काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
22 Jan 2014 - 3:27 pm

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. पुण्यात होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र करूया.

मी प्रतिसादातून सुरूवात करतो आहे.

काही मुद्दे..

१) अन्य शहरातील मंडळींनी कृपया वेगळा धागा काढावा - हे केवळ कार्यक्रम शोधणे सोयीचे पडावे म्हणून.
"""अन्य कोणताही उद्देश नाही"""
२) या कार्यक्रमांना जोडून कट्टा झालाच पाहिजे असा आग्रह नाही. कार्यक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे इतकाच या धाग्याचा उद्देश आहे.
३) कार्यक्रमासंदर्भात शक्य तितकी माहिती देण्याचा प्रयत्न करावा. वेळ, ठिकाण, आयोजकांचा संपर्क क्रमांक (गरज असल्यास) वगैरे माहिती असावी. नसली तरी हरकत नाही, कोणीतरी शोधून प्रतिसादातून भर घालेलच.
४) पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड, उपनगरे असा सर्व भाग गृहीत धरावा. जवळच्या एखाद्या गडावरील कार्यक्रमही या धाग्यावर देण्यास हरकत नाही.
५) मिपाव्यवस्थापनाचा आणि या उपक्रमाचा काहीही संबंध नाही - हे ही एक.. असावे म्हणून. ;)

आणखी काही सूचना असल्यास स्वागत आहे.

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाचित्रपटविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

प्रतिक्रिया

मोदक's picture

22 Jan 2014 - 3:29 pm | मोदक

.

पिलीयन रायडर's picture

22 Jan 2014 - 3:31 pm | पिलीयन रायडर

हुषार आहेसच तु..!! आवडलाय मला धागा! लगेच वाचनखुण म्हणुन मार्क केलाय!

विटेकर's picture

22 Jan 2014 - 4:15 pm | विटेकर

चोक्कस !

कवितानागेश's picture

22 Jan 2014 - 3:54 pm | कवितानागेश

चांगला धागा. :)

नाखु's picture

22 Jan 2014 - 5:07 pm | नाखु

किमान आधी माहीत झाल्याने नंतरची निराशा होणार नाही.

धन्या's picture

22 Jan 2014 - 5:30 pm | धन्या

छान उपक्रम !!!

जादू's picture

22 Jan 2014 - 5:35 pm | जादू

आवडला धागा

काय..? कुठे..? कधी..? मुंबई, होऊन जाऊ दे.

झकासराव's picture

22 Jan 2014 - 6:01 pm | झकासराव

सही आहे. :)

विटेकर's picture

22 Jan 2014 - 6:09 pm | विटेकर

Nimantran

मुक्त विहारि's picture

22 Jan 2014 - 6:44 pm | मुक्त विहारि

छान धागा....

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Jan 2014 - 10:47 pm | लॉरी टांगटूंगकर

अन्याय, अन्याय आहे हा. मिपाला पुण्यापुरते मर्यादित करण्याच्या प्रयत्नाचा निषेध...

ठीके सुरु केलाच आहे, आता तर जमेल तशी माहितीची देवाण घेवाण करू.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2014 - 1:19 am | अत्रुप्त आत्मा

१ नंबर कार्यक्रम.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jan 2014 - 3:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

येथे ओरिसा,भुवनेश्वरहुन आलेल्या कलाकारांचे एक प्रदर्शन चालु आहे. तसे तर टि.स्मा. आणि सोनल हॉल,कर्वे रोड अश्या ठीकाणी नेहमीच काहीना काही प्रदर्शने असतात.मग ह्याचे वैशिष्ट्य काय?
ईथे दगडी कोरीव काम केलेल्या काही मुर्ती मला फारच आवडल्या (पण त्या आणल्या तर मला घराबाहेर....) आणि किंमती ८००-९०० पासुन चालु होत आहेत ते अगदी २० ह. पर्यंत
कपड्यावर नैसर्गिक रंगाने काढलेली दशावतार,रामायण,कृष्ण्-बलराम-सुभद्रा,गोकुळातले प्रसंग अशी अनेक पेंटींग आहेत.ती पण ४०० ते २ हजारपर्यंत. अतिशय ताजे रंग वाटले,शिवाय स्वतः कलाकार सांगणारा दर्दी वाटला. शिवाय हस्तकला, बटवे वगैरे स्त्रियांसाठी आहेतच.
असो. वैयक्तिकरित्या मला त्या शिल्पकला आणि कापडावरील चित्रे फारच आवडली आणि मी काही चित्रे (मोहात पडुन) घेतलीसुद्धा.

धन्यवाद. आजच भेट देण्यात येईल. :)

अक्षया's picture

23 Jan 2014 - 5:03 pm | अक्षया

वा छान धागा.. :)

क्ळविण्यास आनन्द होतो की, नगर वाचन मन्दिराची शाखा बिबवेवाडी येथे सुरू झाली आहे.पत्ता: माणिक - मोती अपार्टमेन्ट, (पुर्वीचे सुबोध वाचनालय),अन्नभाउ साठे पुतल्यामागे, बिबवेवाडी

nandan's picture

25 Jan 2014 - 9:25 am | nandan

२०१४ ...माफ करा

पैसा's picture

28 Jan 2014 - 8:57 pm | पैसा

पुण्यातले सगळे कार्यक्रम संपले?

आतिवास's picture

30 Jan 2014 - 11:35 am | आतिवास

ओजस सु. वि. यांचा ईरोम शर्मिला यांच्या लढ्यावर आधारित 'ले मशाले' चा प्रयोग-
आज (दि. 30 जाने.) संध्याकाळी - वेळ ५ ते ७
स्थळ : राष्ट्रसेवदल, साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ , सिंहगड रोड, पुणे.

आतिवास's picture

30 Jan 2014 - 1:32 pm | आतिवास

george

मोदक's picture

30 Jan 2014 - 1:35 pm | मोदक

फोटो दिसत नाहीये...

आतिवास's picture

30 Jan 2014 - 1:50 pm | आतिवास

मला दिसतोय फोटो!

हं! मजकूर असा आहे:
कै. प्रकाश गोळे यांच्या 'वास्तव' या पुस्तकाचे प्रकाशन.
Talk by Mr. George Archibald, Ex-President, International Crane Foundation USA
रविवार, ९ फेब्रुवारी, सकाळी १० वाजता
स्थळः इंद्रधनुष्य सभागृह, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ
आयोजकः इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2014 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा

https://fbcdn-photos-f-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/t1/1554378_575018552584435_2072318533_a.jpg

यातील महत्वाचे-२फेब्रुवारीचं शेषराव मोरे सरांचं भाषण! आपल्याला "समजायचे-राहिलेले" सावरकर नक्की समजतील,असे भाषण !

मोदक's picture

5 Feb 2014 - 12:05 pm | मोदक

.

ईमेलवरुन आलेलं आमंत्रण कॉपी -पेस्ट केलंय त्यामुळे आंग्ल भाषेत आहे.

Dear Friends The '2nd Girish Sant Memorial annual lecture' will be held on 8th of this month.This year Prof. Ashok Gadgil from Univerisity of California, Berkely, who was a close friend of Girish, is going to deliver the lecture.Improving peoples' lives by developing and deploying appropriate technology. I invite you for the program.Kindly circulate this invitation to your friends who might be interested in coming to the program Venue : S. M. Joshi Auditorium, Near Patrakar Bhavan.Date - 8th February(Saturday) 2014Timing - 6 to 8 pm

८ - ९ फेब्रूवारी ला भांडारकर संस्था मधे..

10.30 to 8...

पतियाळा घराण्याचा युवा गायक रमाकांत गायकवाड, युवा गायिका अंजली दाते आणि तरुण सतारवादक चिराग कट्टी यांचं सादरीकरण पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवातील 'युवा संगीत संमेलना'त अनुभवता येणार आहे. रविवारी (दि. २३) सकाळी ८.३० वाजता हे संमेलन होईल.

आपला परिसर-तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित 'पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव' आजपासून (दि. २१) सुरू होत आहे. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान घरकुल लॉन्स इथं रोज संध्याकाळी ५.३० वाजता हा महोत्सव होणार आहे.
वर्षभर विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं होणाऱ्या भटकंतीत चांगल्या युवा कलाकारांचा शोध लागतो. त्याशिवाय अभिषेकी महोत्सवाची पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्यांची समितीही युवा कलाकारांची निवड करते. गेली तीन वर्ष आम्ही आवर्जून युवा कलाकारांना महोत्सवात संधी देत असल्याचं गायक पं. शौनक अभिषेकी यांनी सांगितलं.
महोत्सवात शनिवारी (दि. २२) सुधाकर देवळे यांचं गायन होणार असून त्यांना अविनाश पाटील तबल्याची आणि सुधीर नायक संवादिनी साथ करणार आहेत. पूर्बायन चॅटर्जी यांच्या सतारवादनास अनुब्रत चॅटर्जी तबला साथ करतील, तर दुसऱ्या दिवशीच्या सत्राची सांगता प्रख्यात गायिका मालिनी राजूरकर यांच्या गायनानं होईल. त्यांना भरत कामत तबल्याची, तर डॉ. अरविंद थत्ते हार्मोनियमची साथ करतील. रविवारच्या (दि. २३) संध्याकाळच्या सत्राची सुरुवात संजीव आणि अश्विनी शंकर यांच्या शहनाई वादनानं होणार आहे. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद तबल्याची साथ करतील. कुमुद दिवाण यांच्या ठुमरी सादरीकरणास हर्षद कानेटकर तबल्याची, तर मिलिंद कुलकर्णी संवादिनीची साथ करतील. महोत्सवाची सांगता पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनानं होणार आहे. हा संपूर्ण महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. संपूर्ण महोत्सवाचं निवेदन गोव्याचे डॉ. अजय वैद्य करणार आहेत.

साभार:पुणे टाइम्स टीम

प्रसाद प्रकाशन + प्रसाद ज्ञानपीठ च्या विद्यमाने पालवी मंच (प्राचीन ज्ञान विज्ञान वृक्षाला फुटलेली आधुनिक पुनरुज्जीवनाची पालवी)
द्वितीय पुष्प :सरोज भाटे विषय--शोध संस्कृत साहित्य विश्वाचा
कार्यक्रम स्थळ: उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३०
दिनांक ५ एप्रिल २०१४ सायंकाळी ५:३० ते ८:३०
दूरध्वनी: प्रसाद प्रकाशन २४४७१४३७

सुहास झेले's picture

6 May 2014 - 2:31 pm | सुहास झेले

खास इतिहास प्रेमींसाठी...
.
.
.
.

सुहास झेले's picture

10 May 2014 - 10:38 am | सुहास झेले

शैक्षणिक सत्रे - भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे - मे २०१४.

मुंबईतील इतिहासप्रेमी आणि मोडी लिपीच्या अभ्यासकांसाठी महाराष्ट्र इतिहास हौशी अभ्यासक मंडळ,मुंबई यांचेतर्फे मे २०१४ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे शैक्षणिक सत्रे आयोजिण्यात येत आहेत.

दिनांक : रविवार, २५ मे २०१४.

स्थळ : भारत इतिहास संशोधक मंडळ, # १३२१, सदाशिव पेठ, भरत नाट्य मंदिरा शेजारी, पुणे - ४११०३०.

वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी ०४.३० पर्यंत.

अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकांवर आमच्याशी संपर्क साधावा.
९८३३९०४७९६, ९८६९४०७१३१, ९८३३१८२०७७.
ई-मेल - miham.mumbai@gmail.com

महाराष्ट्र इतिहास हौशी अभ्यासक मंडळ, मुंबई.

कपिलमुनी's picture

15 May 2014 - 12:55 pm | कपिलमुनी

पुण्यात मोडी लिपी चे क्लासेस कुठे आहेत ?
याची माहिती हवी आहे

म्हैस's picture

30 May 2014 - 3:08 pm | म्हैस

@बबु
पत्ता अजून देतील मध्ये द्या न. बिबवेवाडी गावठाणाच्या कमानीतून आत जायचं का?

चौकटराजा's picture

30 May 2014 - 3:33 pm | चौकटराजा

मोदक हरवला काय ?
मोदक कधी हरवला ?
मोदक कुठे हरवला ?

ऍडव्हेंचर, थ्रील अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव एकाच वेळी देणारी कात्रज टू सिंहगड एन्ड्युरो स्पर्धा अर्थात ‘के 2 एस नाईट ट्रेक’ येत्या 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पार पडतोय. या स्पर्धेसाठी सध्या टिम्सची जय्यत तयारी सुरू आहे. स्पर्धेचं यंदा 12 वं वर्ष आहे.

K2S MONSOON DAY TREKKING RACE 2014 is open only for everyone and will be held on the on Saturday, 2nd August 2014 and is part of the K2S Monsoon Adventure Race 2014. Primarily a team trekking race, K2S tests the competitors' physical and mental endurance. A team of 3 members covers a distance of over 16 kms. in the monsoon rains with bracing wind all over, navigating over 15 hills and valleys from the Katraj Tunnel Top to the top of Sinhagad Fort, Pune.

DATES: RACE DAY 2nd August 2014

REPORTING: 12:00pm.* on 2nd August 2014 at Katraj Tunnel Top.

FLAG OFF: 2:30pm.* from Katraj Tunnel Top

ROUTE: Katraj Tunnel Top to Sinhagad Fort
K2S – Monsoon Trekking Race 2014

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jul 2014 - 12:29 am | डॉ सुहास म्हात्रे

खगोलशास्त्राची आवड असणार्‍यांसाठी एक चांगली संधी...

आयुक्कामध्ये ३१ जुलैला संध्याकाळी ६.३० वाजता, सर्वसामान्य नागरिकांना खुला प्रवेश असलेल्या कार्यक्रमाचे आमंत्रण...

=======================================

Dear All

Please mark your calendars...

IUCAA is organising a Public Lecture on Thursday, July 31 at 6:30 pm (Next Week) in the IUCAA Chandrasekhar Auditorium within the Pune University Campus.

You are all welcome to attend and please pass this on to others who may be interested.

https://www.facebook.com/events/1450429711887865/

Please feel free to interact in the post lecture session with
Dr. Gordon Squires, Communications & Education lead, Thirty Meter Telescope

Exciting recent Astronomical discoveries enabled by the ground- and space-based telescopes will be shared in this talk along with some personal stories of how the speaker helped share them with the world. The progress towards astronomy’s next-generation observatory, the Thirty Meter Telescope (TMT) will also be described. TMT is an unprecedented collaboration among astronomy institutes in India, Japan, China, Canada and the United States of America.

Dr. Squires is an astronomer at the California Institute of Technology, working with the TMT, as well as NASA’s Spitzer Space Telescope, the Herschel Space Observatory, the Galaxy Evolution Explorer, NuSTAR, Kepler, WISE, and other space telescopes with Caltech involvement. His research explores the old, cold and distant universe – understanding how galaxies formed billions of years ago and what is the nature of the dark matter and dark energy that fills space.

Hope to see you there... Please arrive early as seats are limited.

- Samir Dhurde.

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 6:13 pm | संदीप डांगे

का थंडावला धागा? विसरले का धागाकर्ते आपल्या अपत्याला?

सार्वजनीक उपक्रम आहे हा डांगेण्णा.. धागा काढला तेंव्हाच लोकार्पण केला आहे. ;)

मी अशा धाग्यांकडे निराकार भावनेने (बिचारे सर आमचे!!) बघतो. चालला तर चालला.. ज्याला आवडला ते प्रतिसाद देतील...
शिंपल. :)

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 8:24 pm | संदीप डांगे

हो, कळले हो, खोचकपणा करणे आमचं स्वभाव आहे म्हणतात, त्याला जागावं आणि धागाही जिवंत करावा म्हणून ..:))

बाकी, नवीन काय पुण्यात एवढ्यात??

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 11:32 am | महासंग्राम

डांगेण्णा, पुण्याचा सोताचा उत्सव गणेशोत्सव येतोय ५ तारखेपासून अवश्य येणे करावे...
पुणे हे १० दिवस अगदी जिवंत भासतं.

चित्रगुप्त's picture

30 Aug 2016 - 11:43 pm | चित्रगुप्त

पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड, उपनगरे असा सर्व भाग गृहीत धरावा

हे वाचून डोळे पाणावले. कुठे गेला तो पुणेकरांचा जाज्वल्य अभिमान? पूर्वीचे पुणे आता राहिले नाही हेच खरे. यूपी बिहार वाल्यांनी वाट लावली, हे खुद्द बाजीरावांनीच नाचत नाचत सांगितले आहे ...

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 12:04 am | संदीप डांगे

बरोबर आहे काका. मी जे काय दोन चार दिवसात पुणे पाहिले त्यात नदिपल्याडचे शहर हे पुणे नाहीच असे स्पष्ट जाणवत होते. जसे रामकुंडापासूनच्या दोन किमीच्या वर्तुळाबाहेरचं नाशिक हे नाशिक नाही तसेच सदाशिवपेठेच्या दोन किमी वर्तुळाबाहेरचं पुणे हे पुणे नाहीच्च!!

पिंपरी चिंचवड साठी वेगळा धागा सुरु करायचा का मग....
अगोदर पासूनच हा धागा थंड आहे... अजून दुसरा धागा काढून फक्त संख्या वाढवायची काय ?

(असाच टाइमपास)

कपिलमुनी's picture

31 Aug 2016 - 4:49 pm | कपिलमुनी

The Basic Photography Workshop

Sunday, 4th Spetember and Sunday, 11th September

11 A.M to 4 P.M

Symbiosis Institute of Management Studies (SIMS),

Khadki, Range Hills Rd, Pune, Maharashtra 411020,

(Landmark: 800 metres from E-Square on University Road)

भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये लवकरच पर्शियन/फारसी भाषेचा वर्ग सुरु होत आहे.फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी शिकवणार आहेत
अधिक माहिती पुढीलप्रमाणे:
सुरुवात: दि. २४ सप्टेंबर २०१६ पासुन
कालावधी: ६ महिने
वेळ: दर शनिवार सकाळी ९.३० ते ११.३०
शुल्क: रु १०००/-
इच्छुकांनी ०२०-२४४७२५८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

माधुरी विनायक's picture

6 Oct 2016 - 1:37 pm | माधुरी विनायक

पुण्यात ७,८,९ ऑक्टोबरला सिंहगड पायथ्याशी मिसळ महोत्सव असल्याचं समजतं. पुणे, नाशिक, चिपळूण, वऱ्हाडी अशा वेगवेगळ्या चवींची मिसळ चाखता येणार आहे. त्याशिवाय इतर पदार्थही असतील. माझ्याकडे संपर्क क्रमांक किंवा इतर माहिती नाही. पुणेकर मिपाकरांना कदाचित आणखी माहिती देता येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2016 - 3:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

जालावर शोधले तर हे दोन दुवे मिळाले...

http://findtours.in/misal-mahotsav-2016/

http://www.punefoodfest.com/

पहिला 'पुणे मिसळ महोत्सव'

मिसळ - महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न!

सौमित्रच्या गारवावाली कुंद पावसाळी हवा असावी, आजूबाजूला हिरवाईनं नटलेला (अर्थ आपल्या सोयीनुसार घ्यावा) परिसर असावा, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात. मंद झुळुकेसोबत त्याक्षणाला केवळ ‘दैवी’च म्हणता येईल, असा खमंग सुवास सुटावा. क्षणभर डोळे मिटून आपण तो सुवास अनुभवत राहतोय, तोपर्यंत बाळू, पिंट्या, बारक्या असं ‘एरवीचं’ नाव धारण केलेल्या यक्षानं आपल्यासमोर, बादशहासमोर नजराणा पेश करताना आणतात त्या पद्धतीनं ट्रेमध्ये ठेवलेला, उसळीवर मुक्तहस्ते पेरलेल्या शेवफरसाणानं भरलेला चिनी मातीचा बोल, त्याच्यासोबत डोक्यात सुरू असलेले जगातले सगळे विचार तात्पुरते संपवायची ताकद असणाऱ्या रश्श्याचा भलाथोरला वाडगा आणि पांढर्‍याशुभ्र पावाची जोडी अवतीर्ण व्हावी. त्यासोबत नवपरिणीत वधूबरोबर पाठराखिणीसारख्या येणाऱ्या खमंग तळलेल्या भज्यांची प्लेट आणि अधमुर्‍या ताकाचा शुभ्र चषक पेश करावा.

आपण जगाचा विचार सोडून काठोकाठ भरलेल्या मिसळ-रश्श्याच्या बोलकडे आणि भज्यांकडे एकदा मन भरून बघत ‘चांगभलं’ म्हणत मिसळीवर ताव मारावा. ताकात चिमटीएवढीच मिठाची कणी घालत त्याचा पेला रिचवावा. 'प्लीज, रिटायर होऊ नकोस रे' अशी विनवणी करायची वेळ आणणाऱ्या गावसकरच्या बॅटिंगसारखी हुरहूर लावत, तरी समाधानानं योग्य वेळेत मिसळीच्या कार्यक्रमाची चवदार सांगता व्हावी. आणि कार्यक्रम न राहता तो मिसळीचा महोत्सवच होऊन जावा...

पुणे फूड फेस्ट सादर करत आहे - ‘पुणे मिसळ महोत्सव’, पुण्यात पहिल्यांदाच. तोही आमराईत.

इथे मिळेल हरतर्‍हेची मिसळ. गोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ, कोल्हापूरची झटका देणारी मिसळ, नाशिकची चटकदार मिसळ, बिर्याणी स्टाईल ‘दम’ मिसळ, जैन मिसळ, १००% उपासाची आणि तरीही ‘तर्रीदार’ मिसळ. थोडक्यात, तुम्हांला जशी पाहिजे तश्शी मिसळ! सोबत कांदाभजी, वडे, चहा, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळी डेझर्टस् तर आहेतच. शिवाय मनोरंजनाचे इतरही बरेच सुखद धक्के असणारेत.

तर पुण्यातल्या पहिल्यावहिल्या मिसळ महोत्सवात सहभागी व्हा, सिंहगड पायथ्याला अगदी खर्‍या निसर्गाच्या सान्निध्यात. मिसळीचा आस्वाद घ्या, ’टिपीकल’ हॉटेलात नाही, तर मस्त आंब्यांच्या झाडाखाली टेबल-खुर्चीचा जामानिमा मांडून.

नक्की या, कारण एकूणच 'चुकवू नये' अशा काहीपैकी असणार आहे सगळंच.

पुणे फूड फेस्ट आयोजित ‘पहिला पुणे मिसळ महोत्सव’.

आमराई, गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे, पुणे - ४११ ०२५.

(मायबोलीकरांना सहज आठवण म्हणून - सिंहगडावरच तेरा वर्षांपूर्वी पहिल्यावहिल्या वर्षाविहाराची सुरुवात झाली होती).

दिनांक - ७, ८, ९ ऑक्टोबर, २०१६.

वेळ - शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
शनिवार, दि. ८ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
रविवार, दि. ९ ऑक्टोबर - सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.

***

मायबोली.कॉम या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.

***

कैवल्यसिंह's picture

9 Nov 2016 - 8:49 pm | कैवल्यसिंह

पुण्यात मिसळ कुठे चांगली मिळेल? आस्सल पुणेरी मिसळ..

प्राची१२३'s picture

10 Nov 2016 - 5:08 pm | प्राची१२३

१. बेडेकर मिसळ, नारायण पेठ
२. रामनाथ मिसळ, टिळक रोड
३. काटाकिर मिसळ, कर्वे रोड

कैवल्यसिंह's picture

10 Nov 2016 - 6:29 pm | कैवल्यसिंह

म्हणजे खाण्याचा गाडा किंवा एखादी टपरी किंवा एखादा स्टॉल जिथे चांगली मिसळ मिळेल?