शतशब्दकथा : दहशत!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मध्यरात्रीची वेळ .मित्राबरोबर दुकानाच्या पायरीवर गप्पा मारत बसलेलो. दुरूनच एक पांढरी स्कॉर्पिओ येताना दिसली."जरा जास्तच वेडीवाकडी चाललीये " मित्राला बोललो तोवर खाड ..माझ्या गाडीचा बंपर उखडून स्कॉर्पिओ पुढे गेलीसुद्धा.ताडकन उठून मित्राच्या बाईकला किक मारली आणि एकदोन चौक टाकून स्कॉर्पिओ गाठलीच. बाईक आडवी लावली आणि ड्रायव्हरला एकदोन शिव्या हासडल्या.तेव्हढ्यात मागची काच खाली झाली आतमध्ये एक दाढीवाला ,सफेद कपडे ,हातात,गळ्यात जाड चेन घालून ,तो पण फुल टाईट. "कोण रे? काय पायजे? " जरा फाटलीच . तरीपण उसने अवसान आणून गाडी ठोकल्याबद्दल नुकसान भरपाई मागितली."पैशे पायजे तुला?" त्याने मांडीवरचा टॉवेल बाजूला केला.
------------
टॉवेल खाली एक बोट रिवॉल्वरच्या ट्रिगरवर ठेवलेले.विषयच संपला.
प्रतिक्रिया
वाढती गुंडागर्दी :(
छान
का कोण जाणे पण मला वाटत कि
नाही.
आर्र तिच्या!!
हेहेहे
बापरे
ऑइ. खरी आहे?
जब्रा.
धन्यवाद बिरुटे सर
पुढे वाढवली तर चालेल का?
दंडवत
जोडकाम मस्त जमलंय!
extension आवडलं..
कुणीही सतत भीतीमध्ये जगू शकत नाही.
वा वा!!
खतरनाक!
मूळ कथेला दिलेला जोड आवडला पण
हे राहून गेलेलं वाचायच! _/\_
मुळ कथा व बोकोपंतांचे जोडकाम
जबरदस्त!
मस्तच