'गोम' ह्या कथेविषयी काही
नमस्कार मंडळी. मी भागो. मी विज्ञान कथा, कल्पनारम्य कथा, विचित्र कथा, माफकभीती कथा, माफक विनोदी कथा लिहितो. काही लोकांच्या मते मी ‘काहीच्या काही’ कथा लिहितो. माझ्या कथा वाचून वैतागलेले म्हणा किंवा कंटाळलेले म्हणा अश्या मिपा वरील एका बुजुर्ग आयडीने अत्यंत नम्रपणे मला संदेश दिला की, “अहो तुम्ही काय लिहिता त्याबद्दल कथेत थोडे तरी स्पष्टीकरण देत जा.”
कदाचित त्यांचा रोख असा असावा की तुम्ही काय लिहिता ते तुम्हाला तरी समजतंय का?
सध्या माझी ‘गोम’ कथा बोर्डवरच आहे. ह्या कथेत वैज्ञानिक कल्पना ठासून भरलेल्या असल्याने ही संधी साधून (मौकेका फायदा उठाना.) मी हा लेख लिहित आहे.