जीवनाचे कोडे
रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी ,
घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट,
अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा ,
आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि,
आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे,
लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा,
करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा,
उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे
हम्म..!!
छाण कविता
तुम्हाला कसे हो सुचते?
मस्त..
आता पाहतो रोज वाट रविवारची।
खरडायचा फळा.
बघा ना राव,