Skip to main content

करुण

तेंव्हा

लेखक psajid यांनी शुक्रवार, 27/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती ! जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती ! वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती ! भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती ! दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती ! हिरावला मस्तकमोती , "साजीद" घायाळ अश्वत्थामा चौघांसारखी जखम , सलणारी ‘भळभळ’ वेगळी होती ! - साजीद यासीन पठाण
काव्यरस

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 15/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे

प्रौढखणी

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 14/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
विखुरले आरसे शब्दांचे प्रतिबिंब न्हाइले आठवणी कातळ विरले झरले पाणी ओंजळीत अडखळले कोणी मय कथा जाहल्या जन्माच्या अनुशेष शेष मन अनवाणी पाऊल न वा चाहूलहि ना अवशेष शोध हा मूकपणी विलयली सकल लाघव वाणी हृदयी अवखळ सागर करणी उरली अवघड अक्षर लेणी ही व्यथा कहाणी प्रौढखणी ………………… अज्ञात
काव्यरस

खळबळ

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 26/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते. त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील.........
काव्यरस

हझल

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ते वार लाटण्याचे चुकवू कितीक आता हा पोळपाट हाती तोही फुटेल आता पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी डोक्यावरी निशाणा धरणार हाय आता तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी लोटांगणाविना ना पर्याय काय आता प्राविण्य नेमबाजी कौतूक फार झाले का भोगणे तडाखे मज ह्या वयात आता ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली आज्ञा किती झुगारू उरले न त्राण आता . . .
काव्यरस

भूकंप....!

लेखक psajid यांनी बुधवार, 13/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिसांनी पुन्हा त्या वास्तूत आलु, पडक्या पांढरीच्या इटा बघून काळूखात त्या हरवून गेलू !! माती सारता हातांनी डोळं उघडं निर्जीव धूड, नवलाईत सगळं डोळं वासं झोपल्याचं त्यात गूढ !! वाटतंय राहून राहून मना माती कृतघ्न नसावी झाली, आखीरपर्यंत आसंल थरथरली जरी शेजाऱ्यांनी मान ढाळली !! या मातीतच वलावा उभारा त्यावर निर्धास्त सोडला पसारा, दोन चिमुकली फळे संसारा झोपली गार ओढून ढिगारा !! दैव घालाच तिथं वास्तूचं काय ? बायको मुलांसंगती कारभारी जाय, पर मी आकारल्या मातीला वाटलं असावं समद्यासोबत माझा हात धरायचा नाय !! डोळ्यांतल्या पाण्याबरोबर पांढरी माय चमकत हुती, पाणी साचल्या डवंग्यात मातुर पानकणसं तुरय
काव्यरस

भाकरीचा चंद्र ....

लेखक psajid यांनी सोमवार, 11/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गरवेलाच छप्पर चिखलाच खापर, शमवावी तहान त्यांनी पिऊन मळकं पाणी ...... व्यापारी दुनिया व्यावहारिक माया, न्याहळतोय जरी तो उघडेना आपली वाणी ...... जगण्याला काय मोल हिथं नाय, सावकाराचा भार डोई व्याजाची गोणी ...... जन्माचा वैताग भाकरीचा चंद्र माग, देतील प्रसाद कधीतरी अन हिरावतील कंठमणी ...... लढेन म्हणतोय विरुध्द पण साथ नाही शुद्ध, रस्ता दाखवतील सगळेच पण संगे चालेना कोणी ...... श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस

आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली ….

लेखक घन निल यांनी शुक्रवार, 25/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली … माझे मला वागण्याचे कोडे का पडावे , आसे काहीसे विपरीत का माझ्या हातून घडावे माझीच व्यथा अनावर … माझा पोटशूळ ठरली … आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. माझ्याच दोन आसवांचे सामने खेळतो मी , बेधुंद यातनांच्या कैफात लोळतो मी … डोळ्यात अखेर माझ्या आसवेंच उरली …. आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली …
काव्यरस

तुझे एकेक विचार.......

लेखक psajid यांनी शुक्रवार, 25/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे एकेक विचार जपलेत मनांत, तूच दिलेले श्वास आज पिंजऱ्यात......!! आज पिंजऱ्यात जन्मा जन्माची साथ, तन बंबाळ जखमांनी अन वाट पायात......!! वाट पायांत अन आग दही दिशात, होरफळत चाललो मी तुझ्या एका वचनात......!! तुझ्या त्या वचनात प्रेम बलिदानात, हृदय घायाळ पण हसं डोळ्यात.......!! हसं डोळ्यात वाराही शांत, थकून गेलो मी शेवटच्या सहवासात........!! तुझ्या शेवटच्या सहवासात अनोळखी क्षणात, पानगळीच जगणं .....आणि बाकी शून्यात ...........!! .....आणि बाकी शून्यात ...........!! श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस

आजकाल हे असे आहे...

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 22/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल असे आहे... खेळाडू "अभिनय" करत आहेत *(मँच फिक्सिंग) खेळाडू अभिनय करत आहेत *(बॉलीवूड मध्ये प्रवेश करून, जाहिरातीत) आजकाल हे असे आहे... अभिनेते राजकारणात शिरत आहेत अभिनेते "राजकारण" करत आहेत आजकाल हे असे आहे... राजकारणी जनतेच्या सेवेचा "अभिनय" करत आहेत राजकारणी सत्तेच्या रणांगणावरचे "खेळाडू" बनत आहेत आजकाल हे असे आहे... बातम्या मनोरंजनाचा वारसा चालवत आहेत मनोरंजन रक्तरंजीत अपराधी झाले आहे * (गुन्हेगारी सिरियल्स) आजकाल हे असे आहे... माणुसकी सैतानाच्या तावडीत सापडली आहे! माणुसकी माणसांच्या शोधात भटकते आहे! आजकाल हे असे आहे... गरीबी श्रीमंती यातला पूल जीर्ण झाला आहे गरीबी श्रीमंती य
काव्यरस