Skip to main content

भूगोल

कहाणी एका पाण्याची !

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 17/04/2015 22:40 या दिवशी प्रकाशित केले.

एकोणीसशे नव्वदच्या सुमाराची गोष्ट आहे. नविन लुथरा आणि त्यांचे मित्र दीपक मोहन लोणावळयाच्या डोंगराळ घनदाट वनपरिसरातून लुथरा यांच्या मारुती जिप्सी मधून मुळशीकडे निघाले होते. नविन लुथरा म्हणजे कस्टम क्लियरन्स मधले एक उभरते यशस्वी व्यावसायिक. वय जेमतेम तिशीच्या आसपास. अन दीपक मोहन म्हणजे एका तेल-जहाजाचे मालक. धनाढ्य असामी !

Green_One

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.

पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.

(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)

तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.

आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.

स्मायली जीवन माझे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/04/2015 19:20 या दिवशी प्रकाशित केले.

वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र - ४

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 09/03/2015 01:38 या दिवशी प्रकाशित केले.

यापूर्वीचे भाग - १, २, ३

व्यवसायाने पूर्णवेळ सैनिक नसणाऱ्या बंडखोरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध सुरू तर केले होते पण ते जिंकणे फारच अवघड होते कारण त्या काळात ब्रिटिश सैन्य जगात सर्वोच्च स्थानावर होते. तरी पण काही घटकांमुळे ब्रिटिश सैन्याला तोंड देता येईल असे सामर्थ्य निर्माण झाले होते, हिंमत, नेतृत्व, लढताना आजवर न वापरल्या गेलेल्या रणनीती अन नव्याने बनलेली अमेरिकन अस्मिता.

वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.

भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्‍या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं.

बंधारा

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 18/10/2014 16:55 या दिवशी प्रकाशित केले.

त्या बंधार्‍याला तसं फारसं पाणी कधीच नसायचं. कधीतरी एखादी पावसाची सर आली तर थोडं फार पाणी साचायचं. कधीतरी मालक पंप लावून बंधार्‍यात पाणी ठेवण्याचा प्रयत्न करायचे. मात्र त्याचा फारसा उपयोग व्हायचा नाही. पुढे मालकांनी बंधारा असलेली जमिन विकली असं कानावर आलं. ज्यांना विकली ते मालकांसोबत कधीतरी दिसायचे. हे नवे मालक फार मोठे बागायतदार असावेत असं त्यांच्या बोलण्यातून वाटायचं. नेहमी मी इथे अमकं पीक घेतलं, तिथं तमक्या पिकाचं इतकं उत्पादन घेतलं, कृषी खात्यानं आपला धडपडया शेतकरी म्हणून गौरव केला असं बंधार्‍र्‍याच्या काठावर बसून बोलायचे.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.

ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.

डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.

ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.

डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...

१. ठिकाण ===> नंदी पॅलेस

२. दिनांक ===> १८-१०-२०१४

३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०

४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.

डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

रायडींग ऑन अ सनबीम

लेखक श्रीरंग_जोशी यांनी बुधवार, 24/09/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे.

Riding on a sunbeam

पेरू : भाग ११ : लोकजीवन

लेखक समर्पक यांनी सोमवार, 08/09/2014 00:37 या दिवशी प्रकाशित केले.

या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.