रोज किती पाणी प्यावे?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
24 Apr 2022 - 7:24 pm

रोज किती पाणी प्यावे?

शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे

रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे

रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे

आयुष्याच्या वाटेवरआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकालगंगाकैच्याकैकविताकोडाईकनालगणितचाहूलजिलबीजीवनतहानदुसरी बाजूमराठीचे श्लोकमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितालावणीवाङ्मयशेतीविडम्बनपाकक्रियामुक्तकआईस्क्रीमथंड पेयरस्सावाईनशाकाहारीशेतीसरबत

प्रतिक्रिया

माहितगार's picture

24 Apr 2022 - 7:31 pm | माहितगार

सुडंबन प्रेर्ना: रोज किती पाणी प्यावे?

कुमार१'s picture

24 Apr 2022 - 7:38 pm | कुमार१

छान आहे.

चौथा कोनाडा's picture

25 Apr 2022 - 1:07 pm | चौथा कोनाडा

मस्तच !

एका लेखाचे सार, ३-४ कडव्यात.
हेच तर कवितेचे वैशिष्ट्य !

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Apr 2022 - 2:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

कसे आहात?
इतके दिवस कुठे गायबला होतात?
परत फॉर्मात आलेले दिसताय
लिहित रहा
पैजारबुवा,

माहितगार's picture

25 Apr 2022 - 2:51 pm | माहितगार

@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही.

अनेक आभार

पाषाणभेद's picture

29 Apr 2022 - 9:43 am | पाषाणभेद

टिंग डिंग टिडींग....

आता पुढील कार्यक्रम...
आपली माणसं अन त्यांची झालेली माती

टिंग डिंग टिडींग....