मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

शब्दबम्बाळ ·
प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे... नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूचे विमान किती भारी... भारी फिरतंय तेही दुनिया सारी... सारी दुनियेचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा गोट्याचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूला आवडे पुरण पोळी... पोळी पण भलत्याच महाग झाल्या डाळी...

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

तुमचे आवडते "इंग्रजी सिनेमांचे थीम संगीत" कोणते?

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिंदी सिनेमांना थीम संगीत नसतेच असे नाही, पण पण त्यांची धाव ही "टायटल साँग" पुरतीच मर्यादित. कोणे एके काळी हिंदी सिनेमांना टायटल साँग असणे अनिवार्य होते. उदा, "जब प्यार किसि से होता है" किंवा "युं तो हमनें लाख हसीन देखे है." किंवा मग टायटल साँग नसेल तर, मग जंगली सिनेमातील "ऐहसान तेरा हो गा मुझपर" हे गाणे.

हिंदी सिनेमा वाल्यांचे आवडते वाद्य कोणते?

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर : १. खालील लेखातील मते ही माझ्या हिंदी सिमातील तुटपुंज्या ज्ञावर आधारीत आहेत.हा वैचारीक लेख नसल्याने (तसे आमचे कुठलेही लेख जास्त विचार करण्यासारखे नसतात, हा भाग वेगळा) खूप विचार करणार्‍या व्यक्तींनी ह्या लेखाकडे कानाडोळा केलात तरी चालेल. २. दुसरी गोष्ट म्हणजे मला वाद्यांमधले अजिबात काही समजत नाही. पिपाण्या : म्हनजे फुंकायची वाद्ये ह्यात बासरी पासून सनई पर्यंत सगळी वाद्ये. खाजवायची वाद्ये : सतार, तंबोरा. व्हायोलिन. बडवायची वाद्ये : तबला-डग्गा, ढोल, नगारा इत्यादी.

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |३|

संजय क्षीरसागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
इतकी प्रदीर्घ शेरोशायरी आजपावेतो कोणत्याही गज़ल पूर्वी झालेली नाही. पण हीच फैझची ख़ासियत आहे. त्याच्या सृजनात्मकतेचा ठाव घेता येत नाही. प्रत्येक ओळीगणिक तो आणखी जादूमय होत जातो आणि नशेची खुमारी वाढत जाते. कल जो पी थी अजी, ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही | प्रियकर प्रेयसीला समजावतोयं, मला जी नशा आहे ती कालच्या दारुची आहे. आज, तुझी शपथ, मी प्यालेलो नाही ! ________________ आज कुछ तो नशा, आपकी बात का है, और थोडा नशा, धिमी बरसात का है, हमें आप यूं ही, शराबी न कही ये, ये दिलपे असर, तो मुलाक़ात का, ...

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |

संजय क्षीरसागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
फैझ अहमद फैजची ही रचना विजय सिंंगनं गायली आहे. विजय सिंग केवळ या एका गाण्यामुळे अजरामर झालायं आणि शराबींसाठी हा कलाम म्हणजे जगातल्या कोणत्याही काव्यापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरावा असा आहे. जे (किंवा ज्या) पीत नाहीत त्यांच्यासाठी हा लेख काही कामचा नाही, त्यांनी उगीच रंगाचा बेरंग करु नये.

मदत - रामरक्षा स्तोत्र..

चिगो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक मदत हवीय.. प्राचीन मिपात, २०१२ च्या सुरवातीच्या काळात, कुणीतरी एका धाग्यात एका भरपूर स्तोत्र असलेल्या वेबपेजची लिंक दिली होती. त्यात एक कुठल्यातरी दाक्षिणात्य (उच्चारांवरुन) गायकानी पठण केलेलं रामरक्षा-स्तोत्र ही होतं. अत्यंत भारावून टाकणारी लय होती त्या पठणात. उच्चारदेखील खणखणीत आणि स्पष्ट होते. मी त्यावेळी ते डाऊनलोड केलं होतं, आणि ऑलमोस्ट रोज रात्री ऐकायचो त्यावेळी.. पण आता ते मला सापडत नाहीये. डाऊनलोड केलेली फाईलदेखील हरवली आहे, आणि मी त्याकाळातल्या माझ्या मिपा भटकंतीचा धुंडाळा घेतला, त्यातही ती लिंक सापडत नाहीये.

लाल टांगेवाला

रासपुतीन ·
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे. यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे.

मुन्तजिर

मिडास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार कुठल्याही नातेसंबंधात अपरिहार्यपणे येणारे हे भोग. कुणी कधी जिंकतं तर कधी कुणी हरल्याचं दाखवतं. पण साचत जातं काहीतरी आतल्या आत. घुसमट होते. तापलेल्या मनावर पुटं चढत जातात अपमानाची आणि मग कधीतरी कोंडलेली वाफ नको तिथे फुटते. पोळून निघतात मनं. मग रस्ते वेगळे होतात. दिवस जातात, वर्षं उलटतात. आणि मग एखाद्या नाजूक क्षणी जुनी पायवाट आठवते. भुरभुरणाऱ्या पावसात पसरणारा मातीचा गंध दाटून येतो छाती भरून. फिरून कुणाला तरी परत भेटावं अशी आस लागते. दूर आहे म्हणून काय झालं, शेवटी कुठलातरी चिवट बंध रेंगाळतोच मागे. त्याच रेशमी धाग्याला पकडून कुणीतरी साद घालतं.

दश्त-ए-तनहाई में - तृप्ती आणि हुरहूर

पिशी अबोली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुराव्याच्या दु:खाला सौंदर्याची किनार देण्याची ताकद उर्दू भाषेत जबरदस्तच आहे. दु:ख बुडवून ठेवलेल्या खोल डोहाला न डुचमळता हळूच स्पर्श करावा, आणि विरत जाणार्‍या तरंगांना नि:शब्दपणे पाहत रहावं, असं काहीसं काव्य या उर्दू कवींचं.