कथा

तारा वर्तक..व तीचे बाळ

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Nov 2015 - 1:35 am

तारा वर्तक..व तीचे बाळ
.....................................
धनंजय जोशी ब्यांकेत ऑफिसर होता..
गावात वडलोपार्जीत राहता बंगला.
पत्नी शकुंतला...
तो प्रेमाने तिला शकू म्हणायचा व ती जय...
शकूच पहिले मूल गेले होते..गर्भाशय व नलिकेत काही कोम्पिकेशन्स झाली होती...
डॉक्टरांनी औषधे दिली होती..
शकू पुन्हा गर्वार्शी होती ७ महिन्याची...रिपोर्ट्स नॉर्मल होते ..जय काळजी घेत होता..
जय ला जवळच कुणीच नव्हत..आई बाबा पण देवाघरी नुकतेच गेले होते..

कथा

इतस्तत:

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
25 Nov 2015 - 7:57 pm

सह्याद्रीच्या डोंगरकडांवरुन वाहणारे वारे गारठा घेऊन पश्चिमेकडील पाटवाटा समृद्ध करत गेले. बुंदेलखंडाच्या तीव्र ऊतारावरुन अवजड शिळा गडगडत खाली आली. काम फत्ते झाले. चढणी भाजणीचा रस्ता तुडवत वर्दी द्यायला भिवा गडावर पोहोचला. तुघलक खान दाढी कुरवाळत सिंहासनावर आरुढ होता.
"क्या पैगाम लाये हो?"
"वो पत्थर हमने हटाया जनाब"
"बहोत खुब, सुभा नल्ला"
अक्रम पठाणाकडे नजरत-ए-हुकुम गेला. दाढीदारी सैन्य डोंगर उतारावर एकवटले. जिथुन शिळा काढली होती तिथे एक भलामोठा खंदक पडला होता. पहारी तुटून पडल्या. त्या खंदकात जोमाने खोदकाम सुरु झाले.

कथाप्रतिभा

दोन वेडे - उपसंहार

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 6:51 pm

मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला!
त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला!
डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता!

शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत!
भारत अमेरिका युद्ध!
जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते!
"सर आपल्यासाठी पत्र आले आहे"
बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले!
"लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते!
त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!

कलानाट्यइतिहासवाङ्मयकथाव्युत्पत्तीसाहित्यिकतंत्रमौजमजा

रन फॉरेस्ट रन

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 12:27 pm

मिपावर मध्यंतरी 'काही वेगळे चित्रपट' या धाग्यावर हॉलीवुडचे बरायचश्या सुंदर चित्रपटांचे उल्लेख मिळाले, त्यापैकी 'टॉम हँक्स' अभिनीत 'फॉरेस्ट गम्प' पासून सुरवात केली. निसर्गाने मानवाला बनवताना कोणते रसायन वापरले याचा उलगाड़ा अजूनही आपल्याला झालेला नाही, फॉरेस्ट गम्प मधून पुन्हा एकदा हे रसायन समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. विन्स्टन ग्रूम या लेखकाने लिहिलेल्या "फॉरेस्ट गम्प' याच शीर्षकाच्या कादंबरीवर हा चित्रपटला ऑस्करचे उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, संपादन इत्यादी एकूण सहा पुरस्कार मिळाले.

मांडणीसंस्कृतीनृत्यकथासमाजजीवनमानचित्रपटआस्वादअनुभव

दिवाळी कुणाची?

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 11:20 pm

"ये आये, दिवाळी कधीच्याला हाय गं!"
"हाय उंद्याच्याला"
"आये, मंग तू दाळीचे लाडु कव्हा करणार हैस"
"करतीना उंद्याच्याला"
"आये, त्वा रोजच् उंदया उंदया म्हंतीस"
"मंग जाय रासन आलं का नय ते यी बघुन. रासनात दाळ येणार हाय "
__________________________________________________________________________
रातपासुन पांधीत दबा धरून बसलेले दोन ट्रक नानासाहेबाच्या मळयाकड़े निघाले. त्यातला एक ट्रक अजुन तसाच होता, अगदी सीलबंद. दुसऱ्या ट्रक मधली अर्धी निम्मी पोती पांदितच काढुन ट्रॅक्टरणे गावांत पाठवली.

कथा

दिवस असे की - कथा

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 1:22 am

-----दिवस असे की - कथा----------------

दुकानातल्या दर्शनी भागामध्ये ठेवलेल्या नव्या को-रया चपलांकडे राहुन राहुन विनुचे लक्ष जात होते . त्याचवेळी आपल्या पायातल्या फाटुन चिंध्या होऊ लागलेल्या चपलांच्या जाणिवेने त्याचे मन खिन्नही होत होते . मनाचा हिय्या करुन त्याने दुकानदाराला चपलांची किंमत विचारली . पण तीस रुपये आकडा ऐकुन आपली निराशा लपवत , मान हलवत तो बाहेर पडला . त्यावेळी तरी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते . बाहेर पडल्यावर तो स्वताची समजुत घालु लागला .

कथाविचार

दोन वेडे -३

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
21 Nov 2015 - 4:53 pm

तो वेडा ब्रेड कापत होता.
"हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला.
वेडा फक्त त्याकडे बघत होता.
"१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस"
वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला.
मार्कने तो शिताफीने चुकवला.
"१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं!
बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता. त्या आजारातुन बरं होण्यासाठी तुला एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं.तेथून तुला एका डॉक्टरने बाहेर फरार होण्यास मदत केली."
मार्कला आता दम लागला होता.
"पाणी मिळेल?"

हे ठिकाणधोरणमांडणीकलानाट्यवाङ्मयकथाव्युत्पत्तीसाहित्यिकदेशांतरविज्ञान

एक मनस्वी अद्वैत

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in जनातलं, मनातलं
20 Nov 2015 - 8:14 am

एक मनस्वी अद्वैत
अनुराग कंपनीत कामाला जाताना रोज त्या घड्याळाच्या शो रूम वरून जायचा . काहीवेळा क्षणभर थांबायचाही.
ती चकचकीत फॅशनेबल चुटूकशी शोकेसमध्ये ठेवलेली लेडीज घड्याळं त्याला मोहवायची.रागीणीच्या हातावर
कुठलं जास्त खुलून दिसेल याचा विचारहि तो करत रहायचा. उद्या त्यांच्या लग्नाला पांच वर्ष होतायतायात. अजून तेच
लग्ना आधीचं जूनं घड्याळ ती वापरते . उद्या कोणत्याहि परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवसाला तिला सरप्राइज
द्यायचंच तो मनोमन ठरवतो. लाडक्या रागीणी साठी तो एक रिस्ट वॉच घ्यायचं ठरवतो.

कथा

शिंद्री

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
19 Nov 2015 - 9:08 pm

वाजत गाजत छबिना भाईर आला. तालासुरात अगडबंब ढोल बडवले जाऊ लागले. गुरवानं आईराजाचा जोरदार ऊदोऊदो केला. एका हातानं घंटी वाजवत आन दुसऱ्या हातात पंचारतीचं ताट घीऊन गुरव एकएक पाऊल पुढे टाकत चालला. एवढ्या गर्दीत कोपऱ्या कोपऱ्यातनं कुणाच्याना कुणाच्या अंगात यीव लागलं. हाताची घट्ट तिढी मारुन डोळं गच्च मिटुन नानाप्रकारे थयाथया नाचत गुरवाच्या पुढं ते भर अंधारात जाऊ लागले. त्यांनी ना दगड बघीतला ना धोंडा. आप्तगण त्यांच्यावर फुलं ऊधळत ऊदोऊदो करत राहीले.

कथाप्रतिभा