दिवाळी कुणाची?

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 11:20 pm

"ये आये, दिवाळी कधीच्याला हाय गं!"
"हाय उंद्याच्याला"
"आये, मंग तू दाळीचे लाडु कव्हा करणार हैस"
"करतीना उंद्याच्याला"
"आये, त्वा रोजच् उंदया उंदया म्हंतीस"
"मंग जाय रासन आलं का नय ते यी बघुन. रासनात दाळ येणार हाय "
__________________________________________________________________________
रातपासुन पांधीत दबा धरून बसलेले दोन ट्रक नानासाहेबाच्या मळयाकड़े निघाले. त्यातला एक ट्रक अजुन तसाच होता, अगदी सीलबंद. दुसऱ्या ट्रक मधली अर्धी निम्मी पोती पांदितच काढुन ट्रॅक्टरणे गावांत पाठवली.
ट्रॅक्टर राषन दुकानसमोर येताच, राषन आल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.
थांबलेल्या दिवाळीत उत्साह संचारला.
नानासाहेबला ट्रक मळयात सोडुन येउस्तवर दुकानासमोर भली मोठी रांग लागली.
"च्याला आपल्या लोकाइला दमच पडत नै. फुकट म्हणलं की लगीच वर थुत्तर करुण निघत्यात" शिव्या हासडतच सरकारी स्वस्तधान्य दुकाण मालक श्री नानासाहेब यांनी धान्य वाटप चालु केली.
"मालक, इस किलु घऊ, दोन क़िलु साकर अन पाच क़िलु हरबऱ्याची दाळ द्या"
"राम्या, अरं अख्ख्या गावाची दिवाळी तु एकटाच खातु का?"
"मालक, पोरी सोरी आल्यात सनाला"
"देशात सगळीकडं दुस्काळ चाल्लाय. याबरचीना बी माल उलशिकच आलाय. धा किलु घौ, एक किलु साकर अन एक किलु दाळ घी. अन भाव बी वाढलेत अता, चल! उरक!" नानासाहेबांनी कुपनावर ठसा मारून गड्याला धान्य मोजायला सांगितलं.
तिसरापहार पर्यंत धान्यवाटप चालु होतं.
मधेच एकदा नानासाहेबांना फोन आला
"मालक, सरकारी पोत्यातला माल काढून आपल्या पोत्यात भरला" फोनवर नानासाहेबांचा ख़ास माणूस बोलला.
"बरायं! ती सरकारी पोतडी जाळुन टाका मागल्या बारचिवनी इकु नगा लोकाइला" नाना.
"बरं! मालक. लगीच चेतून देतु!"
"निकमाचे टेम्पु धाडून देतु, लग्गीच् माल मार्केट मंदी जाउद्या. माराड़याला सांगुण ठुलय" नाना.
"बरं मालक"
_____________________________________________________________________
"ये आये! बारीक बारीक गोटी येवढुले लाडु कामुन केले ग? अन लै मोठे बी नै केले"
"खा गप गुमाणं, लए रडरड नगस करू. रासनात उलशिकच दाळ आलती" माय त्याच्यावर खेकसलि.
"हेव बघ! माह्याजवळ केवढा पेढा हाय! लाडुन मोठा!" अवखळपने चड्डीच्या खिशातुन एक पेढ़ा बाहेर काढत तो मायेला म्हणाला.
"त्वा कुठुन रं आनलास?"
"त्या रासनवाल्या नानाभाऊ नं दिवाळीला नवी जीपकार घेतली ना त्याचा पेढा वाटला त्यायनि भाईर"

कथा

प्रतिक्रिया

वास्तववादी लेख आवडला तरी कसे म्हणू :(

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2015 - 1:27 am | प्रभाकर पेठकर

मेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी माणसे ही. स्थानिक कार्यकर्ते, राजकारणी, पोलीसपाटील सगळेच जणं हातात हात घालून कार्यरत असतात. दाद मागणार तरी कोणाकडे.

मांत्रिक's picture

24 Nov 2015 - 6:34 am | मांत्रिक

सहमत!!!

नीलमोहर's picture

24 Nov 2015 - 12:30 pm | नीलमोहर

+१

आनंद कांबीकर's picture

24 Nov 2015 - 8:12 pm | आनंद कांबीकर

...

रेवती's picture

24 Nov 2015 - 2:09 am | रेवती

वास्तव.

:( अतिवास यांची उशिर आणि आता ही तुमची कथा वाचुन दिवाळीचा फराळ चार घास कमीच गेला या वेळी.

मितान's picture

24 Nov 2015 - 6:54 am | मितान

:(

अजया's picture

24 Nov 2015 - 7:06 am | अजया

:(

मार्मिक गोडसे's picture

24 Nov 2015 - 11:45 am | मार्मिक गोडसे

आजुबाजुच्या जगात स्वतःहुन डोकावण्याच्या सवयीमुळे हल्ली दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्याची इच्छाच राहीली नाही.

आनंद कांबीकर's picture

25 Nov 2015 - 4:36 pm | आनंद कांबीकर

सहमत

नाव आडनाव's picture

25 Nov 2015 - 4:44 pm | नाव आडनाव

.

पैसा's picture

25 Nov 2015 - 4:55 pm | पैसा

हम्म...

आनंद कांबीकर's picture

28 Nov 2015 - 10:31 pm | आनंद कांबीकर
आनंद कांबीकर's picture

28 Nov 2015 - 10:31 pm | आनंद कांबीकर
नाखु's picture

1 Dec 2015 - 4:07 pm | नाखु

दाहक वास्तव......डोळे बंद करू शकतो पण मन नाही....

जातवेद's picture

1 Dec 2015 - 4:27 pm | जातवेद

:(