Skip to main content

मोठ्ठे आरसे

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 03/12/2014 18:26 या दिवशी प्रकाशित केले.

मुलींच्या वस्तीग्रुहात मी त्याला पकडले
कॉलर पकडुन ओढत बाहेर काढले

बहिणिस आपल्या खांद्यावर होते घेतलेले
घाबरलेले पोर ते ,बोलण्यास न धजावले

दटावताच पोर ते रडु लागले
बहिणीस सावरत हातापाया पडु लागले

"बहिणीला माज्या चेहरा बघायचा व्हता
आयला मारताना बान आरसा फॉड्ला

आरश्यातबी हि लय ग्वाड दिस्सल
बघुन स्वताकडं 'एकडाव ' तरी हसलं

ह्या बारीस जौद्या, परत येत नाय
मोठया आरशात बघायची औकात नाही

आरसे आपले खरेच मोठे आहेत..
पण आपलाच चेहरा का लपवतायत??

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2005
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया