मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात परभणीशहरापासून अंदाजे ३५/४० कि. मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर हे धारासुर हे छोटेसे गांव आहे. याच गावात गुप्तेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर नदीच्या काठावर असल्याने जवळपास ८ फूट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मुखमंडप, मंडप, दोन अर्धमंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा मंदिराचा प्लॅन आहे. मंदिराला पिठावरून प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्ग आहे. मंदिराच्या भिंती काळ्या पाषाणात बांधलेल्या असुन मंदिराचे शिखर महाराष्ट्रात नेहमी आढळणा-या भूमिज या शैलीचे आहे. (गोंदेश्वर (सिन्नर), अम्रुतेश्वर, खिरेश्वर, झोडगे ही महाराष्ट्रातील अजुन काही भूमिज मंदिरे) या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिखर पक्क्या म्हणजेच भाजलेल्या विटांचा वापर करुन बांधलेले आहे. मंदिराच्या शिखराचा काही भाग सध्या ढासळलेला आहे. पुरातत्त्वखात्याने मंदिराच्या डागडुजीकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
.
मंदिराची दक्षिणेकडील बाजू
.
मंदिराची उत्तरेकडील बाजू
.
मंदिराचे पक्क्या विटांनी बांधलेले शिखर
.
मंदिराचा दर्शनी भाग, मुखमंडप, दक्षिणेकडील अर्धमंडप व कक्षासनाची बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम असलेली भिंत
.
मंदिराच्या कक्षासनाची बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम असलेली भिंत
.
आज जरी मंदिरातील मुख्य देवता शिव म्हणजेच शिवलिंग असले तरी एकेकाळी हे मंदिर नक्कीच विष्णू या देवतेचे असावे. याचे कारण म्हणजे मंदिराच्या बाह्य भिंतीवरील बहुतेक सर्व शिल्पे विष्णूची आहेत. या मताला पुष्टी देणारा अजुन एक पुरावा म्हणजे मंदिराच्या परिसरात अलीकडेच सापडलेली एक अप्रतीम विष्णू मूर्ती. ही विष्णु मूर्ती सध्या मंदिराजवळच्या दुस-या एका मंदिरात ठेवलेली आहे.
.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील देवकोष्ठतील बैठ्या विष्णूची प्रतिमा
.
मंदिराजवळ सापडलेली अप्रतिम विष्णुची प्रतिमा
.
मंदिराच्या बाह्य भिंतीवर तीन देवकोष्ठे आहेत व या देवकोष्ठांतही विष्णुचीच तीन रुपे आहेत. या शिवाय मंदिराच्या बाह्यभिंतीवर अनेक सुरसुंदरींची अप्रतिम शिल्पे आहेत. त्यात प्रमुख्याने पत्रलेखिका, पुत्रवल्लभा, दर्पणा, कर्पुरमंजिरी, तिलोत्तमा, मर्दला अश्या विविध सुरसुंदरी आहेत. यांच्या बरोबरच मंदिराच्या बाह्य भिंतीवर मदन, चामुंडा, गणपती अशा काही देवताही आहेत.
.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील मदनाची प्रतिमा
.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील पत्रलेखिकेची प्रतिमा
.
मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजुन एक विष्णु प्रतिमा
.
मंदिरात पुर्व, उत्तर व दक्षिण असा तीनही दिशांकडून प्रवेश करता येतो. मंदिराच्या मुखमंडप व अर्धमंडपात कक्षासने आहेत. या कक्षासनाच्या भिंतींवर बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम आहे.
मंदिराची द्वारशाखेवरही अप्रतिम कोरीवकाम असुन द्वारशाखेच्या दोन्ही बाजूंवर वैष्णव द्वारपाल व चामरधरिणी आहेत. ललाटबिंबावर बसलेल्या गणपतीचे शिल्प आहे मात्र त्याला शेंदूर फासल्याने त्याच्या हातातील आयुधे नक्की समजत नाहीत.
.
मंदिराची द्वारशाखा
.
मंदिरातला चालुक्य शैलीचा खांब
.
मंदिराजवळच्या दुस-या मंदिरात असलेली महिषासुरमर्दिनीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती
.
मंदिराच्या जवळुन दिसणारे गोदावरी नदीचे विशाल पात्र
.
हे मंदिर १२/१३ व्या शतकात म्हणजे उत्तर चालुक्य यांच्या काळात बांधले गेले असावे.

वाचने
10741
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटू का दिसत नाहीयेत!
छायाचित्रे दिसत नाहीयेत पण
खरय नुसत्या वर्णनावरुनही तसे
In reply to छायाचित्रे दिसत नाहीयेत पण by प्रचेतस
आज जरी मंदिरातील मुख्य देवता
बदलण्याचे कारण म्हणजे
In reply to आज जरी मंदिरातील मुख्य देवता by माहितगार
मलाही हि शक्यता अधिक पटते आहे
In reply to बदलण्याचे कारण म्हणजे by प्रचेतस
छान लेख
दुसर्या छायाचित्रातील
In reply to छान लेख by प्रसाद_१९८२
स्त्रीवाद्यवादिनी
अवांतर
In reply to स्त्रीवाद्यवादिनी by श्रीनिवास टिळक
मिपावर चित्रे टाकण्याची कृती:
मंदीराचे स्थापत्य व कोरीवकाम
In reply to मिपावर चित्रे टाकण्याची कृती: by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to मंदीराचे स्थापत्य व कोरीवकाम by डॉ सुहास म्हात्रे
मिपावर चित्रे टाकण्याची कृती:
In reply to मिपावर चित्रे टाकण्याची कृती: by डॉ सुहास म्हात्रे
लेख आणि फोटो दोन्हीही छान आहे
. . हिच ती औंढ्याची मूर्ती...
In reply to लेख आणि फोटो दोन्हीही छान आहे by उगा काहितरीच
विष्णूमूर्ती होयसळ शैलीतील
+१
In reply to विष्णूमूर्ती होयसळ शैलीतील by प्रचेतस
वा वा!
अत्यंत सुंदर!
मस्त फोटो आणि माहिती
चित्र क्र. ७
In reply to मस्त फोटो आणि माहिती by राजेंद्र मेहेंदळे