मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कारुण्य टंकन

निराकार गाढव · · जे न देखे रवी...
व्रण जीर्ण बंधनांचे भयगच्च कंपनांचे दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे क्षण क्षीण रासभाचे समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी | जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी || रण अंगणी धुळीचे मतिशून्य गोंधळीचे विषदग्ध चित्त साचे क्षण क्षीण रासभाचे घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके | चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर, करि हन्त हन्त श्री अंबिके || लय स्तब्ध बद्ध गुरूचे जय शुष्क रुक्ष तरूचे हत रिक्त आर्ततेचे क्षण क्षीण रासभाचे अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या, सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या | चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या, वसुधैव गगनी दिशा लुप्त झाल्या || क्षण मूढ कल्पनांचे खडखट्ट टंकण्याचे फिरूनि पुन्हाच वाचे शत शब्द रासभाचे _/\_ जय गुरुदेव। .

वाचने 10017 वाचनखूण प्रतिक्रिया 49

In reply to by एस

कवितानागेश Sat, 10/25/2014 - 10:47
माझ्याकडे अनुभव नसल्यानी मला अर्थच कळत नाही. पण मला कळत नाही म्हणून मी अश अलौकिक रचणे ला निरर्थकही म्हणणार नाही. षब्द्वैभव बघूनच मी गार पडलेय.

अजया Sat, 10/25/2014 - 10:39
___/\___ जे काय क्रिप्टिक लिहिलंय ते उलगडणारी पुढची कविता येऊ दे!

कंजूस Sat, 10/25/2014 - 11:05
१)गाढवाला कसले दु:ख झाले आहे ? २)त्याचे क्षण असे क्षीण का होत आहेत ? ३)गाढवे जिथे राहातात तिथे सिंह नसतात तरी त्याला सिंहांपासून धोका कसा ? ४)गगनाकडे लाथा झाडणाऱ्या रासभास दिशा लुप्त झाल्याने काय फरक पडणार आहे ? गुण २०

In reply to by तिमा

निराकार गाढव गुरुवार, 10/30/2014 - 05:22
येकदाम ब्रोब्र! क्षीण चिंतासागराच्या प्रवाहाने घनव्याकूळलेल्या आर्ततेतून पाझरलेल्या शब्दरुपि जलवल्लिका आहेत ह्या.

बंपर हाय ह्ये.... शब्द अनाकलनीय तर्किकाचे जणू वाशिंड माजलेल्या वृषभाचे फिरूनी पुन्हा ते आले काव्य इथल्याच गर्दभाचे....!

पैसा Sat, 10/25/2014 - 11:14
काय देखणी शब्दकळा आहे! शरदिनीतैंसारखी निराकार कविता. अर्थ बिर्थ लावायला नकोच.

अनर्थात अर्थ शोधणे अर्थात अनर्थ असणे... यासाठीच्या तालिम / रियाज / सरावासाठी आदर्श असलेला एक अत्युत्तम काव्याविष्कार !!! आता याची पुढच्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करणे आले ;) :)

In reply to by निराकार गाढव

सतिश गावडे गुरुवार, 10/30/2014 - 09:24
>> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले मी.... लोकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध. तुम्ही निराकार गाढव नसून निराकार गाढवीण आहात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु Sat, 11/01/2014 - 09:01
निराकाराचे गुरु आहेत काय??? किमान एकलव्यासारखे तरी!!! असल्यास गुरुंनी शिष्याला अंगठा दखवला का शिष्याने गुरुला ??? खुलासा झालाच पाहिजे!! कालच मा.देवेन्द्र यांनी सांगितले पारदर्षी कारभार होणार म्हणून,तेव्हा शुभारंभ तुमच्या पासून होउन जावूदे!! मि.पा.प्रतिसाद विबंडल्न गॅलरी प्रेक्षक. आसन क्रमांक २५

In reply to by नाखु

निराकार गाढव Sat, 11/01/2014 - 13:22
ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील मणाबाहेरून मणसोक्त विजय मिळवलेल्या गर्दभश्रेष्ठाचे गुर्जी असे शूद्र मणुष्ययोनीतील असतील आसं वाटलंच कसं तुंम्हाला? .

In reply to by निराकार गाढव

पैसा Sat, 11/01/2014 - 13:54
काकाजी, आत्मा अमर आहे! मणुश्ययोनीतले म्हणून अत्रुप्त आत्म्याचा अपमान करण्याचे धारिष्ट्य करू नका. शेवटी गुर्जी आहेत. ओम फट स्वाहा म्हणून एखादा शाप देतील तेव्हा कळेल!

In reply to by पैसा

निराकार गाढव Mon, 11/03/2014 - 06:12
मणुष्यजातीचे गुरूजी माणसांसाठी ठीक आहेत. पण माझ्यासारख्या हुच्च जातीच्या आणि विद्वानाला ते काय शिक्कीवणार? त्यासाठी आमचे स्पेशल गुर्जीच पायजेलेत.

मनीषा Wed, 10/29/2014 - 15:50
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले होते म्हणे .. तुमच्यावर सरस्वती देवीचा वरदहस्तं असावा असे वाटते आहे ... कविता भलतीच ऊंच आहे ....

आनंदी गोपाळ Mon, 11/03/2014 - 07:55
मिपावर प्रतिसाद टंकताना टंकणार्‍यांच्या मनात नक्की काय सुरू असतं, त्याचं तरल अन भावदर्शी कथन. मोक्याच्या धाग्यांवर रासभलीला सुरू होण्याआधी मनातल्या खळबळीवर व रक्तातल्या वारुणीवर स्वार होऊन जी काय आवर्तने मेंदूत उठतात, ज्या आठवणींच्या संदर्भांचे आवेग दाटून येतात, अन रणांगणावर लखलखणार्‍या समशेरींसारख्या जिव्हा कारुण्यटंकन करू लागतात! त्याचे हे खरे वर्णन. वावावा! आवडले, हे वेगळे सांगायला नको.