मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तेंव्हा

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती ! जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती ! वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती ! भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती ! दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती ! हिरावला मस्तकमोती , "साजीद" घायाळ अश्वत्थामा चौघांसारखी जखम , सलणारी ‘भळभळ’ वेगळी होती ! - साजीद यासीन पठाण

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

वेल्लाभट 15/12/2013 - 07:35
मस्त ! जबरी झालीय ! फक्त
क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
हे काय मले जमलं नाय ब्वा !

In reply to by वेल्लाभट

गंगाधर मुटे 20/12/2013 - 00:40
एकाचवेळी एकापेक्षा जास्त एकसमान घटना घडत असतील तर मग प्राधान्यक्रम ठरवणे महत्वाचे ठरते. हजारो शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. त्या तुलनेने नरबळीमुळे मरणारांची संख्या अगदीच नगण्य किंवा कोणत्याच खिसगणतीत नाही. अशा परिस्थितीत कोणी हजारो शेतकर्‍यांच्या मरणाकडे ढुंकूनही पाहायला तयार नसतील मात्र नरबळी मुळे राष्ट्रीय आपत्ती कोसळली आहे, असा आभास निर्माण करत असतील तर अशा दिडशहाण्यांच्या सदसदविवेकबुद्धीबद्दल संशय घ्यायला नक्कीच वाव तयार होतो. मरण हे मरण असते, ते थांबायला हवे. यासाठी केवळ सर्वसाधारण मनुष्य प्रयत्न करत असतो. पण; स्वतःला अतिविद्वान घोषीत करून समाज सुधारायला निघालेले बेगडी समाजसुधारक मात्र "केवळ त्यांची स्वतःची महती ज्यामुळे वाढते" केवळ तोच अजेंडा रेटत असतात. दुर्दैव आपले, दुसरे काय?

पैसा 15/12/2013 - 12:04
या शहाण्या पुढार्‍यांनी 'मेरा भारत महान' म्हटलं होतं खरं, पण ते "मेरा इंड्या ग्रेट" असं पाहिजे होतं. शेतकर्‍यांनी न्युईसन्स पॉवर वाढवली तर त्यांना मानाने जगू देतील लोक नाहीतर बळी तो कानपिळी.

विवेकपटाईत 15/12/2013 - 16:46
मस्त कविता. अमेय साहेब बाबा राम देव ग्रामीण जनतेची आर्थिक उन्नती व्हावी या साठी प्रयत्न करीतआहेतच. आज उत्तराखंड आणि प. उत्तर प्रदेशातील शेतकरी, ग्वारपाठा, आवळा (३०,००० टन त्यांनी वापरला -सरकारी आकडा), गीलोय इत्यादी वनस्पती विकून एवढेच काय गो मूत्र विकून अतिरिक्त पैसा कमवितात आहे. गेल्या उन्हाळ्यात मी पहिल्यांदाच मी बुरांश (उत्तराखंडातील एक फुलझाडचे फुले ), खस, ब्राह्मी, बेल, आंब्याचे पण हेच शरबत (पेप्सी एवजी पाहुण्यांना पाजले). याचा ग्रामीण जनतेला सरळ फायदा मिलता. विदर्भात ही असा फूड पार्क स्थापित झाला पाहिजे. बाकी अतिशिक्षित लोक मूर्ख असतात याचेच उदाहरण दिल्लीत दुप्पट किमतीत लो फ्लोर बसेस घेतल्या जेणे करून सायकल चालवीत अपंग व्यक्ती बस मध्ये येऊ शकेल, हे शहाण्यांनी सरकारला पटवून दिले. दिल्लीत कुठलेच बस स्थानक असे बांधलेले नाही जिथून सायकल वर बसलेला अपंग बस मध्ये दाखील होऊ शकेल. (जमिनी पासून ६ इंच उंच आणि ५० फूट लांब) तेवढ्यात पैश्यात लाख दोन लाख अपंगाना विजेवर चालणारी सायकल देता आली असती. शिवाय या बसेस मध्ये फक्त ३५ लोक बसून शकतात (साधारण बस मध्ये ४४) व लांब व वजनी असल्या मुळे दीडपट इंधन पिते. लोक गमतीने 'हाय कास्ट लो कॅपासिटी' बसेस म्हणतात)

In reply to by विवेकपटाईत

बाकी अतिशिक्षित लोक मूर्ख असतात याचेच उदाहरण दिल्लीत दुप्पट किमतीत लो फ्लोर बसेस घेतल्या जेणे करून सायकल चालवीत अपंग व्यक्ती बस मध्ये येऊ शकेल, हे शहाण्यांनी सरकारला पटवून दिले. हे किंवा खड्डे न पडणारे रस्ते बनवणे हे अशिक्षित / मूर्ख नेत्यांमुळे होते असे तुम्हाला वाटते काय? अहो हे फक्त अत्यंत "चतूर" नेत्यांनाच जमते. याला "वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट" म्हणतात. ह्याच मुख्य तत्वावर तर सद्याचे राजकारण चालले आहे.

विवेकपटाईत 15/12/2013 - 16:48
मस्त कविता. अमेय साहेब बाबा राम देव ग्रामीण जनतेची आर्थिक उन्नती व्हावी या साठी प्रयत्न करीतआहेतच. आज उत्तराखंड आणि प. उत्तर प्रदेशातील शेतकरी, ग्वारपाठा, आवळा (३०,००० टन त्यांनी वापरला -सरकारी आकडा), गीलोय इत्यादी वनस्पती विकून एवढेच काय गो मूत्र विकून अतिरिक्त पैसा कमवितात आहे. गेल्या उन्हाळ्यात मी पहिल्यांदाच मी बुरांश (उत्तराखंडातील एक फुलझाडचे फुले ), खस, ब्राह्मी, बेल, आंब्याचे पण हेच शरबत (पेप्सी एवजी पाहुण्यांना पाजले). याचा ग्रामीण जनतेला सरळ फायदा मिळतो. विदर्भात ही असा फूड पार्क स्थापित झाला पाहिजे. बाकी अतिशिक्षित लोक मूर्ख असतात याचेच उदाहरण दिल्लीत दुप्पट किमतीत लो फ्लोर बसेस घेतल्या जेणे करून सायकल चालवीत अपंग व्यक्ती बस मध्ये येऊ शकेल, हे शहाण्यांनी सरकारला पटवून दिले. दिल्लीत कुठलेच बस स्थानक असे बांधलेले नाही जिथून सायकल वर बसलेला अपंग बस मध्ये दाखील होऊ शकेल. (जमिनी पासून ६ इंच उंच आणि ५० फूट लांब) तेवढ्यात पैश्यात लाख दोन लाख अपंगाना विजेवर चालणारी सायकल देता आली असती. शिवाय या बसेस मध्ये फक्त ३५ लोक बसून शकतात (साधारण बस मध्ये ४४) व लांब व वजनी असल्या मुळे दीडपट इंधन पिते. लोक गमतीने 'हाय कास्ट लो कॅपासिटी' बसेस म्हणतात.

अर्धवटराव 18/12/2013 - 11:19
नाय कळणार कोणाला. नाकातोंडात पाणि जाउन जीव गुदमरायला लागेस्तो हालचाल नाहि करणार आम्हि.

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे

प्रौढखणी

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
विखुरले आरसे शब्दांचे प्रतिबिंब न्हाइले आठवणी कातळ विरले झरले पाणी ओंजळीत अडखळले कोणी मय कथा जाहल्या जन्माच्या अनुशेष शेष मन अनवाणी पाऊल न वा चाहूलहि ना अवशेष शोध हा मूकपणी विलयली सकल लाघव वाणी हृदयी अवखळ सागर करणी उरली अवघड अक्षर लेणी ही व्यथा कहाणी प्रौढखणी ………………… अज्ञात

खळबळ

अज्ञातकुल ·

अज्ञातकुल, तुमच्या वडिलांना आदरपूर्वक श्रद्धांजली. ह्या सर्वातून एकेकाळी गेलो आहे. तुमची भावना, विशेषतः आयुष्यात अचानक निर्माण होणारी पोकळी अनुभवली आहे. आज गेली १७ वर्ष मनांत गाडलेली ,पितृछत्र हरपल्याची, भावना तुमच्या हळूवार शब्दांनी पुन्हा चाळवली गेली. ह्या कठीण प्रसंगास धीराने सामोरे जाण्यास ईश्वर तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस मनोबळ देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

ह्या कठीण प्रसंगास धीराने सामोरे जाण्यास ईश्वर तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस मनोबळ देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

यशोधरा 28/11/2013 - 18:31
अज्ञातकुल, तुमच्या वडिलांना आदरपूर्वक श्रद्धांजली. वडिलांचे छत्र हरपण्याचे दु:ख काय असते ह्याचा अनुभव घेतला आहे :(

माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते. त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील.........

हझल

विदेश ·
काव्यरस
ते वार लाटण्याचे चुकवू कितीक आता हा पोळपाट हाती तोही फुटेल आता पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी डोक्यावरी निशाणा धरणार हाय आता तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी लोटांगणाविना ना पर्याय काय आता प्राविण्य नेमबाजी कौतूक फार झाले का भोगणे तडाखे मज ह्या वयात आता ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली आज्ञा किती झुगारू उरले न त्राण आता . . .

भूकंप....!

psajid ·

प्यारे१ 13/11/2013 - 12:45
साजिद भाई, (तुमच्या दुसर्‍या कवितेच्या तुमच्याच प्रतिसादाला इथं उत्तर देतोय.) प्रतिसादांची काळजी न करता लिहीत रहा. तुमच्याकडून इतर लेखांवर सुद्धा थोडे प्रतिसाद पण देत चला. कधीकधी त्यानं मला प्रतिसाद दिला नाही मग मी का देऊ असं असतं 'आमच्याकडं' ;) लेखन भिडणारं असलं तर आपसुकच प्रतिसाद मिळतो. कधी नेमकं काय लिहायचं ते समजत नाही म्हणून देखील प्रतिसाद मिळत नाहीत. प्रसंगानुरुप कधी ताज्या गोष्टींबद्दलच्या लिखाणाला मार्केट पटकन मिळतं. त्यामुळं लिहीत राहा. :)

झंम्प्या 13/11/2013 - 13:04
अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं, मळक धोतर, टोपी, कोपरी, वाढलेली दाढीची खुट, पाठीत वाकेला, पाठ पोट एक झलेला मळक्या अंगाचा, हातात माती घेऊन भरल्या डोळ्यांनी घराकड पाहत असणारं कोणी, समोर दिसतंय. येतोय हुंदका तेंव्हाचाच एकदा ओकू कि पिवू त्याला आता, मुक्याने मार खाऊन गप्प उभा

आज खूप दिसांनी पुन्हा त्या वास्तूत आलु, पडक्या पांढरीच्या इटा बघून काळूखात त्या हरवून गेलू !! माती सारता हातांनी डोळं उघडं निर्जीव धूड, नवलाईत सगळं डोळं वासं झोपल्याचं त्यात गूढ !! वाटतंय राहून राहून मना माती कृतघ्न नसावी झाली, आखीरपर्यंत आसंल थरथरली जरी शेजाऱ्यांनी मान ढाळली !! या मातीतच वलावा उभारा त्यावर निर्धास्त सोडला पसारा, दोन चिमुकली फळे संसारा झोपली गार ओढून ढिगारा !! दैव घालाच तिथं वास्तूचं काय ? बायको मुलांसंगती कारभारी जाय, पर मी आकारल्या मातीला वाटलं असावं समद्यासोबत माझा हात धरायचा नाय !! डोळ्यांतल्या पाण्याबरोबर पांढरी माय चमकत हुती, पाणी साचल्या डवंग्यात मातुर पानकणसं तुरय

भाकरीचा चंद्र ....

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
गरवेलाच छप्पर चिखलाच खापर, शमवावी तहान त्यांनी पिऊन मळकं पाणी ...... व्यापारी दुनिया व्यावहारिक माया, न्याहळतोय जरी तो उघडेना आपली वाणी ...... जगण्याला काय मोल हिथं नाय, सावकाराचा भार डोई व्याजाची गोणी ...... जन्माचा वैताग भाकरीचा चंद्र माग, देतील प्रसाद कधीतरी अन हिरावतील कंठमणी ...... लढेन म्हणतोय विरुध्द पण साथ नाही शुद्ध, रस्ता दाखवतील सगळेच पण संगे चालेना कोणी ...... श्री. साजीद यासीन पठाण

आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली ….

घन निल ·

पैसा 25/10/2013 - 21:25
सुरुवात चांगली होती. पण मधेच
आसे काहीसे विपरीत का माझ्या हातून घडावे माझीच व्यथा अनावर … माझा पोटशूळ ठरली …
बात कुछ जमी नहीं.

आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली … माझे मला वागण्याचे कोडे का पडावे , आसे काहीसे विपरीत का माझ्या हातून घडावे माझीच व्यथा अनावर … माझा पोटशूळ ठरली … आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. माझ्याच दोन आसवांचे सामने खेळतो मी , बेधुंद यातनांच्या कैफात लोळतो मी … डोळ्यात अखेर माझ्या आसवेंच उरली …. आज पुन्हा रोमांचित लेखणी थरथरली …. शब्दांमध्ये गुंफून भावना कागदावरती उतरली …

तुझे एकेक विचार.......

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझे एकेक विचार जपलेत मनांत, तूच दिलेले श्वास आज पिंजऱ्यात......!! आज पिंजऱ्यात जन्मा जन्माची साथ, तन बंबाळ जखमांनी अन वाट पायात......!! वाट पायांत अन आग दही दिशात, होरफळत चाललो मी तुझ्या एका वचनात......!! तुझ्या त्या वचनात प्रेम बलिदानात, हृदय घायाळ पण हसं डोळ्यात.......!! हसं डोळ्यात वाराही शांत, थकून गेलो मी शेवटच्या सहवासात........!! तुझ्या शेवटच्या सहवासात अनोळखी क्षणात, पानगळीच जगणं .....आणि बाकी शून्यात ...........!! .....आणि बाकी शून्यात ...........!! श्री. साजीद यासीन पठाण

आजकाल हे असे आहे...

निमिष सोनार ·

विजुभाऊ 23/10/2013 - 13:24
आजकाल हे असे आहे कवी गद्य लिहीत आहे. ( जशी ही कविता) गद्य काव्य बनत आहे( प्रतिसाद) गंभीर इनोदी वाटतय( मोकलाया दाही दिश्य.) इनोदी वाचून रडावेसे वाटते. ( अनासपुरेचे इनोद) आजकाल हे असे होत आहे

आजकाल असे आहे... खेळाडू "अभिनय" करत आहेत *(मँच फिक्सिंग) खेळाडू अभिनय करत आहेत *(बॉलीवूड मध्ये प्रवेश करून, जाहिरातीत) आजकाल हे असे आहे... अभिनेते राजकारणात शिरत आहेत अभिनेते "राजकारण" करत आहेत आजकाल हे असे आहे... राजकारणी जनतेच्या सेवेचा "अभिनय" करत आहेत राजकारणी सत्तेच्या रणांगणावरचे "खेळाडू" बनत आहेत आजकाल हे असे आहे... बातम्या मनोरंजनाचा वारसा चालवत आहेत मनोरंजन रक्तरंजीत अपराधी झाले आहे * (गुन्हेगारी सिरियल्स) आजकाल हे असे आहे... माणुसकी सैतानाच्या तावडीत सापडली आहे! माणुसकी माणसांच्या शोधात भटकते आहे! आजकाल हे असे आहे... गरीबी श्रीमंती यातला पूल जीर्ण झाला आहे गरीबी श्रीमंती य