इतस्तत:

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
25 Nov 2015 - 7:57 pm

सह्याद्रीच्या डोंगरकडांवरुन वाहणारे वारे गारठा घेऊन पश्चिमेकडील पाटवाटा समृद्ध करत गेले. बुंदेलखंडाच्या तीव्र ऊतारावरुन अवजड शिळा गडगडत खाली आली. काम फत्ते झाले. चढणी भाजणीचा रस्ता तुडवत वर्दी द्यायला भिवा गडावर पोहोचला. तुघलक खान दाढी कुरवाळत सिंहासनावर आरुढ होता.
"क्या पैगाम लाये हो?"
"वो पत्थर हमने हटाया जनाब"
"बहोत खुब, सुभा नल्ला"
अक्रम पठाणाकडे नजरत-ए-हुकुम गेला. दाढीदारी सैन्य डोंगर उतारावर एकवटले. जिथुन शिळा काढली होती तिथे एक भलामोठा खंदक पडला होता. पहारी तुटून पडल्या. त्या खंदकात जोमाने खोदकाम सुरु झाले.

धामनीच्या सुभेदाराकडे खबर उडत उडत गेली. वायुवेगाने मराठा सैन्य बुंदेलखंडाच्या पायथ्याशी जमा झाले. तलवारी ऊगारल्या गेल्या. गनीम कापुन काढत मराठा खंदकाजवळ पोहोचला. झालेल्या चकमक युध्दात मराठ्यांची सरशी झाली. आणि तो खंदक खणण्यात वीर मराठा त्वेशाने पुढे सरसावला. पवित्र भुमीला वंदन करुन पहिला फावडा सुभेदाराने मारला. आणि पुन्हा एकदा पहारी तुटून पडल्या. अहोरात्र झटुन खंदक पुढे सरकत गेले. दगड, माती, चिखल तुडवत मराठे घाम गाळत राहिले.

दुसऱ्या बाजुने तोफा, बंदुका, छर्रे घेऊन ईस्ट इंडीया कंपनीचा फौजफाटा बुदेलगंडाच्या पायथ्याशी परेड करत दाखल झाला. प्राणांकित आहुती देत गडावर मराठा सैन्य लढाईला सज्ज झाले. पायथ्याशी पडलेल्या अवाढव्य शिळेची इंग्रजांनी कसल्याश्या यंत्राने तपासनी केली. आणि ब्रिटीश सैन्य तिथेच थबकले. कोंडाळं करुन शिळेवर हातोड्यांचे प्रहार तुटून पडले. वरच्या मराठ्याला याची कोणतीच खबरबात नव्हती. शिळेचे छिलके इतस्तत: झाले. मधला छिलक्या एक भव्यदिव्य भाग बैलगाडीत घालून जंक्शनवर नेला. धुर सोडत आगगाडी बंदराकडे धावली.विशाल 'क्वीन मेरीडोना' समुद्रात लाटांवर झुलत ऊभी होती.

खबर मिळताच ब्रिटीश सैन्याने बुंदेलखंडावरुन काढता पाय घेतला. पळून जाणारा इंग्रज बघून मराठ्यांनी गडावर दिवाळी साजरी केली. हा मराठ्यांचा सपशेल पराभव होता.

छत्रपतींची 'भवानी तलवार' समुद्रमार्गे कधीच ब्रिटनकडे रवाना झाली होती.

-------------------------------------------
(संपुर्ण काल्पनिक)

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

25 Nov 2015 - 8:22 pm | चांदणे संदीप

काल्पनिकच आहे तर अजून विस्तार करून परत मिळवल्याचीही कथा येऊद्या. आवडेल वाचायला.

बाकी शिळेत तलवार घुसवली कशी असेल आणि ती त्या काळात कुठल्या यंत्राने 'डिटेक्ट' झाली असेल याचा आज रात्री झोपल्यावर शोध लावावा म्हणतो!

Sandy

जव्हेरगंज's picture

25 Nov 2015 - 9:50 pm | जव्हेरगंज

परत आणायला इंग्लडात जाऊन कल्पनेच्या भलत्याच भराऱ्या माराव्या लागतील!!! प्रयत्न मात्र करणारचं!!!

बाकी 'शोध' लागल्यावर नक्की सांगा हो!!

पीके's picture

25 Nov 2015 - 8:39 pm | पीके

रीटर्नस ईन ईंडीया..

जव्हेरगंज's picture

25 Nov 2015 - 9:52 pm | जव्हेरगंज

आधी लिंकच लागली नाही , काय लिहिलय हे!!

हे ही भारी!

राही's picture

25 Nov 2015 - 10:04 pm | राही

काल्पनिकच आहे म्हणा. कल्पना चांगली आहे पण तेव्हढं ते आगगाडी धूर सोडत वगैरे फारच कल्पनारम्य आहे. भारतात गाडी सुरू झाली कधी, मावळे लढले कधी, मराठा संस्थानं खालसा झाली केव्हा, पेशवाई बुडली केव्हा.. फारच कल्पनारम्य.
कल्पना चांगली आहे. व्यवस्थित विस्तार व्हायला हवा होता.

उगा काहितरीच's picture

25 Nov 2015 - 11:34 pm | उगा काहितरीच

कैच्या कै कथा !

आनंद कांबीकर's picture

25 Nov 2015 - 11:40 pm | आनंद कांबीकर

भरपूर आहे पर राही च्या प्रतिसादाचा विचार व्हावा ऐतिहासिक कथा चांगली होईल

सत्य धर्म's picture

27 Nov 2015 - 4:50 pm | सत्य धर्म

लिखाणाला भलतीच धार आहे तुमच्या. काही पुस्तक वगैरे प्रसिद्ध झाल आहे का याच्या आधी .....
असल तर सांगा.