योजना

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
22 Nov 2015 - 11:17 am

(पात्रांची मानसिकता खरी असली तरी दुर्दैवाने योजना काल्पनिक आहे)
मंत्रीन् बाईंनी फर्मान काढलं तशी कागदं वरुण खाली अन खालुन वरती फिरली. योजनेची ताबडतोब अंमलबजावणी झाली. खेड़ोपाड़ी शिक्षण सेविका पदर खोचुन उभा ठाकल्या. पाट्या, पुस्तकं पोहचली. भत्ते सुरु झाले. शाळात लाइटं लागली. दिवसभर राणात् राबनारी हातं रातच्याला लेखान्या धरु लागली. वर्गा वर्गातून बांगड्याची सळसळ वाढू लागली. पण जेव्हा गणना झाली, टक्केवारी हाती आली तेव्हा बाई हदरल्याच. पाण्यासारखा पैसा ओतून, मोठी फौज उभारुण फ़क्त दहा टक्केच बाया शाळात येतात, हे ऐकून बाईंच्या डोक्यात आग आग झाली. शंभर टक्के स्त्रियांना साक्षर करण्याच्या हेतुने चालु केलेली ही योजना बरगळन्याची चिन्ह दिसू लागले.
बाईंनी वेग वेगळ्या केंद्रांना भेटी द्यायला सुरुवात केली.
बाई जि.प. शाळा, मंडनगाव येथे आल्या तेव्हा रात्र झालेली. शाळेला भेट दिली तर वर्गात पाचच बाया. विचारपुस केली तेव्हां लक्षात आले की गावांत अडानी स्त्रियांचे प्रमाण सत्तर ते अंशी टक्के आहे. मग स्त्रियांशी स्वतः बोलून त्यांची समजूत काढायच्या दृष्टीने बाई मंडनगावतच मुकामाला थांबल्या.
बया शेतात कामाला जातात म्हणून बाई सकाळीच तयार झाल्या अन एका एका घरात शिरू लागल्या.
"तुमचे नाव काय?" बाईंनि एकिला विचारले.
"रंजना बुडगुले"
"रात्रीच्या शाळेला जाता?"
"हो"
तिचे 'हो' ऐकून बाईंना बरे वाटले.
"मग तुम्हाला या चार महिन्याच्या शाळेतून काय काय फायदा झाला?"
"मला वाचाया येऊ लागलं, हिशुब जमु लागला, म्या अता एस टी ची पाटी बी वाचत्या"
तिचे उत्तर ऐकून बाई सुखावल्या.
"तू जातेस का ग?" शेजारच्या घरात तान्ह्या पोराला पाजत बसलेल्या एकिला बाईंनि विचारले.
"नई" पदराने तोंड झाकत ति बोलली.
एका स्त्रिला लाजनाऱ्या स्त्रिकडे पाहुन बाईंना कुतूहल वाटले. बाई तिच्याजवळच जमिनीवर बसल्या.
तिच्या बाळाला हातात घेऊन त्याचे पापे घेतले. ति अनखिनच लाजलि.
"शेजारचि रंजना बघ. शाळेत जाउन तिला किती फायदा झाला. तुम्ही दोघी शेजरिच राहता. मग तु का बरं शाळेत जात नाहीस"
"अमच्या ह्यानला नई आवडत बयांनी लिखा पढी केल्यालं" पदराअडुन उलशिक तोंड दाखवत ति बोलली.
बाई तड़कन उठल्या अन सरळ स्वतःच्या कार्यालयात आल्या.
आल्या आल्या त्यांनी शंभर टक्के पुरुष साक्षरतेच्या योजनेच्या अंमलबजावनीचे फरमान काढले.

कथा

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Nov 2015 - 4:11 pm | पैसा

आवडले!

संदीप डांगे's picture

22 Nov 2015 - 4:57 pm | संदीप डांगे

खूप आवडले. चाबूक लिहिता तुम्ही. साहित्यसंपादंकांची मदत घेऊन टंकनचुका टाळता येतील. तुमच्या लेखनीत धार आहे. अजून येऊद्या. अशा छोट्या कथा कहान्यांमधून जमिनी वास्तव सांगणे तेही विनोदी भाषेत सोपं काम नोहे.

पुलेशु. पुलेवापा.

आनंद कांबीकर's picture

23 Nov 2015 - 11:22 am | आनंद कांबीकर

पुढच्या कथेत टंकन सुधारना दिसतील.

चाणक्य's picture

25 Nov 2015 - 4:06 pm | चाणक्य

.

इडली डोसा's picture

22 Nov 2015 - 11:13 pm | इडली डोसा

बाईंची नविन योजना सफल होऊ दे. पण पुरुष नुसतेच साक्षर होऊन फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही. असो, चांगली कथा. अजुन लिहा.
वरच्या संदिपभौंच्या ह्या

साहित्य संपादकांची मदत घेऊन टंकनचुका टाळता येतील

प्रतिसादाशी सहमत.

जव्हेरगंज's picture

22 Nov 2015 - 11:34 pm | जव्हेरगंज

चांगलं आहे!

पण जो माणुस 'तंगडीची गोष्ट' लिहू शकतो त्याच्याकडे आता जास्त अपेक्षेने पाहतोय!!!!
इतकचं.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
निवडक
http://phuphata.blogspot.com

आनंद कांबीकर's picture

24 Nov 2015 - 7:23 pm | आनंद कांबीकर

वरुटा पाटा, फुपाटा मस्त हे!

उगा काहितरीच's picture

23 Nov 2015 - 12:37 am | उगा काहितरीच

छान लिहीलय... एकंदरीत "आंधळ दळतय अन् कुत्र पिठ खातय" ! अशी अवस्था आहे.

संदीप डांगे's picture

23 Nov 2015 - 9:47 am | संदीप डांगे

शिर्षक बदलले हे बरेच केलेत. पुर्वीचे खटकत होते.

मांत्रिक's picture

25 Nov 2015 - 6:27 am | मांत्रिक

छान लिहिलंय. कल्पना आवडली.

नाव आडनाव's picture

25 Nov 2015 - 4:24 pm | नाव आडनाव

चांगलं लिहिलंय.