अभय-लेखन
"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा
दिनांक : ०१-०७-२०१४
"माझी गझल निराळी" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा
शब्दांजली प्रकाशन, पुणे तर्फे दिनांक २९-०६-२०१४ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे सकाळी ११:३० वाजता "माझी गझल निराळी" या गझलसंग्रहाच्या दुसर्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगीता जोशी, सौ. विनिता देशमुख आणि डॉ. अविनाश भोंडवे उपस्थित होते.
मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका
मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका
माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा
माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....
माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....
सूर्य थकला आहे
सूर्य थकला आहे
पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे
वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे
देव पाहिलेला माणूस
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला
स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला
मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला
माझ्या सारख्या बर्याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला
काय देवा आज इकडे कुठे? मी देवाला विचारले
त्यावर त्याने नुसतेच डोके इकडून तिकडे झटकले
त्याच्या मौना कडे दुर्लक्ष करत मी दोन्ही हात जोडले
आशिर्वाद म्ह्णून त्याने फक्त त्याचे दोन्ही कान हलवले
रंग आणखी मळतो आहे
रंग आणखी मळतो आहे
रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे
गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे
मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे
पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !
भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे
बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे
ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे
'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे
- गंगाधर मुटे
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
अमेठीची शेती
अमेठीची शेती
सांगा कशी फ़ुलावी, तोर्यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी
देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!
झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी
कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी
पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी
सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी
ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी
बोल बैला बोल : नागपुरी तडका
बोल बैला बोल : नागपुरी तडका
बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!
नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!
थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस
वादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस
तेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई
तरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई?
लुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...!
मरणे कठीण झाले
मरणे कठीण झाले
जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले
ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले
हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले
कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले
बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले
सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले
एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले
जीवनाचे कोडे
रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी ,
घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट,
अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा ,
आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि,
आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे,
लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा,
करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा,