मित्रवेडा

विनीत संखे's picture
विनीत संखे in जे न देखे रवी...
2 Jun 2015 - 6:51 pm

कॅंटिनच्या चहाचा उग्र दर्प
चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स.
थंड चहाने उघडलेली शिव्यांची लाखोली
ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स.
डोळे बंद करायचे, सारं लख्ख पाहायचं
अन तंद्री भंग होता होत नाही
पुढ्यातल्या चहा अन कॉम्प्यूटरच्या फाईल्सना
मित्रांच्या आठवणींचा कुठलाच रंग येत नाही.

दाराशी जमलेल्या गर्दीतून वाट काढत येणारा सागर
प्रत्येक नव्या मुलीला न्याहाळत त्याच्या प्रशस्तीच्या तऱ्हा.
नादिराचा सततचा मोबाईलवरील दिनक्रम
अन गचाळ आनंदच्या शर्टावर अपरीट चरा.
आज मोबाईल वर व्यावसायिक दिनक्रम जातो
पण नादिराशी बोलणं होत नाही.
नव नव्या मुली भोवती असूनही त्यांची
प्रशस्ती सागरशिवाय मनी येत नाही.

शेवटच्या बेन्चशी झालेली चार वर्षांची सलग लगट
अन उशीरा येताच मित्रांना वेधायचं.
तीन जणांच्या बाकावर चारांची जेमेतेम सोय
प्रोफ.च्या आड चोरून मित्रांना ग्रुप मेसेजिंग करायचं.
आज ऑफिसाताल्या क्युबिकल मध्ये
इमेल व्हॉट्सअॅप करतो पण ग्रुप मेसेजिंग होत नाही.
एसेमेस च्या मागे गेलेल्या त्या एका रूपयाची किंमत
महिनाखेरीच्या साठ हजारातही जात नाही.

सेमिस्टरएक्झाम मग दणक्यात यायची
मित्रांच्या मस्तीला फूट पाडायची.
अभ्यासासाठीचा महिना असाच मग
परीक्षेस न जुमानत, मजेत काढायचा,
अन सबमिशनचं भूत मागे लागताच
लिहून लिहून फाईल्सचा खलिता भरायचा.
राहिलेल्या दिवसांतली मग तुटपुंजी
शेवटच्या आठवड्याची तयारी
त्यातही मग परीक्षेच्या
आदल्या रात्रीची केलेली नाईट वारी
आजही कामासाठी रात्र जागतो पण
त्यास मित्रांची साथ मिळत नाही,
जागून जागून केलेल्या अभ्यासाचं ते
मिडनाईट ऑईल मात्र आज जळत नाही.

सत्र परीक्षा अशीच जायची
निकाल घेऊन लगबगीत परतायची
निकालाच्या आधीची चिंता सतावायची
मग युनिव्हर्सिटीची फेरीही मारायची.
ताणतणावाचा नेल बायटींग ठाव
प्रत्येकाच्या ठायी दिसायचा
नादिराचा फोन, रंगील्या सागरचा मिजास
त्या कोऱ्या रीझल्ट बोर्डाशी हरायचा.
निकाल लागताच स्वतः आधी
मित्रांचीही श्रेणी पाहायची
ॠषभ आनंदशी फर्स्ट क्लासची ट्रीट मागत
सागरला पुढल्या केटीची रीत सांगायची.

शेवटची सत्रपरीक्षा मात्र तशी नसायची
कॉलेज संपलं!!! असं दणक्यात सांगायची
उच्च शिक्षण, नोकरी, करीयर यांचा ओझी
क्षणात डोक्यावर जाणवायची
अन त्याच ओझ्याखाली वाकलेल्या
सॅग, ॠषी, नॅड्झ अन ऍण्डीवरही दिसायची.

आता बरीच वर्षं झालीत
मी डोळे उघडतो
मोबाईलवर मित्रांची नावं बघून आनंदतो.
"हॅप्पी फ्रेण्डशिप डे", म्हणून
सगळ्यांचे मेसेजेस आलेले असतात
तेही माझ्यासारखेच बंद डोळ्यांत
मैत्रीची खास सफर करून झालेले असतात...

मित्रवेडा - विनीत

फ्री स्टाइलभावकविताकवितासमाजनोकरीशिक्षणमौजमजा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

2 Jun 2015 - 7:28 pm | लालगरूड

आवडेश ®®®®®®®

एक एकटा एकटाच's picture

2 Jun 2015 - 7:58 pm | एक एकटा एकटाच

एक नंबर....

सगळी कड़वी अपील झाली........

जियो.......

विनीत संखे's picture

3 Jun 2015 - 12:59 pm | विनीत संखे

धन्यवाद.

अप्रतिम चित्रण .. क्या बात .. कॉलेजचा सर्व काळ झरकण पुढे आणुन ठेवला ...
सर्वच्या सर्व तंतोतंत खरेअनुभव

पथिक's picture

3 Jun 2015 - 2:01 pm | पथिक

आवडली

वेल्लाभट's picture

4 Jun 2015 - 12:55 pm | वेल्लाभट

कचकावून आवडलीय !

अक्षदा's picture

18 Jun 2015 - 12:06 am | अक्षदा

पाणी येऊन गेल डोळयांत... या पेक्षा अजून काय बोलु