ? देवाचे सडेतोड उत्तर: माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ
काव्यरस