प्रपोज डे: लघु कथा
सदू, घरी येणार होतास ना!
"जमणार नाही काका".
का बरे?
"काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज केले."
वा! छान, पुढे काय ...
"तिच्या सोबत डॉगी होता."
(त्याने फोन ठेवला)
सदू, घरी येणार होतास ना!
"जमणार नाही काका".
का बरे?
"काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज केले."
वा! छान, पुढे काय ...
"तिच्या सोबत डॉगी होता."
(त्याने फोन ठेवला)
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात:
नमस्कारास वेचावें नलगे
नमस्कारास कष्टावें नलगे
नमस्कारास कांहींच नलगे
उपकरण सामग्री. (४/६/२२)
अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी
सहज फिरायला निघालो होतो
सहज मंजे मुद्दामच …
– मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे
– घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो.
नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले
– मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते.
कोs हं ? … मी कोण आहे ?
मै कौन हूँ ? व्हू आयाम ?
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:
जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥ 1९/३/१३॥
मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे.
समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे.
तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?
— सध्याचे आपले राहते घर आणि त्याबद्दलची आसक्ती, मोह, सवय (तसेच ते सोडण्यातून कदाचित होणारा पश्चात्ताप, असुरक्षिततेची भावना वगैरे)
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? "
"काय म्हणतेस सुले ?"
"होय रे माझ्या राजा "
-- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते.
-- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो.
टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात -
'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो....
कुठलेतरी कविराज कवत असतात --
"अशाच एका धुंद सकाळी -
मनात माझ्या स्फुरती ओळी -
जरतारी तो शालू आणिक -
धुंद मखमली नाजुक चोळी "
छोटा कृष्णा मित्रांसोबत वाड्याच्या अंगणात खेळण्यात गुंग होता. "कृष्णा गौरव्वा आहे का रे घरात ?" ह्या प्रश्नाने त्याचे मन खेळातून बाहेर आले, त्याची मान आवाजाच्या दिशेने वळली - सत्तरी ओलांडून गेलेल्या आज्जी काठी जमिनीला टेकवून उभ्या होत्या. त्याने होकारार्थी मान हलवली . पळत आत जाऊन वर्दी दिली - "आई स्वामी आज्जी आल्या आहेत. " गौरव्वा हातातलं काम टाकून डोक्यावरचा पदर सावरत स्वयंपाक घरातुन बाहेर आली. तोपर्यंत स्वामीनबाई सोप्यातल्या आरामखुर्चीत येऊन विसावल्या होत्या. गौरव्वानं त्यांच्या पायावर डोकं टेकवलं.