शतशब्दकथा : दहशत!!
मध्यरात्रीची वेळ .मित्राबरोबर दुकानाच्या पायरीवर गप्पा मारत बसलेलो. दुरूनच एक पांढरी स्कॉर्पिओ येताना दिसली."जरा जास्तच वेडीवाकडी चाललीये " मित्राला बोललो तोवर खाड ..माझ्या गाडीचा बंपर उखडून स्कॉर्पिओ पुढे गेलीसुद्धा.ताडकन उठून मित्राच्या बाईकला किक मारली आणि एकदोन चौक टाकून स्कॉर्पिओ गाठलीच. बाईक आडवी लावली आणि ड्रायव्हरला एकदोन शिव्या हासडल्या.तेव्हढ्यात मागची काच खाली झाली आतमध्ये एक दाढीवाला ,सफेद कपडे ,हातात,गळ्यात जाड चेन घालून ,तो पण फुल टाईट. "कोण रे? काय पायजे? " जरा फाटलीच .