अजुनी दूर किनारे

अर्व's picture
अर्व in जे न देखे रवी...
25 May 2015 - 12:43 pm

उरलेत भाव काही
संपलेत शब्द सारे
संपला प्रवास केव्हाच
अजुनी दूर किनारे

जेथे मैफीली सुरांच्या
होत्या कधी काळी
सजली तिथे आता
जखमांची मांदीयाळी

भिजलेला श्रावणगंध
वाहती अजूनी वारे ...
संपला प्रवास केव्हाच
अजूनी दूर किनारे ...

वाटेतल्या फुलांनो
रोखा श्वास तुमचे
विपरीत अर्थ आहेत
तुमच्या स्पंदनांचे

क्षण शेवटाचा उशाशी
तरीही गंध का रे?
संपला प्रवास केव्हाच
अजूनी दूर किनारे

कवी :  निशांत तेंडोलकर ..

भावकविताकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 May 2015 - 1:39 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान

वेल्लाभट's picture

25 May 2015 - 4:14 pm | वेल्लाभट

कविता, भाव सगळं सुरेखच.

अवांतरः डडडा डडा डडाडा मीटरमधे बसवण्याचा प्रयत्न केला पण बसली नाही.

चुकलामाकला's picture

26 May 2015 - 7:25 am | चुकलामाकला

+१
कविता आवडली पण मिटरमध्ये बसली असती तर अजून मजा आली असती.

मित्रहो's picture

25 May 2015 - 4:35 pm | मित्रहो

सुंदर

एक एकटा एकटाच's picture

25 May 2015 - 10:14 pm | एक एकटा एकटाच

छान लिहिलीय

उरलेत भाव काही
संपलेत शब्द सारे
संपला प्रवास केव्हाच
अजुनी दूर किनारे

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2015 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 11:02 am | Hrushikesh Marathe

अप्रतिम :)