✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जन्म घेतला तेव्हाच....!!

ग — गोल्या, गुरुवार, 06/11/2015 - 08:20

जन्म घेतला तेव्हाचं
खोदून कबर आलो
औपचार म्हणून
आयुष्य घालवीत होतो

आलो त्याच्या कडून
जायचे त्याच्याच पाशी
प्याला जीवनाचा
घोट घोट संपवित होतो

परत करावयाचा उसना
देहाचा अंगरखा हा
मिजाशीने त्याला
म्हणुन वागवीत होतो

पुरी होती करावयाची
कहाणी जिंदगी ची
आयुष्याची कोरी पाने
मी जगुनी भरवीत होतो

उभ्या आडव्या धाग्यातून
निसटणार शिताफिने
नाती स्नेहाची मी
वृथा गुंतवित होतो

होता सोडायचाच
मंच दुनियेचा
तोंड रंगुवुनी पात्र
मात्र वठवित होतो!!

-------------------------------------
धागा संपादित केला आहे.


प्रतिक्रिया द्या
1902 वाचन

💬 प्रतिसाद (7)

आली आली , जिलबी आली .असो

दमामि
गुरुवार, 06/11/2015 - 08:32 नवीन
आली आली , जिलबी आली .असो मी जगुनी भरवीत होतो... भरवित पेक्षा भरीत चांगल वाटेल हो ?
  • Log in or register to post comments

मी माझ्या कडून करवुन घेतो या

गोल्या
गुरुवार, 06/11/2015 - 14:06 नवीन
मी माझ्या कडून करवुन घेतो या अर्थी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

छान

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 06/11/2015 - 10:12 नवीन
उभ्या आडव्या धाग्यातून निसटणार शिताफिने नाती स्नेहाची मी वृथा गुंतवित होतो
छान.
  • Log in or register to post comments

Thnks

गोल्या
गुरुवार, 06/11/2015 - 14:16 नवीन
Thnks
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

आवडली.

सनईचौघडा
गुरुवार, 06/11/2015 - 11:29 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

अरे अरे

वेल्लाभट
गुरुवार, 06/11/2015 - 14:33 नवीन
अरे अरे
  • Log in or register to post comments

कारे कारे

गोल्या
गुरुवार, 06/11/2015 - 22:30 नवीन
कारे कारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा