मोठ्ठे आरसे
लेखनविषय:
काव्यरस
मुलींच्या वस्तीग्रुहात मी त्याला पकडले
कॉलर पकडुन ओढत बाहेर काढले
बहिणिस आपल्या खांद्यावर होते घेतलेले
घाबरलेले पोर ते ,बोलण्यास न धजावले
दटावताच पोर ते रडु लागले
बहिणीस सावरत हातापाया पडु लागले
"बहिणीला माज्या चेहरा बघायचा व्हता
आयला मारताना बान आरसा फॉड्ला
आरश्यातबी हि लय ग्वाड दिस्सल
बघुन स्वताकडं 'एकडाव ' तरी हसलं
ह्या बारीस जौद्या, परत येत नाय
मोठया आरशात बघायची औकात नाही
आरसे आपले खरेच मोठे आहेत..
पण आपलाच चेहरा का लपवतायत??
वाचने
1982
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
अरे भाई तुम कहना क्या चाहते
In reply to अरे भाई तुम कहना क्या चाहते by प्रसाद गोडबोले
आरसा
In reply to अरे भाई तुम कहना क्या चाहते by प्रसाद गोडबोले
अर्थ
मोठ्या भावाने लहान बहिणीचा
मस्तय
.